अनाहूत

अज्ञाताच्या देशातून कुणी अनाहूत येतो
जड चेतनाच्या सीमा पार पुसून टाकतो
झिरझिर धुक्यातून क्षणमात्र डोकावतो
रस रंग नाद गंध सरमिसळ करतो
विझूविझू रोमरोमी ज्योती पेटवू बघतो
लेखणीच्या टोकापाशी हटवादून बसतो
आत ओथंबून येता सरसर बरसतो

अज्ञाताच्या देशातून
शब्द अनवट येतो
भवताल कोंदुनिया
दहा अंगुळे उरतो...

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

फार मोजके असे आंतरजालीय कवि आहेत की ज्यांच्या कविता विषयी उत्सुकता असते.
तुमची ही कविता ही फारच सुंदर आहे
तुमच्या कविता वाचतांना बरेचदा असे जाणवते मात्र की तुम्ही फार सुंदर बोलता बोलता एखादा माणुस अचानक गप्प बसावा
व आपल्याला चुटपुट लागावी तशा तुमच्या अनेक सुंदर कविता ॲबरप्टली संपतात
तुमचा बाणा अचानक काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही चा होउन जातो
पण अर्थातच त्या अपुर्णतेची पण एक गंमत आहे आनंद आहे च .
एक बटरफ्लाय नावाची अरुण कोलटकरांची कविता आवर्जुन इथे आठवते ती अशी
There is no story behind it.
It is split like a second.
It hinges around itself.

It has no future.
It is pinned down to no past.
It's a pun on the present.

Its a little yellow butterfly.
It has taken these wretched hills
under its wings.

Just a pinch of yellow,
it opens before it closes
and it closes before it o..

where is it?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपला प्रतिसाद याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्यासारख्या कविता लिहीणं जमेल, त्यादिवशी मी गद्य लिहीणं सोडेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.