पंखनिळाई

तुझी भरारी उंच नभीची
पंखांवरती घेऊन घरटे
क्षितिज तांबडे घेत उराशी
दूरदेशीच्या नादगंधल्या
…वाऱ्यावरती भणाणलेली

पंखनिळाई तुझी लकाके
संध्येच्या कायेवर भगव्या
संथ वाहत्या नदीकाठच्या
दाट धुक्याचे अस्तर फाडत
…वीज होऊनी थरारलेली

शब्दाचा ध्वनी जिथे विरावा
तोल क्षणाचा जिथुन ढळावा
त्या रेषेवर सावरलेली
सापेक्षाच्या उंबरठ्यावर
…सावलीत तू विसावलेली

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

नाही आवडली.
बरच काही सांगितले आहे. पर मेरे पल्ले नही पडी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सावलीत तू विसावली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिकाम बु बुम