रात्र उजळवणारा कृत्रिम "चंद्र"

रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशाकडे आपण काही वेळ पहात राहिल्यास एखादा दुसरा उल्का आकाशातून जमिनीकडे झेप घेताना दिसल्याशिवाय राहणार नाही. आकाशातील तारेच तुटून पडतात की काय वा आकाशात कुणी तरी दिवाळीची आतिषबाजी करत आहेत की काय असे लहानपणी आपल्याला वाटायचे. परंतु आजकल शहरातील आकाशच नव्हे तर खेड्यातील आकाशसुद्धा तेवढे निरभ्र नसतात. त्यामुळे उल्कापाताच्या वा पिठूर चांदण्यात फिरण्याच्या आनंदाला आताची पिढी पूर्णपणे मुकत आहे. नैसर्गिक सौंदर्यापेक्षा कृत्रिम सौंदर्याकडे ओढ असलेल्या आजच्या जगात सर्व काही स्क्रीनवर कॅप्चर करण्यातच धन्यता मानणाऱ्यासाठीच आकाशातील चंद्राला एक सोबती आणण्याचा घाट आजकाल घातला जात आहे. चीनचे तंत्रज्ञ अवकाशातच एक कृत्रिम सृष्टीच्या निर्मितीचे स्वप्न पहात आहेत.दीड कोटी लोकसंख्या असलेल्या चेंगडू शहरावरील अवकाशात प्रायोगिक स्वरूपात एक कृत्रिम चंद्र स्थिर करण्याचा प्रयत्न चीनी तंत्रज्ञ करत आहेत. आपण नेहमी पहात असलेल्या चंद्रासारखा तो दिसेल. परंतु तो नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा आठ पट जास्त प्रकाशमान असेल. त्यामुळे त्या शहराला रस्त्यावरील दिव्याची गरज भासणार नाही, असे चेंगडू एरोस्पेस या संशोधन संस्थेचा दावा आहे. त्यामुळे जगभरातील खगोल शास्त्रज्ञांना आश्चर्याचा धक्क बसत आहे.

humanity moon गंमत वा जाहिरात किंवा प्रतिष्ठेसाठी म्हणून अवकाशात काहीना काही तरी उडवत ठेवण्याची एक फॅशन आजकाल प्रचलित आहे. काही महिन्यापूर्वी न्यूझिलँडच्या रॉकेट लॅबने ह्युमॅनिटी स्टार नावाचा आरशाचा चेंडू अवकाशात प्रक्षेपित केला होता. खरे पाहता तो चेंडूसारखा पूर्ण गोलाकारही नव्हता; सुमारे एक मीटर व्यास असलेल्या या चेंडूच्या पृष्ठ भागावर 76 त्रिकोनाकारातील आरसे चिकटवलेले होते. दक्षिणोत्तर दिशेत भ्रमण करणाऱ्या ताऱ्यासारखा हा चेंडू दर 92 मिनिटाला पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्णकरत होता. व रात्रीच्या वेळी दुर्बिणी विनासुद्धा कुणालाही तो दिसत होता. याच्या वीक्षणामुळे किती जणांना आनंद झाला हे माहीत नसले तरी खगोल-अभ्यासक मात्र आकाशदर्शनातील अडथळा म्हणत रागाने लालबुंद झालेले होते. दुर्बिणीतून आकाशदर्शन करणाऱ्या हौशी अभ्यासकांना मात्र अजून एक वस्तू निरीक्षणासाठी मिळाला होता. हा प्रकार म्हणजे उपद्रवी गंमत वा अवकाशात टाकलेला कचरा असेही अनेकांना वाटत होते. तरीही हा आकाशचेंडू सर्व टीका सहन करत व माध्यमात कुतूहल निर्माण करत तीन महिने टिकला. परंतु हा अगाध चेंडू अपेक्षित वेळेआधीच भ्रमणावस्थेतच जळून खाक झाला व त्याची राख अवकाशात कायमचीच विलीन झाली.

roadstar हा चेंडू तर तुलनेने फारच लहान; परंतु एका हौशी महाशयानी अवकाशातील भ्रमण कक्षेत एक खरीखुरी कारच ठेवलेली आहे. इलॉन मस्क या विक्षिप्त तंत्र-उद्योजकाची ही करामत आहे. विद्युत शक्तीवर धावणाऱ्या टेस्ला कार्सची निर्मिती करून जगातील वाहतूक यंत्रणेला कलाटणी देणाऱ्या टेस्ला कंपनीच्या या प्रमुखाने आख्खी कारच अवकाशातील भ्रमण कक्षेत ठेवलेली आहे. याचीच स्पेस-एक्स कंपनी उपग्रहांचे प्रक्षेपण, पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणाऱ्या रॉकेट्सची निर्मिती, पृथ्वीवर परत येऊ शकणाऱ्या सॅटेलाइट्सची निर्मिती इत्यादी साहसी उत्पादनासाठी प्रसिद्धीच्या झोतात आहे. फॉल्कन रॉकेटच्या सहाय्याने बाहुबली टाइप शक्तीशाली रोडस्टार कारचे अवकाशात प्रक्षेपण करण्यात मस्क यशस्वी झाला. आता ही कार पृथ्वीच्या भ्रमण कक्षेच्या बाहेर जाऊन सूर्याच्या भ्रमण कक्षेत प्रदक्षिणा घालत आहे. या लाल भडक रंगाच्या कारमध्ये स्टारमॅन नावाचा स्पेससूटधारी बाहुली(ला!) ड्रायव्हरच्या आसनावर आहे. हा स्टारमॅन ताशी एक लाख किलोमीटर्स वेगाने ही कार चालवत आहे.

अंतरिक्ष युगातील या 61 वर्षात पूर्णाकारातील सुमारे 8000 वस्तू पृथ्वीच्या कक्षेच्या जवळपास भ्रमण करत ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. त्याचबरोबर कक्षेपर्यंत न पोचलेले त्रिशंकू अवस्थेतील उपग्रह, त्यांचे सुटेभाग, मोडतोड होऊन दूरवर पसरलेले हजारो वस्तूंची गर्दी अवकाशात कायंमचेच भ्रमणावस्थेत आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या कलेवराची विल्हेवाट अवकाशाच्या भ्रमण कक्षेत स्थिर करून प्रदक्षिणा घालण्यासाठी नावनोंदणी करणाऱ्यांची संख्यासुद्धा कमी नाही. अवकाशात कचरा टाकू नये अशी विनवणी करण्याची वेळ आता आली आहे. परंतु ऐकतो कोण? इलॉन मस्कची कार या कुठल्यादी तक्रारींना दाद न देत कुणाच्याही हाती न लागणाऱ्या सूर्याच्या कक्षेत भ्रमण करत आहे.अमेरिका व रशियाच्या अवकाशाच्या मक्तेदारीच्या यादीत आपणही हातभार लावत आहोत.

lighting moon चीनचा इलेक्ट्रॉनिक चंद्र निसर्गात दिसणाऱ्या चंद्राएवढासुद्धा नाही. एक प्रकाशमान ताऱ्यासारखा दिसणारा चंद्र चेंगडू शहराचा काही भागानाच देदिप्यमान करणार आहे. आरश्यावर पडणाऱ्या सौर उर्जेचा वापर करून प्रकाश किरणात परिवर्तन करण्याची यंत्रणा यात आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अशाच प्रकारचे आणखी दोन चंद्र 2020 सालापर्यंत अवकाशात प्रक्षेपित करण्याचा तंत्रज्ञांचा मानस आहे. त्यामुळे शहराचा काही भाग रात्रीच्या वेळी प्रकाशात न्हाऊन निघणार आहे. (हा चंद्र सुमारे 50 चौरस किलोमीटर् एवढे क्षेत्रफळ प्रकाशमान करू शकतो.) शहराला रात्री उजेड मिळाल्यामुळे रस्त्यावरील दिव्यासाठी लागणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात कपात होणार आहे. एका अंदाजानुसार ही बचत प्रती वर्षे सुमारे 120 कोटी युवान (173 मिलियन डॉलर्स) एवढी असेल. या इलेक्ट्रॉनिक चंद्रामध्ये दिवे विझवण्याची सोय असल्यामुळे क्रीडांगणावर वा दुर्घटनेच्या ठिकाणी प्रखर प्रकाश सोडता येईल, अशी स्वप्न तंत्रज्ञ पहात आहेत. परंतु हा प्रकल्प अपयशी ठरणार आहे, असे या क्षेत्रातील तज्ञांचा कयास आहे. कारण रशियाच्या मिर स्पेस स्टेशनवर काही वर्षापूर्वी 20 मीटर्स व्यास असलेला एक आरसा पतंगासरखा टांगून ठेवला होता. फक्त 10 मिनिटेच प्रकाश देऊन हा आरसा कुठ्ल्या कुठे नाहिसा झाला.

अवकाशात कुठलीही वस्तु स्थिर ठेवल्यासारखे दिसण्यासाठी पृथ्वीपासून सुमारे 37000 किलोमीटर्स उंचीवर जियोसेंट्रिक कक्षेत ठेवावे लागते. त्यापेक्षा जवळ असल्यास ते स्थिर दिसणार नाही. 400 किलोमीटर्स उंचीवरील रशियाचे मिर स्पेस स्टेशन स्वतःच्या जागेवरून हलत असते. या स्पेस स्टेशनला पुन्हा जागेवर आणण्यासाठी बूस्टर रॉकेट्सचा मारा करावा लागतो. चीनचा हा चंद्र चेंगडू शहराच्या अवकाशातून थोडा जरी सरकल्यास उद्दिष्ट सफल होणार नाही.

रात्रीच्या या कृत्रिम प्रकाशामुळे शहरालगतच्या अरण्य प्रदेशातील प्राणी-पक्षी यांचे जीवन उध्वस्त होऊ शकते. चीनच्या कृत्रिम चंद्राचा दावा असाच काहिसा असेल. कृत्रिम चंद्रासाठी पैसा खर्च करण्याऐवजी शहराभोवती असलेले वायू प्रदूषण नष्ट करत असल्यास शहरवासियांनी एरोस्पेस संस्थेचे आभार मानले असते.

अजून काही महिन्यानंतर स्पेस मिरर नावाची एक कलाकृतीसुद्धा अवकाशात दिसणार आहे. ट्रेव्हर पेग्लेन या अमेरिकन कलाकाराची ही कृती असून नेवाडा आर्ट म्यूजियमतर्फे 575 कि.मी. उंचीवर ते स्थिर करण्यात येत आहे. कारला अवकाशात पोचवणाऱ्या फॉल्कन रॉकेटच्या सहायाने एक बलून अवकाशात सोडले जात आहे. घड्याळातील काट्यासारखी असलेली ही वस्तु बलूनचा आकार घेत स्थिर झाल्यावर उघड्या डोळ्यांना दिसू लागेल. कदाचित दिसला नाही तरी काही फरक पडणार नाही. कारण त्याला मोबाइल स्क्रीनवर बघण्यासाठी ऑर्बिटल रिफ्लेक्टर नावाचा अँप तयार आहे.

हातावरील फोड बघण्यासाठी आरसा कशाला या म्हणीला खोटे पाडत आकाशातील चंद्रालासुद्धा बघण्यासाठी मोबाइलच उपयोगी येऊ शकेल!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

माझ्या मते ही उत्तम कल्पना आहे. जगातल्या सर्व मोठ्या शहरांतले दिवे काढून टाकून फक्त त्या भागांसाठी चंद्र निर्माण केले तर इतर भागांसाठी आकाश जास्त स्वच्छ होईल. वीजेचा खर्च तर वाचेलच, पण त्यातून निर्माण होणारा कार्बन डायॊक्साइडही कमी होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविंचा उत्साह वाढेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाचा विषय आणि लेख दोन्ही रोचक आहेत.

रात्रीच्या अंधारात बरेच गुन्हे घडतात. पाकिटमारी, बारकं हत्यार दाखवून लूटमार, लैंगिक स्वरूपाचे गुन्हे; आणि या गुन्ह्यांमुळे मनुष्यांच्या हालचालींवर, पर्यायानं रोजगाराच्या संधींवर मर्यादा येतात. अशा प्रकाश देणाऱ्या कृत्रिम उपग्रहांमुळे मानवी आयुष्यही सुधारण्यास मदत होऊ शकते.

(मात्र लेख वाचताना इंग्लिशमधून भाषांतर केल्याचं सतत जाणवत राहिलं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.