मानाच्या पाहुण्या

धुरळा उडवीत आलेली होंडा सिटी ऐटदार वळण घेऊन पाटलांच्या बंगल्यासमोर थांबली. ड्रायव्हर गाडीतून उतरला आणि मागचे दार उघडून अदबीने उभा राहिला.

सनग्लासेस लावलेल्या दोन गौरांगना गाडीतून उतरल्या. पाटलीणबाई लगबगीनं त्यांच्या स्वागतासाठी आल्या, आणि पाहुण्यांना दिवाणखान्यात घेऊन गेल्या. म्हाताऱ्या चौकीदाराने दाराबाहेरून पाहणाऱ्या पोराटोरांना हाकलले, आणि तोही मान वळवून दोघींकडे पाहू लागला.

"वाटर? शुगर?" आपल्या मर्यादित इंग्रजीत पाटलीणबाईंनी पाहुण्यांना गूळ-पाण्याचा आग्रह केला. त्या दोघी मात्र एकमेकींच्या आणि पाटलीणबाईंच्या चेहऱ्याकडे आळीपाळीने पाहत राहिल्या.

तेवढ्यात दोघींच्या बॅगा घेऊन ड्रायव्हर आला. त्याने पटकन परिस्थिती ओळखली. "आईसाहेब, त्यांना आपल्या सवयी ठाऊक नसतात," तो म्हणाला “त्यांना निस्तं पाणी द्या बिसलरीचं आन मग चाय देतानाबी बिनदुधाचा बिनसाखरेचा द्या.”

"बरं बरं," पाटलीणबाई अंमळ फणकाऱ्यानेच म्हणाल्या आणि त्यांनी वळून हाक मारली "युवराज, जरा इकडे या पाहू."

युवराज ठेवणीतले कपडे घालून वाट बघतच बसला होता. आईची हाक आल्याबरोबर तो लगेच दिवाणखान्यात आला.

"हलो, मायसेल्फ युवराज पाटील. व्हाट इज युवर गुड नेम?" तो म्हणाला आणि पाटलीणबाई कौतुकाने त्याच्याकडे पाहू लागल्या.

"आयम जेनिफर, शीज कत्रिना" निळ्या पंजाबी ड्रेसमधली युवती म्हणाली. "व्हेअर इज द ब्राईड?"

"आय टेक यू टू हर. शी इज गेटींग रेडी," युवराज लगबगीनं म्हणाला. जेनिफर जास्त गोड दिसतेय, पण कत्रिना जीन्स मध्ये … असा विचार तो करतोय तेवढ्यात खुद्द राजाराम पाटील दिवाणखान्यात आले. सगळे उठून उभे राहिले, त्यांना बघून जेनिफर आणि कत्रिना सुद्धा उभ्या राहिल्या.

"सिट डाऊन, सिट डाऊन," आपला राठ आवाज मऊसूत करायचा असफल प्रयत्न पाटलांनी केला. "काय, पाव्हण्यांना चहा वगैरे दिला की नाही?" पाटील म्हणाले आणि पाटलीणबाई तातडीनं स्वतःच स्वैपाकघरात गेल्या.

युवराज वडलांसमोर कानकोंडा झाला, आणि आता काय बोलायचे हे न उमजून त्या दोघीही गप्प बसल्या. थोड्या वेळाने चहाचे कप आणि लाडू चिवड्याच्या बशा घेऊन पाटलीणबाई आल्या. "पिंट्या, त्या ड्रायव्हरला चहा नेऊन दे," त्या नोकराला म्हणाल्या, आणि त्यांना एकदम आठवले "अगबाई, साखर आणि दूध घालायचं नाही हे विसरलेच." त्या स्वतःशीच पुटपुटल्या.

जेनिफर आणि कत्रिना चहा तर पिऊ शकल्या, पण चिवड्याचा पहिला घास घेताच त्यांच्या डोळ्यांतून गंगायमुना वाहू लागल्या. युवराजने पटकन दोघींना पाण्याचे ग्लास दिले.

"चला मंडळी, लवकर तयारी करा. दोन तासात मंगल कार्यालयात पोचायचं आहे," पाटील म्हणाले. "संयुक्ताची तयारी बघा जरा."

दोन तासांनी मंडळी तयार होऊन निघाली. पाटील कुटुंबीय त्यांच्या पजेरोमधून उतरले, पण उपस्थितांच्या नजरा होंडा सिटीमधून उतरणाऱ्या दोन पऱ्यांवर खिळल्या होत्या.

"या मडमा कोण बरं?" एका आजीबाईंनी सुनेला विचारले. "संयुक्ताच्या मैत्रिणी आहेत कॉलेजच्या," सूनबाई म्हणाली.

लग्न समारंभ उत्तम झाला. रेसेप्शनला स्टेजवर संयुक्ताबरोबर उभ्या असलेल्या जेनिफर आणि कत्रिनाबरोबर हस्तांदोलन करण्याच्या भरात काहीजण नवपरिणीत दाम्पत्याबरोबर हस्तांदोलन करायला विसरले.

आमदार स्वत: आले, तेव्हा पाटीलसाहेब त्यांना जातीने स्टेजवर घेऊन आले. आमदारांच्या पंजाबी बायकोशी संयुक्ताने मैत्रिणींची ओळख करून दिली, "मीट माय फ्रेंड्स फ्रॉम कॉलेज".

सगळा सोहळा छान पार पडला. विदाई झाली तेव्हा संयुक्ता आईवडिलांच्या, भावाच्या आणि मैत्रिणींच्या गळ्यात गळा घालून रडली. फोटोग्राफर सगळे क्षण कॅमेर्‍यात टिपत होताच.

सर्वजण बंगल्यावर परतले. जेनिफर आणि कत्रिना परत जाण्याची तयारी करायला त्यांच्या खोलीत गेल्या. ड्रायव्हर पाटीलसाहेबांचा निरोप घ्यायला गेला.

जेनिफर आणि कत्रिना गाडीत येऊन बसल्या होत्या. त्यांच्या बॅगा आणि पाटलीणबाईंनी दिलेल्या भेटवस्तू ड्रायव्हरने पिंट्याच्या मदतीने डिकीमध्ये ठेवल्या, आणि त्याने गाडी सुरू केली.

गावाबाहेर पोचल्यावर त्याने गाडी थांबवली आणि पाटील साहेबांनी दिलेला लिफाफा उघडला. "ट्वेंटी थाउजंड फॉर इच ऑफ यू," त्याने रोख दोघींना दिली आणि बाकीचे साठ हजार आपल्या खिशात टाकले. त्याने मनाशीच विचार केला - भेटवस्तू विकून गाडीचे भाडे आणि पेट्रोलचा खर्च निघाला असता.

"नेक्स्ट असाईनमेंट ऑन द सेकंड ऑफ जून, जळगाव डिस्ट्रीक्ट," तो म्हणाला.

"शुअर - वुई विल गो टू सुला इस्टेट इन नाशिक डिस्ट्रीक्ट ऑन अवर वे बॅक," कत्रिना म्हणाली आणि तिघेही खळाळून हसले.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

रुपक असेल तर कळले नाही.

मानाच्या ऐवजी मोलाच्या चालले असते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रूपक वगैरे बिलकुल नाही. एका समारंभात मिरवणाऱ्या एका गोर्‍या जोडप्याला (आणि इतरांच्या प्रतिक्रिया) बघून ही गोष्ट सुचली. (ते जोडपं मात्र फॅमिली फ्रेन्ड्स होते.)

'मोलाच्या पाहुण्या' हे शीर्षक आवडलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मोलाच्या पाहुण्या' हे शीर्षक आवडलं! >> धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमदारांच्या पंजाबी बायकोशी संयुक्ताने मैत्रिणींची ओळख करून दिली, "मीट माय फ्रेंड्स फ्रॉम कॉलेज".

'संयुक्ता'सुद्धा (बायेनीचान्स) भाड्याचीच (आय मीन, मोलाची) काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गावाबाहेर पोचल्यावर त्याने गाडी थांबवली आणि पाटील साहेबांनी दिलेला लिफाफा उघडला. "ट्वेंटी थाउजंड फॉर इच ऑफ यू," त्याने रोख दोघींना दिली आणि बाकीचे साठ हजार आपल्या खिशात टाकले.

वीस हजार दुणे चाळीस हजार अधिक साठ हजार बोले तो एक लाख रुपये... म्हणजे, या भाडोत्री सर्व्हिससाठी पाटीलसाहेबांनी लाख रुपये रोख मोजले तर.

एर्गो,

'मोलाच्या पाहुण्या' हे शीर्षक आवडलं!

'लाख मोलाच्या पाहुण्या'सुद्धा खपून जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुपक वगैरे आहे वाटलं नाही. त्या डायवरचा आणि गोऱ्या मडमांचा बिझनेस असावा "गोऱ्या मडमा आपल्या पाहुण्या आहेत" म्हणुन मिरवण्याची इच्छा असलेल्या लोकांच्या लग्नात उपस्थिती लावण्याचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एक्झॅक्टली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मागणी आहे, तिथे पुरवठादार असायचेच. (आणि नसले, तर पैदा व्हायचेच.) हा निसर्गनियम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

... कोणी मेले, तर रडण्यासाठी पैसे देऊन भाडोत्री प्रोफेशनल रडणारे आणण्याची प्रथा काही समाजांत असतेच. ('रुदाली' की कायसेसे म्हणतात वाटते त्या प्रकाराला; चूभूद्याघ्या. जितके जास्त रडणारे, तितकी प्रतिष्ठा अधिक, असा काहीतरी हिशेब असतो म्हणे, 'नाही आसू नाही माया' बी डॅम्ड.) त्याचेच हे (लॉजिकल?) एक्स्टेन्शन म्हणायचे. यात विशेष आणि/किंवा धक्कादायक असे काही वाटत नाही.

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक डच मित्र सांगत होता, तो आणि त्याची तेव्हाची मैत्रीण भारतात फिरायला आले होते. हा मित्र दिसण्याच्या बाबतीत अगदी दुर्दैवी नसला (कोणाला नारायण राणे आठवले, अं???) तरी कोणी जॉन अब्राहम नव्हे. राजस्थानात फिरणार होते. जयपूर किंवा उदयपूरमध्ये हे दोघं कुठे बसून चहा पीत होते. आजूबाजूला भारतीय बायाबापड्या जमा झाल्या. एकीनं धीर धरून त्यांना विचारलं, "माझ्या मुलाबरोबर फोटो काढून घ्याल का?" त्यांना सुरुवातीला काही समजलं नाही, पण हो म्हणाले. मग रांगच लागली.

हल्लीच्या काळात आयपीएलमध्ये नाही, गोऱ्या चियरलीडर्स आणून नाचवत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आजकाल उच्च मध्यम वर्गाटाळ्या वधूवरांपैकी निदान एक व बहुधा दोघेही फारिन रिटर्न्ड असतातच त्यामुळे भटजींप्रमाणेच हेही एक फिक्स्चर झालं आहे बहुतेक ! एआयबी च्या व्हिडियोजमध्ये पाहिलेच ! पण हा धंदा असणे ही मस्त आयडिया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0