गूज

हातात हात घेऊन चालायचे का काही अंतर?
वाट असो कितीही काटेरी
अथवा अपुरा असेल आपला दमसास
पण घ्यायचा का अनुभव चालायचा, मस्तीत?

वेडावुन जायचे ठरवले ना आपण
तर मग खंत कशाला वेडेपणाची?
आणि कोसळलोच जर कड्यावरून
तर परततील तुषार इंद्रधनुच्या वलयात
प्रपाताप्रमाणे आपलेही, कदाचित.

मावळतीच्या क्षितिजावर
सावल्यांची नक्षी होणार असलोच जर
तर उगवतीच्या रक्तगात्री
आशांचे मोती का न उधळावे आपण?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गूज Goose

(चित्र विकीवरून साभार.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तळटीप विसरली का नबा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0