हायकू -

१.
उत्साही माळी
मोसम पावसाळी
रोपटी चूप ..

२.
झाडाचे पान
गळते अवसान
पाला पसार ..

३.
मेघ नभात
बरसात ढंगात
मोर रंगात ..

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हायकू आवडले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हायकू आवडले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हायकूचा पारंपारिक संकेत असा अाहे की त्यात तीन अोळी असतात, अाणि त्यांतल्या सिलॅबल्सची संख्या अनुक्रमे ५-७-५ अशी असते. (सिलॅबलला 'स्वनावयव' असा मराठी पर्याय अाहे. पण तो फारसा प्रचलित नाही अाणि मला अावडतही नाही, त्यामुळे इथे वापरलेला नाही.) 'सिलॅबल' च्या प्रचलित व्याख्येनुसार त्यामध्ये vowel nucleus (स्वरकेंद्र) असावं लागतं. त्याप्रमाणे हिशेब केला तर 'रोपटी चूप' मध्ये तीनच सिलॅबल्स अाहेत (रोप् + टी + चूप्), पाच नाहीत. त्याचप्रमाणे 'गळते अवसान' मध्ये सहा सिलॅबल्स अाहेत, सात नाहीत.

अर्थात संकेत जाणूनबुजून मोडायचा असेल तर गोष्ट वेगळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

त्याप्रमाणे हिशेब केला तर 'रोपटी चूप' मध्ये तीनच सिलॅबल्स अाहेत (रोप् + टी + चूप्), पाच नाहीत.

'रोपटी चूप' हे 'रोप् टी चूप्' असे न वाचता 'रो पऽ टी चू पऽ' (पक्षी: दोन्ही प अकारान्त) असे वाचून वेळ मारून नेता येणार नाही काय?

(नाहीतरी आपण कविता वाचताना ती गद्य उतारा वाचल्यासारखी 'श्रावण्मासी हर्ष मानसी हिर्वळ् दाटे चोहिकडे, क्षणात् येते सर्सर शिर्वे क्षणात् फिरुनी ऊन् पडे'* अशी वाचत नाहीच. 'हिर्वे हिर्वे गार् गालिचे हरित्तृणांच्या मख्मालींचे, त्या सुंदर् मख्मालीवर्ती फुल्राणी ही खेळत् होती'** हे आकाशवाणीवरच्या बातम्या म्हणून वाचायला ठीकच आहे. पण कविता म्हणूनही ते जर असेच वाचले, तर कवितेचा चुथडा होणार नाही काय?)

त्याचप्रमाणे 'गळते अवसान' मध्ये सहा सिलॅबल्स अाहेत, सात नाहीत.

'आजचे बाजारभाव' पद्धतीनेच*** हिशेब करायचा झाला, तर 'गळते अवसान'मध्ये बहुधा चार सिलॅबल्स असावीत, सहा नव्हेत. (गळ् ते अव् सान्. किंवा, शेवटच्या 'सान्'ची जरी फोड करायची म्हटली - कोणत्या नियमाने? - तरीही फार फार तर पाच.) पण कवितावाचनाकरिता (गऽ ळऽ ते अ वऽ सा नऽ अशी) सात सिलॅबले बहुधा जुळवता यावीत, असे वाटते.

======
*, ** बालकवींच्या उपरोल्लेखित रचनांची उदाहरणे कदाचित स्वयंस्पष्ट (मराठीतील 'इंट्यूटिव' अशा अर्थी) होणार नाहीत, याकरिता त्यांऐवजी 'आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो' ही पर्यायी रचना विचारात घेऊ. कवितावाचनात यातील 'पिकतो', 'गळतो', खेळतो' किंवा 'रस' यांचे उच्चार गद्यवाचनाप्रमाणे 'पिक्तो', 'गळ्तो', 'खेळ्तो' किंवा 'रस्' असे न होता, 'पिकऽतो', 'गळऽतो', 'खेळऽतो' किंवा 'रसऽ' असे होतात, हे सहज लक्षात यावे. ('राजा' मात्र 'कोकण्चा'च! पण ते एक असो.) (मराठीतून) हायकूवाचनाकरिता हेच तत्त्व अमलात आणायला काय हरकत आहे? नाही म्हणायला जपानी वाचल्याचा इफेक्ट येईल.

*** म्हणजे, आकाशवाणीवर (मुंबई 'ब'!) 'आजचे बाजारभाव' हे ज्या आघातानिशी वाचले जातात, त्या आघाताने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिली त्रिवेणी आवडली (वरचा जयदीप यांचा प्रतिसाद पटल्याने हायकू शब्द टाळला आहे)

@ जयदीपः मराठीत हायकू आणायचे प्रयोग झाले आहेत - मी ते वाचलेले नाहित. मात्र मराठीत हायकू येताना ५-७-५ सिलॅबलचे नियम कसे पाळावे?
मराठीत हायकू लिहायचे असेल तर काही वेगळे नियम आहेत काय? कोणी तसे बनवायचा प्रयत्न केला आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सिलॅबलचे नियम (पाळायचे असतील तर) पाळणं हे थोड्या सरावाने काही विशेष अवघड नाही. उदाहरणार्थ, 'विडंबन' या शब्दात तीन सिलॅबल्स अाहेत (वि+डं+बन्) हे कानाला कळतं, किंवा शंका वाटली तर फोड करून पाहता येतं. (पारंपारिक जपानी नियम 'अोन' च्या परिभाषेत अाहेत, अाणि 'अोन' अाणि सिलॅबल यात थोडा फरक अाहे. पण इथे त्या गुंत्यात शिरण्यात अर्थ नाही.)

त्यापलिकडे अाणखी काही पारंपारिक संकेत अाहेत; हायकूत एक ऋतुनिर्देशक शब्द असावा हा त्यातला एक. (कुठल्या शब्दामुळे कुठला ऋतू सूचित होतो याच्या पारंपारिक याद्यादेखील अाहेत, उदा. बेडूक -> वसंत). ह्यातलं किती पाळायचं अाणि किती नाही हे शेवटी हायकू रचणाऱ्यानं स्वत: ठरवायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

माझ्या डोक्यात
भरले कांदे-बटाटे
भजी तळूया?

======
पद्यवाचनाकरिता सूचि:

'माझ्या डोक्यातऽ
भर् ले कान् दे बऽ टा टे
भऽ जी तऽ ळू या?'

अशा रीतीने वाचल्यास ५-७-५ बरोबर जमतात.
=====
यात 'भजी' हा ऋतुनिर्देशक शब्दही आहे. ('भजी' -> 'पावसाळा', असा आमच्यात पारंपरिक संकेत आहे.)
=====
वाचकांस आमच्या या 'हायकू'सदृश जे-काही-असेल-त्यातून भले जो काही हवा तो अर्थबोध होवो - प्रत्येक वाचकास वेगळा होऊ शकतो, आणि तो कवीस अभिप्रेत असलेलाच असतो, असेही नाही, हीच तर हायकूची 'गंमत' असल्याबाबत ऐकलेले आहे - पण आमच्या लेखी या रचनेत एक गूढार्थ दडलेला आहे. म्हणजे असे पहा, 'आपल्या डोक्यात कांदे आणि बटाटे हे भजी तळण्यास केवळ उपयुक्तच नव्हेत, तर अत्यावश्यक घटक हे पोत्यावारी आहेत' (पहा: 'भरले कांदे-बटाटे'), हे कवी उघडउघड आणि अत्यंत प्रांजळपणे कबूल करतो. आणि त्याच्या भरवशावर श्रोत्यास भजी तळण्याकरिता आमंत्रणसुद्धा करतो. इथवर ठीकच.

आता यात गोची अशी आहे, की कांदे आणि बटाटे हे भजी तळण्याकरिता आवश्यक असे घटक असले, तरी पुरेसे खचितच नाहीत. भजी तळण्याकरिता पीठही लागते! ते तर आपल्याजवळ असण्याबद्दल कवी चकार शब्दही काढत नाही. मग हे पीठ मिळायचे कसे?

उत्तर स्वयंस्पष्ट आहे. पहा विचार करून.

असे पहा. कवीने आपल्या आमंत्रणात 'भजी तळूया?' असा प्रश्न केलेला आहे. 'भजी तळतो(, चल खायला येतोस/येतेस का?)' असे म्हटलेले नाही. म्हणजे, हे सहतळणाचे आमंत्रण आहे ('आपण भजी तळूया?'), यात पॉटलकतत्त्व अपेक्षित आहे. 'मी कांदे-बटाटे पुरवतो, तू पीठ आणशीलच' हे यात गृहीत आहे. आता आमंत्रिताकडचे हे पीठ येणार कोठून?

झाल्या अपमानास, 'माझ्या डोक्यात भले ही कांदे-बटाटे भरलेले असतील. पण त्या परिस्थितीत, तुझे डोके हे पिठाचे पोते आहे', असे प्रत्युत्तर कवीने किती शिताफीने आणि सटलतेने दिलेले आहे, हे लक्षात आले असेलच.
=====
हायकू हे क्षणचित्र असते, असेही काहीसे ऐकलेले आहे. दोघांमधील लाडिक भांडणाचे (हो, लाडिकच. येथे हाणामार्‍या चाललेल्या नाहीत, भांडणातसुद्धा प्रेमळ संवादच आहे, हे सहज लक्षात यावे.) हे क्षणचित्र किती सूचक आहे, नाही?
=====

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादासाठी धन्यवाद.
थोडीफार चर्चा झाली, ती वाचून बरे वाटले.
५+७+५ आणि यमक पाहून, मनात आलेले विचार हायकूत मांडले,
तिस-या ओळीत वेगळा विचाराचा किन्चित्सा धक्का मांडला.
ह्याव्यतिरिक्त अन्य बाबीन्चा मी तरी सखोल अभ्यास केलेला नाही.
आजवर ह्या साच्यातच मनात आलेले,सुचलेले,जाणवलेले विचार "हायकू"च्या मांडणीत लिहिलेले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहेत. व्याकरणात अडकले की गडबड होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0