रेट्रो स्ट्रीट : अर्थात जुन्या गाण्यांच्या गप्पा

तर असं झालं , मालक अदिती यांनी खोडी काढली बेस गिटारसंबंधी. ते काय असतंय वगैरे. आणि मग बराच कुटाणा झाल्यावर त्या म्हणाल्या कि मला ( नेहमीप्रमाणे ) हे सगळं माहितेय वगैरे. पण असो . तर खरडफळ्यावर गप्पा वाढत गेल्या. गविशेठ , शुचि मामी , भटोबा , नील लोमस , चौदावा धूमकेतू आणि मालक अदिती , कधीकधी चक्क थत्ते वगैरे . चालकमालक जंतू कावणार असं गृहीत धरून खरडफळ्यावरून चर्चा धाग्यावर आणायचं ठरवलं ( पण जंतू कावलेच नाहीत , )गवि शेठनी नाव सुचवलं म्हणून देऊन टाकलं रेट्रो स्ट्रीट.
आता म्हणाल कि " नवीन काय ऐकताय " पेक्षा इथे वेगळं काये ? खरतर काही नाहीये पण आमच्या गप्पांचा झेंडा लागणार कसा , म्हणून काढून टाकला धागा आणि बिल फाडलं जंतूंवर .
तर वेगळं काये तर इथे गप्पांमधून हा धागा पुढे जाणं अपेक्षित आहे . मारत चला ..
नेहमीप्रमाणे ( या विषयात किंचित रस नसूनही केवळ जनहितार्थ ) श्री श्री आचरट बाबा एडिट करायला आले. आता विषय हाच म्हणल्यावर या गप्पा चालू होण्यापूर्वी अरबी तारुण्य आदूबाळ ( मे पीस बी अपॉन हिम )यांनी द कव्वाली बद्दल चालू गेलेल्या गजालीही यात घेतल्या आहेत .
आत्ता नुसतं एडीटून टाकतोय , गाणी नन्तर वेळ झाल्यावर एम्बेड करण्यात येतील .

गवि
सोमवार, 11/02/2019 - 10:36
नायिका गाते आहे आणि ती एक तर शब्द विसरते किंवा भावनाविवश झाल्याने, तिला पुढे गाववत नाही.
मेरे दिल गायेजा झूबी झूबी..
हे सुद्धा, चक्क यातलं आहे. (.. की जिमी जिमी, आजा आजा? चुभूदेघे)..

गवि
सोमवार, 11/02/2019 - 10:49
आगोदर वाटायचं की जिमी जिमी हे गाणं एखाद्या मूळ रशियन गाण्यावरून उचललं असेल आणि म्हणून त्यांना ते अपील होत असेल. (सवयीने)

पण खरंच हे हिंदी मूळ गाणं आणि ते असलेला मिथुनचा सिनेमा हे तिथे एका पिढीत घराघरात पोचले होते आणि टॉप फेमस होते असं ऐकलं / वाचलं. मिथुन हा अनेक रशियन तरुणींचा "क्रश" होता असंही.

गवि
सोमवार, 11/02/2019 - 10:45
बादवे, जिमी जिमी आजा आजा हे गाणं गोव्यात येणाऱ्या रशियन टुरिस्ट लोकांत इतकं लोकप्रिय आहे की ते खास त्यांच्यासाठी जवळपास सर्व लाईव्ह शोजमध्ये वगैरे खास पेशकश म्हणून किंवा त्यांच्या डिमांडवरुन गायलं वाजवलं जातं.
दोन तीन वेळा हे पाहून आंजावर शोध घेतला असता जुने भारत रशिया सिनेमा, संगीत विषयाकडे ऋणानुबंध दाखवणारे वृत्तपत्रीय लेख सापडले.

अबापट

सोमवार, 11/02/2019 - 13:19
हे घ्या जिमी जिमी आजा आजा चं मूळ गाणं
https://www.youtube.com/watch?v=T-cB0AFHZjw

गवि
सोमवार, 11/02/2019 - 13:25
बघतो लिंक. रोचक असेल.
जिमी जिमी ही क्रिएशन इन इटसेल्फ ओरिजिनल आहे असं म्हणणं / माहिती नसून जे काही जिमी जिमी हिंदी गाणं सिनेमात आहे, तेच तिथे रशियात मुळातून फेमस आहे असा मुद्दा.

गवि

सोमवार, 11/02/2019 - 13:30
लै भारी.
यांचंच "हँडस अप" हे तर फार फार आवडतं लहानपणापासून.
You're ok ऐकलं नव्हतं.

गवि

सोमवार, 11/02/2019 - 13:32
अंडर प्रेशर >> आईस आईस बेबी >> थंडा थंडा पानी
ही चेन आठवली.
अबापट
सोमवार, 11/02/2019 - 13:42
अंडर प्रेशर मधील बेस गिटारवरची रिफ पुढे या दोन्ही गाण्याची चाल बनली . सालं आपल्याकडं बेस गिटारचा चांगला वापर नाय करत कुणी .

गवि

सोमवार, 11/02/2019 - 13:56
सालं आपल्याकडं बेस गिटारचा चांगला वापर नाय करत कुणी
अगदी अगदी..त्यातल्यात्यात लेस्ली लुईसला आवडते ती मधेच मारायला.

घाटावरचे भट
सोमवार, 11/02/2019 - 14:13

>>अवांतर: त्या नायिका/न-नायिका गाण्यांवरून, अजून एका (मायक्रो)थीमवरची दोन गाणी आठवली.

म्हणजे, नायिका गाते आहे आणि ती एक तर शब्द विसरते किंवा भावनाविवश झाल्याने, तिला पुढे गाववत नाही. अशा प्रसंगी, तिच्या आयुष्यातले बाप-भाऊ-सखा- तिच्या साहाय्यार्थ पुढे धावतात आणि 'भरी मेहफिल में', एकही बीट न चुकवता गाण्याचं सॅलड ड्रेसिंग पूर्ण करतात!
उदा. १) पतझड सावन बसंत बहार. अबला नारी: नीलम, संरक्षक: शशी कपूर
उदा. २) दुश्मन ना करे दोस्त नो वो. अबला नारी: स्मिता पाटील(!). संरक्षक: राजेश खन्ना
अजूनही असतील. कुणाला आठवत असल्यास येथे अवश्य नोंदवावीत.
'ये इश्क इश्क है' - सिनेमा आठवत नाही, पण वयस्कर बुवा आणि वयस्कर बाईंमधला कव्वालीचा मुकाबला चालू आहे. वबुंनी त्यांचा गाण्यातून प्रेमाविरुद्ध काही बिनतोड युक्तिवाद केल्या कारणाने वबांना अश्रुपात होतो. तस्मात वबांना प्रेमाची तारीफ करणारं गाणं पुढे म्हणवेनासं झाल्यावर पुढचं गाणं मख्ख चेहेऱ्याचा भारतभूषण येऊन पूर्ण करतो, आणि मुकाबला की काय तो जिंकतो.
सालं आपल्याकडं बेस गिटारचा चांगला वापर नाय करत कुणी .
असहमत. मला बेस गिटारचा उत्तम वापर कोणता याचे बेंचमार्क्स माहित नसले तरी रेहमान बेगि मस्त वापरतो असं वाटतं. मसक्कली नावाच्या गाण्यात बेगि काढून टाकली तर काहीच उरणार नाही. किंबहुना दिल्ली-६ चित्रपटातील सगळ्याच गाण्यांत बेगि सुंदर वापरलेली आहे.

नितिन थत्ते

सोमवार, 11/02/2019 - 22:21
>>'ये इश्क इश्क है' - सिनेमा आठवत नाही,
बरसात की रात
३_१४ विक्षिप्त अदिती
सोमवार, 11/02/2019 - 22:36
आता मुद्दाम बेस गिटार काय ते समजण्याची शक्यता वाढेल म्हणून 'मसक्कली' ऐकलं; आतापर्यंत फक्त मोहित चौहानच्या आवाजासाठी ऐकलं होतं.
अत्यंत रटाळ आणि कल्पनाशक्तीला काहीही वाव नसणारं काम सध्या करत आहे, मग एकीकडे नेटफ्लिक्सवर 'दिल्ली -६' लावून दिला. तेवढाच कमी कंटाळा.
आदूबाळ
मंगळवार, 12/02/2019 - 05:49
'बरसात की एक रात'मधली ती कव्वाली हिंदी सिनेमांतली 'द कव्वाली' आहे. 'जो दवा के नाम पे जहर दे, उसी चारागर* की तलाश है' किंवा 'जब मैं पीता हूं तो कहते है कि मरता ही नहीं, जब मैं मरता हूं तो कहते है कि जीना होगा' वगैरे थोर लिरीक्ष आहेत त्यात.
*म्हणजे डॉक्टर असावा असं संदर्भावरून वाटतं. पण एका मित्राला 'लौंग गवाच्छा'मधला लौंग हे लांबीचं माप वाटत असे. त्यामुळे...
अबापट
मंगळवार, 12/02/2019 - 06:22
तो बरसात की रात ओ आबा, बरसात की एक रात अमिताबच्चम चा ..
नील लोमस
मंगळवार, 12/02/2019 - 07:51
ये इश्क इश्क है
उर्दू, पंजाबी, देहाती अश्या विविध भाषा . प्रमुख गायकांपेक्षा नाच्या-मावशीटाईप सहगायकांनीच म्हंटलेली, ओठांवर बोट फिरवत मख्ख भारतभूषणसाठी अस्वस्थ होणारी चंचल सौंदर्यवती मधुबाला असली किलर गोष्ट सुचवल्याबद्दल आभार
लौंग गवाच्छा
हा हा हा. आबा लोल.
अबापट
मंगळवार, 12/02/2019 - 08:47
१. बरसात की रात मधे संगीत थोर आहे..म्हणजे सुप्रसिद्ध ही द कव्वाली, गरजत बरसत सावन आयो रे, जिंदगीभरनही भुलेगी ये बरसात की रात वगैरे लोकप्रिय गाणी सोडून ,उर्वरित गाणीही थोर आहेत. उदा. निगाहे नाज ही कव्वाली ऐका , यातील फारशा प्रसिद्ध नसलेल्या गायकांची गायकी थोर.
द कव्वाली पेक्षा ही भारी वाटते.अनेक गेय कप्लेट्स सुधा या पिच्चरात मजा आणतात
आणि हे सगळं जमवलंय भा र ल मं यांचा फक्त मर्यादित वापर करूनच.(अदिती प्लिस नोट)
रोशन रॉक्स.
२. @ नील : तू काय म्हणत आहेस ते कळलं, पण कव्वाली मधे नाच्या/मावशी वगैरे असतात का याबद्दल साशंक आहे.( त्यांच्या पोशाखावरून वाटू शकते म्हणजे सुरमा, तोंडात पान, विशिष्ट टोपी वगैरे.)
अजूनही कव्वालांचे पोशाख खास असतात. त्यांची अकंपनीमेंटपण काहीही असू शकते . बुलबुल तरंग तबल्याऐवजी बोन्गो पण डाव्या हाताने डग्गाच . पण गायकी थोर असू शकते..
असो
ऐका निगाहे नाज पण ..
आय लौ कव्वाली पन

अबापट

मंगळवार, 12/02/2019 - 09:02
१.किंवा जी चाहता है चुम लु वगैरे...
व्हीडो बघावेत अजून करमणूक होते
२.भटोबा, तुमचा रेहमान चा मुद्दा मान्य. पण अपवादच नाही का ?

नितिन थत्ते
मंगळवार, 12/02/2019 - 17:22

>>बेस गिटार काय ते समजण्याची शक्यता वाढेल

"दिल है छोटासा"-रोजा मध्ये पण बेस गिटार छान वाजते.

१४टॅन
मंगळवार, 12/02/2019 - 18:51
स्वस्तिक बँडचं जोगी ऐकलंत का? बेस आणि इलेक्ट्रिक गिटार उत्तम.
राजकुमार रावचा 'ट्रॅप्ड' पाहिला. ऑस्कर ओवाळून टाकण्याइतकी उत्तम ॲक्टींग.

अबापट

मंगळवार, 12/02/2019 - 21:27
भटोबा , तुमचा आक्षेप मान्य. आत्ताच उर्वशी उर्वशी टेक इट इझी उर्वशी लागलं होतं. भरपूर आहे बेस गिटार..

अबापट
मंगळवार, 12/02/2019 - 21:23
अदिती, उद्या अंडर प्रेशर चा व्हीडो टाकतो. त्यातील बेस गिटार दिसेल व ऐकू येईल . फोनवरून जमत नाहीये . मग बहुधा बरेच संदर्भ लागतील.
बेस गिटार हे मूलतः परकशन म्हणून रॉक न रोल आणि रॉक मधे वापरले जाते. पूर्वी जे काम डबल बेस नावाचे धूड करे त्याची अर्ली फिफ्टीज मधे स्टेज संगीत जास्त सुटसुटीत झालं, तेव्हा जास्त सुटसुटीत अशा बेस गिटार ने घेतली असावे..जागच्या जागी उभे असणारे गायक वादक जाऊन जास्त नाचते गाते हालते चालते नाचरे गायक वादकांना हे फार सोयीचे झाले असावे( अंड आधी का कोंबडी आधी ते बघायला पाहिजे)हाच काळ स्टेज वर दंगा रॉक अँड रोलचा ( तरी एल्विसच्या सुरुवातीच्या काळात डबल बेसचे अवजड धूड दिसते स्टेजवर)
(अवांतर रोचक: तसा त्यापूर्वी आणि नन्तरही पियानो परकशन म्हणूनही वापरला जातो . मज्जा येते तिथंबी)

३_१४ विक्षिप्त अदिती
मंगळवार, 12/02/2019 - 21:57
बापट, बेस गिटार ऐकवाच.

अबापट
बुधवार, 13/02/2019 - 11:02
अदिती , सुलभ बेस गिटार .
उपरनिर्दिष्ट व्हिडिओ पहा. यात दोन गिटारवाले आहेत. एक लांब केसवाला आहे. तो AstroPhysics मधे Ph.D. आहे . त्याच्याकडे दुर्लक्ष करा . दुसरा सभ्यसा दिसतोय , कमी केस वाला. पांढरा टी शर्टवाला, इंजिनेर आहे तो , त्याच्या हातात चार तारा असलेली गिटार दिसतीय त्याकडे बघा आणि ऐका
किंवा व्हिडिओ चालू झाल्याझाल्या जे वाजताना दिसतंय आणि ऐकू येतंय ती बेस गिटार .

३_१४ विक्षिप्त अदिती
बुधवार, 13/02/2019 - 21:26
तो AstroPhysics मधे Ph.D. आहे . त्याच्याकडे दुर्लक्ष करा .
ही आता प्रतिक्षिप्त क्रिया असते.
बापट, तुम्हाला पटणार नाही, पण बेस गिटार म्हणजे काय ते मला माहीत आहे. मी Astrophysics मधे Ph.D. करत होते तेव्हा माझ्या घरमित्रांपैकी एक अकूस्टिक गिटार वाजवाजचा, एक बेस गिटार आणि एक ड्रम. ते तिघं गाण्याबजावण्याला बसले की माझे कान किटायचे. पण बेस गिटारच्या तारा अकूस्टिकपेक्षा निराळ्या असतात, दिसतात वगैरे गोष्टीही मला माहित्येत.
तुम्ही ऐकवणार ते गाणं क्वीनचं असणार, याबद्दल मला खात्री होतीच.

..शुचि
बुधवार, 13/02/2019 - 21:53
मी Astrophysics मधे Ph.D. करत होते तेव्हा माझ्या घरमित्रांपैकी एक अकूस्टिक गिटार वाजवाजचा,
इंग्लंडमध्ये का गं. विचारायचं कारण की सहसा भारतिय लोक गिटार-ड्रम वगैरे घरात वाजवताना ऐकीवात/पहाण्यात नाहीत.

मिहिर
गुरुवार, 14/02/2019 - 01:11
अण्णा, रहमानच्या 'दिल से रे' गाण्यातही बेस गिटार स्पष्ट ऐकू येते. ती पिंक फ्लॉइडवाल्याने वाजवली आहे म्हणे.

३_१४ विक्षिप्त अदिती
बुधवार, 13/02/2019 - 23:23
हो, हो. पोलिश मित्र अकूस्टिक गिटार वाजवायचा, दोन ब्रिटिश मित्र बेस आणि ड्रम्स.

घाटावरचे भट
गुरुवार, 14/02/2019 - 14:00

>>अण्णा, रहमानच्या 'दिल से रे' गाण्यातही बेस गिटार स्पष्ट ऐकू येते.

'दिल से रे' गाण्याचा तालाचा/पर्कशनचा भाग बराचसा बेगिवरच आहे. पण मसक्कलीमधली बेस गिटार खास आहे. त्यात बेसचा वापर फक्त गाणं भरण्यासाठी किंवा तालासाठी नाही, तर बेसलाईन गाण्याचा अविभाज्य भाग आहे. त्यात दोन वाद्य मोठ्या खूबीने वापरली आहेत - एक म्हणजे बेगि आणि दुसरा म्हणजे स्ट्रिंग सेक्शन (जो फक्त मुखड्याचा किंवा अंतऱ्याचा ओळीच्या सुरुवातीला वाजतो). त्यांनी मस्त परिणाम साधला जातो.

गुरुवार, 14/02/2019 - 14:46

>>अण्णा, रहमानच्या 'दिल से रे' गाण्यातही बेस गिटार स्पष्ट ऐकू येते. ती पिंक फ्लॉइडवाल्याने वाजवली आहे म्हणे.

विकि म्हणतं "Guy Pratt, Pink Floyd bass guitarist for post Roger Waters albums Delicate Sound of Thunder, The Division Bell and Pulse played bass on this song." विकि असंही म्हणतं की हा बाबा सेशन बेस प्लेयर आहे आणि त्यानी लै पब्लिकसोबत बेस वजवलाय. म्हणजे काय ते माहित नाही.

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 15:33
भटोबा, म्हणजे काय खरंच माहीत नाही ?
घाटावरचे भट
गुरुवार, 14/02/2019 - 16:40

>>भटोबा, म्हणजे काय खरंच माहीत नाही ?

नाय बॉ. सेशन बेस प्लेयर आणि इतर बेस प्लेयर्समध्ये काय फरक असतो?

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 17:02
सेशन म्युझिशिअन्स विकी मारा म्हणजे लक्षात येईल . बरेच वादक वेळोवेळी आपल्या सर्व्हिसेस थोरामोठ्या ग्रुप्सना देतात ( खरं तर उलट, बरेच ग्रुप्स अशा वादकांच्या सेवा घेतात ) ही मंडळी सामान्यपणे तरबेज , ज्ञानी कुशल असतात.( तशी नसतील तर विचारत नाही त्यांना ) त्यांची नावे बँडच्या लेबल वर नसतात ( वादन त्यांचे असेल तरी).पण बरेच कलाकार /ब्यांड यांच्याबद्दल कृतज्ञ असतात.( कारण बँड कच्चा असताना या मंडळींनी कुठेतरी हाताला धरून , वाजवून , मार्गदर्शन केलेलं असतं)
स्वीट होम अलाबामा गाणं ऐकलं असेल . लिनर्ड स्किनर्डनी एक आख्ख कडवं swampers या सेशन म्युझिशिअन्सच्या ग्रुपला व्हायलंय , कृतज्ञतापूर्वक .. हे वाचा म्हणजे लक्षात येईल .. आपल्याकडेही अशी मंडळी असणारच .. पण मला माहित नाही . One verse of the song includes the line, "Now Muscle Shoals has got the Swampers/And they've been known to pick a song or two." This refers to the town of Muscle Shoals, Alabama, a popular location for recording popular music because of the "sound" crafted by local recording studios and back-up musicians. "The Swampers" referred to in the lyrics are the Muscle Shoals Rhythm Section. These musicians, who crafted the "Muscle Shoals Sound", were inducted into the Alabama Music Hall of Fame in 1995[10] for a "Lifework Award for Non-Performing Achievement" and into the Musician's Hall Of Fame in 2008 (the performers inducted into the latter were the four founding Swampers—Barry Beckett, Roger Hawkins, David Hood, Jimmy Johnson—plus Pete Carr, Clayton Ivey, Randy McCormack, Will McFarlane, and Spooner Oldham).[11][12] The nickname "The Swampers" was given to the Muscle Shoals Rhythm Section by producer Denny Cordell during a recording session by singer/songwriter Leon Russell, in reference to their 'swampy' sound.
Part of the reference comes from the 1971–1972 demo reels that Lynyrd Skynyrd had recorded in Muscle Shoals with Johnson as a producer/recording engineer. Johnson helped refine many of the songs first heard publicly on the Pronounced album, and it was Van Zant's "tip of the hat" to Johnson for helping out the band in the early years and essentially giving the band its first break.
Lynyrd Skynyrd remains connected to Muscle Shoals, having since recorded a number of works in the city and making it a regular stop on their concert tours.

गवि
गुरुवार, 14/02/2019 - 17:31
बरेच वादक वेळोवेळी आपल्या सर्व्हिसेस थोरामोठ्या ग्रुप्सना देतात (
प्रासंगिक करार ??
(अगदीच अवांतर, पण शाळेच्या एस्टीवाल्या ट्रिपा आठवल्या)

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 17:38
गविशेठ, प्रासंगिक करार हे टेक्निकली बरोबर पण महत्व खूप जास्त. ब्यांड वाले लोकं मान देतात या लोकांना. भारी वादक असतात हे.

गवि
गुरुवार, 14/02/2019 - 17:48
तसेच अनेक बँड्समधून उत्तम लोक निघून सोलो करियर सुरू करतात.. किंवा दोन सोलो / बँड एकत्र येऊन featuring असं म्हणून काही एकेकटी गाणी करतात.
पैकी दुसऱ्या प्रकारात काही भारी गाणी बनून जातात.
बँडमधून बाहेर पडून एकटा सुरु अशा केसेसमध्ये जास्त वेळा प्रभाव कमी झाल्याचं वाटलं. (फेमस बँड सोडलेल्याचं) सोलो करियर जास्त चांगलं असं क्वचित वाटलं.
बँड म्हणून एक जादा एनर्जी असते.

घाटावरचे भट
गुरुवार, 14/02/2019 - 17:49
धन्यवाद अन्ना!

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 17:59
एक उत्तम उदाहरण म्हणजे बिली प्रेस्टन ... हा जरी बीटल्सच्या फॅब फोर पैकी नसला तरी त्याला अनऑफिशिअली फिफ्थ बीटल म्हणून संबोधण्यात येई .

गविगुरुवार, 14/02/2019 - 19:52
Band with band or solo with solo
-UB40 आणि Pato Banton : बेबी कम बॅक.
- Bryan Adams featuring Melanie C: When you're gone
बँडखेरीज सोलो:
Ali Campbell : Let your yeah be yeah (Cover)
जॉर्ज मायकेलची अनेक WHAM नंतरची।। फादर फिगर, प्रेइंग फॉर टाईम
आठवतील तसे ऍडवतो.
तुम्हीही ऍड करा.

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 20:00
च्यायला गवि, तुम्हीपण एटीजवाले काय ?

आणि माझं एव्हरी ब्रेथ यु टेक...

गवि
गुरुवार, 14/02/2019 - 20:13
हो आमचं सगळं जुनं जुनं
पुढे, स्टिंगचं "पोलीस"मधून बाहेर पडल्यानंतरचं "Fields of gold" हे माझं अतीव आवडतं गाणं आहे.

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 20:24
आणि माझं एव्हरी ब्रेथ यु टेक...

..शुचि
गुरुवार, 14/02/2019 - 20:28
एव्हरी ब्रेथ यु टेक
ते गाणं मागावर असल्याचं म्हणजे स्टॉकिंग बद्दल आहे.

..शुचि
गुरुवार, 14/02/2019 - 20:33

च्यायला गवि, तुम्हीपण एटीजवाले काय ?

माझा नवराही ८०ज वाला आहे. पण मी उंडगं जनावर कसं वाट्टेल त्या शेतात जाउन चरतं, मनास येइल ते खातं, तशी हॅपहझार्ड गाणी ऐकत गेलेय. त्यामुळे आम्ही फक्त गोग्गोड वाले. मग ते ७०ज/८०ज/९०ज आपल्याला कळत नाही.

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 20:43
मामी,
भारी आहात तुम्ही !!! मी पण वाट्टेल त्या शेतात चरलोय.फक्त तुम्ही उसाच्या शेतीत गेलात आणि मी दगडधोंड्यांच्या... सेवनटीज एटीज वगैरे लेबल्स हो फक्त, ओळ्खण्याकरता

..शुचि
गुरुवार, 14/02/2019 - 20:44
भारी आहात तुम्ही !!!
हाहाहा नाही ती माझी उपमा नाही वरिजनली सन्जोपरावांनी ती वापरलेली आहे.

गवि
गुरुवार, 14/02/2019 - 20:48
आणि माझं एव्हरी ब्रेथ यु टेक...
ते तर आहेच हो. ओ अण्णा, गाजलेल्या मूळ बँड्सची गाणी उत्तम असणं हा भाग गृहीत आहेच, पण इथे त्यातून कोणी वेगळं होऊन सोलो केलेल्या गाण्यांत क्वचित काही उत्तमही बनतात त्याची उदाहरणं म्हणत होतो.
न ऐकलेल्यांसाठी..

अबापट
गुरुवार, 14/02/2019 - 20:56
बर बर , मग तर काय भरपूर आहेत.
माय स्वीट लॉर्ड जॉर्ज हॅरीसन,
इमॅजीन आणि इन्स्टंट कर्मा जॉन लेनन,
I got my mind set on you .. George Harrison
Bad Boy Ringo Starr
जेनेसीस सोडल्यानन्तरची फिल कोलिन्सची Another day in paradise, one more night, सुसूसुडिओ वगैरे

गवि
गुरुवार, 14/02/2019 - 20:57
व्हिडीओ बघतानाही काहीतरी हुरहूर लागते, नॉस्टॅल्जिक. त्याच्या सावलीच्या भागात भूतकाळ लख्ख उजळलेला. ठिकाण तेच, सध्याचं भकास.
व्हिडीओलाही दाद..

गवि
गुरुवार, 14/02/2019 - 21:11

तुम्ही ऐकवणार ते गाणं क्वीनचं असणार, याबद्दल मला खात्री होतीच.

पण पण पण..मुळात कोणी काढला या गाण्याचा विषय हे, नम्रपणे नमूद करुन इत्यादि इत्यादि इत्यादि.
करिता माहितीस्तव..

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 14/02/2019 - 21:41

पण पण पण..मुळात कोणी काढला या गाण्याचा विषय हे, नम्रपणे नमूद करुन इत्यादि इत्यादि इत्यादि.

मी विषय काढला हे मान्यच, पण बापटांचं 'क्वीन' बँडवर प्रेम आहे. त्याचं मला कौतुक आहे, असं १४ फेब्रुवारीला नमूद करणं माझं कर्तव्य आहे.


नील लोमस

शुक्रवार, 15/02/2019 - 07:41

स्टिंग फील्ड ऑफ गोल्ड

गवि, या गाण्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हे गाणं खूप नॉस्टॅल्जिक करणारं आहे. आणि व्हिडीओ बद्दल तर काय बोलायलाच नको.

घाटावरचे भट
शुक्रवार, 15/02/2019 - 09:34
स्टिंगची एव्हरी ब्रेथ यू टेक, फील्ड्स ऑफ गोल्ड आणि डेझर्ट रोझ माझी आवडती गाणी. स्टिंगचा आवाज फार छान आहे.

गवि
शुक्रवार, 15/02/2019 - 10:14
इफ आय एव्हर लूज माय फेथ इन यू, हे गाणंही एक अगदी mtv च्या भारतातल्या पहिल्या पहिल्या दिवसांची याद म्हणून आवडतं.
तेव्हा mtv फारच वेगळा होता.

..शुचि
शुक्रवार, 15/02/2019 - 10:48

..शुचि
शुक्रवार, 15/02/2019 - 11:22
विस्कॉन्सिन/मिनेसोटा चे कंट्री लाइफ अगदी जवळुन पाहील्याने, कंट्री म्युझिक प्रचंड आवडते.

अबापट
शुक्रवार, 15/02/2019 - 13:15
भटोबा ,
डेझर्ट रोज थोरच . सहमत .
मामी ,
' विस्कॉन्सिन/मिनेसोटा चे कंट्री लाइफ'
मिड वेष्टर्ण कन्ट्री लाईफ स्टाईल व्यक्त करणारी इतर गाणी लिहा की .
कन्ट्री रोड आहेच म्हणजे , म्हणजे इथे अगदी कपिलदेवनं एका ट्रॅक्टरच्या ऍड मधे त्याची वाट लावल्याने फेमस झाले आहे वगैरे .
बाकी लिहा की .

..शुचि
शुक्रवार, 15/02/2019 - 13:29
म्हणजे इथे अगदी कपिलदेवनं एका ट्रॅक्टरच्या ऍड मधे त्याची वाट लावल्याने फेमस झाले आहे वगैरे .
हाहाहा हो का?

अबापट
शुक्रवार, 15/02/2019 - 15:52
मी काय म्हणतो , की कार्यकारी संपादक रा रा जंतु पूर्ण उचकण्याच्या आधी ही सर्व गाणी तिकडे एखादा, आवडती गाणी वगैरे असा धागा काढून ट्रान्सफर करूयात का ?
क्या बोलते गवि शेठ, भटोबा , मामी ?
( ट्रान्सफर कशी करतात ? )

गवि
शुक्रवार, 15/02/2019 - 16:43
ट्रान्सफर करूयात का ?
क्या बोलते गवि शेठ, भटोबा , मामी ?
तुमची सूचना मान्य करण्यास एखाद्याची हरकत नसावी असे म्हणणे वावगे ठरू नये असे म्हटल्यास गैर आहेच असं वाटत नाही हे खरं, अशा आशयाचं व्यक्तिगत मत व्यक्त करावं की नाही हा मुख्य प्रश्न असू शकतो..

पुंबा
शुक्रवार, 15/02/2019 - 17:53
उत्तरदायित्वास नकार देणे गैर नसावे असे वाटण्याची शक्यता तुम्ही ध्यानात घेण्यास हरकत नसावी असे वाटू शकते असे असावे.


चिंतातुर जंतू

शुक्रवार, 15/02/2019 - 19:20
माझा असा दाट संशय आहे की लोकांना खफवर गंभीर आणि माहितीपूर्ण लिहिण्यास अटकाव करण्यासाठी आणि कंटाळा आणून त्यांना इथून हुसकवण्यासाठी ह्या रा रा जंतुंनी हत्तींचे डु आयडी धारण केले असावेत.

१४टॅन
शुक्रवार, 15/02/2019 - 19:30
भटोबा ,
डेझर्ट रोज थोरच . सहमत .
शतश:.
शेप ऑफ माय हार्टही माझं आवडतं. शिवाय अनुष्का शंकर, कर्ष काळेसोबतचं त्याचं 'सी ड्रीमर'ही. चिरतरूण, सदाबहार आवाज.

अबापट
शुक्रवार, 15/02/2019 - 19:54
रा रा जंतूंनी डू आयडींची (त्यांना न जमणारी )अफवा सोडण्यापेक्षा हे सगळं तिकडे धाग्यावर ढकलायचं हे सांगावं किंवा बेटर स्टील स्वतःच ते करून टाकावं
मंडळ आभारी असेल.

नील लोमस
शुक्रवार, 15/02/2019 - 21:28
माझा असा दाट संशय आहे की लोकांना खफवर गंभीर आणि माहितीपूर्ण लिहिण्यास अटकाव करण्यासाठी आणि कंटाळा आणून त्यांना इथून हुसकवण्यासाठी ह्या रा रा जंतुंनी हत्तींचे डु आयडी धारण केले असावेत.
प्रायव्हसीचा फील हे कारण तर नसेल खरडफळ्यावर गंभीर आणि माहितीपूर्ण लिहिण्या मध्ये? ऐसीचे लेख लॉगिन न करताही वाचता येतात त्यामुळे ऐसीवर लॉगिन करणे आवश्यक करावे.

३_१४ विक्षिप्त अदिती
शुक्रवार, 15/02/2019 - 23:33
कोणती गाणी आवडतात, याबद्दलही खाजगीपणा!! किती घाबरून राहाल! जो डर गया, समझो मर गया.

अबापट
गुरुवार, 21/02/2019 - 13:08
गवि शेठ, आपल्या खरड फळ्यावरच्या रँडम संगीत गप्पांचा धागा करूयात का ? पुढं चालू ठेवणार का तुम्ही ?
हो म्हणालात तर समर्पक नाव सुचवा धाग्याचं

नंदन
गुरुवार, 21/02/2019 - 13:58
हो म्हणालात तर समर्पक नाव सुचवा धाग्याचं
ही नावं सोडून काहीही चालेल*
- सूर तेच छेडिता
- स्वर आले दुरुनि
- गाये चला जा
- सूर राहू दे
- गाता रहे मेरा दिल
- सूरसंगम
- जुळल्या सुरेल तारा
- सूर निरागस हो
- हे सुरांनो
(प्रत्येक नाव, त्यापुढे ... + उसासा कल्पूनच वाचावे!)
* म्हणजे गवि ही असली नावं सुचवणार नाहीत, याबद्दल खात्री आहे. पण तेवढ्यातच चान्स पे डान्स!

गवि
गुरुवार, 21/02/2019 - 14:52
नाव: रेट्रो स्ट्रीट..

१४टॅन
बुधवार, 27/02/2019 - 06:34
अबापट, Bloodywood ऐका. भारीए.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

परिणिता ची गाणी फार गोड आहेत पण कोणतं गाणं या गाण्यासारखं आहे? ते रेखाचं?= कैसी पहेली ये जिंदगानीऽऽऽ
https://www.youtube.com/watch?v=B7Gwf4RQ53o

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमची कुंपणापर्यंतची, सरड्याची धाव संपली बर्का. आता अबा आणि गवि यांनीच किल्ला लढवावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Did you ever know that you're my hero?
You're everything I wish I could be.
I could fly higher than an eagle,
For you are the wind beneath my wings.

https://www.youtube.com/watch?v=jorJh8DTMVM&list=PLo4u5b2-l-fDllmvY5TWKd...

अतिशय अर्थपूर्ण गाणे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'रॉक ऑन'बद्दल कोणी काहीच लिहिलं नाही? मला समजत असतं तर मी निबंधच पाडला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बघितला नाही . म्हणून क्षमस्व...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ख्रिस आयझॅक च्या आवाजावर वर फिदा झालेय.
- स्टाइल (आवाज नाही. सॅव्हेज गार्डन आवाज चोरतो) थोडी सॅव्हेज गार्डन सारखी आहे. - http://aisiakshare.com/comment/177155#comment-177155
______________
हिंदीमध्ये तलतचा मखमली आवाज तसे हृदय वितळवतो. knees literally go weak.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याचे व्हिडीओ अनेकदा खूप इंटिमेंट असतात म्हणून लिंकवायला संकोच वाटतो.

एनिवे आता ते गोड ऐकून झाल्यावर हे क्रिस आयझॅकचंच अगदी वेगळ्या मूडचं Did a bad bad thing ऐका

https://youtu.be/J1ia-OQThno

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की. होय व्हिडीओज मस्त आहेत खरच इन्टिमेट आहेत. मलाही ऑफिसात बघता येत नाहीत.
किंग विदाऊट कॅसल - आवडलं.
_________
लाऊड ॲक्टिंग सोपे असते. डाउन्प्लेड ॲक्टिंग अवघड असते, तशी त्याची संथ, शांत स्टाइल अवघड असावी.
_____________
baby did a bad bad thing - सुपरकुल!!! आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रतिसादात काही भारतातही बऱ्यापैकी गाजलेली आणि अनेकांना माहीत झालेली पाश्चात्य गाणी लिस्ट करतोय.

Nothing's gonna change my love for you

Living next door to Alice

I just called to say I love you

Brother Lui

Tarzan boy

Last Christmas

Ice ice baby

Another day in paradise

Don't break my heart

Oh Carol (Neil Secada)

Mysterious girl

Games people play

Coco Jambo (Mr. President)

Saturday night (Whigfield)

Informer (Snow)

One night Bangkok

जास्त फेमस असणे आणि तुलनेत जास्त पसरलेली (भारतात) हा आणि इतकाच कॉमन निकष.

क्वालिटी कमी जास्त रेंज आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवऱ्याला एक 'Funky Town' गाणेही आवडते. नो नॉस्टॅल्जिक होतो. मला कौतुक नाही. ओके आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे १९८० च्या आसपासचं . नंतर गणेशोत्सव मिरवणुकीत दंगा घातला याने. अजूनही वाजिवत्यात कधीमधी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला ते गाणे महा इरिटेटिंग आणि महा मूर्ख (किंवा महा मूर्खागमनी) वाटते. डोक्यात जाते.

असो चालायचेच.

(अपेक्षित श्रेणी: गेला बाजार 'माहितीपूर्ण'.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

परतभेट म्हणून तुम्हालाही 'मार्मिक' दिली आहे.

असाच स्नेह वृद्धिंगत होऊ द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

कोण रे तो आम्हाला पकाऊ देतोय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अबा व गवि - ८०ज लाइव्ह रेडिओ
https://www.iheart.com/live/iheart80s-radio-5060/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सायमन आणि गारफुङ्केल - साऊण्ड ऑफ सायलेन्स, डॅङ्गलिङ्ग कॉन्व्हर्सेशन्स
द डब्लिनर्स - रॉकी रोड टु डब्लिन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लुई आर्मस्ट्राँगचं सगळ्यात सुप्रसिद्ध घ्या हे. नंतर लै लोकांनी कव्हर

काढलं याचं .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अबा आप ८०ज के बहोत पीछे जा रहे हो. फिर हम भी हमारा पेटारा खोलेंगे Smile
_______________
https://www.youtube.com/watch?v=5GWDgirgsq4&list=PLo4u5b2-l-fDllmvY5TWKd...
टेनेसी वॉल्ट्झ - खूप आवडतं गाणं आहे.
एक स्त्री टेनेसी वॉल्ट्झ चालू असताना, आपल्या प्रियकराची ओळख , तिच्या मैत्रिणीस करुन देते. आणि हाय! ती मैत्रीणच तिच्या त्या प्रियकराला चोरते Sad
असा दु:खद प्रसंग गाण्यात मांडला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो तरी मी अजून बीटल्स चे एकही गाणे टाकले नाहीये ..
आणा, तुम्ही आणा अजून जुनी गाणी.
बीटल्सचा म्हणालात तर हजारी धागा पाडू शकेन. पण आवरतो मोह.
मालक लोकं दुर्लक्ष करत आहेत त्याचा किती गैरफायदा घ्यायचा म्हणून..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुर्जी दिसत नाहीत आजकाल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एल्व्हिसची गॉस्पेल गाणी अफाटच गोड व मंत्रमुग्ध करणारी आहेत. मी असे ऐकले आहे की रॉक& रोल चा तो अनभिषिक्त सम्राट अजरी असला तरी, गॉस्पेलकरताच त्याला ग्रॅमी मिळाली.
http://elvis.commercialappeal.com/the-gospel-truth-elvis-never-lost-his-...
___________
https://www.youtube.com/watch?v=GMnBYESE984&list=PLo4u5b2-l-fDyGw2wkt8dp... - आय कम टू द गार्डन अलोन, व्हाइल द ड्यु इज स्टिल ऑन द रोझेस ................... किती गोड गाणं आहे.

https://www.youtube.com/watch?v=P1d4Rp8SXF8&list=PLo4u5b2-l-fDyGw2wkt8dp... .................. फँटॅस्टिक!
____________
मॉर्मॉन्स/लॅटर डे सेंटस चे पुढील गाणे किती शांत आहे.
https://www.youtube.com/watch?v=aWMJ-02mO4c&list=PLo4u5b2-l-fDyGw2wkt8dp...
______________
https://www.youtube.com/watch?v=C8TNpZOdYA8&index=8&list=PLo4u5b2-l-fDyG... - व्हॉट हेवन सीज इन यु ......................... व्हिडीओ देखील पहा. अर्थपूर्ण गाणे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो तरी मी अजून बीटल्स चे एकही गाणे टाकले नाहीये ..

'टॅक्समॅन'विषयी काय मत बापट?
आणि 'समथिंग'?
आणि 'व्हाइल माय गिटार जेंटली वीप्स'?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काय काय सांगू ? तिन्ही गाणी जॉर्ज हरिसननी कंपोज केलेली आणि लीड गायलेली आहेत.
ब्रिटनमधील तत्कालीन टॅक्स स्ट्रक्चरची जोरात झळ पोचल्यावर त्यावर सडकून टीका करणारे टॅक्समॅन. आजी व माजी पंतप्रधानांवर थेट त्यांची नावे (हिथ आणि हेरॉल्ड विल्सन)घेऊन हाणला आहे.
If you drive a car I'll tax your street
If you try to sit, I 'll tax your seat
If you get too cold , I'll tax the heat
If you take a walk, I'll tax your feet
असे टॅक्स स्ट्रक्चरचे सुबोध भाषेत वाभाडे आहेत.
गाणे बरे आहे, ऐकावे.
सुरुवातीची बेस गिटार (पॉल) बरी व ठळक आहे.
समथिंग, बाय फार जॉर्ज हरिसन चे सर्वोत्कृष्ट गाणे. सर्वार्थाने. जरूर ऐकावे.
While my guitar gently weeps अतिशय वेगळे गाणे. जॉर्जचा जिवलग मित्र (आणि त्याच्या तत्कालीन पत्नीचा भावी नवरा!!! Smile Smile ) प्रख्यात गिटारिस्ट एरीक क्लॅप्टन (इज गॉड , वाला) याने पण गिटार वाजवली आहे.
अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की या गाण्यात गिटार रडत आहे असा खरंच फील येतो.( ऐकावे).
भारतमित्र जॉर्ज हरिसन हा लेनन आणि मकार्टनी या (मुख्य )बीटल्सपेक्षा कायम कमी प्रकाशझोतात असलेला. त्यावर बरेच रोचक लिहिता येईल
आत्ता बाहेर निघालोय., म्हणून थांबतो.
जंतू, बीटल्सच्या प्रत्येक गाण्यावर निबंध लिहून बोर मारू शकेन, उगा मला जास्त भरीला पाडू नगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बीटल्सच्या प्रत्येक गाण्यावर निबंध लिहून बोर मारू शकेन, उगा मला जास्त भरीला पाडू नगा.

हे बुलडॉग?
किंवा 'रेन'?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दोन्ही लेनन ची. हे बुलडॉग मधील पियानो आणि गिटारची रिफ श्रवणीय. एकदम जोश गाणे.(तुमच्या व्हिडिओ मध्ये पियानो दिसत नाही, पण आहे. लीड गिटार जॉर्ज हरिसन)
रेन दिल्याबद्दल धन्यवाद. प्रसन्न गाणे. लै दिवसांनी परत ऐकीन. बीटल्स रेरीटीज नावाच्या कलेक्शन मध्ये भारतात आलं. जास्त प्रसिद्ध गाण्यांपैकी नाही पण भारिये.
आता पुढील धडा तीन तासांनी. कारण बाहेर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजकडे असलेल्या लॉंग प्ले तबकड्यांतील बीटल्स कलेक्शनमध्ये एक लव्ह यू टू नावाचं गाणं आहे. त्यात पूर्ण सतारीची पार्श्वभूमी आणि तबला:अनिल_भागवत.

https://youtu.be/Mki1p2Fbr28

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय . आपणास हे माहित असेलच की बीटलसचा लीड गिटारिस्ट हा मुंबईत येऊन रविशंकर यांच्याकडून सतार शिकला होता. मूळचा चांगला गिटारिस्ट असल्याने त्याला कदाचित हे थोडे सोपे गेले असावे .
पहिल्यांदा त्याने सतार Norwegian woods या गाण्यात वापरले .

तुम्ही दिलेल्या लव्ह यु टू शिवाय Within you without you यामधे संपूर्ण भारतीय सुरावट आहे . सतार , तबला वगैरे . फारसं छान नाहीये . या गाण्यात जॉर्जचं भारतीय संगीताबद्दलच कमी आकलन आणि गोंधळ स्पष्ट दिसतं. ( नंतर हे आकलन खूप सुधारले )

बीटल्स च्या इतर काही गाण्यांमध्येही भारतीय फील आहे . उदाहरणार्थ : Across the Universe . ( जॉन लेनन ) . यात स्वरमंडल आहे . हे गाणे बीटल्स महर्षी महेश योगी ( तेच ते , श्री श्री रविशंकर यांचे गुर्जी ) याच्या ऋषिकेशच्या आश्रमात रचले गेले आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

While my guitar gently weeps अतिशय वेगळे गाणे. जॉर्जचा जिवलग मित्र (आणि त्याच्या तत्कालीन पत्नीचा भावी नवरा!!! SmileSmile ) प्रख्यात गिटारिस्ट एरीक क्लॅप्टन (इज गॉड , वाला) याने पण गिटार वाजवली आहे

गाणे उत्तम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि हे घ्या रॉक अँड रोल चे आद्यपुरुष चक बेरी चं जॉनी बी गुड ... नाचा नाचा यावर ..
काळाच्या ओघात हे गाणं " बॅक टु द फ्युचर " पिच्चर मधे वेगळ्या पद्धतीने वापरलं ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते असं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चालक मालक अदिती, जंतू आणि गुर्जी 'बास करा आता, लोड वाढलंय' म्हणत नाहीत तोपर्यंत दंगा चालुदेत...

माझ्याकडून एक पिंक फ्लॉईड : मनीऽऽऽ

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

खरे तर मला त्यातले फारसे काही - किंवा काहीच - कळत नाही, पण विद्यार्थिदशेत असताना आजूबाजूच्या कोणीतरी पिंक फ्लॉइडचे म्हणून हे ऐकविले होते, ते बरे वाटले होते. एरवी पिंक फ्लॉइड कोण, काय वगैरे मला काहीही कल्पना नाही. (किंबहुना, त्याने पर्पल फ्लॉइड किंवा मेरावालाक्रीम फ्लॉइड म्हणून जरी सांगितले असते, तरी मी त्याला होच म्हटले असते. कारण, पु.लं.नी म्हटल्याप्रमाणे, शेवटी आम्ही..., इ.इ.)

पूर्णपणे नि:शब्द गाणे. परंतु त्यात कोणीतरी कशापासूनतरी पळून चाललेला आहे, परंतु तो ज्याच्यापासून पळून चाललेला आहे ते जे काही आहे, ते शेवटी त्याला पकडतेच, हा इफेक्ट छान साधलेला आहे. (तुकड्याचे नाव 'ऑन द रन' असल्याचे कळते; चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला हे व्यसन लागू शकले असते. मित्रांनी पूर्ण प्रयत्न केले नाहीत असे वाटते न बा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बीटल्सची आवडती:

I want to hold your hand

लव्ह मी डू

विथ लव्ह फ्रॉम मी टु यू

येलो सबमरीन

...

आणि with a little help from my friends

हे पुढे वेगळी धुन वापरून Joe Cocker ने गायलेलं The Wonder Years या अद्भुत टीव्ही सिरीयलचं टायटल सॉंग ..

द वंडर इयर्स हा खूप मोठा विषय आहे. कितीजणांनी योग्य वयात द वंडर इयर्स मालिका पाहिली आहे यावर त्या विषयाला मिळणारा प्रतिसाद अवलंबून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि मी आता मागे गेले होते खफवरती एक मी डकवलेलं गाणं शोधायला ते मिळालं नाही पण तुमचं वंडर इयर्स मिळालं Smile आणि परत आले तर पहाते तुमचा प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नॅन्सी सिनात्रा ची गाणी पहील्यांदा ऐकते आहे. छान आहेत. -

https://www.youtube.com/watch?v=N-AgYXz2n9Y - बँग बँग ............................ सॅड!!
https://www.youtube.com/watch?v=F2hR-rOukbU - दीज बूटस आर मेड फॉर वॉकिंग ...................... मस्त आहे हे.
https://www.youtube.com/watch?v=nMQM9kEBRWI - समथिंग स्टुपिड ............................... फनी!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Bed's Too Big Without You - The Police - हे येईल का कुणाच्या रेट्रोमध्ये? Smile
आणि Masoko Tanga?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय झालं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बाळ रडत होतं. वुडवर्डस ग्राईप वॉटर द्यायला सांग तिला Wink
हाहाहा
इस पांचटपणा के लिये, एक डाव माफी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गल्ली चुकली होती. एव्हढच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

She looks so pretty with no makeup on
You should hear her talkin' to her momma on phone
I love it when she raps to an Eminem song
That's my girl
Man her eyes really drive me crazy
You should see her smile when she holds a baby
I can honestly say that she saved me
My girl, yeah
Yeah that's my girl
In the passenger seat, windows down dancing around
Causin' a scene, that's my girl
Sippin' crown and sprite, in a ball cap turned back
Ooh she got me like
Yeah baby girl you gone and done it again
Makin' all the guys wish you were with them
But I bet they don't see what I see when I see my girl
Every night before she goes to bed
She hits her knees and bows her head
Thanks the Lord for another day
I just thank him for my girl
Yeah that's my girl
In the passenger seat, windows down dancing around
Causin' a scene, that's my girl
Sippin' crown and sprite, in a ball cap turned back
Ooh she got me like
Yeah baby girl you gone and done it again
Makin' all the guys wish you were with them
But I bet they don't see what I see when I see my girl
Oh my girl
Yeah, that's my girl
In my truck, in the songs that I sing with the radio up (my girl)
In my heart, in my soul, in the air that I breathe every day (that's my girl)
Yeah everything (my girl)
Yeah that's my girl
In the passenger seat, windows down dancing around
Causin' a scene, that's my girl
Sippin' crown and sprite, in a ball cap turned back
Ooh she got me like
Yeah baby girl you gone and done it again
Makin' all the guys wish you were with them
But I bet they don't see what I see when I see my girl
Oh, my girl
Yeah, that's my girl
___________________
https://www.youtube.com/watch?v=YEKLeWBr9jY&list=PLo4u5b2-l-fDxT8iRSbF6-...
___________________
बाय द वे युट्युब वरती कमेंटस वाचता की नाहि? खूप माहीती कळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Country.

Lucille.. या गाण्यात four hungry children ऐवजी four hundred children असं चुकून ऐकल्यावर Lucille च्या नवऱ्यापेक्षा तिच्याविषयी सहानुभूती दाटून आली.

बाकी कन्ट्रीमध्ये हे एक आणि रुबी डोन्ट टेक युअर लव्ह टु टाऊन.. हे दुसरं, अशी दोन गाणी स्त्रीला गिल्टी, स्वार्थी, निगेटिव्ह रंगवतात. "रुबी"मध्ये तर पांगळा नसतो तर तिला बंदूक घेऊन ठार मारण्याची इच्छा व्यक्त केली जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ल्युसिल आणि रुबी, फार सॅड गाणि आहेत. मी नाही ऐकत. नो डाउट छान आहेत. दोन्ही गाणी पुरुषाची बाजू जास्त दाखवतात.
_________________-
हेसुद्धा ऐका यातही निगेटिव्ह स्त्री आहे जी पैशाकतरता लग्न करते पण तरीसुद्धा या गाण्यात तिची बाजू मांडली आहे.. -
.
https://www.youtube.com/watch?v=-993tLyeVqw&list=PLo4u5b2-l-fDxT8iRSbF6-...

She said I married money, I'm use to wearin' pearls
But I've always dreamed of bein' just a good ol' boys girl
So tonight I left those crystal candle lights to live a dream
And partner, there's a tiger in these tight fittin' jeans
.
We danced every dance and Lord the beer that we went through
I'm satisfied I did my best to make her dream come true
As she played out her fantasy before my eyes it seemed
A cowgirl came alive inside those tight fittin' jeans

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंट्री गाणी ९०% बीअर, गर्ल्स, मोठी धूड असलेल्या गाड्या , टायर्स, मड ट्रॅक्स, फिशिंग बद्दल असतात असे एका युट्युबच्या कमेंटवरुन वाचले होते. अगदी ९० नसेल पण हो त्या गाण्यात ही आवड दिसून येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे कस्काय राहून गेलं काय माहित .
बेफाट टॅलेंट, अस्ताव्यस्त लाईफस्टाईल , अतोनात दारू ( काही बाबतीत ड्रग्स ) यामुळे वयाच्या केवळ सत्ताविसाव्या वर्षी मेलेल्या अनेक कलाकारांपैकी एक .
पंचवीस सव्वीसाव्या वर्षी हे असलं काही लिहू शकणारा ...
"The time to hesitate is through
No time to wallow in the mire
Try now, we can only lose
And our love become a funeral pyre"
किंवा
The future's uncertain
And the end is always near.

जिम मॉरिसन बऱ्याच वेळा स्टेजवरसुधा फुल टाईट असे ( हेच ते भा शा सं आणि रॉक साम्य मानावे का ? चेष्टाए ..चिल )
स्टेजवर आल्यावर काही वेळा : ' As usual everything is fucked up ' असे जाहीर करून मग राडा कॉन्सर्ट चालू होई .
हमारे जमानेके पुणे मुंबय रॉक कॉन्सर्ट्स मध्ये त्याच्या लाईट माय फायर ही आरती ही बऱ्याच वेळा होई .

गाणं तुफान आहे .. जरूर ऐका

( या म्युझिक व्हिडिओमधे मूळचा अति एक्सटेंडेड किबोर्ड पीस कट होऊन आलेला आहे. संधी मिळाली तर मूळ ऐका .)
उद्या याचंच दुसरं ' रोडहाऊस ब्लूज ' देईन .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भ या न क फॅन होतो या गाण्याचा. फारच भारी गाणं काढलंत आठवणीतून वर. आणि हाच विचार आला की हे आधीच कसं नाही आलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता डोअर्सवर आलोच आहे तर..

People are strange when you're a stranger
Faces look ugly when you're alone
Women seem wicked when you're unwanted
Streets are uneven when you're down

हेही मी लूपमध्ये ऐकत असे.

"ब्रेक ऑन थ्रू टु द अदर साईड.". हे तर अजूनही कारमध्ये ऐकतो.

पूर्ण आल्बमच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच आहे. त्याचा आवाज छान आहे.
.
"girl, we couldn't get much higher", ही ओळ ड्रग्स शी संबंधित दिसते आहे. विकीवरती त्या अर्थाचे निरुपण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

All I can say is that my life is pretty plain

I like watchin' the puddles gather rain

And all I can do is just pour some tea for two

And speak my point of view but it's not sane

It's not sane

I just want someone to say to me, oh

I'll always be there when you wake, yeah

You know I'd like to keep my cheeks dry today

So stay with me and I'll have it made

And I don't understand why sleep all day

And I start to complain that there's no rain

And all I can do is read a book to stay awake

And it rips my life away but it's a great escape

Escape, escape, escape

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एरोस्मिथ फॅन्स कोणी आहेत का?

Cryin'

Living on the age

Crazy

Amazing

अनेकांना नाही आवडत, पण खच्चून ओरडणे यासाठी मला आवडतात हे कबूल करतो. अगदी चाल, म्युझिकसुद्धा.

अलिशिया सिल्व्हरस्टोनला घेऊन हॉट व्हिडीओ असायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आरडाओरडा आणि ढणढणाट आवडत नाही. गोग्गोड गोग्गोड आवडतात.
अपवाद - टोटल एक्लिप्स ऑफ द हार्ट
_____________
ऑफिसातुन व्हिडिओ पहाता येत नाहीयेत. सारखे लोक ये-जा करत आहेत. पण आज संध्याकाळी ऐकेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एरोस्मिथ नकोच, ब्लाइंड मेलन मेलडी आहे. ते ऐका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते ऐकलं गवि मगाशीच पण एक बंडल रेकॉर्डिंग होतं.
हां आता, हा तुम्ही दिलेला व्हीडीओ उघडतोय. छानच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फॅन नाही , पण स्टिव्हन टायलरचा आवाज आवडतो.
काही वेळा पांचट लिरीक्ष मुळे फार उतरतात ते. ( असो)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे जुनं गोग्गोड शुगा.
https://www.youtube.com/watch?v=h9nE2spOw_o&list=PLo4u5b2-l-fDllmvY5TWKd...

Sugar, ah honey honey
You are my candy girl
And you got me wanting you

__________________________________
मी अमेरीकेला आले होते तेव्हा बेबी बॅशचं पुढील 'शुगा' गाणं पॉप्युलर होतं. फार आवडतं.
https://www.youtube.com/watch?v=6rgStv12dwA

त्याचं सायक्लॉन फार आवडतं -
https://www.youtube.com/watch?v=y-1575pG-kc
.
raunchy गाण्यांचा विषय निघालाच आहे तर, पुढीलही आवडते गाणे आहे.
https://www.youtube.com/watch?v=pGL2rytTraA
https://www.youtube.com/watch?v=S5ck6TJQ5Ow
___________
'जंगल ड्रम' हे गाणे मस्त आहे - https://www.youtube.com/watch?v=iZ9vkd7Rp-g

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॉय जॉर्ज याची भारतीय पार्श्वभूमीवरची काही गाणी खूप ऐकली जायची.

-Bow down mister

-Karma chameleon

आणखी एक टियर्स फॉर फियर्स ग्रुप. एव्हरीबडी वॉन्टस टु रुल द वर्ल्ड..

त्याखेरीज

Duran Duran..

-कम अनडन

-व्हाईट वेडिंग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्रे मस्त मस्त!!! हे माहीतच नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाव डाऊन मिस्टर मधे आशाबाईंचा (उगाचच) आलाप आहे शेवटी राव.
टिअर्स फॉर फियर्स च एवढं एकच गाणं ऐकलं .
ड्यूरान ड्युरान च मिड एटीज नंतर नावच गायब झालं बहुतेक.
(गवि शेठ , ही म्हणजे फारच कॉमन गाणी व्हायला लागली .. आता म्हणजे तुमचं आणि न बा यांचं वय सारखं असणार असं वाटायला लागलं .)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टिअर्स फॉर फियर्स च एवढं एकच गाणं ऐकलं .

ब्रेक इट डाऊन अगेन हेही वाजायचं सारखं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

INXS - Beautiful girl.

Aha - Take on me

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टेक ऑन मी व्हिडिओ मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी 'टेक ऑन मी' हा व्हिडिओ एकदा दिलेला आहे. Smile
मस्त मस्त!!
बरं झालं दिलात ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Guns & Roses.. -Patience

व्हिसल पूर्ण पाठ केली होती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile सॉलिड्ड्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही दोघे खरेखुरे दर्दी आहात. मी अमेरीकेत आल्यापासुन convert झालेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Leonard Cohen - Hey, That's No Way To Say Goodbye
https://www.youtube.com/watch?v=wI48PS3m59A

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने