उकडीचे मोदक...... जरा हटके

पाककृती..... उकडीचे मोदक....

Ukadiche Modak

म्हंटल तर अवघड, म्हंटल तर सोपी. सुगरणीचा कस लावणारी. अगदी तीन व्यंजनं वापरून होणारी कृती. माझ्या मगदुराप्रमाणे येथे देतो.
सगळ्यात महत्त्वाचं, मोदकांवर निरतिशय प्रेम हवं. प्रत्येक मोदकाकडे पाहताना मनातून, हृदयातून प्रेम उचंबळून यायला हवं. आपला एखादा मित्र असल्याप्रमाणे मोदकांवर प्रेम कराल तरच त्याची गोडी अवीट.
आता नैवेद्याचा पदार्थ म्हणून चतुर्थी ला करावे हे खरं, पण हौस आहे म्हंटल्यावर कधीही करावे, अट एकच, पोटात भरपूर भूक हवी आणि मस्त हादडून झाल्यावर गच्च ताणून द्यायला भरपूर वेळ हवा. तरच ते सार्थकी लागतील.
माझ्यासाठी मी एक पावसाळ्याचा कुंद दिवस बघतो. माझ्या गावाचं वातावरणच असं, कि मस्त ढग भरून आले की दिवसभर एक अंधार पसरल्यासारखा असतो, हवेत नशिली थंडी भरते, आणि एकच कार्यक्रम असावा वाटतो, खा आणि झोपा. अशा दिवशी, सकाळी फक्त गरम वरण भात आणि तूप इतकच खावं.
सकाळी सकाळी उठून, किंवा आदल्या दिवशी रात्री, छान आंबेमोहोर घ्यावा. अस्सल वाण असला पाहिजे. हातात घेऊन नाकापर्यंत नेईपर्यंत घमघमाट यायला हवा, तरच खरा आंबेमोहोर. हातसडीचा असेल तर सोन्याहून पिवळं. तर असा तांदूळ घ्यावा, स्वच्छ हातांनी आणि स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा, दोन किंवा तीन वेळा. काहीही काळं बेरं मागे राहता कामा नये. मग एक पांढरे शुभ्र वस्त्र घ्यावे. (वस्त्र हाच शब्द ह्या सगळ्या साजाला योग्य आहे, एखादा पंचा किंवा साडी किंवा तत्सम कापड ह्या सगळ्या थाटाचा विचका करतं). ते फरशीवर अंथरावं. आणि अगदी हळू हाताने ते धुऊन निथळत ठेवलेले तांदूळ पसरावे. आणि अगदी सावलीतच वाळवावे. उन्हात वाळवले तर तुकडा पडतो, उकड चांगली येणार नाही. तर हे तांदूळ छान वाळू द्यावे. मधून मधून मायेच्या हाताने हळुवार वर खाली करावे. हे सगळं करण्याचं कारण, उकडीसाठी पिठी ताजी हवी. विरी गेली असल्यास उकड विसविशीत होते आणि मोदक अजिबात वळता येत नाहीत. (सूचना: अगदी कोणत्याही दुकानातून "सुवासिक" वगैरे तांदळाचे पीठ आणु नये. स्वतःच्या हाताने करावे).
मग हे वाळलेले तांदूळ एका डब्यात भरून गिरणीत न्यावे. गिरणीवल्याला सक्त ताकीद द्यावी कि पीठ पांढरे शुभ्र यायला हवे. बाजरी किंवा ज्वारीवर दळलं तर याद राख, मोदक पात्रात उकडून काढील तुला पण! मग ते पीठ घरी आणून डबा जरा वेळ उघडा ठेवावा, पिठातली उष्णता बाहेर पडायला हवी.
एवढे सोपस्कार झाल्यावर मस्त वरण भात खाऊन दुपारी परत ताणून द्यावी.
संध्याकाळचा चहा झाला की आपली वेळ ठरवावी आणि कामाला लागावे. आपल्याला हवे असतील तितके नारळ घ्यावे. ते सोलून घ्यावे. गरगरीत गोटा झाला की एका वाटीत पाणी घेऊन चार बोटे त्यात बुडवावी आणि त्या नारळाच्या बरोबर मध्ये सगळीकडून लावावी. (पृथ्वीवर विषुववृत्त असते तसे) मग नारळ फोडावे. बरोबर दोन भागात फुटले पाहिजे. नाही फुटले तर आपले कसब कमी पडते समजावे. असे हे दोन भाग नारळाचे खोवयाला घ्यावे. इथेही कडक सूचना कि नारळ खोवून घ्यावे. मिक्सर मधून बारीक केल्यास त्याला एक कोरडे पणा येतो आणि म्हणावा तो स्वाद येत नाही. खोवणीने खोवल्यास एक मऊपणा येतो, थोडसं दूधही निघत नारळाचं, त्याच्याने चवीला चार चाँद लागतात.
सगळे नारळ खोवून झाले की गूळ किसून घ्यावा. उकडीचे मोदक हे गुळातच करायचे असतात. कोणी साखरेचे केल्यास त्याला महाराष्ट्रातून बाहेर हाकलून द्यावे. आणि जे कोणी बाहेर उकडीचे साखरेचे मोदक विकतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. असो. तर गूळ छान किसून घ्यावा. मस्त लालसर असला पाहिजे. (तो पांढराफटक गूळ मिळतो बाजारात, तो अजिबात घेऊ नये. चिक्कीचा गूळ घेतल्यास, तो गूळ, तुम्ही, ते नारळ आणि ते मोदक गोंधळ घालावा).
जितके खोवलेले खोबरे असेल, तितकाच गूळ घ्यावा. किंवा किंचित कमी घ्यावा. प्रमाण अगदी काटेकोर हवे. जराही कमी पडल्यास चवीचा विचका होईल. तर एका कढईत किंचित तूप घालून ती गॅस वर ठेवा. गॅस चालू पण करा. मग तो गूळ आणि खोबरे त्या कढईत घाला आणि सतत हलवत रहा. गुळाचे काही खडे राहिले असतील तर ते फोडत रहा. गुळाचा खडा राहता कामा नये. तर हे मिश्रण सतत हलवत रहा. गूळ संपूर्ण वितळला कि अजून फक्त 2 मिन परतून घ्या. फार परतले तर मिश्रण कडक होते गार झाले की, मग नारळाच्या वड्या कराव्या लागतील. तुमचे तयार झालेले सारण काढून त्यात किंचित जायफळ किसून घाला आणि हवे असल्यास थोडी खसखस आणि सुका मेवा. सारण थंड करायला ठेवा.
इकडे एक जाड बुडाचे पातेले घ्या. पितळाचे असल्यास उत्तम. ते नॉनस्टिक वगैरे बाष्कळपणा अजिबात नको. जितके पाणी घ्याल, अगदी आणि अगदी तितकेच तांदळाचे पीठ हवे. ते पाणी पातेल्यात उकळायला ठेवा. छान पहिली उकळी आली की त्यात तूप, आणि अगदी किंचित मीठ घाला म्हणजे पारीला पण चव येते. पाण्याला उकळी आल्यावरच तूप आणि मीठ घालायचं, आधी नाही. मग पीठ घालायचं त्यात आणि लगेच झाकण ठेवायचं. दोन मिनिटांनी झाकण काढून, लाटण्याने किंवा जमणार असेल तर उचटण्याने ते सगळं एकजीव करावं. यात बऱ्यापैकी मेहनत हवी. ते सगळं एकत्र करून झालं की मग परत झाकण ठेऊन एक वाफ येऊ द्यावी.
मग गॅस बंद करावा. 2 मिनिटांनी ती उकड काढून घ्यावी. मोठी परात असल्यास उत्तम किंवा सरळ गॅस ओटा स्वच्छ करून त्यावर ओतावी म्हणजे मळायला सोपी जाते. एका वाटीत पाणी आणि चमचाभर तेल एकत्र करावे. त्यात दोन्ही हात बुडवावे आणि उकड मळावी. उकड गरम असतानाच मळली जाते, त्यामुळे हाताला बसणाऱ्या चटक्यांकडे दुर्लक्ष करून मळत रहावी. कणकेच्या गोळ्यासारखी मऊ झाली एका भांड्यात ठेवावी आणि वर ओलसर मखमल घालून झाकण ठेवावे.
आता हाताला परत तेल पाण्याचा अंश लावावा, उकडीचा साधारण माध्यम लिंबाएवढा गोळा घ्यावा, आणि डाव्या हाताच्या तळवा आणि उजव्या हाताचा अंगठा याने तो गोळा पारीच्या स्वरूपात न्यावा. (जिज्ञासूंनी you tube पहा किंवा घरी आई किंवा बायकोला करताना). अगदी कंजूस असल्यासारखे बारीक बारीक वळू नयेत. उकडीचा मोदक हा मोठाच हवा. मग त्यात खच्चून सारण भरावे. छान पाकळ्या काढत तो बंद करावा आणि वर सुरेख कळी काढावी. असे मोदक करत रहावे.
दुसरीकडे मोदक पात्रात पाणी घालून ते उकळत ठेवावे. उकळी आल्यानंतरच मोदक मोदकपात्रात उकडायला ठेवावे, आधी नाही. पत्रातल्या खाचंइतके मोदक वळून झाले कि ते त्याला एक तुपाचा हात लावून मोदक त्यावर ठेवावे आणि झाकण लावावे.
मोदक झाले की नाही हे कसे तपासावे? जेव्हा मोदक पात्र नुकतेच गॅस वर ठेवतो, तेव्हा त्यातून येणारी वाफ हि वर जाते, मोदक उकडून झाले की त्यातली वाफ बाहेर पडताना आडवी बाहेर पडते. ती आडवी झाली की मोदक झाले समजावे. ह्याला "उभी आडवी वाफ जाणे" अशी संज्ञा आहे.
मग झालेलं मोदक एका ताटात काढून वर तूप घालावे. नैवेद्याची भानगड असल्यास तो सोपस्कार पटकन उरकवा. आरतीत फार वेळ घालऊ नये. गणपतीचा नैवेद्य असल्याने त्याचीच आरती करावी, उगाच देवी, शंकर, दत्त इत्यादींना त्रास देण्यात मतलब नाही.
नैवेद्य झाला रे झाला की कोणाचीही वाट न पाहता, सरळ ताटात मोदक घ्यावा, त्याची वरची कळी मोडावी, आत तूप घालावे आणि मग उमजावे ब्रह्मानंदी टाळी लागणे म्हणजे काय......
अशी ही मोदकांची साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण, आण रे अजून एक मोदक.....

field_vote: 
4.75
Your rating: None Average: 4.8 (4 votes)

प्रतिक्रिया

फोटो नाय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे सगळं ISO 2001 छाप केलंत पण तांदूळ घरच्या जात्यावर न दळता गिरणीत दळायला नेलेत! पीठ तापतं तिकडे आणि हातसडीच्या तांदळातले पौष्टिक गुणधर्मही उडतात.

आता गुळही साखरेचाच मिळतो. खरा गुळ घातला तर सारण काळे होते.
मोदक खाऊन दुपारी झोप काढायची म्हटलं तर ठीक पण संध्याकाळी करून खाऊन झोपण्यात काय मजा?

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मार्मिक' दिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...आता गुळही साखरेचाच मिळतो. ...

म्हणजे? मै कुछ .... समझा नही. फार पूर्वी "साखऱ्या गुळ आलाय" हे रत्नांग्रीत ऐकलं आहे. म्हणे तो जरा कोरडा, साखरेचे कण मधे मधे क्रिस्टलाईझ झालेला असतो. अर्थात म्हणा गुळ = साखर + बाकीची घटकद्रव्य म्हणजे कुठलाही गुळ साखरेचाच असतो !! पण प्रोसेसिंग स्टेपमधे साखर करून मग परत तिचा गुळ करतात असा बोध होतोय म्हणून ही पृच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

गुळही साखरेचाच मिळतो. .

हो.
कसं ते पाहा -
उसाचा रस आटवत पाणी कमी करत आणतात, थंड केल्यावर घट्ट ढेप बनेल एवढा आटवून साच्यात ओतून थंड केल्यावर रसाचा गुळ होतो. स्फटिकीकरण होत नाही. (Amorphous)
गुळास वापरायला घेतल्यावर हवा लागून आंबण्याची खोड असते. तसं लवकर होऊ नये म्हणून खायचा सोडा घालावा लागतो. गुळ चविष्ट लागत असला तरी काळा,तपकिरी दिसतो. आता मार्केटमध्ये शुद्ध पौष्टिक वस्तुंपेक्षा गोऱ्या दिसणाऱ्या वस्तुंची मागणी असते ती पुरी करायला हवी ना?
२) रस बराच पातळ असताना त्याचे स्फटिकिकरण उर्फ साखर करता येण्याची युक्ती शोधली गेली. तर यात दोन फायदे झाले रुपडे आणि पाण्याचे प्रमाण वाढल्याने स्वस्ताई.
साखर ३६/-रु , गुळ ७०रु किलो.
३) गुळासाठी रस आटवताना योग्यवेळी योग्य प्रमाणात साखरच ओतायची(२०%) की थोडा कमी काळा स्वस्त गुळ होतो. पण आता ८०%साखरही घालतात.
४) खरा गुळ फक्त तमिळ दुकानांत मिळतो.
-----
न'वी बाजु धन्यवाद हो।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कधी नॉलेजमधे (मराठी शब्द लिहिता येत नाहीये) भर पडेल सांगता येत नाही! रोचक आहे खरं. धन्यवाद.

तामिळ लोकाना पीव्वर गुळाचं कौतुक फार आहे म्हणून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

तामिळ लोकाना पीव्वर गुळाचं कौतुक फार आहे म्हणून?

मुलांनी गोळ्या चॉकलेटं खाण्याऐवजी चांगलं खावं म्हणून गुळ देतात. दुकानांत बोटभर / एकदोन इंच लांबीचे गुळाचे चौकोनी खडे तयारच विकत मिळतात. ते चोखायचे.
तमिळ भाषेत सक्करै = गुळ, पंचसारा = साखर.
तांदुळ आणि खोबरं ते अधिक खातातच. ऊसही होतो तिकडे. तुळशीच्या लग्नात काळा, मऊ ,खूप गोड ऊस विकायला येतो. ते मोदक ( तो आकार )करत नाहीत पण वेगळी केळीच्या पानातली पुस्तकं(सपाट आकार) करतात आणि तूप घालूनच खातात. तमिळ सहकाऱ्यांमुळे माहीती/अनुभव.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहानपणी कोण्या कुटुंबाने एका घराबाहेर फळा लावून त्यावर येथे शुद्ध पिवळा गूळ मिळेल असं लिहिलं होतं. पिवळा असं वर्णन असल्याने शुद्ध चांगला गूळ म्हणजे पिवळा असं वाटे. एके दिवशी कोणीतरी त्यातला ळ पुसला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाळेतला विनोद. मी गु ऱ्हस्वच लिहितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्यंत सहज घडू शकणारा विनोद.

स्थळ: सांगली

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@गवि:

'मार्मिक' श्रेणी दिली आहे. कृपया दखल घेणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@गवि:

'विनोदी' श्रेणी दिली आहे. कृपया दखल घेणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही मांडल्या. या महिन्याचा हिशेब क्लियर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुळाला तमिळ मध्ये वेल्लम् पण म्हणतात, வெல்லம்

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिद्धार्थ

पंचाईत आहे आता. "सुरेख पिवळाधम्मक गुळ" असा आत्तापर्यंत अद्न्यादनात आनंद होता!

अवांतर - तेव्हढं adnyaanaata कसं लिहायचं "कुणी याल का, सांगाल का? शिकवाल का, या पामरा?" !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

jY

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्ञानात भर घातल्याबद्दल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

मला वाटतं पंचसारा हा मल्याळम शब्द आहे साखरे साठी.

तमिळ मध्ये साखरेस सक्करै म्हणतात माहित होतं.

मंडवेल्लम / वेल्लम - आपला पिवळा / काळपट उसाचा गुळ
करूपट्टी - पामचा गुळ

मोदक त्यांच्याकडे कोळकट्टाई म्हणून खातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

तमिळ चानेल डीडी पोधगाई'वर पाककृती दाखवतात तेव्हा
गुळ घातलेली खिचडी -सक्करै पोंगल, नेहमीची आपली खिचडी मिळगु (मिरची/तिखट) पोंगल.
साखर कधी दाखवतात तेव्हा पंचसारा बोलतात.
मंडवेल्लम > मंजळवेल्लम हळद किंवा पिवळा रंग.(मञळवेल्लम).
बाकी केरळमधल्या पालघाट (पलक्कड)मध्ये तमिळ लोक फार आहेत ते थोडं मिश्र तमिळमलयालम बोलतात. त्यामुळेही असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://haridasvani.wordpress.com/2018/05/04/bhagyadalakshmi-9/
.

सक्करे तुप्पद कालुवे हारिसि । शुक्रवारद पूजेय वेळेगे ॥

सक्करे म्हणजे साखर, तुप्प म्हणजे तूप. कालुवे म्हणजे पन्हाळ कशी असते त्यासारखे. हारिसि म्हणजे वाहते. शुक्रवारी तुझ्या पुजेच्यावेळी साखर तुप यांनी युक्त पंचामृताची एकप्रकारे नदी वाहत असते. पण दासांनी येथे तुप आणि साखर याचाच प्रामुख्याने उल्लेख केला आहे. पंचामृत हा एक अर्थ आहेच पण दुसरा अजून एक अर्थ असाही होतो की,

येथे तुप आणि साखर प्रतिकात्मक आहे. तुप हे बुद्धीवर्धक आहे म्हणजेच विवेक. आणि साखर मधुर, शुद्ध, सत्त्व असणारे म्हणजेच भक्ती. ही विवेक आणि भक्तीची नदी एकप्रकारे तुझ्या आश्रयी वाहत असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरा गूळ (काळा किंवा गडद तपकिरी, सोडा न घातलेला) आता अनेक ठिकाणी मिळतो. उदा. मला फलटणमधून असा मस्त गूळ मिळालेला आहे. बाकी Organic Jaggery शोधली तरी मिळावा. उदा. हे पाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चिंज, हो मिळतो. पण सारण, चिक्की याचे काळे फार होतात म्हणून टाळतात. पुरणपोळ्यांचा रंग बघवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काळे फार होतात म्हणून टाळतात

काळ्या रंगाचं मला काही वाटत नाही. मी तर हा काळा गूळ शिरा, खरवस, कॅरॅमल कस्टर्ड, नारळाचा खव, कलाकंद, टार्ट, क्रम्बल अशा अनेक पदार्थांत साखरेऐवजी वापरतो. सुरेख चव येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जात्यावरच दळणार होतो, पण खुंटा ऐन वेळी सापडेना, मग आळस आला आणि गेलो गिरणीवर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिद्धार्थ

पण तांदूळ घरच्या जात्यावर न दळता गिरणीत दळायला नेलेत!

ओव्याही आवश्यक आहेत का अस्सल वरिजनल चवीसाठी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओथेंटिक म्हणायचे आहे?
Bill Bensley _ architect याचाही उद्देश स्थानिक निसर्ग, कला, हॉटेल रचनेत आणायचा असतो.. किचनमध्ये पदार्थही बनवत असणार.
हा कोकणात/ कोल्हापुरात येणार का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का नको? म्हणाव्या की ओव्या......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिद्धार्थ

केव्हाही करा आणि खा..... खाणं आणि नंतर ताणून देण्याशी मतलब....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिद्धार्थ

क्या बात है, व्वा!! नुसते मोदकच नाही, कृती पण अगदी निगुतीने सांगितल्येय. "कृती" हा शब्द आपला या अशा लिखाणाला दुसरा योग्य माहीती नाही म्हणून लिहितोय. ती भुस्कुटीणपण असं सुरेख लिहायची पदार्थाबद्दल. "उभी आडवी वाफ जाणे" प्रकार कधी ऐकला नव्हता. असो. तर धोंडॉपंत, मोदक बाकी फक्कड जमलेत हां - लेख बुकमार्क करून ठेवलाय. या ऐसीवाल्यांचं आणि वाचनखूणांचं काय वावडं आहे देव जाणे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

मला कोणीतरी सांगीतले होते की काळ्या गूळात लोह जास्त असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ळ काढून टाकला तरीही या विधानात तथ्य आढळावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

नैवेद्याची भानगड असल्यास तो सोपस्कार पटकन उरकवा. आरतीत फार वेळ घालऊ नये.

वाह!!! वाह!!!
मस्त अफलातून वर्णन केलेले आहे! खूप सुरेख!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उकडीचे मोदक हे गुळातच करायचे असतात. कोणी साखरेचे केल्यास त्याला महाराष्ट्रातून बाहेर हाकलून द्यावे. आणि जे कोणी बाहेर उकडीचे साखरेचे मोदक विकतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. असो. तर गूळ छान किसून घ्यावा. मस्त लालसर असला पाहिजे. (तो पांढराफटक गूळ मिळतो बाजारात, तो अजिबात घेऊ नये. चिक्कीचा गूळ घेतल्यास, तो गूळ, तुम्ही, ते नारळ आणि ते मोदक गोंधळ घालावा).

विशेषत: ह्या परिच्छेदासाठी त्रिवार प्रणाम.
अजून लेखन वाचण्यासाठी उत्सुक. पंचतारांकन दिलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

कोणी साखरेचे केल्यास त्याला महाराष्ट्रातून बाहेर हाकलून द्यावे.

खांड (खांडसरी) अशा प्रकारची (गुळी) साखर महाराष्ट्रात आधीपासून तयार होते. अज्ञानी अभिनिवेषापोटी आलेले टाळ्याखाऊ विधान आहे हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

सविस्तर सांगाल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिद्धार्थ

खांडसरी घालून केलेले मोदक गुळाच्या सारणापेक्षा वेगळ्या चविचे होतात.

इथेही कडक सूचना कि नारळ खोवून घ्यावे.

अगदी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

आमचे येथील चायनीज रेष्टारण्टांतून श्रीकृपेकरून हुबेहूब असेच दिसणारे उकडीचे मोदक 'स्टीम्ड डंपलिंग' या नावाने विकतात. फक्त, त्यांत डुकराचे सारण घातलेले असते, इतकाच काय तो तपशिलाचा फरक. शिवाय, मोदक बुचकळून खायला सोबतीला काळसर गडद तपकिरी रंगाचे कसलेसे पातळ सॉससुद्धा देतात. छान लागतो एकंदरीत तो प्रकार. आम्ही त्यांना मराठीत 'डुकराचे मोदक' म्हणून संबोधतो.

काही नाही, चित्रावरून आठवण झाली, म्हणून ज़िक्र केला, इतकेच. बाकी तुमचे चालू द्या.

- (सर्व प्रकारची सारणे घातलेल्या उकडीच्या मोदकांचा भोक्ता) 'न'वी बाजू.

==========

फुलटॉस टू @आदूबाळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला मोमो म्हणायचं होतं का @न'वी बाजू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोमोच्याच जातीतला प्रकार, पण किंचित वेगळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Chinese Fried Pork and Cabbage Dumplings
.
https://previews.123rf.com/images/fanfo/fanfo1810/fanfo181000128/109107427-kawa-manta-uyghur-lamb-and-pumpkin-dumplings-uyghur-cuisine-asia-traditional-assorted-dishes-top-vie.jpg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाककृती छान लिहीली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||