पावसातल्या आठवणी

असा पाऊस कोसळत असला, की मन आपसूक भूतकाळाकडे धाव घेतं. सगळ्या चिंता क्षणात विसरल्या जातात, आणि ऐंशीच्या दशकातलं ते निरागस बालपण डोळ्यांसमोर येतं.

असा पाऊस कोसळत असला, तरी शाळेत जावं लागायचंच. डोक्यावर इरलं, पाठीवर दप्तर, एका हातात डबा-वाॅटरबॅग आणि दुसर्‍या हातात चित्रकला-हस्तकला यांच्या सामानाची पिशवी असा जामानिमा करून आम्ही शाळेत जायचो. एवढं करून शाळेला सुट्टी दिली असेल तर जरा रागच यायचा. मग कॅन्टीनमध्ये वडापाव किंवा गोभी मांचुरियन खाऊन अंगात जरा ऊब यायची आणि आम्ही घरी परतायचो.

घरी आल्यावर कपडे बदलून स्वच्छ आंघोळ करून अंगणात खेळायला पळायचो. पागोळ्यांमधून पावसाची संततधार चालूच असायची. मग साध्या होड्या, शिडाच्या होड्या, विमानवाहू जहाजे वगैरे बनवून खळाळत्या पाण्यात सोडायला फारच मजा येत असे.

कोणीतरी पोर या प्रकारात शिंकायचं. मग शेजारच्या घराच्या ओसरीत बसलेल्या सिंधुआज्जी आम्हाला दटावायच्या आणि पडवीत यायला सांगायच्या. आम्ही डोकी पुसतोय तोवर आलं, धोत्रा आणि तुळस घातलेला गरमागरम चहा आणून आम्हाला द्यायच्या. वाफाळता चहा पीत पीत आम्ही गप्पा मारत बसत असू. अशा वातावरणात भुताखोतांच्या गोष्टी ऐकून अंगावर काटा येत असे.

दिवेलागणीची वेळ झाली की आई हाक मारायची. मग आंघोळीची गोळी घेऊन आम्ही परवचा म्हणायचो आणि चटया आंथरून झोपी जायचो, ते पावसाची साद ऐकतच.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Decoding Devdatta

----------------------------
काय निसटलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

स्वच्छ आंघोळ करून पावसात खेळायला जाणे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

आणि आंघोळीपूर्वी कपडे बदलणे.

बाकी काही उरलं नव्हतं, आदूबाळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कपडे बदलून अंघोळ करून?
(हे इंटेंडेड आहे की नाही माहित नाही, पण 'कोड' दिसला ब्वॉ.)
संपा: लेखकमहोदयांनी माजा पॉईंट ढापला. कट्टी.
अजून एक म्हणजे कॅन्टीन. पुढचं गोभी मंचुरिअन फारच सोपं होतं तसं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

देवदत्तपंत बहुधा १९८०च्या दशकात बीएमडब्ल्यूतून नाहीतर हार्लीडेव्हिडसनला किक मारून मराठी माध्यमाच्या शाळेत जात असावेत. (एकदा तो प्रवास घडला, की त्या जिवावर बाकी काहीही करणे सहज शक्य असावे.)

..........

असो. आता मालिकेत असह्य रिपीटिशन होऊ लागले आहे, असे सुचवितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ड्युली नोटेड फाॅर अ‍ॅक्शन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तरी आवडतंय. 'काहीही असले तरी मी आहे देवदत्त' वगैरेपेक्षा तर नक्कीच शतपटीने मस्त आहे.
हं, त्यांनी नॉष्ट्याल्जिक सोडून दुस्री जॉन्रं घेतल्यास अजून बहार येईल असं वाट्टं खरं.
पुलेशु देवदत्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

त्यांनी नॉष्ट्याल्जिक सोडून दुस्री जॉन्रं घेतल्यास अजून बहार येईल असं वाट्टं खरं.

एवढेच म्हणायचे होते. याहून अधिक काही नाही.

(नॉष्ट्याल्जिक, की मॉक-नॉष्ट्याल्जिक?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...कोठल्या शाळेला कँटीन होते म्हणे? मग त्यात वडापाव किंवा - गॉड फॉरबिड - (त्या जमान्यात) गोभी मांचुरियन खाण्याची गोष्ट लई पुढची.

(नाही म्हणायला, आमच्या शाळेतील काही मवाली पोरे, पहिल्या तासाला हजेरी लावून पोबारा करत नि मग थेट रीगल रेष्टारंटात जाऊन, खाऊन, चहा पिऊन, सिग्रेटी फुकून, अलकाचा शो टाकून मग थेट सहाव्या तासाला हजेरी लावायला पुन्हा शाळेत उगवत, तसे काही देवदत्तपंत करीत असल्यास गोष्ट वेगळी.)

अन्यथा, आमच्या वेळी बहुतांश पोरे खिशातले (असलेच तर) चारआठ आणे शाळेसमोरच्या हातगाडीवरच्या चिंचा, पेरू, चण्यामण्याबोर, नाहीतर फारच झाले तर पाववडा - याला वडापाव म्हणत नसत, नि हा शाळेसमोरच्या हातगाडीवरच मिळे - यांवर उडवण्यात धन्यता मानत असू. (तेही क्वचित. नाहीतर डबा खाणारी भटे आम्ही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या पावसातला तो मातीचा वास मस्त असतो. हल्ली सगळीकडे काँक्रिटीकरण झाल्यामुळे मोकळी माती असलेली ठिकाणे कमी झाली आहेत. आधी सगळीकडे तो वास यायचा तसा हल्ली येत नाही. पण कधी तो अनुभवायला मिळाला की मस्त वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0