तंबीट्टू

श्रावणात कर्मठ घरात पूजाअर्चा जास्त तसं खायप्याची विविधतापण तितकीच असायची. तसं बघायला गेलं तर टेक्निकली आम्ही कानडी आहोत पण बहुतेक नाहीपण. पण तो मुद्दाच नाही. कानडी असू आम्ही असं वाटायचं कारण म्हणजे हेच की सणावारी केले जाणारे पदार्थ, नैवेद्य म्हणून केले जाणारे पदार्थ. तर श्रावण महिन्यात तसंही एरवीपेक्षा अधिक प्रमाणात पूजाअर्चा असायची घरी. अनेक पदार्थ 'चांगल्या हातानं' म्हणजे काहीसं सोवळ्यानंच केरून ठेवलेले असायचे. तळणं केली जाती श्रावणात खास. भाजणी भाजून चकलीकडबोळी केली जात. आणि विशेष म्हणजे तंबीट्टू केले जात.

माझ्या लहानपणी मला तंबीट्टू खायला नको वाटत असे त्यातल्या वेलदोड्याच्या वासामुळं. पण तंबीट्टूचा रंग, आकार मला फार आवडत असे. आकार इतर लाडवांसारखा नसे त्यामुळं मजेशीर वाटे. शिवाय तंबीट्टूनं इन्नी ओवाळतही असे. एकतर पुरणाचे दिवे असत किंवा तंबीट्टूचे.

नंतर बिनावेलदोड्याचा तंबीट्टू माझ्यासाठी करायला सुरुवात केली आईनं. आणि तंबीट्टू मला रंग, आकाराबरोबरच चवीलाही आवडूच लागले.

कर्नाटकात तंबीट्टूला विशेष महत्त्व आहे. मध्य, दक्षिण कर्नाटकात तांदळाचे तंबीट्टूही केले जातात. पण उत्तर कर्नाटकात डाळ्याचे तंबीट्टू केले जातात. 'हुरिगडाळे तंबीट्टू' असं म्हणतात याला.
करायला एकदम सोप्पे आणि लवकर होणारे हे लाडू.

लहानपणी मला आठवतंय तसं तंबीट्टूला लाडवासारखा गोल आकार न देता काहीसा cylindrical असा आकार देऊन बोटाने मध्ये खळगा करत. यात तुपाचे दिवे लावले जात आरती करताना. आरती करून दिवे शांतवले की एक छान खरपूस वास येत असे त्या तंबीट्टूला. आता काही दिवे वगैरे नाही लावले पण आईनं केलेले हे 'लाडू'च्याच आकाराचे तंबीट्टू मात्र एकदम चवीष्ट झालेत.

आईच्याप्रमाणे तंबीट्टूची करायची कृती - एकदम सोपी आणि सहज.

फुटाण्याच्या डाळ्याचं पीठ, सुकं खोबरं, शेंगदाणे, (नसले तरी चालतंय) खसखस, गूळ, तूप हे इतकंच साहित्य लागतं. फुटाण्या डाळ्यांचं पीठ करून घ्यायचं मिक्सरवर, सुकं खोबरं खिस करून छान भाजून घ्यायचं घरभर खरपूस खमंग वास पसरेपर्यंत. जराशानं ते निवलं की मिक्सरमधून काढून घ्यायचा खोबऱ्याचा खिस. खसखस भाजून घ्यायची, शेंगदाणे आवडत असले तर तेही भाजून कूट करून घ्यायचे. आता सगळी पीठं हाताशी ठेवायची. कढईत चमचादोनचमचे तूप गरम करायचं त्यात खिसलेला गूळ घालून तो वितळवायचा फक्त त्यात हे पीठ, खिस, कूट, खसखस घालून छान एखाद मिनाट परतून गॅस बंद करून टाकायचा. पाक नसल्यानं तो एकतारी दोनतारी यतारी आहे का बघायची झंझटपण नाही. गूळ आळून यायच्या आधीच लाडू वळायचे. जरा खूपच कोरडं कोरडं वाटलं, ठिसूळ वाटलं तर सरळ घरचं तूप घालायचं वरून चमचादोनचमचे. हे लाडू ठिसूळच असतात हे महत्त्वाचं. कमी तूपातले, काहीसे कमी गोड, kind of हेल्दि लाडू असतात हे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाह. मस्त.

तंबिटाचे लाडू या नावाने हे ओळखीचे आहेत.

खाऊन मात्र युगे लोटली. आजीच्या पिढीसोबत अस्तंगत झालेल्या गोष्टींपैकी एक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉलिडे!!! मस्त दिसतायत लाडू.
___________
सोपे आहेत की. करेन या वेळेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही जणी तर वेलदोड्यांचा डबाच पाडतात. त्याला उगाच " वेलदोडा थोडा पुढे आलाय का?" म्हणायची पद्धत होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा! मस्त दिसताहेत लाडू. बायकोला करायला सांगितले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वा.
उत्तम.
बॅटोबा, लवकर सांग हो बायकोला टंबीटाचे लाडू करायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोपी, पौष्टीक आणि चविष्ट पाककृती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

किस आणि किसणं असे प्रमाणभाषेतले शब्द आहेत त्याला पश्चिम महाराष्ट्रात खिस आणि खिसणं म्हणतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खूप मस्त! सोपं सुटसुटीत कृती. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।