आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग १

तितली रानी तितली रानी
मुझको दे दो अपने पर
पर लगाके उड जाऊंगी
अपनी नानी के घर

मुलगी हे म्हणायला लागली आणि मला आईच्या घराच्या ऐवजी माझ्या नानीचं घर आठवायला लागलं.
लहानपणीच्या खूप आठवणी या औरंगाबाद मधल्या घरा भोवती आहेत हे जाणवल.

माझ्या आजीचं नाव विमल आणि आजोंबांचं नाव वासुदेव म्हणून घराचं नाव गोकुळ असा ठेवलेलं आणि नाव पुरक असायला पाहिजे म्हणून कि काय पण वासुदेवांना ८ नातवंड. (या हिशोबानी माझ्या दुसया आजोंबांच्या घराचं नाव हस्तिनापूर असायला पाहिजे होतं कारण तिकडे आम्ही ५ जण. असो.)

तर गोकुळ हे त्या वेळेस च्या पद्धती प्रमाणे मोठ्या जागेवर बांधलेलं ऎसपैस घर. समोर आंगण, अंगणात हौद, गेट वर नेहमी काढलेली रांगोळी आणि विमल नि लावलेली असंख्य झाडे. आम्ही अगदी लहान होतो तेंव्हा आजी कडे गुलाब, जुई, मोगरा, गच्ची पर्यंत असलेली मधुमालती आणि सदैव अंगणात सडा टाकणारी तगरीची फुले नेहमी फुललेली असायची. गुलाबी गावरान गुलाब फुलला कि मला आनंद हा कि आता आजीच्या हाताचे गुलकंद मिळणार. या सगळ्या फुलांचा वास असेल किंवा आता फक्त आठवणीत असेल पण आजीचं घर नेहमी सुगंधित असायचं. आजी रोज आई आणि मामी करता गजरा बनवत असे आणि घर जवळ असल्या मुळे आजोबांसोबत रोज तो घरी येत. मोगऱ्याच्या फुलांचा वास अजूनही आठवते ती लहानपणीची आईची. औरंगाबाद मध्ये असलेल्या नातवंडानमध्ये मीच मुलगी असल्या मुळे, आजी करता फुल वेचून आणायची ड्युटी माझी असायची. आजीच्या जाडजुड पितळेच्या परडीत गजऱ्या करता फुल, देवा करता फुल असे वेचून आणणे म्हणजे माझ्या करता ३ भावांच्या दांडगट पण पासून सुटका असायची.

या समोरच्या अंगणातून वाट काढून मागे गेलो कि फळांची झाडं होती. पेरू आणी सीताफळ तर नक्की आठवतात कारण असंख्य वेळा कच्चे पेरू तोडून आणि आजीचा ओरडा खाऊन झालेला होता. इथे पण एक हौद होता जो घरच्या वापरायच्या पाण्याचा source होता त्या मुळे हा हौद किती भरलेला आहे यावर घरात नेहमी चर्चा असायची. कारण कधीच कळलं नाही पण आजोबांनी इथे एक संडास बांधला होता. लपाछुपी खेळताना सगळी मोठी भावंडं धाकट्यांना याच संडासात कोंबून स्वतः कुठे तरी चांगल्या ठिकाणी लपायला जायचे हे नक्की होते. इथे लपल्या मुळे असेल पण लपाछुपीचा खेळ मला कधीच आवडला नाही. त्यातल्या त्यात राज्य असेल तर चांगल, पण लपायचं असेल, तर सारखी मनात भीती असायची कि आपण लपूनच राहिलो आणि कोणी आपल्याला शोधालच नाही तर? (फार पाप भीरु असल्या मुळे स्वतः बाहेर येऊन जाता येत असा विचारही मनात आला नाही.)

घरात आत आलो कि पहिले एक छोटी खोली होती. ह्या खोलीनी धाकट्या सक्ख्या भावाच्या झोळी पासून (जिच्यात आम्ही मोठे तिघच जास्त बसत असू ), आता धाकट्या मामे भावाच्या ऑफिस पर्यंत दिवस पहिले.डाव्या बाजूला सीटिंग हॉल आणि तिथेच आजोबांचा दिवाण. त्या दिवाणावर आजोबा आणि दिवाणाखाली सोनू कुत्रा हे चित्र मी कधीच विसरू शकत नाही. ह्या सोनूला आजोबांनी हॉल पर्यंत यायची मुभा दिली होती पण दिवाणावर नाही. त्याकरता एक मोठी काठी नेहमी दिवाणावर असायची. आजोबांच्या आणी सोनूच्या भीतीमुळे आमच्याकरता हा दिवाण no-go zone होता. या हॉल मध्ये आजोबा नेहमी एक कमी voltage दिवा लावायचे ( इथे पूर्ण प्रकाश आजोबा गेल्या नंतरच दिसला) आणि याच प्रकाशात मोठा भाऊ सगळ्यांना "ZEE Horror show" बघायला लावायचा. धाकटा मामे भाऊ आजीच्या मागे बसून आणि उरलेले आम्ही तिघं चादरीच्या मागे बसून हा शो बघत असू . स्वतः ची घाबरगुंडी उडवून घ्यायला त्याला का आवडत असेल हे अजूनही मला कळलेले नाही. त्यात आजोबांनी पाणी मागितले तर उठून भूत खेतांनां लढून, रक्त रणजित टाईल्स वरून जाऊन रक्तचाच नळ उघडून ते आणावा लागणार या भीतीने फाटलेली असायची (काय ते विचारू नये). त्या चादरीच्या मागे बसून आई कधी येते हा एकमेव विचार मनात असायचा. आजोबांच्या खोलीतून आत गेल कि मामा मामी ची खोली. ह्या खोलीचा Dark रूम (अंधारातली लपाछुपी) खेळण्याकरता भरपूर उपयोग व्हायचा कारण याला डायरेक्ट सूर्यप्रकाश मिळत नसे. मग आत मध्ये स्वयंपाकघर. हे स्वयंपाकघराची मांडणी मला आठवते तेंव्हा पासून तशीच आहे. ते मोठाले पितळेचे डबे, नीट रचून ठेवलेले छोटे पेले, मोठ्या भावाची कुरूप लोटी, देवघर, dining table .. सगळे पहिले कि एका comfort zone मधे जाते मी. पहिले मामी नि आणि आता भावजयीनी हे जसच्यातस ठेवल आहे मी म्हणून त्यांना धन्यवाद म्हणते.

याच स्वयंपाक घरात टेबलच्या खाली एक चोर खोली होती. तिचं काम जर गोष्टी चोरांपासून लपवून ठेवणं होत तर तिला चोर खोली का म्हणत हा मला कधीही न उलगडलेला प्रश्न. असो. या खोलीत नक्की साप आणि विंचू असणार या मताची मी असल्यामुळे,टेबल वर बसतांना नेहमी पाय वर घेऊन बसायची सवय मी स्वतःला लावून घेतली होती.

तर या स्वयंपाक घरात आम्ही खाली बसून आणि आजोबा टेबल वर बसून जेवायचे. (आजी कधी जेवायची हे कधीच पाहिल नाही). आमच्याकडून ताटात उरणे (टाकणे), जेवतांना बोलणे, नाक मुरडणे या अगणित गुन्ह्या पैकी कोणता तरी गुन्हा व्हायचाच, मग त्या वेळेस च्या पद्धती प्रमाणे table वरून ओरडा मिळायचा. आजोबा हातात काठी घेऊन बसत नव्हते हेच मुळी कौतुक. या स्वयंपाक घरातील असंख्य चवींपैकी तोंडात अजूनही जाणवते ती आजीनी केलेली गरमगरम पुरण पोळीची. आजीसारखी पुरणपोळी आईला आणि मावशीलाही जमत नाही (शिव्या पडणार आता).

क्रमश:

टीप : सध्या जरा वेळ असल्यामुळे "आठवणीतील घरं" यावर लिहायचा विचार आहे. त्यातले हे पहिले घर.. Hopefully this continues

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पेरु आणि सिताफळ म्हणजे कोकणात नाही. नगरकडे असावं. साप ,विंचु म्हणजे सातारा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

aho aurangabad lihila ahe mi ... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो. पण विदा पाहून अंदाज केला. नगर औरंगाबादची हवा एकच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

... नेहमी काढलेली रांगोळी आणि विमल नि लावलेली असंख्य झाडे.

ह्यांतलं विमल म्हणजे काय?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

...एकमेवाद्वितीय, एक्स्क्लूज़िव.

आठवा, 'ओन्ली विमल'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Aajobanna naav ghyayala sangitale ki te fakt ONLY VIMAL mhanayache Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहिलेलय
माझ्या बालपणीचा लपाछुपी खेळ आठवला. साधनांचा अभाव असल्याने बालपणी आम्हीही शरीर हेच साधन असलेले असे च खेळ प्रामुख्याने खेळायचो.
किंवा टायर वगैरे सारखी फुकट उपलब्ध साधने. किंवा गोट्या वगैरेसारखी स्वस्त बस यापुढे फारशी मजल नव्हती. पण मजा जाम यायची. दिवसच्या दिवस घराबाहेर फक्त नदी झाड फुकट फळे एकंदर सर्वच छान आणि मुख्य म्हणजे फुकट उपलब्ध.
आमचे अजुन गेम म्हणजे रंगात रंग कोणता रंग हा मला खुप आवडायचा नंत र्विषामृत तेव्हा आम्ही खेळाच्या मधात कोणी आऊट करायला आल तर ट्याम्प्लीज अस म्हणुन हाताची मुठ करुन थुंकी लावायचो म्हणजे मला आता आउट करता येणार नाही अस. फार नंतर मला त्याचा अर्थ टाइम प्लीज होता अस कळलं.
बाकी जगातल्या सर्वात जुन्या खेळात लपाछपी हा एक आहे आणि दुसरा डॉक्टर डॉक्टर असे रजनीश यांच्या पुस्तकात वाचलेले आठवते. त्यातही मुलगी पेशंट असते आणि मुलगा डॉक्टर अस काहीस.
आम्ही तु तुझ दाखव मी माझ दाखवतो अस एकेकट्याने जोडीत गुपचुप करायचो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

thank you Smile ... lahanpanichya baryach shabdanncha arth khup nantar kalala ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही तु तुझ दाखव मी माझ दाखवतो अस एकेकट्याने जोडीत गुपचुप करायचो.

आचरट असलो तरी असलं सुचलं नव्हतं. गर्व से कहो वगैरे.
आणि कोण लांबपर्यंत *** केलं तरी मिsssले सुर मेरा तुम्हारा गाणं नव्हतं तेव्हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0