Broken is Beautiful

त्याचे झालंय असे की, सोशल मीडियाचे पेव फुटल्यापासून जो तो मी कसा परफेक्ट आहे; मी, माझे घर, माझे मित्र, माझा नवरा/बायको, माझी मुलं, माझे करीअर, माझे वीकेंड्स, मी जातो तो भाजी बाजार सगळे कसे एकदम परफेक्ट आहे हे दाखवायचा जो अट्टाहास चालू असतो ते पाहून असे वाटतं जगात इम्परफेक्ट नाहीच की काय काही?

आपल्याकडे कपाला चरा गेला किंवा एखाद्या प्लेट ला तडा गेला तर बरेचदा हि मोडकी आहे, तुटकी आहे तर कधी अशुभ म्हणून आपण फेकून देतो. जपानी संस्कृतीत एक "kintsugi" नावाची कला आहे. हे पडलेले चरे , तडे सोन्याने भरून टाकतात आणि ती वस्तू आता आधी पेक्षा मोलाची आणि सुंदर होते. ते चरे, तडे आता त्या वस्तूचा एक अविभाज्य अंग बनतात ज्यामुळे त्यांची किंमत वाढते. त्या गोष्टीचे इम्परफेक्शनच तिची किंमत वाढवतं. Sometimes we are broken and that’s okay.

नुकतीच मी एका आर्ट गॅलरीत जाऊन आले. तिथे एक पेंटिंग होते ज्यात एक आई होती आणि तिचे सगळे अंग भेगांनी भरले होते. डोक्याच्या भेगा संसाराच्या तापांनी पडलेल्या, स्तनांच्या भेगा मुलांना अमृत पाजून पडलेल्या, पोटाच्या भेगा पडलेल्या पुनरुत्पादन करून...या सगळ्या भेगा सोन्याने भरून टाकल्या होत्या आणि अगदी खरे सांगते ते तेज डोळ्यात मावणारे नव्हते. Broken is not only beautiful but sometimes better than new.

आपल्या आयुष्यात झालेली पडझड, आपल्या आयुष्यात मोडलेल्या गोष्टी, दुरुस्त केलेल्या गोष्टी, आलेली संकटे, केलेल्या चुका-घोडचूका आणि त्याची झालेली शिक्षा या सगळ्यांनी आपली किंमत अजून वाढते. आपल्या आयुष्यात आलेल्या अडचणी, संकटे यांनी आपल्याला अशा जखमा होतात कि त्या भळाभळा वाहतात, त्याचे व्रण राहतात, पण रुमी म्हणतो तसे, "The wound is the place where the light enters you."

म्हणजे आपण सगळेच तसे ब्रोकन असतो ना. आपल्याला आकलनही होणार नाही, अशा आणि इतक्या प्रकारे माणसे ब्रोकन असू शकतात नव्हे असतातच. त्यांना मोकळ्या मनाने आणि मानाने आपल्या कवेत घ्यावे त्यांच्या "ब्रोकन" असण्यासकट कारण,

Broken is Beautiful,
and we all are broken,
some are less, some are more
but broken and enlighten,
that's why should be treasured

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छोटेखानी लेख आवडला. जपानी सौंदर्यदृष्टीचा विषय निघालाच आहे, तर त्यावरून वाबी-साबी ही संकल्पना आठवली:

In traditional Japanese aesthetics, wabi-sabi (侘寂) is a world view centered on the acceptance of transience and imperfection. The aesthetic is sometimes described as one of beauty that is "imperfect, impermanent, and incomplete". It is a concept derived from the Buddhist teaching of the three marks of existence (三法印 sanbōin), specifically impermanence (無常 mujō), suffering (苦 ku) and emptiness or absence of self-nature (空 kū).

Characteristics of the wabi-sabi aesthetic include asymmetry, roughness, simplicity, economy, austerity, modesty, intimacy, and appreciation of the ingenuous integrity of natural objects and processes.

थोडंफार 'जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले'ची आठवण करून देणारं तत्त्वज्ञान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0