सखे फक्त तुझ्यासाठी

चार शब्द प्रेमाचे
उमटले माझ्या ओठी
शब्दच झाली फुले
सखे फक्त तुझ्यासाठी ll १ ll

माझ्या जीवनातील आहे
तू आश्वासक साथ
तुजमुळे लाभे मज
स्नेह सौख्याचा हात ll २ ll

तुझ्या स्वभावातील गोडवा
वाढवी स्नेहसौख्य आपुले
माझ्या आनंदाचे क्षण
आपुल्या मैत्रीनेच झाले ll ३ ll

निर्मळतेची जोड सखे
आपुल्या या स्नेहाला
हीच सदिच्छा तुजसाठी
उदंड आयुष्य लाभो तुजला ll ४ ll
............................................ यो. रा. खालकर

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

माझ्या जीवनातील आहे
तू आश्वासक साथ

ठळक शब्द खटकतो आहे.

अवांतर - ( तुमचा जन्म २१ एप्रिल १९८८ चा आहे काय?
आणि तुमचे नाव योगिनी आहे का?
- औद्धत्याबद्दल क्षमस्व.
)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचे नाव योगिनी आहे का?

योगिनीच काय म्हणून? यशोधरा, यशोमती, यमुना, यामिनी, यास्मीन किंवा आयव्हेट का नाही?

आणि, यशवंत, यशपाल, यजुवेंद्र, यदुनाथ, योगेश, याकूब, यूसुफ किंवा यित्झाक यांनी नक्की काय घोडे मारलेय?

किंबहुना, "सखे फक्त तुझ्यासाठी" म्हटले आहे, म्हणजे (कवयित्री लेस्बियन असल्याखेरीज) ती कवयित्री नसून तो कवी असण्याची शक्यता बहुत अधिक.

(की आपला खडा टाकून पाहिला? Wink )

तुमचा जन्म २१ एप्रिल १९८८ चा आहे काय?

कदाचित 210488 हा त्यांच्या आवडत्या रंगाचा आरजीबी कोडही असू शकेल.

- औद्धत्याबद्दल क्षमस्व. )

क्षमा कसली मागताय? अहो, औद्धत्य मआंजावर नाही पाजळायचे तर मग कोठे पाजळायचे? किमान अर्हतेचा निकष आहे तो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

न.बा, मै तुमकू शेरलॉक समझा पर तुम वॊटसन निकले!
कवितेखाली नाव दिलं आहे....
असो. अवांतर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट2
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याकडे लक्ष नाही गेले खरे.

(मुळात कवितेकडेसुद्धा लक्ष तुमच्या प्रतिसादामुळे गेले. अन्यथा, गेले नसते.)

परंतु तरीही, योगेश का नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

+++तुम वॊटसन निकले!++
न बा , यु आर लुजिंग योर टच . (आमच्या वेळचे) पूर्वीचे न बा नाही र्हायले.
पालीचा आधार घेऊ नका आता.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नावात काय आहे ??????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तसं काहीच नाही. पण मला " yrk210488" नावाच्या कवीच्या कविता आवडतात असं म्हणणं थोडं त्रासदायक नाही का होणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नावात काय आहे ? हा प्रश्न संत आसाराम बापु यांनी लोकप्रिय केलेला आहे.
या प्रश्नाला साहित्य विश्वात अजरामर करण्यात संत आसाराम बापु यांचे योगदान अतुलनीय आहे.
त्यानंतर च हा प्रश्न पाश्चात्य जगात लोकप्रिय झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“Do not judge, or you too will be judged" Bible
Matthew 7:1-6 New International Version