एका शहीद सैनिकाच्या पत्नीचे मनोगत

एका शहीद सैनिकाच्या पत्नीचे मनोगत
------------------------------------------------------------
तू शहीद तिकडे देशासाठी
इथे दुःख माझिया उरात
एकेक स्वप्नाची राखरांगोळी
मन आसवांच्या पुरात

स्फोटाचा एकच दणका
साऱ्याचे तुकडे तुकडे
कुठे चिरफाळले देह
कुठे विच्छिन्न मुखडे

अग्नी दिला तरीही तुला
डोळे शोधती धुरात

कपाळाचं पुसलं कुंकू
पदरात कच्ची बच्ची
सांत्वनांचा काय दिलासा
ही एकच गोष्ट सच्ची

पुन्हा कधीही तुझी पाऊले
ना वळणार या घरात

न बलिदान हे जावो व्यर्थ
या बलिदाना येवो अर्थ
या देशाची सारी जनता
लढण्या आहे समर्थ

आपण सारे एक म्हणा रे
सूर मिळवूनी सुरात

बिपिन सांगळे

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

तिकडे ते लोक काल कुठे फुटून‌ मेले नाहीत, तोवर आज इथे कविता आलीसुद्धा?

याला शीघ्रकवित्व म्हणावे, की तापल्या तव्यावर पोळी भाजून घेण्याचे कसब?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

न्यू दिल्ली टाइम्स नावाचा एक शशी कपूरचा सिनेमा आठवला. त्यात शशीकपूर संपादक असतो. कुठल्याही खुनाची बातमी त्याच्या पेपरात आधी येते. तो खुनाची बातमी चछापायला देऊन खून करायला जात असतो.

एका वेळेस तो बातमी छापायला देतो पण त्याला काही कारणाने खून करता येत नाही. पेपरात बातमी तर छापली जाते आणि तो पकडला जातो.

डिस्क्लेमर: सदर कवीला हल्ल्याची पूर्वकल्पना होती असे सुचवायचा मुळीच हेतू नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सखेद आश्चर्य !
आज नाही तर -
१५ तारखेला अनेक चॅनेल्स वर शहिद जवानांचे दुःखात बुडालेले कुटुंबीय दाखवले .
त्यातल्या विधवा झालेल्या स्त्रियांचा आक्रोश पाहवत नव्हता .
त्या त्या बायकांचे दुःख काय असेल , विचार करवत नाही .

देशप्रेम तर आहेच म्हणून त्यांचं दुःख मांडायचा प्रयत्न केलाय ,
तरीही त्यांची व्यथा मी परिपूर्ण मांडू शकलेलो नाही .
कविता पोस्ट करून माझी चूकच झाली , पुढच्या वेळेस काळजी घेईन

धन्यवाद

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपीन, तुमच्या भावना सच्च्या आहेत. लिहित रहा!
कवितेतली करूणा पोचली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************