चोरीचा मामला

दुपारपास्नं डोकं जड झालं होतं. दोनच दिवस झाले होते, पण विथड्राॅअल सिम्प्टम्स् मेजर जाणवायला लागले होते.

शेवटी असह्य झालं. ताडकन् लाथेनं पांघरूण फेकलं, टीशर्ट घातला आणि घराबाहेर पडलो. मह्याला हाक मारली. तो बहुतेक माझी वाटच बघत होता भेंजो.

आमची हाऊसिंग सोसायटी जरा गावाबाहेर आहे. ("एक्स्क्लुझिव एक्स्क्लेव्ह" अशी जाहिरात केलेली बिल्डरने. भेंजो मराठी रंगार्‍याची वाट लागली असणार जोडाक्षरं लिहिताना.) तर मेनरोडवरनं खाली येणारा रस्ता वळतो तिथे जरा सुनसान असतं. लाईटपण पोरांनी क्रिकेट खेळताना फोडलीय आणि एवढ्या लांब सोसायटीने सीसीटीव्हीपण नाही लावलाय.

तर तिथे जाऊन पार्कात बाकावर बसलो. डोंबलाचं पार्क. गंजलेला सीसाॅ आहे एक फक्त. आणि एक कापलेली घसरगुंडी - तिच्यावर कोण घसरलं तर पॅन्टच फाटेल भेंजो.

तर बाकावर बसलो. सुनसान होतं. सूर्यास्त होऊन गेला होता. मह्यानं जर्किनमधनं ग्लोव्ह आणि मास्क काढले. दोघेही तय्यार झालो.

दहाबारा मिनिटात मेनरोडवरनं उतरणारा लाईट दिसला. बाईक किंवा स्कूटर होती. आम्ही पोझिशन घेतल्या. रस्त्यावर खड्डे पडले होते म्हणून त्याचा स्पीड एकदम कमी झाला. स्विगीचा माणूस होता - हंगर सेव्हियर म्हणे भेंजो.

तर मह्याने स्कूटरसमोर उडी मारली आणि त्या माणसाने स्पीड कमी केला तसा मी सुरा काढला. हंगर सेव्हियर फुल्ल टरकला होता. "मुझे छोड दो, मय गरीब आदमी हू" वगैरे बोलायला लागला. फुल्ल मावळा अॅक्सेन्ट होता.

"चूप बे" मी घोगरा आवाज काढून बोललो "बक्सा खोल". त्याने कसाबसा पत्र्याचा बाॅक्स उघडला. मह्याने एकदम काळजीपूर्वक वरचं पार्सल उचललं आणि रिसीट बघितली. "चिकन फ्राईड राईस" एवढंच बोलून त्याने पार्सल सीटवर ठेवलं. मग दुसरं पार्सल बघितलं. "अल्फ्रेडो पास्ता!? भेंजो ये शहर में पास्ता कौन खाता है?" असं करवादत तेही पार्सल त्याने सीटवर ठेवलं.

"आता माझी सटकणार" असं एकदम मी मराठीत बोलून गेलो. मह्यानं मला डोळ्यानं दटावलं आणि तिसरं पार्सल उघडलं. "मलाई कोफ्ता, व्हेज कोल्हापुरी आणि आठ रोटी" तो बोलला. मी निःश्वास सोडला.

"हा साब जो चाहिये वो ले लो," स्विगीवाला कसाबसा बोलला. "और जिसने ऑर्डर किया वो बंदा क्या खायेगा?" मी डाफरलो. मह्याने शांतपणे कांद्याच्या सगळ्या पुड्या काढल्या आणि बाकी सब्जीरोटी आत ठेवून पार्सल बंद केलं. "अब निकल सुमडी में" असं स्विगीवाल्याला सांगून आम्ही पार्कात घुसलो.

बकाबका दोनदोन कांदे खाल्ले आणि मग जरा बरं वाटलं. "या श्रावणाच्या आवशीचा घो" मह्या म्हणाला. मी नुसतीच मान डोलावली.

मग मास्क आणि ग्लोव्ह लपवले आणि दुसऱ्या रस्त्याने सोसायटीकडे गेलो. कांद्याचा वास लपवायला एकेक फोरस्क्वेअर ओढली आणि मग हाॅल्स खाल्ल्या. हाॅल्सनी काय सुट्ट्याचा वास लपणार नव्हता आणि आईची तडी मिळणारच होती. पण कांदा खाल्ला हे कळलं तर घराबाहेर काढला असता.

मग घरी गेलो.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

फुल्ल कांदा खाऊन लिहिलेली दिसतेय... काय आज सकाळी सकाळीच कांदा कुठून मिळाला?

(कांद्याचे विथड्रॉवल सिंप्टम म्हणे. पुढला जन्म नक्की जैनाच्या घरात मिळणार तुम्हाला.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

... वाचलं आणि मग घरी गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आवडली श्टोरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धनंजयला कांद्याचा निराळा उपयोग (का अर्थ?) समजला होता - एक हे विश्व, शून्य हे विश्व

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लौल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

काय तरी बाबा एकेक.
कुठे फेडाल ही पापं.
आता पापक्षालनार्थ लसुणी(णा)वरही एक कहाणी लिहावी. ती शुक्रवारी लिहावी म्हणजे संतोष मातेला होईल.
( कांद्यापेक्षा लसूण दुर्मीळ असल्याने चोरी करताना विशेष दक्षता घ्यावी आणि खबरदारी बाळगावी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0