बळीराज किंकर अख्नंडीत माझे

छन्दीष्ट्य वातावरणी
जर्जर धारा हि सारी
जरब कायम असे दिनकराची
दुर्भिक्ष्य ते जान्हवीचे पाणी II

यति नग सारे
काष्ठ मांडी हाट सारा
त्रागा मरुत वाही
रिक्त अंबार सारे II

कंगाळ बळीराज
करी मख
घेउनि नांगर हाती
अर्ध्वयु अवतरती स्वअभ्युदयासि II

अक्षर आरोहण अर्ध्वयु
ते साधे
अनृत अनुज मानुनी
बलीराजासी
उध्रुत उधम इंद्रजाल सारे
बळीराज किंकर अख्नंडीत माझे II

{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

शेतीपासून गुरे वेगळी काढल्याने हाल होतात.
( कवितेमधले बरेच शब्द डोक्यावरून गेले.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजकालचे वातावरण लहरी आहे , पाऊस चांगला पडेल असे हवामान खाते सांगते पण तो काही पडत नाही . त्यांची जी काही वैज्ञानिक उपकरणे आहेत त्यांना तो चांगलाच झुलवतो . हे झालं ( छन्दीष्ट्य वातावरण)
जान्हवी म्हणजे नदी .. यती म्हणजे संन्यासी आणि नाग म्हणजे पर्वत जे आता फार कमी उरले आहेत .. मातीपण चोरतायत लेकाचे .. काष्ठ म्हणजे सुके लाकूड , झाडं तोडून कायद्याच्या दृष्टिकोनातून अपराधी होण्यापेक्षा मोरचूद वगैरे वापरून झाडं मारता येते , जमीनही मोकळी आणि आयते लाकूडही मिळते . वार्याला याचा राग येतो , तो त्रागा वाहून व्यक्त करतो .. या सर्वांचे दुष्परिणाम म्हणजे बळीराजाचे कोठार ( अंबार) रिक्त राहते .
तो बिचारा जमिनीचा यज्ञ ( मख ) करत असतो नेहेमीप्रमाणे नगर घेऊन आणि इथे आपले पुढारी ( फक्त पुढे पुढे करणारे , आयते बाईट देणारे , समाजाचं मन ह्यांनाच कळते असे दाखवणारे म्हणजेच अर्ध्वयु येतात आणि स्वतःचाच भाग्योदय करून घेतात .)
कुठला आमदार खासदार गरीब आणि साधा राहिलेला बघितलाय का ? असेल तर एकदम विरळ . ते स्वतःच कायम म्हणजेच अक्षर प्रगती करत राहतात . हे सर्व करताना दाखवतात मात्र जनतेचे कैवारी असल्यासारखे . खोटे म्हणजेच अनृत आणि अनुज म्हणजे भाऊ बंद असल्यासारखे .

हे सर्व मायाजाल देश स्वतंत्र झाल्यापासून असेच आहे , पक्ष कुठलाही असो , गरीब अजून गरीब होत आहेत आणि श्रीमंत अजून गब्बर पण आपले शेतकरी मात्र एव्हढी सारी मेहनत करूनही ह्या हरामखोर दलालांचे दास आहेत म्हणजेच किंकर आहे आणि ते कायम राहतील .... हे विष ओकलंय आज मी .. बर्याच ठिकाणी हि पेस्तवली पण आज तुम्ही संधी दिलीत व्यक्त होण्याची त्याबद्दल धन्यवाद साहेब .. हि अशीच विखारी लिखाणं माझ्या हातून सदैव घडत जाऊ देत हीच त्या श्री चरणी प्रार्थना

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या कवितांचे विषय आणि त्यांच्या कल्पना हटके असतात. तुम्ही त्यामागे बराच विचार केलेलाही दिसून येतो. हे कौतुकास्पद आहे. तुम्ही कविता लिहित राहावं असं माझं मत आहे.

पण एक मनापासून विचारतो, रागावू नका. एका कवितेसाठी तुम्ही किती कष्ट घेता? मर्ढेकरांनी त्यांच्या आयुष्यभरात शंभर कविता लिहिल्या. कोलटकरांनी दोनतीनशे, विंदांनीही साधारण तितक्याच किंवा कदाचित थोड्या जास्त. नारायण सुर्वेंचीही तीच गोष्ट. या कवींपैकी सुर्व्यांनीतरी 'मी एक कविता डोक्यात अनेक दिवस, काही वेळा अनेक महिने घोळवतो. प्रत्येक शब्द त्याच्या जागी योग्य व्हायला पाहिजे असा प्रयत्न करतो. तो मनासारखा सापडेपर्यंत मला अस्वस्थ वाटत राहातं.' असं म्हटलेलं आहे. वरच्या इतर कवींचं एकंदरीत आउटपुट पाहाता त्यांच्या बाबतीतही तेच सत्य असावं.

मात्र सेल्फ पब्लिकेशनच्या आजच्या जगात आपण काय आणि कसं म्हणतो यापेक्षा आपण काहीतरी म्हणतोय बुवा यालाच अधिक महत्त्व येतं आहे का? कारण अनेक चांगले कवीही दिसामाजी कविता लिहिताना दिसतात.

हे केवळ तुम्हा उद्देशूनच नाही, माझा सर्वसामान्य प्रश्न आहे. कारण शब्दांवर प्रभुत्व असलेल्या अनेकांना वर्षाकाठी पंचवीस पन्नास कविता लिहिताना मी पाहातो. व्हॊल्यूम वाढला की क्वालिटी ढासळते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

# """ तुमच्या कवितांचे विषय आणि त्यांच्या कल्पना हटके असतात. तुम्ही त्यामागे बराच विचार केलेलाही दिसून येतो. हे कौतुकास्पद आहे. तुम्ही कविता लिहित राहावं असं माझं मत आहे. """

या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद राजेश साहेब . मी स्वतःला कवी कधीच समजलो नाही कारण मुळात मला त्याबद्दल काही माहीतच नाही आहे . हे माझे अगदी प्रांजळ मत आहे . राहता राहिला या लेखनाचा विषय तर तो मी जे स्वतः बघतो किंवा अनुभवतो त्यातून ते बाहेर येते . जे काही वाटते ते लिहायचे आणि आंजावर सोडायचे . अजून एक सांगतो साहेब , आतापर्यंत मी जे काही लेखन केले आहे , त्याला जास्तीत जास्त दहा मिनिटे लागली असतील त्यापेक्षा अधिक नाही . कुणाच्या कविता मी कधी वाचल्याच नाहीत त्यामुळे गद्य आणि पद्य काय असते त्याचा संबंधच येत नव्हता . हे सर्व हौसेखातर आणि जर कुणी विचारलेच कि बाबा हे तू काय आणि का म्हणून लिहिले आहे तर ते वाचताक्षणी मी त्या प्रसंगात शिरतो आणि स्पष्टीकरण देतो .
एक रोचक किस्सा सांगतो साहेब , मागे मी एकदा ठाण्याला एक प्रकाशक आहेत त्यांना भेटायला गेलो होतो . मी सर्व साहित्य घेऊन त्यांना भेटायला गेलो . त्यांनी ते व्यवस्थित वाचून काढले . त्यातील त्यांना काही आवडले ते बाजूला काढून त्यांची मोजणी केली . ते म्हणाले कि प्रकाशित करायचे असेल तर किमान ७० च्या वर असतील बरे होईल . तुम्हाला एक कविता लिहायला किती वेळ लागतो ? मी त्यांना सांगितले ५ ते १० मिनिटे . ते खो खो हसायला लागले . ते म्हणाले विंदांच्या पण पुढे आहेत राव तुम्ही . त्यांचा तो सूर मला थोडा उपरोधिक वाटला आणि मी त्या पुन्हा प्रकाशित करायच्या भानगडीत पडलो नाही . त्यामुळे कि काय बहुधा हाच स्वप्रकाशनाचा मार्ग मला योग्य वाटतो . इथे टंकले कि पुढे काय होते आहे ते सतत काळात राहते आणि आपण वाचकांच्या सतत संपर्कात राहतो . आपल्याबद्दल इतरांची काय काय मते आहेत तेही समजावून घेता येते . जेणेकरून पुढे काय करता येईल अथवा काय करू नये याचे तरी ज्ञान होते .

# """ मात्र सेल्फ पब्लिकेशनच्या आजच्या जगात आपण काय आणि कसं म्हणतो यापेक्षा आपण काहीतरी म्हणतोय बुवा यालाच अधिक महत्त्व येतं आहे का? कारण अनेक चांगले कवीही दिसामाजी कविता लिहिताना दिसतात.""
मी याबाबद्दल काहीही सांगू शकत नाही साहेब . कारण मला वाटत मी " मला हे सांगायचे आहे , पटलं तर बघा नाहीतर सोडून द्या गंगेला " या वर्गात मोडतो असं वाटत .

# """कारण शब्दांवर प्रभुत्व असलेल्या अनेकांना वर्षाकाठी पंचवीस पन्नास कविता लिहिताना मी पाहातो. व्हॊल्यूम वाढला की क्वालिटी ढासळते का?"""
हे कदाचित खरं असू शकत कारण मी स्वतः कित्येकांना केविलवाणे प्रयत्न करताना बघितलेले आहे . इथे नाव घेणे योग्य नाही पण मलातरी त्यांचे लिखाण फारच कंटाळवाणे वाटले . ओढूनताणून उपमा , फक्त तेच तेच प्रेमाचे रताळ विषय आणि दुसरं काही नाही . त्यामुळे वोल्युम वाढला कि दर्जा ढासळत असावा . किंबहुना तुम्हाला एकाच विषय असेल लिहायला उदाहरणार्थ प्रेम तर तुम्ही त्यात किती वेगळेपण लिहिणार . प्रेमाची व्याख्या हि जगजाहीर आहे . पण तेच जर तुम्ही प्रेमात घडलेले किस्से रंगवून सांगितले तर किती मजा येईल . हा प्रयत्न मी नेहेमी करत असतो . त्याचेच उदाहरण आता पुढे मी देणार आहे ते वाचावे हि नम्र विनंती ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय तुमचे विषय चांगले असतात पण कवन म्हणून वाचताना फारच ख़डे लागतात. त्यामुळे आजवर कोणत्याच "कविते"ला प्रतिसाद दिला नाही. इथेच ऐसीवर माधव जूलिअन यांचे छंदोरचना आहे. आपला काव्यरचनेचा इतिहास वाचून पाहा. नक्की फरक पडेल. व्यक्त होत राहा, पण निवडलेल्या साहित्यप्रकाराची बूजही राखा. शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद उज्वला ताई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरचे प्रतिसाद वाचले. कविता म्हणतात कारण त्यात काही उपमा कल्पना असतात. कधीकधी गाता येईल इतकी छंदोरचना सर्वांनाच जमेलच असे नाही. पण गद्य अस्ताव्यस्त होत जाण्याचा कल असतो तसा पद्यात होत नाही. यामुळे तुमचे पद्य आवडते. एका पद्यात एक विचार पटकन मांडून संपवलेला असतो.

पन्नासच्या आसपासचे / अगोदरचे मराठी लेखन फार कमी वाचले त्यामुळे बरेच शब्द अडले. ते विचारून घेतले.

एक पर्याय म्हणजे एका लेखात तीन कविता देता येतील. खिलजिने मूर्ती फोडल्या त्याशी नावाचा काही संबंध?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खिलजी नाव धारण करण्यामागे वेगळी पार्श्वभूमी आहे आणि मला वाटत ती इथे सांगणे योग्य ठरणार नाही .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0