विकोपी प्रेमसंबंध

नाते कोणतेही असो. वाद न होणे तसे किंवा कसेही दुर्मीळच. त्यात जर का ते प्रेमसंबंध (प्रेयसी-प्रियकर यांच्यातील) असतील तर तो ‛वाद’ हा उलट्या बोंबांनी ‛संवाद’च असतो. सवंजे (सरळे) न खाण्याच्या सवयीने असेही म्हणता येईल की, साधा संवादही वादातीत असतो. तर नाते हे प्रेमसंबंधातील असेल तर ते नाते फारच नाजूक/अस्थिर/चंचल असते असे माहीत नसल्यासारखे (निदान तसे समजून) सांगायचे आहे. शेवटी ‛संपादकीय’ लिहिण्याचा सराव करतोय. तर या बातमीने डोके गरम झाले अन् काही प्रश्न उगवून आले. ते मोजक्या स्वरूपात इथे चर्चेसाठी मांडतो :
1) प्रेमसंबंध केवळ एकमेकांपुरते एकमेकांभोवती लपेटून घेणे, ह्यात कसल्या प्रेमाचे कसले पावित्र्य असते?
2) तथाकथित प्रेमापोटी सहज तयार होणारी मालकी-हक्काची भावना टाळण्यात किंवा ती कमी करण्यात अपयश येते, की ते अपरिहार्यच आहे?
3) संवाद/विसंवादाच्या कोणत्या पातळीला कोणते समुपदेशन घेण्यात/देण्यात कमी पडतेय असे वाटते?
4) प्रेमसंबंधात साधा वाद/संवाद, खून करण्या-इतपत धारदार बनण्याला कोणती निर्णायक कारणे कारणीभूत असू शकतील व त्यावर कोणते उपाय सांगता येतील?

असे अनेक प्रश्न तयार होतील. कारणे जशी फिरतील तशी चर्चाही फिरत राहील. त्यासाठी प्रश्नापूर्ती मर्यादा निश्चितही करता येईल. अजून एक म्हणजे, धागा योग्य ठिकाणी आहे/नाही अशा मूलभूत बाबींबाबतही अनभिज्ञ आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी चूभूद्याघ्या. धागा योग्य किंवा योग्य ठिकाणी नसल्यास तो उडवावा किंवा योग्य ठिकाणी हलवण्यात यावा. कसेही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

विवेकाची कास आवश्यक आहे. इन जनरलच. असो.
___________
परंतु त्या दुव्यावरील बातमी काढुन टाकलेली आहे. त्यामुळे संदर्भ लक्षात आला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

A certain smile, a certain face
Can lead an unsuspecting heart on a merry chase
A fleeting glance can say so many lovely things
Suddenly you know why my heart sings

मला त्याच ठिकाणी ती लिंक संपादित करता येईना म्हणून मी त्याची सुधारित लिंक पहिल्या प्रतिसादात ‛सुधारणे’खाली दिली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

1) प्रेमसंबंध केवळ एकमेकांपुरते एकमेकांभोवती लपेटून घेणे, ह्यात कसल्या प्रेमाचे कसले पावित्र्य असते?
> हे सगळं फार वैयक्तिक आहे, आणि वयपरत्वे, अनुभवानुसार सगळ्याच संकल्पना बदलत जातात. २०व्या वर्षी आपण ज्याला प्रेम वगैरे म्हणतो तेच ४०व्या वर्षी नाही म्हणणार.
प्रेमाचं पावित्र्य असं काही असतं का? मला नाही वाटत. हॉर्मोन्स का खेल है छोटे.

2) तथाकथित प्रेमापोटी सहज तयार होणारी मालकी-हक्काची भावना टाळण्यात किंवा ती कमी करण्यात अपयश येते, की ते अपरिहार्यच आहे?
> व्यक्तींच्या प्रगल्भतेवर अवलंबून आहे. इथे व्हॉट्सॲप डिपी बदलला नाही म्हणून खून होतो तर कुठे नवरा बायको ओपन रिलेशनशिपमधे आरामात रहातात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.

3) संवाद/विसंवादाच्या कोणत्या पातळीला कोणते समुपदेशन घेण्यात/देण्यात कमी पडतेय असे वाटते?
> पास.

4) प्रेमसंबंधात साधा वाद/संवाद, खून करण्या-इतपत धारदार बनण्याला कोणती निर्णायक कारणे कारणीभूत असू शकतील व त्यावर कोणते उपाय सांगता येतील?
>गुड क्वेश्चन. टिपिकल मराठी विचारवंतांच्या भाषेत सांगायचं तर " आजकालच्या समाजाची चंगळवादी वृत्ती आणि बाजारू दृष्टीकोनामुळे नातेसंबंधांवर एक ताण आला आहे. ह्या भौतिक सुखाच्या मागे धावता धावता आपण आपल्या मनालाच विसरलो आहोत इ.इ."
मला वाटतं ह्या बातम्या पूर्वी इतक्या रिपोर्ट होत नसाव्यात- आजकाल लगेच समजतात. पण म्हणून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे आणि अशी प्रकरणं वाढलीत असा निष्कर्ष काढता येईल का?

"विडिओ गेम खेळायला दिला नाही म्हणून नातवाने आजीला ठार मारलं" - हा प्रकार मात्र गंभीर आहे. "हिंसा" ही ओके आहे- असं काहीतरी आजकालच्या मुलांना वाटत असेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0