ह्यू-एन-त्सँग -

लहानपणी शाळेतील इतिहासाच्या पुस्तकातल्या एका
चित्रा बद्दल मला खूप कुतूहल वाटायचं. गोटा केलेले यूल ब्रायनर सारखे डोके, गोल गोमटे शरीर, चपटे डोळे, गुडघ्यापर्यंत पसरलेला झगा, हातात पंख्यासारखी वस्तू, पायात सपाता, एक पाऊल पुढे तर दुसरे मागे, अशा रूपात प्रभाव टाकणारा तो प्रवासी ज्ञानपिपासू म्हणजे चीनचा ह्यू-एन-त्सँग ! (इ. स. ६०२-६६५) याचे चित्र होय.
त्याने आयुष्यभरात सुमारे दहा हजार मैलांची पायवाट
तुडवली होती! (इंग्रजीत 'झुआंग अँग' असा सोपा उच्चार
आहे. यापुढे फक्त 'झुआंगच' म्हणू). त्याच्यावर फारसे
वाचायला मिळत नाही. पण काही वर्षांपूर्वी दोन पत्रकारांनी झुआंगने ज्या मार्गाने चीन ते भारत व परत प्रवास केला त्याच मार्गाने आधुनिक वाहनांनी प्रवास करून Chasing The Monk's Shadow हे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे. लहानपणापासून झुआंगला बौद्ध धर्मतत्त्वांचे आकर्षण होते व मिळेल तेवढ्या धर्मग्रंथांचा तो अभ्यास करत होता. विसाव्या वर्षीच तो भिक्षू झाला. तथापि त्याच्या अनेक शंकांचे समाधानकारक निरसन होत नव्हते. मूळ धर्मग्रंथ वाचावे, विद्वान भाष्यकारांना भेटावे
व एकूणच धर्मसंस्कृतीचा अभ्यास करावा या हेतूने त्याने भारतात जायचे ठरवले. डोंगराळ भाग, हिमकडे, बर्फाळ प्रदेश, कडाक्याची थंडी, निर्जन भाग यांना पुरून उरत तो भारतात आला. वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत (केरळपर्यंत) त्याने वेगवेगळ्या मठातून व विद्यापीठातून ज्ञानग्रहण चालू
ठेवले. त्यासाठी तो संस्कृत-पालीसह येथील इतर अनेक भाषा शिकला. त्याकाळच्या जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातही त्याने शिक्षण घेतले. तेथील सर्व अध्यापकांनी त्याच्या जिद्द, बुद्धी, नम्र आचरण याबद्दल गौरवोद्गार काढले होते. अनेक
ज्ञानमहर्षीच्या पायाशी बसून त्याने चर्चा करत तसेच शंकानिरसन करून घेत बौद्ध धर्म व इतर अनेक ज्ञानशाखांमध्ये नैपुण्य प्राप्त केले. भारतातील सर्व राजेमंडळींनी त्याचा आदर करून इथेच
स्थायिक होण्याची विनंती केली होती. यात थोर राजा हर्षवर्धनही होता. पण चीनमध्ये परत जाऊन हा ज्ञानठेवा तेथील सर्वांना उपलब्ध करून देण्याचे त्याचे जीवितध्येय होते. त्याची भ्रमंती तब्बल १८ वर्षे (इ.स.६२७ ते ६४५) झाली. विशेष म्हणजे त्याने येथील अनेक मूळ धर्मग्रंथांच्या स्वहस्ते नकला करून घेतल्या होत्या. परत जातांना हस्तलिखिते नेण्यासाठी सुमारे २१ खेचरांची गरज लागली असे सांगतात. बरे.. एवढे केल्यावर घरी जाऊन विश्रांती घ्यावी तर तेही नाही. चीनच्या राजाने परत आल्यावर त्याचे स्वागत करून राजदरबारी राहण्याची विनंती केली होती. पण झुआंगने ते नाकारले व ज्ञानयज्ञ चालू ठेवला. उर्वरित १९ वर्षांच्या आयुष्यात त्याने एका गुंफेत वास्तव्य केले व या सर्व हस्तलिखितांचे चिनी भाषेत भाषांतर केले. भारताबद्दलच्या ऐतिहासिक माहितीसाठी काही वेळा झुआंगच्या ग्रंथांचा आधार घेतला जातो. वयाच्या ६४व्या वर्षी त्याने देह ठेवला. ज्याकाळी कोणत्याही सोई नव्हत्या त्यावेळी त्याने केलेली पायपीट, ज्ञानसाधना व बौद्ध साहित्यावर केलेले प्रचंड कार्य थक्क करते.

आता या पार्श्वभूमीवर आपल्याकडची मुलेमुली पहा. फर्लांगभर अंतरावरच्या शाळाकॉलेजात जायलाही दुचाकी - चौचाकी हवी. ज्ञानग्रहण मात्र शून्य. त्यांना निदान ह्यू-एन-त्सँग हे नाव तरी माहीत आहे का किंवा ऐकले आहे का ? बहुधा उत्तरादाखल प्रश्नार्थक, निर्विकार व मख्ख चेहराच दिसेल!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भारतातल्या शहरांबद्दल त्याने जे लिहून ठेवले ते बहुमोल आहे. एका त्रयस्थाने केलेले निरीक्षण महत्त्वाचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या काळातल्या शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकांत या सद्गृहस्थाचे नाव 'युआन श्वांग' असे छापलेले असायचे. संबंधित तज्ज्ञांनी असा उच्चार नक्की कोठून शोधून काढला, हे त्यांचे त्यांनाच माहीत!

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण प्रमाण चिनी राष्ट्रबोलीत उच्चार श्युएन् झाङ् (झ नव्हे ज़, पण शब्दात लिहिता येत नाही) याजवळ जाणारा असावा.

ह्यू-एन-त्सँगच्या मध्यातल्या "-एन-"मुळे भारतीय उच्चारात कुप्रसिद्ध "चाऊ-एन-लाय" नाव आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0