प्रेमदिन शुभेच्छा




तरुण सुंदर दुकानदार बाई थंडगार शीतकपाटापाशी आल्या व त्यांनी मला निट निगुतीने एका फुलदाणीत सजविले. फ़ुलदाणीनेदेखील माझे हसून स्वागत केले, अन्य माझ्या मित्रमैत्रिणॆंनॆ सरकून घेउन मला जागा करून दिली.
.
आणि मला हायसे झाले. उकाड्यातून एक तर थंड हवेत आल्याबद्दला तसेच गटागट पाणी प्यायला मिळाल्याबद्दल. जरा दम घेतल्यानंतर मी आसपास पाहू लागलो. तर बरेच ओळखीचे उत्फुल्ल चेहरे दिसले. बरेच जण माझ्या बागेतालेच , माझ्या किंवा नंतरच्या batch चे दिसत होते. आधीच्या batch ची काही पोरं-पोरी थोडी कंटाळवाण्याच चेहऱ्याने नोकरीचा call येण्याची प्रतीक्षा करताना दिसली. पण एकंदर वातावरणात उत्साह जाणवला.
.
"हाय! हाउ आर यु? युअर लकी दे टुडे " हे गोड शब्द अचानक कुठूनसे आले म्हणून पाहिले तर एक शुभ्र लिली हसून माझ्याचकडे पहात हात हलवताना दिसली. अरे ही तर माझी स्टायलिश शेजारीण . काही दिवसांपूर्वीच बागेत हिने प्रवेश काय केला आम्ही सगळे झेंडू, मोगरा, जाई , डेलिया या नवीन आलेल्या टकाटक लिलीच्या प्रेमात पडलो, फक्त सराईत इंग्रजी व ettiquettes च येणार्या नाही तर स्वभावाने अतिशय गोड असलेल्या तिने कधी सर्वांचे मन जिंकुन घेतले त्याचा पत्ताही लागला नाही. "Howdy?" मीदेखील हात हलवून अभिवादन केले.
.
आज valentine Day असल्याने आता येणार्या नवीन फ़ुलांचा तसेच बाहेर रवानगी होणार्या फ़ुलांचा राबता पटापट असल्याचे लक्षात यायला मला वेळ लागला नाही. आहाहा! Campus Interview मध्ये निभाव न लागलेल्या आमच्यासारख्या हुशार फ़ुलांकरता हा दिवस म्हणजे नोकरी मिळण्याची पर्वणी होती ते ही चांगली नोकरी. एखाद्या ललनेच्या विपुल केशसंभारात विराजमान होण्याची किंवा एखाद्या तरुण, भावुक (किती outdated गुणाबद्दल बोलतोय मी! पण ते एक असोच.) मुलीच्या हृदयाशी बिलगून बसण्याची , एखाद्या उंची restaurant मधील टेबलावर मध्यवर्ती जागा पटकाविण्याची.
.
कोणा कवीने म्हटले आहेच ना,

"काही गोड फुले सदा विहरती स्वर्गांगनांच्या शिरी.
काही ठेवितसे कुणी रसिकही. स्वच्छंद हृन्मंदिरी|.
काही जाऊनी बैसती प्रभुपदी पापापदा वारि ते.
एखादे फुटके नशीब .............."

जाउ दे आत्ता या शुभ दिवशी अभद्र कशाला बोला.
.
मी एकदम खूष आहे आज कारण मला खात्री आहे माझ्या या लाल सुटबुट टाय वेशात मला कोणी तरुण पट्टकन हसत हसत उचलून घेईल व मला, त्याच्या प्रेयसीकडे मोठ्या दिमाखात सोपवेल.
.
माझ्या विचारांची साखळी तुटली जेव्हा बेबी ब्रॆथ फुलांचे खळखळून हसणे माझ्या कानी पडले. आम्हा कोणत्याही सोलो फुलाबरोबर लिली असो, डेलिया असो वा माझ्यासारखा गुलाब असो, बरीच ताजीतवानी पाने व ही इवली इवली जांभळट फुले नेहमी ग्राहक घेउन जात. यां चिल्ल्यापिल्ल्यांना नेहमीच मागणी असे. नेहमीचे अतिहासरे सूर्यफूल मात्र आज जरा काजळल्यासारखे किंवा मरगळल्यासारखे वाटले. बरोबर आहे valentain Day च्या इतिहासात कोणी सूर्यफूल प्रेयसीला दिल्याचे ऐकिवात नाही. मोगरा, जाई , जास्वंद यां सात्विक फुलान चीही तब्येत च निराळी त्यांना सहसा देवळात घेउन गेलेले पाहिले आहे त्यामुळे आज ती ही निवांत गुपचूप बसली होती. त्यांना आजच्या दिवसाचे फारसे सोयरसुतक नव्हते.
.
"फार हुरळून जाउ नकोस आज मी तुला टक्कर देउ शकतो" या उद्धट आवाजाने चमकून मी पाहिले तर टग्या पिवळा गुलाब माझ्याशीच बोलत होता. "फ्रेन्डशिप करता तुला कोण घेताय तिथे मीच पाहिजे." या त्याच्या वाक्यावर उगाचच चिडून जाउन मी काही बोलणार तोच टायगर लिली ने दटावून आम्हा दोघांना आपण बागेत नाही याची जाणीव करून दिली "Behave yourself ." हे शब्दाला वजन यावे म्हणून इंग्रजी बोलायची टूम या लिली परीवाराचीच. यावर मी परत उलटून म्हणालो "पिवळ्याला माझ्याशी हुज्जत घालायचं कारणच नव्हतं. त्यानेच सुरु केलं." यावर किनर्या आवाजात गुलाबी कार्नेशन म्हणाली "तुम्ही पुरुष जात ना, जाल तिथे भांडणार पहा. जरा समजुतीने घेणार नाही. " यावर मान डोलावून अन्य लाल कार्नेशन्स नी तसेच व्हायलेटसनीही व कोरांटीनेही सहमती प्रकट केली. चाफ्याने मग मध्यस्ती केली "छोड ना. तुला माहीत आहे पिवळ्याचा स्वभाव"
.
मग जरा वेळ असाच अवघडलेल्या शांततेत गेला नाही तोच शंकाळू तगर जांभई देत तिच्या आळसावलेल्या आवाजात म्हणाली "पण मित्रांनो मला हे कळत नाही या माणसांना प्रेम व्यक्त करायला प्रेमदिन च का उजाडावा लागतो? अन्य दिवसांनी काय घोडं मारलाय?" यावर आमच्यातल्या mature केवड्याने तिला समजावले "प्रत्येक ऋतू वसंत असला तर वसंताची किंमत ती काय राहिली? तसेच आहे, एक मूड बनण्याकरता, सौहृदाची भावना वाढीस लागण्याकरता एखादाच असा दिवस क्रुशिअल असतो." यावर परत सर्वांनी माना डोलावल्या.
.
इतक्यात माल्किणबाईंच्या पावलांची चाहूल लागली व सर्वजण चिडीचूप attention मध्ये केस वगैरे चापून चोपून , टाय निट करून उभे राहिलो . बाईंबरोबर एक देखणा पुरुष आला. त्याच्या हातात already chocolate box होता, त्याने हसत माझ्याकडे पहात, मालकीण बाईंना म्हटले की लग्नानंतरचा हा त्यांचा पहिला प्रेमदिन आहे व त्याला लाल गुलाब हवा आहे. व त्याला मी आवडलो आहे. त्याबरोबर आनंदलेल्या मला उचलले गेले. व पुढे माझा प्रवास अधिकच रोचक होत गेला, परंतु त्याविषयी पुन्हा कधीतरी.
.
आता माझ्यातर्फे ऐसॆकरांना प्रेमदिनाच्या शुभेच्छा!

मूळ प्रेरणास्रोत - http://www.misalpav.com/node/1286
चित्र जालावरुन साभार


field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Smile वर आणते आहे. सॉरी एकदाच Wink
Final touches are done. अधिक बदल केले जाणार नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेरे सामने जब तू आता है जी धक से मेरा हो जाता है |
लेती है तमन्ना अंगड़ायी दिल जाने कहाँ खो जाता है ||
महसूस ये होता है मुझको जैसे मैं तेरा दम भरती हूँ |
इस बात से ये ना समझ लेना की मैं तुझसे मोहब्बत करती हूँ||

https://lh3.googleusercontent.com/FBEXZy1XDgdFfVW8iFOfjIBlucgHPgkvsSHhVgqblkCfwgOfpZgNAIh_Oje_-hyby8rZd5UeiyIBrJT7diIHtFjljqfmZgNIuJKJ9pp6btbL5J2KriXJKy5Yl9A_VmyadUm3I3g1u4Vt9qnIBJUAvxBhtzNzwct9o6XH2I2LXFadE9ytn35-TYFEgXx-2GrhRU5l7khtTcTKtQqRLj0NaufDwko8AHI-fPNv-6V0yXfdC40vvaE6glV8Is89D9Rm62DJOSYU-DpxyHYwAylQVWvBGAHiXoPPKxOTMr2UM8RcR8reniIGUkX8C1fNOrz-yvDIbURxo_8CI18FiL0RIzt16CqREynTUTCjNaB1wtBah6PlT-kB18tkVDRAgJ8soP7_qlnNywUWtnX8Ch3odIqveNDnA1vWIpmXhx83uZd7uRfChH86fHw_EwbbVtAIuHdtIfb3JDHyUbC9PRgL-r2vl6nJYrkXwYRjOgbeBw84aGrNwhKdoi-3KVcgJAhADC3JmlRun1ZIXofBLUxJ8-M82rY4SKLuE-xzys0GSeArJHWsfRLBtQeknXnnTZ9ZsF7Y3wn6SPvykWP6CH3f1s0ToRKubkwUqOXzRLP5IBcj4msCWGZtUPcg8AMeNTblO2A6mHac-u-Z7B6Za5tQHqDa1HIiRTyOR2aEwRRCxjmI1iFgSd7CkJ2dJmBDcOeLurBWfNxJgaLYsVaLxrc_0XBDEA=w273-h367-no

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0