कातरवेळ

न मागताही मला तू खूप काही दिलंस...
तुझ्या सौंदर्याची खाण...
आठवणींचं एकाकी माळरान...
काळजावरचा टपोरा घाव...
आणि वार करूनही पश्चात्तापाची पुसटशीही झलक नसणारा तु़झ्या डोळ्यांतला भाव...
आता फक्त एवढंच कर माझ्यासाठी...
दिवस आणि रात्रीला धर एकेका हातात...
आणि टराटरा उसवून टाक मधला कातरवेळेचा उदासवाणा मखमली पडदा...
दिवस ऑफिसमधल्या कामात निघून जाईल ग...
आणि रात्र मित्रांशी फोनवर गप्पा छाटण्यात...
किंवा थकून गेलो असेन तर गाढ झोपण्यात...
पण ही 'तळ्यात की मळ्यात?'ची साली मधली वेळ खायला उठते ग...
एकटेपणाचा सल घेऊन भसकन् अंगावर येते...
मनाच्या पार चिंधड्या करून आत्महत्येच्या प्रवासाला नेते...
पण तिच्या मोहात पडून मला मरण पत्करायचं नाहीय...
मला आयुष्यभर मरायचंय... क्षणोक्षणी...
प्रेम केल्याची शिक्षा भोगत...
म्हणूनच एखाद्या दिवशी तुझ्या नव्या प्रियकरापासून सवड मिळाली की...
दिवस आणि रात्रीला हाताशी धर...
आणि माझ्यासाठी एकदाची ती कातरवेळ विलग कर...

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्तच! शेवटच्या ओळी अतिशय प्रभावी
फक्त कवितेच्या मूडच्या विपरिइत येणारा तो 'ऑफिसमधल्या' शब्द खटकला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वाह!! तगमग छान व्यक्त केलेली आहे.
Everybody's Somebody's Fool

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0