चकवा.........आयुष्याच्या वाटेवर!(भाग २)

आजचा प्रवास संपूच नये असं वाटतंय, खरंच खूप नर्व्हस झालोय. पण अंतर जास्त नसल्यामुळे आम्ही तासाभरातच पोहोचलो. पोहोचताच सर्वात आधी आजीबाबांकडे गेलो, बाबांनी तर फक्त पप्पा सोबत होते म्हणून ओळखलं.

आम्ही गेलो तेव्हा बाबा अंगणातच बसलेले होते, पप्पांनी अंगणात गाडी लावली आणि आम्ही उतरलो. बाबांनी पप्पांना पाहिलं नंतर माझ्याकडे पाहिलं आणि २, ३, ४ कितीतरी क्षण माझ्याकडे पाहत राहिले. लगेच भानावर येत ते मोठ्याने ओरडत घरात पळत सुटले, "ए, दादा बघ कित्ती मोठ्ठा झालाय....."

त्यांचे शंकरपाळे बनवणं चालू होतं, पण सर्व तसंच सोडून आजी पळतच बाहेर आल्या आणि माझं सर्वात नावडतं वाक्य बोलल्या, "कित्ती बारीक झालास रे!!!"

मला या वाक्याची इतकी चिड आहे की, हे वाक्य ऐकायला मिळू नये म्हणून मी वर्षातून एकदाच आणि तेही फक्त दिवाळीलाच घरी जातो. आणि इथे इतक्या वर्षानंतर संभाषणाची सुरुवात याच वाक्याने झाली. पण आजीच्या प्रेमामुळे मी काही जास्त मनावर घेतलं नाही आणि फक्त हसून घरात गेलो.

इथून पुढे माझी खरी परीक्षा चालू होणार आहे, कारण आधीपासूनच मला जास्त बोलायची सवय नाहीये आणि आता काय बोलावं तेही कळत नाहीये.मी फक्त घरात जाऊन एका पाहुण्यासारखा बसलो. एकेकाळी मी हे संपूर्ण घर डोक्यावर घेत असे पण आज इतक्या वर्षानंतर परक्यासारखं वाटत होतं. माझ्याकडे आता इकडे तिकडे बघण्याशिवाय पर्याय नव्हता. घर जसं १५ वर्षांपूर्वी होतं, आजही तसंच आहे, काहीच फरक नव्हता, टीव्ही सुद्धा तोच होता. आजीबाबा जॉब वगैरेबद्दल विचारपूस करत बसले आणि मी फक्त एखाद्या मुलाखतीप्रमाणे जेवढ्यास तेवढे उत्तर देत गेलो. थोड्या वेळाने तेच मला कंटाळले आणि मग पप्पांशी गप्पा मारू लागले. आणि मी फक्त एक श्रोता झालो, अजून काय करणार?

मला आता खरंच टेन्शन आलं की, इथे आजीबाबांशी जास्त बोलता येत नाहीये, सृष्टीशी कसा बोलेल?आणि मी मागच्या १५ वर्षात माझी चुलत बहिण सोडली तर प्रॅक्टिकली कोणत्याच मुलीशी बोललो नाहीये. आता "कुठून हा प्लॅन बनवायची बुद्धी सुचली?", असं वाटायला लागलंय.

बाबांनी बोलताना सांगितलं कि, मुग्धानेपण इथेच एक ब्युटी पार्लर चालू केलाय. मुग्धा बाबांची एकुलती एक मुलगी आणि लग्न करून तिथेच स्थायिक झालीये. बाबा सांगत होते कि, सृष्टीपण आता मुग्धासोबतच काम करते म्हणून. म्हणजे या दोन्ही आता तिथेच भेटतील तर... पण बाबा म्हणाले की, "तिथे तुम्ही काही जाऊ नका सध्या दिवाळीची गर्दी असते, कामात त्यांना नीट बोलताही येणार नाही". हे ऐकून तर मला वाटलं कि, सृष्टीला न भेटताच जावं लागतंय की काय! कारण पप्पांनी सांगितलं असतं, "तिथे जायची काय गरज, आजीबाबांशी भेट झाली ना?" आता सगळं नशिबाच्या हातात.

काही वेळ बसून आम्ही उठलो आणि पप्पांच्या मित्राच्या घरी जायला निघालो. आधीच आम्ही येणार हे कळवल्यामुळे काका आज घरीच होते. ईथेपण तसंच जेवढ्यापुरतं तेवढं बोललो. काकू किचनमध्ये चिवडा करत होत्या; म्हणून त्यांनी मला तिथेच बोलावलं. मला तिथे सृष्टीबद्दल बोलू कि नको, काहीच कळत नव्हतं. त्यांनीच मग मला बोलतं केलं!
"कुठे असतोस सध्या?" काकुंनीच सुरुवात केली.

"मुंबईला!" एका शब्दात उत्तर.

मग पुढचा प्रश्न त्यांनी स्पेसिफिक विचारला, "सृष्टीची आठवण वगैरे येते कि नाही?", त्यांनी स्वतःबद्दल न विचाराता सृष्टीसाठी हा प्रश्न विचारला, मी पुरता गोंधळून गेलो..

मीपण काहीतरी शब्द जुळवून उत्तर दिलं, "हो येते ना! शेवटी ती माझी पहिली मैत्रीण होती.."

"जाताना तिला भेटून जा. तू भेटलास तर खरंच खूप बरं वाटेल तिला."

"हो नक्कीच, तिला न भेटता कसा जाईल?" आता मीपण काकुंशी मोकळेपणाने बोलत होतो.

थोडा वेळ तिथे थांबलो आणि मग तिथून निघालो. आता प्रश्न असा होता, पप्पांना कसं सांगायचं की चला सृष्टीला भेटायला जाऊ म्हणून? कारण बाबांनी नाही सांगितलं होतं. पण पप्पाच बोलले, "तुझी इच्छा असेल तर मुग्धाला भेटायला जायचं का? तूला पाहून खरंच आनंद होईल तिला."

मी बाळ असतांना मुग्धा मावशी आमच्याच घरी असायची, मला खेळवताना तिला खूप मजा वाटायची; म्हणून मला भेटून ती खरंच खुश झाली असती. मग काय नॉन स्टॉप पार्लर गाठलं. पार्लरला बाहेर एक मावशी बसल्या होत्या, पप्पाच त्यांना बोलले कि, मुग्धा ताईंना बाहेर बोलावता का? त्या मावशी आत गेल्या आणि मुग्धा मावशी बाहेर आली. तीसुद्धा १५ वर्षांपूर्वी लग्नाआधी जशी दिसायची, आजपण तशीच दिसत होती. तिनेपण बाबांसारखं आधी पप्पांकडे पहिलं आणि नंतर माझ्याकडे कितीतरी वेळ पाहात राहिली आणि जोरात आतल्या दिशेला तोंड करून हाक मारली, "ए सृष्टी, बाहेर ये! शेंड्या आला बघ...."

मला ती या नावाने हाक मारेल, याचा मी विचारही केला नव्हता. शेंड्या नाव ऐकून थोडं वेगळंच वाटलं, पण लहानपणी मला शेंडी असल्यामुळे ती मला शेंड्याच म्हणायची. पण आता मोठा झाल्यावर आणि तेही सृष्टीसमोर ह्या नावाने हाक मारली म्हणून जास्तच विचित्र वाटलं.

आता मी फक्त सृष्टी येणार त्या दिशेला पाहत होतो आणि ती एकदाची बाहेर आली! मी तिच्याकडे पाहतच राहिलो, माझा विश्वासच बसत नव्हता की, हि तीच सृष्टी आहे म्हणून. खरंच खूप सुंदर दिसत होती. पण ती आली आणि एका कोपऱ्यात उभी राहिली, काहीच बोलली नाही. आणि मीपण पप्पा आणि मावशीसमोर तिच्याशी काहीच बोललो नाही. मावशी फक्त सध्या काय करतो वगैरे विचारात होती. थोडा वेळ बोलून झाल्यावर मी आणि मावशीने एकमेकांचे नंबर्स घेतले आणि आम्ही तेथून निघालो.

२-३ महिन्यापासून बनवलेला प्लॅन फेल झाला होता. तिच्याशी काहीच बोलता आलं नाही म्हणून स्वतःवरच संताप येत होता. पण करणार काय यात कुणाची काहीच चुकी नव्हती, माझाच मितभाषी स्वभाव नडला होता. आता जाताना फक्त तिचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करत होतो, तोही व्यवस्थित आठवत नव्हता; कारण तिचा चेहराही नीट पाहू शकलो नव्हतो. आता माझी खरंच खूप चिडचिड होत होती.

आता घरी येऊन दुसऱ्या काहीतरी कामात मन रमवण्याचा प्रयत्न करत होतो. पण इतक्या लवकर शांत होईल ते मन कसलं? रात्री झोपताना पण तेच विचार येत होते, म्हणून झोपही लागत नव्हती...

असाच डोळे बंद करून पडलो होतो, तेवढ्यात एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सऍप वर मेसेज आला, "nice dp".

मी विचारलं, "may i know, who's this?"

"सृष्टी!"

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

"nice dp"

dp म्हणजे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो व्हॉट्स ॲप चा असतो ना...
माझ्या मते, desktop picture/photo...

वाचल्याबद्दल धन्यवाद! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पद्म.

नंबर आला म्हणजे काम तमाम...

माझ्या माहितीप्रमाणे, नंबर मिळेपर्यंतच कंबर कसावी लागते. एकदा का नंबर आला, की मनात असलेलं/नसलेलं सगळंच घडून येतं. आता पुढच्या भागाची उत्सुकता आहेच.

‛की’ तेवढा असाच येऊद्या. मराठीतील एकक्षरी शब्द (काही सन्माननीय उभयान्वयी अव्यये सोडता) दीर्घ लिहावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

धन्यवाद कासव! वाचल्याबद्दल आणि माहितीसाठीही....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पद्म.

खरंच खूप सुंदर दिसत होती.

सौंदर्य पहाणाऱ्याच्या नजरेत असतं. तुमची मैत्रिण असल्याने नक्कीच तुम्हाला आवडली असणार. असो.
छान आहे हा भागही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादासाठी फार फार धन्यवाद...
बाकी पहिल्या भागावरचे प्रतिसाद वाचून हा भाग टाकू की नको हा विचार करत होतो.
उद्या पुढचा भाग टाकेन...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पद्म.

हाहाहा मला वाटलच होतं. पण लेग पुलिंग इज कॉमन आणि त्याशिवाय मजा काय आहे? प्लीज पर्सनली घेउ नका. छान चालले आहे. इथे ललितची फार वानवा आहे. तुमचे ललित आवडते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी अशी धारणा आहे की, वाचन कसे घडते यावरून लेखन कसे असावे हा भाग अधिक संवर्धित करता येईल. त्यामुळे मागच्या भागात जस-जसे वाटत गेले तस-तशी मांडणी केली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

येथील वाचकांकडून लेग पुलींगसुद्धा एंजॉय करायला शिकतोय...
वाचल्याबद्दल धन्यवाद... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पद्म.

सा.मो. यांचा लेग पुलिंग शब्द खटकला आहेच. पण आपणासही तसे वाटते म्हटल्यावर मलाही लेग पुलिंग एन्जॉय करायला शिकले पाहिजे तर...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

खरं तर पाय ओढणे हे शब्दश: झाले. मराठीत -थट्टा करणे म्हणता यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

‛लेग पुलिंग’चा अर्थ असा काही वेगळा असू शकतो, याची खरंच कल्पना नव्हती. इथे मी शब्दशःच अर्थ काढला. त्यामुळे तो खटकला म्हणून नोंदवला. माहिती दिली नसती तर गैरसमज वाढवून घेतला असता. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

पण काहीही म्हणा, थट्टेत एक आपलेपणाची भावना असते...
आणि म्हणूनच तुम्हा लोकांची थट्टा स्विकार आहे..!!!! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पद्म.

सहज लेखन. आवडलं. वाचकांची उत्सुकता कायम ठेवणं उत्तम जमलंय.
--
"इथे ललितची फार वानवा आहे. " - सा.मो. नै तर काय. ललिता सोडून गेली म्हणता येत नाही, कारण ती मला कधी भेटलीच नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ललिता नाही च्रट्जी ल-लि-त. पुरुष/मुलगा/मेल/मर्द.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे ललित प्रभाकर किंवा गेलाबाजार ललित मोदी.
आले का लक्षात कंकाका?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंकाका

कंकाका चा फुल फॉर्म?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंकाका चा फुल फॉर्म? -
- कंजूसकाका
Smile Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्रे हां!!! बरुबर!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचकांची उत्सुकता कायम ठेवणं उत्तम जमलंय.>>> प्रतिसादाबद्दल धन्यवाद... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पद्म.

सा.मो., पूर्वी माझ्या लेखनात ललित दाखवा आणि शंमर रु मिळवा असा शेरा घरूनच मिळायचा. ( आताही मिळतो.) ही संस्थळं नसती तर मी कुठे बरं न भेटलेल्या ललिताची जाहिरात दिली असती? लोकसत्ता/मटा/मुपी सकाळ? तुमच्या ललिताचा फोटो क्लिअर नसल्याने छापू शकत नाही एवढी पोहोच जरी संपादकांनी पाठवली असती तरी फ्रेम करून लावली असती.
असो. सृष्टीचं काय झालं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सृष्टीचं काय झालं?>>> पुढच्या भागात वाचा... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पद्म.

सा.मो., पूर्वी माझ्या लेखनात ललित दाखवा आणि शंमर रु मिळवा असा शेरा घरूनच मिळायचा.

जाउं द्या च्रट्जी घरकी मुर्गी नेहमीच दाल बराबर असते. मी नवऱ्याला नेहमी म्हणते काय भाग्यवान आहेस माझ्यासारखी बायको तुला मिळाली. मला हेवा वाटतो तुझा Wink
मग मी एकदा चुकून म्हटलं पुढच्या जन्मी मला माझ्यासारखी बायको/नवरा मिळु देत. आणि मग माझी मीच घाबरले Wink नको रे देवा तथास्तु म्हणु नकोस म्हणुन Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणूनच पुजेत एक शंख ठेवलेला असतो का?
( ब्लासफेमी म्हणा हवे तर पण हा पांचजन्य किंवा अजून दुसरा कोणता? बरीच वेगवेगळी नावे होती ना प्रत्येकाच्या शंखाला))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0