चौर्यकर्म

मी लहान होतो तेव्हा चमचे चोरायचो.

सुदैवाने माझ्या कामगिरीत सिल्व्हरवेअर वगैरेचा अंतर्भाव नसल्यामुळे पोलिसांनी पकडून बालसुधारगृहात वगैरे डांबायचा प्रश्न उद्भवला नाही. (चांदीचे चमचे ठेवणारी हाटेलं असतात हेच तेव्हा माहीत नव्हतं.)

साधे स्टेनलेस स्टीलचे चमचे मला प्रमुदित करत. क्वालिटीच्या (तेव्हा वाॅल्स नव्हतं, आणि विल्स अप्राप्य होत्या. असो.) व्हॅनिला आईस्क्रीमच्या कागदी कपाबरोबर मिळणारे लाकडी चमचेही मला चालायचे. तसं आईस्क्रीम सठीसहामासीच मिळत असल्याने संधी मिळाली की दोनतीन लाकडी चमचे तरी ढापायचोच. ("अंकल आपने चमचा दियाच नय" यावर विश्वास ठेवणारे एकदोन दुकानदार तेव्हा पार्ल्यात असायचे. (गेले बिचारे. पार्लं पार बदललं. ) )

गुलाबी रंगाचे प्लास्टिकचे सुबक चमचे माझी उमेदीची वर्षं उलटून गेल्यानंतर आले याचं मला फार वाईट वाटतं. पण त्याची काॅम्पेन्सेशन्स होती. शंकरपाळ्या कापायची गोल आरी मागे बसवलेला चमचा एकदा गवसला होता तेव्हा अत्त्युच्च आनंद झाला होता.

काटे आणि सुर्‍या यांचं मला आकर्षण नव्हतं. डाव आणि पळ्या यांबद्दल ममत्व नसणं हे माझं डिफेन्स मेकॅनिझम असावं. स्टॅम्प, नाणी, नोटा, ट्रेझरी बाॅण्डस्, हिरेमाणकं, जपानी कल्चर्ड मोती, इतर अनकल्चर्ड मोती यांच्याबद्दल आणि इत्यादींबद्दल वावगा विचार कधी माझ्या मनाला शिवलाही नाही. मी फक्त चमच्यांचा स्पेशालिस्ट होतो.

बरं, त्या काळात एकसारख्या सहा किंवा बारा चमच्यांचा सेट, ते टांगून ठेवायचे स्टॅण्ड अशा अनिष्ट प्रथांचा सुळसुळाट समाजात झाला नव्हता, हे माझ्या पथ्यावर पडायचं. घरातल्या पाचपन्नास चमच्यांतले एकदोन (किंवा पाचसहा) गायब झाले तर ते कोणाच्या लक्षात येत नसावं. डायरेक्ट मला विचारणं तर सोडाच, पण कोणत्या घरी मला परत बोलावणं आलं नाही असंही कधी झालं नाही. (लग्नात आहेर आणि वाढदिवसाला रिटर्न गिफ्ट म्हणून मिळालेल्या चमच्यांची विल्हेवाट लागावी म्हणून मला मुद्दाम पुन्हापुन्हा घरी आमंत्रण देत असतील का, ही शंका मला कधीकधी भेडसावते.)

माझा कार्यकाल आणि त्यातील काही सुरस आणि चमत्कारिक किस्से, यांबद्दल पुन्हा कधीतरी.

(टीप: वरील गोष्ट काल्पनिक आहे. कोणत्याही व्यक्ती अथवा घटनांशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग आहे याची गरजूंनी व चमचे मोजणाऱ्यांनी नोंद घ्यावी.)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

क्राईम मास्टर गोगो म्हणाला तेच तुम्हाला म्हणतो - " और सुनाओ.."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चमच्यांचा विषय निघाला आहे, म्हणून नोंदवतो. आम्ही लहानपणापासून, कायम टी स्पून घेऊन, एखादा पदार्थ खातो. (कदाचित, लहान तोंडी मोठा घांस... वगैरे म्हणींचा प्रभाव असावा.) पण हल्ली, असे निरीक्षण आहे की, तरुण पिढी टेबलस्पून घेऊनच खात असते. कदाचित, खाण्याचा निवांतपणा कमी असेल, किंवा हल्ली जिवण्याच मोठ्या असतील!
लेख आवडला पण त्रोटक वाटला. एका माजी राष्ट्रपतींच्या पत्नीचे किस्से आठवले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका माजी राष्ट्रपतींच्या पत्नीचे किस्से आठवले!

'राष्ट्रपतींच्या पत्नीचे' म्हणजे राष्ट्राचेच ना? मग असे सरळ बोला की! आडवळणाने कशाला बोलता?

(कॉकॉ, ऑमॉलॉ पण साँगॉ नॉ किस्से! वँऽऽऽऽऽऽ!!!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माजी राष्ट्रपतींच्या पत्नीचे >>>>
म्हणजे माजी राष्ट्राचे तर नव्हेत??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घरातले चमचे कॅनीबल असून रात्री एकमेकांना खातात असा माझा समज होता ! तुम्ही डोळे उघडलेत माझे. आता आमच्या घरातला देवदत्त शोधायला हवा.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घरातले चमचे कॅनीबल असून रात्री एकमेकांना खातात असा माझा समज होता !

आणि मोज्यांच्या जोडीतील एकच मोजा ड्रायरमधील अंतराळातील ब्लॅक होलमधून पलिकडच्या विश्वात जातो, असे मीही समजत होतो इतके दिवस! म्हणजे हेही त्या लफंग्या देवदत्तचेच काम असले पाहिजे. हाणा साल्याला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घरातलं काहीही मिळेनासं झालं की मी आता देवदत्तवर खापर फोडणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.