जंत

-----जंत-----
शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी?
वृत्ती जन्मल्या आता, दावया तुका खोटी
मिथ्या मोहती जना, भाषणे भली मोठी
कणा विकुनी रतीसी, केसाने गळा घोटी
दावी संवेदना जना, तोडती मास बोटी
म्हणे वासना पाप, परी तमाखु न सुटी
दंभ दाडुनी गर्भी, साधी मधूशब्द ओठी
चढी पटावर लगबग, लंगडत हारांसाठी
सांगी गर्वाने जना, आम्ही शुक्र संतामठी
कळे कधी तयांसी, मलमूत्र ते संतासुटी
नचं व्यवहार परी ,परदुःखे सुखी होती
संघर्षात अंतरीच्या, हारूनी पेढे वाटी
प्रकाश सर्वत्र तयांचा, अंधार बुडिदेठी
अशेही उत्सरती कच्चर, जंत संतापोटी

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

अभिवादन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वांना मेबेंडॅझॉल द्यावे लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0