श्रावण

झाले किरणांचे पाणी ऊनमंजिऱ्या सावरी
जळी मेघ वितळता पांगे कापूस डोंगरी

आडोशात झाडोऱ्यांच्या चिंब भिजलेले पक्षी
तेलपंखांचे नितळ थेंब ठिबकत नक्षी

पानोपानी सळसळे हिरवाई अंगोपांग
जून बुंध्यावर चाले धीट मुंगळ्यांची रांग

रास सोन्याची उतरे प्याली हळद निळाई
रंगगंध निथळत इंद्रजाल भवताली

खेळ ऊनपावसाचा तृप्त गवताचा वास
करी दंवाचा आरसा निळ्या आकाशाचा श्वास

उरी मातीच्या बेभान पाणथळ रानवाटा
इंद्रधनुच्या डोळ्याने पाही आसमंत सारा

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाह!!! सुंदर.
http://www.betterphotography.in/wp-content/contest_uploads/65/0024699/65_0024699_104784.jpg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आडोशात झाडोऱ्यांच्या चिंब भिजलेले पक्षी
तेलपंखांचे नितळ थेंब ठिबकत नक्षी
1
1

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रं मस्तच मारवा, ..शुचि!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0