रिव्हर ऑफ कॉन्शसनेस

Oliver Sacks

रिव्हर ऑफ कॉन्शसनेस - ऑलिव्हर सॅक काय सुंदर पुस्तक आहे.-
लेखक 'Principles of psychology - William James' यांच्या पुस्तकातील काही प्रयोग लिहीतो -
प्रत्येक प्राण्याचा वेग वेगवेगळा असतो जसे कासव, गोगलगाय हे अति अति मंद असतत तर मधमाशा, डास, भुंगे अतिशय वेगवान. पण गंमत म्हणजे या प्राण्यांचे/कीटकाच्या आयुष्यमानही वेगवेगळे असते.
आपल्याला त्यांचे 'Perception of Time' अर्थात काळाचे भान कुठे माहीत असते?
- ----------------------------------------- प्रयोग १---------------------------
समजा आपण १ मिनीटात १० दृश्ये, संवेदना पाहू शकतो, रजिस्टर करु शकतो. असे माना १०,००००० (दहा लाख) संवेदना/परसेप्शन्स हे आपले आयुष्य आहे.. आता जर हेच आपण एका मिनीटात, १०,००० संवेदना रजिस्टर करु लागलो. तर.... आणि समजा काही लाख संवेदना एवढेच आपले आयुष्य आहे तर काय होइल कल्पना करा .......... आपण चुटपुट काही महीनेच खरं उदाहरणादाखल तर ३ तास धरा ना !जगू. समजा आता हिवाळा आहे तर मग उन्हाळा ही इतकी दूरची बाब होइल की आता आपल्याला प्रलय (apocalypse) जसा वाटतो, तसा आपल्याला उन्हाळा वाटेल बरोबर? सूर्य तर आकाशात स्थिरच राहील.चंद्राच्याही कला दिसणार नाहीत.
------------------------ प्रयोग २----------------------------------
याउलट आता अशी कल्पना करा की १ मिनीटात तुम्ही आत्ता जे अनुभव घेता त्याच्या १/ १०,००० फक्त संवेदना / जाणिवा तुम्ही अनुभव करु शकता तर मग - उन्हाळा/हिवाळा जणु ५ मिनीटात सरतील. झाडे झरझर वाढू लागतील. झुडपे तर वाढतील मरतील, वाढतील मरतील जसे काही काळावरचे बुडबुडे.बंदूकीची गोळी कशी सट्टकन सुटते ती दृष्यमानही होत नाही तसा सुर्य आकाशातून उल्कापात झाल्याप्रमाणे सटकन सुटेल.

आपण म्हणतो डासाचे, फुलपाखराचे आयुष्य २ दिवसाचे असते. पण त्यांच्या 'Perception of Time' प्रमाणे ते ५० वर्षे जगत असतील जणू.
कासव २०० वर्षे जगते असे आपण म्हणतो पण त्याच्या 'Perception of Time' प्रमाणे ते २० च वर्षे जगत असेल की.
______________________

डार्विनच्या संशोधनापूर्वी, सर्व शास्त्रद्न्यांचा व पर्यायाने जगाचा कयास हा होता कि वनस्पती या 'सेल्फ-फर्टीलाइझ' होतात अर्थात त्यांच्या स्वतः:तच बीजोत्पादन होते. वनस्पतीमध्ये दोन्ही लैंगिक अवयव अर्थात स्त्रीकेसर व पुंकेसर असल्याने, शास्त्रद्न्यांचा तसा समाज झाला यात नवल ते काय. डार्विनने मात्र या समाजाला छेद देणारे संशोधन जगापुढे आणले. त्याला हे कुतूहल होते कि जरा वनस्पती स्वतः:ची स्वतः: बीजोत्पादन करण्यात सक्षम असेल तर मग 'Primrose ' या वनस्पतीत व अन्य काही वनस्पतीत एका मादी व एक नर फुलं का दिसते. या वनस्पतीला २ प्रकारची फुले येतात हे त्याने निरीक्षले - काही लांब देठाची असतात (मादी फुले ) तारा काही आखूड देठाची (नर फुले) आणि त्याने स्वतः:चा फुले एकमेकांच्या जवळ आणुन, क्रॉस-fertilization करण्यास सुरुवात केली म्हणजे स्त्री फुल-स्त्री फूल/ पुरुष फूल -पुरुष फूल व स्त्री फूल -पुरुष फूल असे तेव्हा त्यास आढळले की स्त्री फूल -पुरुष फूल फर्टिलायझेशन मधून जे बियांचे पीक येते ते वजनाने अधिक व उत्तम दर्जाचे असते. अर्थात वनस्पतीच्या उत्क्रान्तिमध्ये क्रॉस-फर्टिलायझेशन हा महत्वाचा टप्पा आहे. ज्याला त्याने हायब्रीड व्हिगर असे नाव दिले.
.
पुढे त्याला कोइव्होल्यूशन थिअरी चा शोध लागला. यापूर्वी देखील लोकांनी हे निरीक्षण केलेले होते की कीटक, भुंगे, फुलपाखरे हे एका फुलात जातात, त्यांच्या पंखांना परागकण चिकटतात व तेच कीटक उडत दुसर्या फुलावर जातात.पण हा संशय आलेला नव्हता की या परागवाहनाचा संबंध बीजोत्पादनाशी आहे. पण डार्विनच्या लक्षात आले, मधमाशा फक्त पिवळ्या व निळ्या फुलांवरती भिरभिरतात कारण त्यांच्याकरता लाल रंग अस्तित्वात नसतो (रंगआंधळेपणा) याउलट जांभळ्या व ultraviolate छटा असलेल्या फुलांकडे त्या आकर्षित जास्त होतात.याउलट जी फुले 'निळा रंगआंधळ्या' फुलपाखरांना आकर्षित करतात ती फुले लाल रंगाची असतात याउलट ज्या वनस्पतींना त्यांच्या परागवाहनाकरता माशांची गरज भासते त्या सडलेल्या मांसाच्या दुर्गंधाचे उत्पादन करतात. रात्री उमलणाऱ्या फुलांना सुगंध असतो कारण त्यांच्या परागवाहनाकरता लागणारे कीटक रंगापेक्षा वासाकडे आकर्षित होतात. एका Magnilia म्हणून फार पुरातन काळापासून अस्तित्वात असलेल्या झाडाच्या जातीला अतिशय फिक्या रंग-गंधाची फुले येत कारण ज्या काळापासून ते झाड अस्तित्वात होते, त्या काळी ना फुलपाखरे होती ना कीटक आणि त्यामुळे त्या झाडास ना कीटकांची गरज होती ना कीटक अस्तित्वात येतील असे मानण्यास निसर्गास तेव्हा काही कारण आहोत. हे सारे डार्विनला अतिशय रोचक, exciting वाटले.
.
पुढे त्याच्या लक्षात आले की वेली (twine , leaf -climbers ) आदी वेली झाडाचा आधार घेउन वरवर दिशेने विकास करतात आणि त्यातून त्या आधारास आवश्यक अशा tissues पासून मुक्ती मिळवतात. हे सारे नैसर्गिक-निवड व उत्क्रान्तिस पूरक असेच होते. वेल जेव्हा ऊर्ध्व दिशेस वाढते तेव्हा ती ट्विस्ट होते, वळते, आणि हे वळणे प्रकाशाला अनुसरून घडते तेव्हा त्याला वाटले जणू वेलीच्या टेन्ड्रिल्स ना डोळाच असतो जणू काही . त्याने टेन्ड्रिल्स ना शाई लावली असता त्याच्या लक्षात आले की वेल प्रकाशाकडे झेपावत नाही. मूळे देखील पाणी शोषित जमिनीत जातात तेव्हा दाब, तापमान, रसायने, प्रकाश आदि सर्व फेक्टर्स फार लक्षात घेतले जातात जणू काही या मोटर tissues ना लहान मेंदूचा असतो म्हणा ना.
.
तेव्हापर्यंत झाडे-फुले-वेळी या साऱ्या गोड, दिमाखदार, जडभूत कविकल्पनांचे वारसदार होते ते आता शास्त्रीय scrutiny व एका ड्रॅमा ऑफ लाईफ (जीवनानाट्य) म्हणून पाहू जाऊ लागले.
________________
अगदी प्राथमिक मज्जासंस्था या विषतयी अभ्यास करताना शास्त्रद्यांना हे कळले. -

एखादे गांडुळ जर स्वत:ला कावळ्याचे भक्ष्य न बनविण्यात यशस्वी झाले तरी त्याला थोडा वेळ निपचित पडुन रहावे लागते न जाणो कावळा जवळपास कुठे तरी असायचा - हा अगदी प्राथमिक शिकण्याचा धडा झाला.
स्टेन्टर (https://en.wikipedia.org/wiki/Stentor_(ciliate)) हा एक अतिशय प्राथमिक जीव आहे. त्याला एकदा जोराने स्पर्श केला तर त्याची मज्जासंस्था ५ स्टेजेसमधून जाते व तो दूर जातो. इतका स्लो रिस्पॉन्स असतो. पण जर परत तसाच जोराने स्पर्श केला तर मात्र पहील्या स्टेजनंतर एकदम ५ वी स्टेज येते - म्हणजे कुठेतरी तो शिकलेला आहे, एज्युकेटेड :).
तेच जर त्याला अलगद स्पर्श केला तर तो निघून जात नाही. habituated!! सवय झालेली आहे हे देखील एक प्रकारचे शिकणेच आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाचनीय. छान ओळख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद च्रट्जी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिंता फोटो डकवल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.newyorker.com/magazine/2012/08/27/altered-states-3
अवलिया दिसतो हा माणूस. लिहीतो किती सुंदर. भयंकर हुषार व्यक्ती असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0