धर्म आणि नीतिमत्ता

आज सकाळी सकाळीच ही बातमी वाचनात आली आणि पुन्हा धर्माच्या नावाखाली चाललेल्या अघोरी प्रकारामुळे तळतळाट झाला.
सविता हलपनवार नावाची आयर्लंड मधे राहणारी स्त्री डॉक्टरांनी अबॉरशन करायला नकार दिल्यामुळे मेली. अर्थात तुम्हीसुद्धा ही बातमी वाचलीच असेल. आयरीश कायद्यानुसार, जोपर्यंत पोटातल्या बाळाचे हृदय चालू आहे तोवर अबोर्शन करू शकत नाही. त्या दुर्दैवी बाईच्या नवर्‍याने हरतर्‍हेने डॉक्टरांशी बोलून पाहीलं असणार पण तीन दिवस असह्य वेदना सहन करून शेवटी तीने प्राण ठेवला. थोडक्यात म्हणजे धर्माने (किंवा धर्माच्या नावाखाली लोकांनी) आणखी एक बळी घेतला. शेवटी लग्नबाह्य संबध ठेवल्याच्या संशयावरून बाईला दगडाने ठेचून मारणारे काय, नवरा मेला म्हणून त्याच्या बायकोला जिवंत जाळणारे काय आणि हे 'तथाकथित' डॉक्टर काय. सगळे एकाच माळेचे मणी.
मधे एकदा एक वाक्य वाचलेलं आठवलं 'नीतिमत्ता धर्माशिवाय असू शकते. पण धर्म नीतिमत्तेशिवाय असूच शकत नाही'. मागे एकदा अमेरिकेतील एका पाहणीत २०% लोकं कोणत्याही धर्माशी निगडीत नसल्याचं दिसून आलं. आणि ही टक्केवारी वाढतेय हे वाचून थोडं बरं वाटलं. अर्थात कोणत्याही धर्माशी निगडीत नसणे आणि कोणत्याही धर्माच्या लोकांबद्धल इन्डिफरंट असणे हया वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. धर्माची आणि कायद्याची सरमिसळ होऊ न देणं हे इतकं अवघड का आहे 'गॉड नोज'!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

अतिशय दुर्दैवी घटना. सविता यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

कॅथलिकांमधे जन्मलेल्या मुलांना बाप्टाईज केल्यानंतरच स्वर्ग मिळतो. आई आधीच बाप्टाईज झालेली असते, ती मेली तरी ती स्वर्गातच जाणार. मूल स्वर्गसुखापासून वंचित राहू नये म्हणून गर्भपात करणं हा धर्मबुडवेपणा आहे. (संदर्भः द सेकंड सेक्स.) एकेकाळी या समजूतीपायी (विशेषतः ख्रिश्चन) मुली मिळेल त्या आडमार्गाने गर्भपात करवून घेतानाही मरत असत. आज, आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान हाताशी असून पहिल्या-दुसर्‍या शतकातल्या धर्मधारणांमुळे माणूस मरतो ही गोष्ट दु:खद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ह्या बातमीतले तपशील वाचून फारच वाइट वाटलं. आता तरी बदल व्हावेत कायद्यात आणि मानसिकतेत...धार्मिक मूर्खपणामुळे दोन जीव गेले.

धर्म हा केवळ व्यक्तिगत पातळीवर असावा...कायदा सगळ्यांसाठी समान असावा असं अनेक वेळा वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक वर्षे आयर्लंडमधे राहिल्यामुळे, वर्तमानात बहुतांश सर्वसामान्य कॅथलिक लोक धार्मिक असले तरी धर्मखुळे नक्कीच नाहीत याचा अनुभव घेतल्यानंतर अशा घ्टना मला अधिकच बुचकळ्यात पाडतात. आयरिश टाईम्स मधली ही
http://www.irishtimes.com/newspaper/opinion/2012/1115/1224326605995.html बातमी आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या तर बहुतांश लोकांचा या धर्मांध कायद्याला विरोधच आहे असे दिसते तरीही कायद्यावरील चर्चचा पगडा इतका सहजासहजी सुटत नाही अशी वस्तुस्थिती आहे. आता एका निष्पाप स्त्रीचा हकनाक बळी गेल्यावर समाजाला जाग येईल आणि कदाचित कायद्यात फेरफार केले जातील. (सध्याच्या कायद्यातही स्त्रीचा जीव धोक्यात आला तर गर्भपाताला कायद्याची संमंती आहे पण त्यासंदर्भात असलेल्या अनेक गुंतागुंतीच्या अस्पष्ट रेषांमुळे असे प्रसंग उद्भवतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घटना फार दुर्दैवी आहे.
पण एक कळले नाही - जो गर्भपाताचा कायदा आहे तो धर्माने केलेला आहे असे वाचण्यात आले नाही. त्यामुळे ख्रिश्चन धर्माचा सम्बन्ध कळला नाही.
त्या देशात कायदा तिथले धर्मगुरू ठरवितात का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जसा पाकिस्तानात पैगंबराची किंवा कुराणाची अवहेलना झाली तर त्या व्यक्तीवर खटला चालतो अशी कायद्यातच तरतूद आहे त्याच प्रमाणे हे सुद्धा. जिथे जिथे धर्म-निरपेक्षित कायदा नाही तिथे असले धर्माच्या शिकवणूकीनुसार केलेले कायदे असणारच. अर्थात धर्म म्हणजेच माणसाने काय चांगलं आणि काय वाईट याबद्धल बनवलेली आचारसंहिता (असं मी मानतो). हेच काम कायद्याचं पण आहे. पण धर्माधिष्ठित कायद्यांमधे काळाप्रमाणे बदल होतातच असं नाही. इथे सगळा लोच्या आहे. कारण एकदा 'बायबल (किंवा कुराण्/गीता/वगैरे) मधे अमुक अमुक सांगितलेलं आहे' असं म्हटल्यावर ते बदलण्याचा अधिकार माणसाला मिळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-------------------------------------------

जिथे जिथे धर्म-निरपेक्षित कायदा नाही तिथे असले धर्माच्या शिकवणूकीनुसार केलेले कायदे असणारच.

असे कायदे कुठे नाहीत?
काही विदा आहे काय?

आपल्या देशातही धर्मस्थळांच्या अवहेलनेसंबंधी (क्रिमिनल) कायदा आहे असे ऐकून आहे.
भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रातही, सिव्हिल कोड हिंदूंसाठी वेगळे आहे हे आपणास ठाऊक आहे काय?
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायद्याबद्दलच्या आपल्या सखोल अभ्यासातून या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला आवडेल.

(अन डिव्हायडेड हिंदू फ्यामिलीच्या नावाखाली ट्याक्स बेनिफिट लुटणारा) आडकित्ता.

अवांतरः धारयति इति धर्मः असे म्हणाल, तर समाजपुरुषाच्या चलनवलनासाठी समाजानेच स्वीकारलेली बंधने स्वीकारणे, ती बंधने डिफाईन करणे हा धर्म. यमनियम. पण त्याच वेळी इतर धर्मांना तु:च्छ लेखणे त्यात येत नाही, असेही ऐकून आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मी भारताची बाजू घेऊन इतर देशांना किंवा धर्मांना कमी लेखलं आहे असं आपल्याला वाटलं असल्यास आपला गैर समज आहे. भारतात फार वेगळी परिस्थिती नाही याची मला जाणिव आहे. भारत धर्मनिरपेक्ष आहे असं मी म्हटलेलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-------------------------------------------

अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भारतापेक्षा स्वतःला प्रगत म्हणवणार्‍या देशांतही अश्या खुळ्या धार्मिक समजूतींमुळे बळी जातात हे अगम्य आहे.

महिनाभरापूर्वीच बातम्यांत ओझरतं पाहिलं होतं, आता सर्व तपशील नीट आठवत नाहीत... युरोपातली एक संघटना गर्भपात नाकारणार्‍या कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहे. दर आठवड्याला किंवा तत्सम कालावधीत गर्भपात करवून हवा असणार्‍या गर्भवती स्त्रियांना उत्तर आफ्रिकेतल्या देशांत नेऊन तिथे त्यांचा कायदेशीर गर्भपात करवून घेत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

"भारतापेक्षा स्वतःला प्रगत म्हणवणार्‍या देशांतही अश्या खुळ्या धार्मिक समजूतींमुळे बळी जातात हे अगम्य आहे."
तथाकथित प्रगत देशां मधल्या काही गोष्टी बुचकळ्यात पाडतात. हल्लीच जर्मनीतली ही बातमी वाचनात आली: "Germany's Roman Catholics are to be denied the right to Holy Communion or religious burial if they stop paying a special church tax."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कायदा हा समाजातील चालीरितींवर आधारलेला असतो, असं कुठेतरी कधीतरी वाचल्यासारखं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याच विषयावरील इतरत्र झालेली ऊदबोधक चरचा

मराठे,

" 'तथाकथित' डॉक्टर काय. सगळे एकाच माळेचे मणी."

हे असले डायलॉग मारताना जरा इच्चार करत जावा. नेक्ष्ट टाईम आजारी पडले, तर असे इच्चार लपवून ठेवा. एखादा तुमच्यासारखाच माथेफिरू डाक्टर भेटला आन त्याला तुमचे असले इच्चार समजलेत, तर उग्गा १२ च्या भावात जाल Wink

सोताच्या पर्तिसादास श्रेणी देता येत नसल्याने (ही माझीच वरजिनल सूचना व्हती) या पर्तीसादास मीच भडकाऊ श्रेणी देत हाये हे हिते लिव्तो हाये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

१. मी डॉक्टरांना 'तथाकथीत' असं म्हटलं आहे कारण डॉक्टरांचं मूळ कर्तव्य रोग्याचं आयुष्य वाचवणं आहे. ह्या प्रकारामधे स्वतः कायद्याच्या भानगडीत अडकू नये म्हणून रोग्याचा बळी दिल्याचं स्पष्ट दिसत आहे.
२. जर त्या बाईच्या जागी त्यांची स्व्तःची मुलगी/बायको असती तर त्यांनी तेच केलं असतं का? तुम्ही स्वतः डॉ आहात. तुम्ही काय केलं असतं?
३. मी दिलेली लिंक तुम्ही बघितलीत का? त्यात लिहिल्याप्रमाणे डॉ. त्या बाईच्या नवर्‍याला सांगत होते की "मी आणि माझी टीम कॅथोलिक आहे त्यामुळे आम्ही हे करू शकत नाही. आणि हा कॅथोलिक देश आहे." इथे कायद्याचं बंधन दुय्यम आणी धर्माचं बंधन प्रथम असल्याचं दिसतं.
४. त्या डॉक्टरांना कोणी कायद्याच्या भानगडीत अडकवलंच तरी 'पेशंट कॅथोलिक नव्हती शिवाय आयरीशही नव्हती. आणि तीला वाचवण्याचा हाच एक मार्ग होता' असा युक्तीवाद करता आलाच असता. अर्थात त्या नंतरच्या 'जर्/तर' च्या गोष्टी झाल्या.
५. कायद्याचं पालन आणि रोग्याचं आयुष्य यामधे डॉक्टर म्हणून कोणती गोष्ट जास्त महत्वाची आहे?

राहता राहीला माझ्या माथेफिरूपणाचा प्रश्न, आता तुमच्या सारख्या डॉक्टरांनीच प्रमाण पत्र दिल्यामुळे मी खुलेआम माथेफिरूपणा करायला मोकळा झालो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-------------------------------------------