लढा पावनखिंडीचा - प्रस्तावना

लढा पावनखिंडीचा - प्रस्तावना

मित्रांनो,
काही काळापुर्वी पावनखिंडीतला भेट देण्यासाठी गेलो असता तेथे झालेल्या लढ्याच्या आठवणी जाग्या झाल्या.
काही माहिती होती, काही नव्याने लक्षात आली. वाटले इथे बर्‍याच कालावधीनंतर धागा टाकावा. या लढ्यातील ऐतिहासिक बाजू, भौगोलिक परिस्थिती, तात्कालिक राजकारणातील डावपेच यावर अभ्यासू वाचकांच्या लेखनातून काही नवे समजून घ्यायला मिळेल…
काही विचारणा…
१. विशाळगडाला महाराजांनी आधी जिंकले होते का? १३ जुलै १६६० रोजी महाराजांच्या बाजूने कोण गडकरी होते? तिथे किती सैन्य असावे?
२. विशाळगडाला सध्या काय रंग रूप आहे? तिथे कोणाचे स्मारक उभे आहे?
३. बाजीप्रभूंचे लढाईत प्राणांतिक समर्पण जिथे सध्या दाखवले जाते तिथेच झाले असावे का?
४. त्या लढ्यात सिद्दी मसूदच्या बाजूने लढणारे किती कामी आले? घोड खिंडीत आणि विशाळगडाला पायथ्याशी मिळून?
५. सिद्दी जोहरला पुढचा काळ कसा गेला?
६. अनेक उत्साही गिरी-दुर्ग संघटनांचे कार्यकर्ते दर वर्षी सुमारे त्याच दिवशीचा मुहूर्त साधून पायी चालत जायचा प्रयत्न करतात. मिपाकरांच्या पैकी गेलेल्यांचे काय अनुभव आहेत?

या लढ्याची गाथा मिलिट्री कमांडरच्या नजरेतून पहायचा प्रयत्न केला आहे का? करायची इच्छा आहे असे वाटणारे कोणी आहेत का?
'मिलिटरी कमांडरांच्या नजरेतून' अशा संकल्पनेतून आजच्या मिलिटरी कमांडरांना त्याच मोहिमेचे नियोजन करून ते पार पाडायला सांगितले तर ते कसे काम करतील या प्रमेयावर आधारित या पुढील लेखन केले आहे...

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आता भाग पहिला सादर करत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0