"मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार"

डिस्क्लेमर : माझ्या प्रस्तुत लेखामधे लैंगिक स्वरूपाचे उल्लेख आणि ज्याला अश्लील, ग्राम्य असं मानलं जातं त्या स्वरूपात बर्‍याच गोष्टी (वानगीदाखल, उधृतवजा अशा) येणार आहेत. तरी ज्यांना अशा गोष्टींचं वावडं आहे, त्यामुळे पावित्र्यभंग झाल्यासारखं वाटतं, भावना दुखावतात, अस्मितांना धक्का पोचतो, शीशी वाट्टं, घाण्घाण वाट्टं, त्यांनी न वाचलेलं बरं अशी नम्र विनंती.

पुस्तकाबद्दलचे तपशील :
"मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार"
संपादक-अभ्यासक : अ. द. मराठे
ग्रंथाली प्रकाशन.
-----------------------

मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार

पुस्तकाच्या शीर्षकावरूनच हे पुस्तक कशाबद्दल आहे ते कळतं. अशा पुस्तकाबद्दल काही सांगायला जायचं तर पुस्तकाचं स्वरूप, त्यामागचा हेतू, एकंदर मीमांसा आपण लिहितो. या पुस्तकाबद्दल हे लिहू गेलो तर लक्षांत आलं की खुद्द लेखकाने हे उत्तमरीत्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे. त्यामुळे ती ५-६ पानी प्रस्तावनाच जशीच्या तशी स्कॅन करून इथे दिलेली आहे. पुस्तकामागे अनेक वर्षांचा अभ्यास, अनेक थोरामोठ्यांचे आशीर्वाद आहेत. मुख्य म्हणजे एका न शमणार्‍या जिज्ञासेपोटी हे सर्व काही झालेलं आहे.

ज्यांना प्रस्तावना वाचायची आहे त्यांच्याकरता स्कॅन केलेल्या पानांचे दुवे :
प्रस्तावना १

प्रस्तावना २

प्रस्तावना ३

प्रस्तावना ४

प्रस्तावना ५

प्रस्तावना ६

इतकं सांगून झाल्यानंतर आता पुस्तकातला जो "खरा" मसाला आहे तो मांडायला मी मोकळा आहे. Smile रत्नभांडारातले निवडक जवाहिर दाखवावे तसं मी आता
प्रस्तुत पुस्तकातल्या काही छानछान(!) म्हणी-वाक्प्रचारांची यादीच द्यायला सुरवात करतो.

- "हातभर पुच्ची इतभर दाना, झवनारापरीस बगनारा शाना"
- "झवताना मेलो, कुळाव्याक दोष?" (कुळावा = लग्न ठरवणारा मध्यस्थ)
- "हगल्यापेक्षा निपटणे बरे"
- "पोर ना बाळ, पुच्ची वाजवी टाळ"/"भुरगे ना बाळ चोट वाजयता टाळ" (अर्थहीन, ज्यातून काही निष्पन्न होत नाही अशी बडबड करणे.)
- "थानान वाढली म्होण बायल न्हय आणि ढेंगान् वाडलो म्होण दादला न्हय" (शारीरिक वाढ म्हणजे बौद्धिक वाढ असतेच असं नव्हे.)
- "डोळ्यांत बुल्ली आणून पाहाणारा" (कामवासेनेने पछाडून पाहाणारा)
- "तहान लागल्यावर जो मूत प्याला तो भूक लागल्यावर गू खाईल" (जो एक अनिष्ट गोष्ट करतो तो दुसरी त्याहून वाईट गोष्ट करणारच.)
-------------------------
- "झक् मारणे" याचा अर्थ "भरकटणे" असा विशद केला आहे.
- "कुतरओढ होणे" = परस्परविरोधी दिशांनी खेचले गेल्याने होणारी ओढाताण. कुत्र्यांच्या मैथुनात असलेल्या स्थितीमधे, ते ओढले गेले तर ते त्यांना फार वेदनादायक होते.
- भाद्रपद महिना आणि कुत्र्यांच्या समागमाच्या ऋतूची एकरूपता या अर्थाने "भादवा" असा शब्द वापरणे.
- "एखाद्याच्या गांडीत काड्या घालणे" - एखाद्याला कामाला प्रेरित करणे. शेतीवरून आलेला वाक्प्रचार.
- " एखाद्याच्या नाकात काड्या घालणे" : एखाद्याला खिजवणे, त्रास देणे.
- "धश्चोट" : दांडगा, अडाणी , पशुतुल्य. या शब्दाची दिलेली संस्कृत व्युत्पत्ती : "यस्य चोटस्य दर्शनेन नारीणां हृदये धस् धस् भवति इति धश्चोट:" (ही अर्थातच कुणा पुरुषाची वेट फ्यांटसी आहे!)
"चोट" या शब्दाला जोडून (अर्थातच!) डझनावारी शब्द बनले आहेत. त्या सर्वांचे नेमके अर्थ आणि नेमक्या छटा यांचं अंशतः विवेचन आहे. ते सर्व इथे देता येणार नाही. वानगीदाखल शब्दांची यादी : रिकामचोट, अडाणचोट, फुकटचोट, खुळचोट, भिकारचोट, धंचोट, मेंगचोट, बुळचोट, दिमाखचोट, नंगचोट, उडाणचोट, गबाळचोट, फुगीरचोट, गफलचोट , बोडेफकीर, वेडालवडा इत्यादि. (एकंदरीतच एखाद्याबद्दल तुच्छतेने बोलायचं असलं तर व्यक्तित्व-विशेषाला "लवड्याचा" असं जोडायचं. म्हणजे सिरीयसलवड्याचा , भिकारलवड्याचा वगैरे)
- "चोट" बरोबरच (अर्थातच!) लोकप्रिय शब्द म्हणजे "झव". मग त्यातून वेडझवा, उलटझवणीचा, आडझवणीचा वगैरे. - यू गेट द आयडीया!
-------------------
अश्लील/असभ्य गोष्टींबद्दलच्या काही रोचक घडामोडी :
- अज्ञानापोटी काही गोष्टी "अश्लील" असूनही वापरणे : उदा. "एखादी गोष्ट धसास नेणं" हे आपण नेहमी म्हणतो. त्यातलं धसणं म्हणजे संभोग आणि त्या प्रक्रियेची पूर्ती होय. किंवा "गाढव गेले आणि ब्रह्मचर्यही गेले" या म्हणीचा संदर्भ असा की एकदा एका आजन्म ब्रह्मचारी असलेल्या संन्याशाला कामभावना अनावर झाल्यामुळे तो गाढवाचा वापर करू पाहातो. तेव्हा त्यामुळे गाढवही पळून जातं आणि तो ब्रह्मचारी राहात नाही.

- संतसाहित्यातल्या काही गोष्टी "शुद्ध" होऊन येणं : तुकारामाच्या "भले तरी देऊ गांडीची लंगोटी" शुद्ध होऊन "कासेची" बनलेली आहे Smile

- क्वचितप्रसंगी एखादा मूळचा साधा अर्थ असलेला वाक्प्रचार अपभ्रंश होऊन "अश्लील" बनू शकतो. उदा. मूळचा "लोडीलूट" हा शब्द. मूळचा शेतीतला अर्थ असा की बलुतेदारांनी आपापला धान्याचा हिस्सा घेऊन जाणे. तो आता "लवडेलूट" होऊन बसलेला आहे. किंवा दुसरं उदाहरण सांगायचं तर अंतराचं वर्णन करताना "कुत्र्याच्या भोकभर" असं वर्णन. यात "भोक" म्हणजे योनी नसून "भुंकणं ऐकू जाईल इतपत दूरवर" असा अर्थ आहे.

- असभ्य/अश्लील म्हणींचे अर्थातच सामाजिक/सांस्कृतिक संदर्भ आहेत. जातीवास्तव, स्त्रीद्वेष्टेपण, स्त्रियांची आणि विविध जातींची तुच्छतावाचक वर्णनं. किंबहुना लैंगिक स्वरूपाच्या कितीतरी उल्लेखांमधून हेच प्रतिबिंबित होतं.

असो. सर्वकाही इथे देणं शक्य नाही. थोडी आकडेवारी देतो. विवेचनवजा भाग संपल्यानंतर शेवटी वाक्प्रचार, म्हणी, संकेत, प्रतिमा, प्रतीकं अशा प्रकारची यादी आलेली आहे. सर्वकाही मिळून सुमारे १००० गोष्टी भरतील.

लेखक अ. द मराठेंचं नुकतंच - म्हणजे गेल्या दोन वर्षांमधे निधन झाल्याचं कळलं. त्यांना मी सलाम करतो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुरतकडचे लोक रोखठोक म्हणी वापरतात.
गेल्या वीस वर्षांत काही नव्या म्हणी झाल्या आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा वाक्प्रचार आपल्या डोळ्यादेखत निर्माण झालेला आहे. संधी आली तेंव्हा " he failed to have erection" अश्या अर्थाने तो सुरुवातीला वापरला गेला. आता मुली सुद्धा " माझा पोपट झाला " म्हणू शकतात..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~२० वर्षाआधी कॉलेजात असतांना ऐकलेला एक किस्सा (सत्य घटनेवर आधारीत) -
एक जण इंजिनीअरिंगच्या पेपर नंतर घरी जात होता. ओळखीची जोडी समोर दिसली म्हणून त्याने विचारलं - "कसा होता पेपर?". त्यातल्या पोराने सांगितलं - "काय खरं नाही. पेपर बघून माझ्या तर गोट्याच कपाळात गेल्या". पोरीने पण सांगितलं - "हो ना, माझ्या पण".....
विचारणाऱ्याला पेपर कसा होता माहित नाही, पण उत्तर ऐकून त्याच्या पण गोट्या कपाळात गेल्या असणार, नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शब्दशः कोणाच्या तरी गोट्या खरोखर कपाळात गेलेल्या बघायला मला आवडतील. कोणी खरोखर असं बघितल्याचं सांगितलं, तरीही सध्या पुरेल. काय मजा येईल नै बघायला! किती वेळा हाच प्रकार विनोद समजून लोकांनी सांगितला आहे, निश्चितच कोणी तरी हे प्रत्यक्षात बघितलं असावं.

पुरुष मारामाऱ्या, शिवीगाळ, बा-चा-बा-ची करतात, एकमेकांच्या आई-बहिणी काढतात, त्यांत शब्दशः अर्थ अपेक्षित नसतो. अर्जुन गर्भगळीत होण्याचे उल्लेख सापडतात. मात्र मुलीच्या/बाईच्या गोट्या शब्दशः कपाळात जाण्याची अपेक्षा का, हे समजत नाही.

तिर्री मांजरीला अनेकदा मी 'गोटी' अशी हाक मारते, 'छोटी'शी यमक साधतं म्हणून. मांजर आणि बाई यांतल्या संवादातही हाच्च अर्थ अपेक्षित आहे, असं समजणाऱ्या लोकांचीही गंमत वाटते. पुरुषांनाच; बायका यावर हसलेल्या बघितलेल्या नाहीत. पुरुषांना गोट्यांचं एवढं ऑबसेशन का असतं? बायकांना योनी या शब्दाचं ऑबसेशन असल्याचं दिसत नाही, चौऱ्यांशी लक्ष योन्यांमधून प्रवास करूनही हे ऑबसेशन सापडणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्कोर सेटलिंग मोड ऑन - तुम्ही पुरुष नसल्याने गोटीचं महत्त्व तुम्हाला कधी कळू शकणार नाही ! Smile - /स्कोर सेटलिंग मोड संपला

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"पायात गोळे आले" हा त्याचा स्त्री इक्विव्हॅलंट बनू शकत नाही का? (दिशा बदलली तरी विस्थापन साधारण तितकेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंवा ज्याचं जळतं त्यालाच कळतं. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"आंखे निकालके गोटी खेलुंगा" वाल्या हो त्या... त्या जातात व्यवस्थित कपाळात.
पण शाकाहारी अदितीदेवीना नॉनव्हेज चीच आवड. त्याला काय करणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बायकांना योनी या शब्दाचं ऑबसेशन असल्याचं दिसत नाही

याच इंग्रजी नांवाच्या मराठीकरण केलेल्या नाटकांत, त्या बायका, प्रेक्षकांना मोठ्याने आणि पुन्हा पुन्हा, 'योनी योनी' असं ओऱडायचे आवाहन करत होत्या. हे ऐसीवरच्याच, त्याच्या परीक्षणात वाचलं आहे. ते ऑब्सेशन काढून टाकण्यासाठी का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

योनीच्या मनीच्या गुजगोष्टी नाटक ना? उपक्रमावर लेख आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

माझ्या मते ती निव्वळ कॉपी मारलेली आहे. मूळ इंग्लिश नाटकात असं करतात म्हणून. ते भाषांतर गूगल-भाषांतरापेक्षा केसभर उजवं, एवढंच बरं आहे. भाषा बदलली की संस्कृती बदलते याची काहीही जाणीव न ठेवता केलेलं भाषांतर.

हे ऐसीवरचं उसंत सखूंनी केलेलं परीक्षण - योनीच्या फनीच्या फनी गोष्टी !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

किस्सा मराठीतला नाही, परंतु असभ्य वाक्प्रचारांसंबंधीचा आहे, म्हणून इथे सांगतो.

स्थळ: आमचे कँपस. काळ: शनिवारचा पहिला तास. सहसा कसल्या ना कसल्यातरी टेस्टसाठी राखून ठेवलेला. प्रमाणे, कसलीतरी फाडू टेस्ट होती. संपली. समस्त विद्यार्थिगण झालेल्या रक्तपाताची चर्चा करीत हॉलवेतून चालला होता. पैकी, दिल्लीहून आलेल्या एका विद्यार्थ्याने आपल्या सहदिल्ल्योद्भव मित्रास विचारले, "कैसी हुई?"

आपल्या दिल्लीब्रीदास जागून त्याच्या मित्राने कॅरॅक्टेरिस्टिक दैल्लिक परिभाषेत उत्तर दिले: "माँ चु* गयी|"

कर्मधर्मसंयोगाने, एक प्रोफेसरमहोदय तेव्हा हॉलवेमधून जवळूनच चालले होते, त्यांनी ते नेमके ऐकले. प्रोफेसर उत्तरप्रदेशी. म्हणजे दिल्लीकरांचे बाप. त्यांनी लगेच त्या उत्तरदात्यास हटकून विचारले: "घर से टेलिग्राम आया था क्या?"

आता बोला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर उल्लेखलेली घटना/घटनेचा विनोद वर्गातीलमुलींनाही माहीत असल्याने अखेर नाईलाजाने हे असं थेट बोलण्याऐवजी कपाळालगतच्या केसांकडे अंगुलीनिर्देश करून फक्त 'कुरळे झाले रे' असं बोलण्याची प्रथा चालू झाली.
पण हे चाळीस वर्षांपूर्वी.
आपण आम्हास सिनियर असणार.
खुलासा: हा प्रतिसाद विकासे यांच्या पोस्टला उद्देशून होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कपाळालगतच्या केसांकडे अंगुलीनिर्देश करून फक्त 'कुरळे झाले रे' असं बोलण्याची प्रथा चालू झाली.

'कपाळमोक्ष होणे' हा वाक्प्रचारसुद्धा अशाच काही अर्थी उद्भवला असावा काय?

(बाकी, 'कुरळे झाले' बोले तो कपाळात जाणाऱ्या चीजवस्तू आजूबाजूच्या परिसरासह गेल्या असाव्या काय? म्हणजे, आमच्या वुड्डहौससाहेबाच्या भाषेत, 'व्हेअर द हेअर इज़ क्रिस्प'?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला खरंच माहीत नाही, गोट्या कपाळात जाणे म्हणजे नेमके काय, कुणी सांगेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही वापरतो अशी एक म्हण:
'बॉल न बोचा अन गावभर नाचा'
एक वाक्प्रचार: डोक्याची पुच्ची होणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

'बॉल न बोचा अन गावभर नाचा'

मी ऐकलेला पाठभेद असा - 'बॉल ना बोचा अन म्हणे मला टोचा'
अर्थ - एखाद्या गोष्टीसाठी लायक नसताना त्या गोष्टीची अपेक्षा करणे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाॅल ना बोचा, फुकटचा लोचा
अर्थ: फालतू गोष्टींचा अट्टहास आहे हा which is not fruitful

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

"डोळ्यांत बुल्ली आणून पाहाणारा" (कामवासेनेने पछाडून पाहाणारा)

(१) ह्यावरून नेमाड्यांच्या एका कादंबरीतला (बहुतेक ‘झूल’ मधला) एक वाक्प्रयोग आठवला. चांगदेव पाटील ज्या कॉलेजमध्ये शिकवत असतो तिथला एक चपराशी की कारकून एका शाळकरी मुलीवर पाघळून जाऊन तिचा पिच्छा पुरवत असतो. तर दुसरा एक चपराशी त्याचं वर्णन ‘साहेब, तो लवळा खांद्यावर घिऊन फिरत होता’ असं करतो. (पुस्तक हाताशी नसल्यामुळे उल्लेख नेमका नाही, पण गोळाबेरीज असाच होता.)

(२) ‘डोळ्यांत बुल्ली’ ही कल्पना माझ्यासाठी नवी होती, पण ‘बुल्लीत डोळा’ ही कल्पना मात्र ’युलिसीज’ मधल्या मॉलीच्या स्वगतात आहे:

..when I got over him that way when I unbuttoned him and took his out and drew back the skin it had a kind of eye in it..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक3
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

_/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

जगातल्या सर्व शिव्यांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे लैंगिकता. शिवी म्हणजे लैंगिकतेची ओवीच. रोष, नाराजी, राग, अगतिकता व्यक्त करण्यासाठी या ओव्यांचा वापर करण्याची परंपरा खूप जुनी आहे. सहनही होत नाही व सांगताही येत नाही या अवस्थेतून बेडा पार करण्यासाठी या ओव्यांचा आधार घ्यावा लागतो. खात्यांतर्गत शिस्त म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार या दु:खावर फुंकर घालण्यासाठी या ओव्या सासुरवाशिणीला जात्यावर दळायला हलक्या करणाऱ्या ओव्यांइतक्याच महत्वाची भूमिका पार पाडतात. या ओव्यांना पांढरपेशा साहित्यात स्थान नाही. पण दलितसाहित्यात या ओव्यांच महत्व अनन्य साधारण आहे. तिथं या ओव्यांना प्रतिशब्द नाही. पर्यायी शब्द वापरले तर आशयहानी होते. 'पोटाला नाही आटा अन म्हनं चोटाला उटण वाटा`. इथं तर अश्लीलताही ओशाळून जाते....

हे स्वगत मधे लिहिलेले आठवले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

'स्वगत' लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे पुस्तक वन ऑफ दि मोस्ट आवडते एव्हर आहे.

२०१२ सालीच हे पुस्तक आल्या आल्या घेतलं होतं आणि ताबडतोब लेखकाला फोन करून अभिनंदनही केलं होतं. लेखकाची तब्बेत बरी नसल्याने लेखकपत्नीकरवी थोडंसं संभाषण झालं. एकच प्रश्न विचारलेला तो हा की ऐतिहासिक ग्रंथांचा वगैरे काही आधार त्यांनी घेतलेला किंवा कसे? तर त्याला त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. अर्थात बाकी एक महत्त्वाचे लिमिटेशन त्यांनी स्वत: प्रस्तावनेतच कबूल केलेले आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडून शिव्या कलेक्ट केल्या पाहिजे होत्या, ते एका माणसाच्या बस की बात नसल्यामुळे त्यांनी त्यांना माहिती असलेल्या प्रदेशातील (मुख्यत: कोंकण) शिव्या संग्रहित केल्या. त्यामुळे कोंकणचा अनुशेष भरून निघाला. आता इथून पुढे पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ, झाडीपट्टी, वगैरे भागातल्यांनी आपापल्या शिव्या लिहून त्यांची पुस्तके काढली पाहिजेत.

हा माझा ड्रीम प्रोजेक्ट होता शाळेत असतानाचा. तो त्यांनी अगोदरच पूर्ण केला. असो, चालायचेच!

बाकी काही असो, या निमित्ताने गधेगाळीसारख्या अतिशय समृद्ध वारशाला सध्याची पिढीही तितक्याच उमेदीने पुढे नेतेय हे पाहून बरे वाटले. एस्पेशली झवणे ही शिवी किमान ८०० वर्षे जुनी आहे हा माझ्यासाठी एक साक्षात्कारच होता.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त प्रतिसाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

माझ्या मते झवणे ही शिवी नसावी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे. मला ते एक आडनाव असण्याची शक्यता वाटते. जसं - दवणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंवा दुसरं उदाहरण सांगायचं तर अंतराचं वर्णन करताना "कुत्र्याच्या भोकभर" असं वर्णन. यात "भोक" म्हणजे योनी नसून "भुंकणं ऐकू जाईल इतपत दूरवर" असा अर्थ आहे.
...... 'भोकभर' हा वाक्प्रचारातला वापर माहीत नव्हता. मी 'भुकावर' असंच ऐकलं आहे.
पुरावा: २०१४ ऐसी-कट्टावृत्तान्त. पहिला परिच्छेद, शेवटची ओळ. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा वान्गमयामुळे सरपटणारा मेंदु फार सुखावतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

ओह खरच? रेप्टाइल ब्रेन? या मेंदूबद्दल, वाचले पाहीजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रस्तावनेची पाने इथे दिल्याबद्दल धन्यवाद. त्याने लेखकाची वैचारिक बैठक कळते.

'आजवरी कमळांच्या द्रोणी, मधु पाजला तुला भरोनी'

या ओळीचा बारकाव्यासहीत अर्थ माहीत नव्हता.

तुमच्या परसोवात एक चाफ्याचा फूल फुलला. तेचा परीमळ आमच्या घरागत इलो

वा!!
________________________
बाकी असभ्य म्हणी नाहीत पण शिव्या मुंबईच्या रेल्वेत, कोळीणींच्या तोंडी ऐकल्या आहेत
________________
प्रस्तावनेत म्हटले आहे, ..... पुस्तक वाचून हे स्पष्ट झाले की - 'हे वाक्प्रचार विकृत नाहीत तर ते अत्यंत गंभीर उद्गार आहेत.' परवाच एका पुस्तकात वाचनात आले की फ्रॉईडच्या मते 'स्लिप ऑफ टंग' हे योगायोग नसतात , अमूर्त मनाशी त्यांचा दाट संबंध असतो. ते वाक्य आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

युट्युब वेब सिअरिज - गावाकडच्या गोष्टी - भाग १,२,३,४ पासूनच लक्षात येईल बालण्याची पद्धत मुलांचीही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी बोलीभाषेतील लुप्त झालेल्या असभ्य म्हणी आणि वाक्यप्रचार. व्यवस्थित अभ्यास करून प्रसंगी योग्य ती म्हण/ वाक्यप्रचार वापरा :-

टिप : सभ्य लोकांनी पुढे न वाचता msg delete करावा.

1) लवडेलूट करणे :- संधी मिळाली म्हणून एखाद्या पदार्थाचा भरपूर, अनावश्यक उपयोग करणे.

2) गांड धुवून कढी आणि उरलेल्याची वडी :- अतिशय कंजुषपणा करणे.

3) आंडाला लोणी लावणे :- अत्यंत नामुष्कीची खुशामत करणे.

4) आंड तोंडात धरणे :- लाचारीचा कळस करणे.

5) नेसली बारा लुगडी पण बाहेर झाटं उघडी :- विपुलतेचा उपयोग न करणे.

6) सती जाणारी, गांड भाजते म्हणून माघारी येणार नाही :- निश्चयी माणूस संकटांना घाबरुन पराभव पत्करत नाही.

7) गांड गुलामी - अत्यंत हीन दास्यत्व.

Dirol गांडीत बोट घालु नये, घातले तर हुंगू नये, हुंगले तर सांगू नये, सांगितले तर तिथे राहू नये :- एखादी वाईट गोष्ट मुळातच करु नये, केली तर मुर्खपणा वाढवत जाऊ नये.

9) मोराने पिसारा फुलविला की गांड उघडी पडते :- नको त्या वेळी दोष उघडे पडणे.

10) तोंडभर विडा नी गांडभर लवडा - भरपूर समृद्धी असणे.

11) गांडीत मिर्चीची रोपे लावणे :- खुप छळणे.

12) गांडीत मिर्ची फुटणे:- दुसर्याचे यश पाहून आग होणे.

13) उंटीणीच्या गांडीचा मुका घेणे :- कुवतीबाहेरचे कार्य करायला घेणे.

14) सासरी आली, पन चूत विसरली :- कामाचे मुख्य साधन विसरणे.

15) रांडेला लवड्याची भिती कसली? - सराईत माणसाला कसली अडचण येत नाही.

16) फुकटचा फोदा आणि झव रे दादा :- फुकटात मिळालेल्या वस्तुचा, संधीचा यथेच्छ उपभोग घेणे.

17) फोदा इकडे, झवताय तिकडे :- बावळटपणे कार्य करणे.

18) फुकट झवायला मिळतय तर म्हणे शेट्ट रुतत्यात :- चांगली गोष्ट मिळाली तरी ती घेण्याला सबबी सांगणे.

19) झाट्याची नाय पत आणि नाव गणपत :- पोकळ रुबाब.

20) अस्वलाला कसले आले झाटांचे ओझे? :- समर्थ माणसाला कार्याचा भार जाणवत नाही.

21) नागवी सवाशीण भेटणे :- अकल्पित लाभ होणे.

22) बकरीची शेपटी ना फोदा झाके, ना माशी हाके :- निरुपयोगी गोष्ट.

23) मुतण्यापुरता लवडा हाती धरावा :- नीच माणसांशी कामापुरते संबंध ठेवावा.

24) वाळुत मुतले, ना फेस ना पाणी :- निर्रथक क्रिया.

25) खरी रांड मोठ्या लवड्याला भीत नाही :- कार्यकुशल माणुस संकटांना घाबरत नाही.

26) एक रांड आणि चार आंड :- मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती.

27) झाटे धूतली म्हणून रेशीम होत नाही :- मुळातच वाईट गोष्टीत कितीही बदल केला तरी ती मुळ गुणधर्म सोडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण5
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

अतिशय माहितीपूर्ण माहिती. अजून ज्ञान आपल्याकडे असल्यास आपणही एखादे पुस्तक लिहिण्याचे मनावर का घेत नाही ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२० आणि २७ कहर आहेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !