'सलाम डॉक्टर' : लक्ष्मण माने, उर्फ निखळ विनोदाचा अनपेक्षित झरा

डॉ. श्रीराम लागूंना नुकताच राजर्षी छत्रपती शाहू कला गौरव पुरस्कार देण्यात आला. त्या निमित्तानं लक्ष्मण माने यांनी कालच्या 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये लिहिलेला एक लेख वाचून अनेक दिवसांनी निखळ मनोरंजनाचा प्रत्यय आला. लागूंची महती सांगताना माने यांनी स्मिता पाटील, सुहास जोशी, रिमा लागू आणि दीपा श्रीराम अशा 'चित्रात पाहिल्यासारख्या बायां'बद्दल जे लिहिलं आहे ते वाचून पुरस्काराची महती आणि तो मिळालेल्या लागूंचं कर्तृत्व दोन्हींविषयीच्या आपल्या ज्ञानात मोलाची भर पडेल असा माने यांचा समज झालेला दिसतो.

त्यामुळे 'भटक्या विमुक्तांचे अनेक किस्से मी रंगवून सांगत होतो. डॉक्टर निरागसपणे हासून दाद देत होते.' अशासारखी वाक्यंदेखील मग तितकीशी निरागस वाटेनाशी होतात. 'ऐसी अक्षरे'च्या वाचकांचा सोमवार या निमित्तानं रंजक जाईल ह्या आशेनं लेखाचा दुवा इथे दिला आहे. माने यांना 'कृतज्ञतापूर्वक सलाम'.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16895475.cms

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

जाणकारांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.

अडाणी लकडबघ्घा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही निखळ विनोदाच्या अपेक्षेनेच "मटा" वाचत असणार असं दिसतंय. तुमच्या अपेक्षा पूर्ण होतात यात काय नवल? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महान लेखक श्री. लक्ष्मण माने यांना फोर्ड फाऊंडेशनचा पुरस्कार मिळाला असल्याने त्यांनी कुणाबद्दलही काहीही लिहिले तरी ते दर्जेदारच असते.
शिवाय भटक्या-विमुक्त जाती जमातींचे ते 'पंतप्रतिनिधी' असल्याने त्यांच्या कोणत्याही लेखनाची फक्त आणि केवळ वहावाच व्हायला पाहिजे असा फतवा काढायला हवा.

मटासारख्या नामांकित आणि दर्जेदार दैनिकातील या लेखातून डॉ. लागूंचे उदात्त कार्य तर दिसतेच पण त्यांनी कसल्या-कसल्या लोकांबरोबर काम करावे लागत होते ते स्पष्ट केल्याने ते कार्य अधिकच महनीय ठरते असे श्री. लक्ष्मण माने यांना सुचवायचे आहे.शिवाय स्वतः श्री. माने 'तीर्थ-प्रसाद' घेत नव्हते ही महत्त्वाची बाब विसरता येणार नाही.
लक्ष्मण मानेंसारखा नितीमान लेखक प्रत्यक्ष समोर असताना काही लोकांनी त्यांच्यासमोर असे उद्धट आणि अनितीमान वर्तन करून त्यांचा अपमान केला असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

प्रस्तुत चर्चा-प्रस्तावकाला माने यांचे लेखनच समजलेले नाही. त्यांचा जन्म जिथे झालेला आहे तिथून त्यांनी मारलेली ही उत्तुंग भरारी लक्षात घेता त्यांना एखादे नोबेल - गेलाबाजार साहित्य आकादमी पुरस्कार तरी मिळायलाच हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंतप्रतिनिधी

मेलो... लक्ष्मण माने यांच्यावर अशी मार्मीक टीका आजवर कोणीच केली नव्हती. आता यातच एक छोटा बदल करून टीकेसाठी आणखी एक गोष्ट तयार ठेवता येते - 'पंच'प्रतिनिधी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माने यांचा लेख प्रामाणिक आहे. कुठल्याही गोष्टीत फक्त चुकते काय हेच दाखवणार्‍या विचारवं(जं)ती उच्च्भ्रूंना हा लेख खटकला यात नवल नाही. सुहास जोशी यांनी तंबाखू खाऊच नये की काय? रीमा लागू यांनी माने यांना --- म्हणूच नये की काय? माने यांनी लागूंना (रीमा, श्रीराम नव्हे. माने श्रीराम लागूंना कशासाठी उचलतील? तुमच्या शंकाच फार!) उचलून खांद्यावर टाकूच नये की काय? नाटकानंतर कुणी चौथा अंक करुच नये की काय? लागूंनी (येथे श्रीराम, रीमा नव्हे. रीमा लागू कशाला कबुली देतील? तुमच्या शंकाच फार!) तशी वरचेवर जाहीर कबुली दिलेलीच आहे! माणे यांच्या भावणा बघा. डॉक्टरांच्या दिवाणखान्यातील टेबलवरची फिरती चक्रे बघू नका....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

तंबाखू चोळताना लेखाचा मुख्य उद्देशच विसरले. मग चिक्कार करमणूक झाली.
तरूण वयात रीमा लागू कसली खत्तरनाक दिसायची. आता मात्र फारच जाडी झाल्ये. मग श्रीदेवीचं कौतुक होणार नाहीतर काय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काल हा लेख वर्तमानपत्रात वाचल्यानंतर पुष्कळ करमणूक झाली... माने यांचा उद्देश थोर आहे... नाट्यसृष्टीतल्या गमती जमती म्हणून त्यांनी एखादे पुस्तक काढावे... हातोहात खपेल...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा कुठेतरी अन्यत्र प्रकाशित झालेल्या लेखनाची टिंगल करणारा धागा 'ऐसी..' वर तेही बातम्या ह्या सदरात पाहून वाईट वाटलं.
"डॉ. श्रीराम लागूंना नुकताच राजर्षी छत्रपती शाहू कला गौरव पुरस्कार देण्यात आला." ही बातमी अशा धाग्यावरून कळली !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लक्ष्मण माने यांचा सदर लेख हाच मुळात एक टिंगल वाटावा अशा प्रकारचा आहे. डॉ लागूंचे ते कौतुक करतायत की अपमान; मानेंना कुणाविषयी काय बोलायचे आहे, स्वतःविषयी काय बोलायचे आहे, लेखाचा विषय काय, प्रयोजन काय - कशाचाच मेळ लागत नाही. लक्ष्मण माने आणि डॉ लागू ही दोन्ही नावे प्रसिद्ध, चांगल्या कारणांसाठी. असे असताना असला लेख समोर आला तर असला धागा निघाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही केलेली मानेंच्या लेखनाबद्द्लची टिप्पणी 'टीका' म्हणून वाचनीय आहे.
पण एकूण तुमची प्रतिक्रीया हे ह्या धाग्याचे समर्थन आहे असे वाटते (खात्री नाही, पण वाटते).

"असे असताना असला लेख समोर आला तर असला धागा निघाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही."
मला फक्त वाईट वाटलं. माझ्या प्रतिसादाला उद्देशून तुम्ही लिहिले नसेल तर दिलेल्या स्पष्टीकरणाकडे दुर्लक्ष करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लक्ष्मण मान्यांच माफी पत्र रविवारच्या मटा त आले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

लिंक अथवा स्कॅन?

जर माफीची वेळ आली अथवा गरज असेल तर हे छापू का दिले मटाने? मटाला देखील येनकेनप्रकारेण...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेलो!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

मटाचा छापील अंकाचा ईपेपर जालावर दिसला नाही. म्हणजे ते पत्र वाचता आले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

रिमा लागू आणि सुहास जोशी मला भगिनीसमान आहेत अन् भावनेच्या भरात मी काहीबाही लिहून गेलो असं काहीतरी माने यांनी त्या माफीपत्रात लिहिलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माफीनाम्यात भगिनीसमान वगैरेंचा उल्लेख कशासाठी हे कळले नाही. तंबाखू खाणे किंवा दारू पिणे या कृती भगिनीं करत नाहीत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तंबाखू खाणे किंवा दारू पिणे (किंवा दारू अती झाल्यास पुढची करमणूक करणे) अशा कृती करणार्‍यांकडे भगिनी म्हणून बघितले जात नाही. (किंवा भगिनीसमान मानल्यास भाऊ बहुदा स्वतःसाठी मराठीतली एक प्रसिद्ध शिवी वापरत असावेत.) कारण माता-भगिनी या स्त्रिया नसून पवित्र, देवी वगैरे असतात. सुहास आणि रिमा या दोघी भगिनीसमान असल्यामुळे त्यांनी असे वर्तन केले तरीही मी त्यांना पवित्र, देवी वगैरे मानतो असं माने यांना सुचवायचं असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझी आजी अजूनही तंबाखू खाते. माझ्या वडिलांच्या मामांनी (म्हणजे आजीच्या भावाने) तिला नेहमीच भगिनी म्हणून बघितले आहे. किंबहुना अनेक वेळा आजीच्या चंचीतली तंबाखू मागूनही खाल्ली आहे. त्यामुळे तंबाखूबाबतचा आक्षेप मला पटला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या जागी असते तर, बहुसंख्य शहरी सुशिक्षितांची दुटप्पी मानसिकता नसणारे मामे आजोबा असण्याचा आनंद मला झाला असता. माझ्या नात्यातल्या स्त्रियांनी मला अशी संधीच दिली नाही, मग मी ती उपलब्ध करून घेतली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Manet painted the upper class enjoying more formal social activities. In Masked Ball at the Opera, Manet shows a lively crowd of people enjoying a party. Men stand with top hats and long black suits while talking to women with masks and costumes. He included portraits of his friends in this picture.

स्रोत - http://en.wikipedia.org/wiki/%C3%89douard_Manet#Paintings_of_social_acti...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>माफीनाम्यात भगिनीसमान वगैरेंचा उल्लेख कशासाठी हे कळले नाही.<<

मान्यांच्या भावनेचा भर जो होता तो नक्की कोणत्या दिशेचा होता तेदेखील मला कळलं नाही. एकंदर प्रकार पाहता मान्यांच्या वक्तव्याला शास्त्रकाट्याची कसोटी लावण्यात फारसा अर्थ नाही या निष्कर्षाप्रत मी पोहोचलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सुहास ही माझी बहीणच असल्याने मी अधिकारवाणीने लिहू शकतो.
ती लहानपणापासूनच सापाला घाबरायची. शब्दशः थरकाप व्हायचा तिचा. एकदा रस्त्याने चालताना, मोठ्या भावाने, चेष्टेने तिच्या चपला, सापाच्या कातड्याच्या आहेत हे सांगितल्यावर तिने त्या रस्त्यातच फेकून दिल्या आणि अनवाणी घरी चालत आली. सर्पदर्शन होऊ नये म्हणून ती नॅशनल जिऑग्राफिक, अ‍ॅनिमल प्लॅनेट असले चॅनेल चुकूनसुद्धा बघत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0