लेखकहो सावधान

आज माझ्या एका ओळखीच्यांकडून मला लोकमत या वृत्तपत्रातील हा दुवा ईमेलने कळवण्यात आला:

http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNe...

ऐसीअक्षरेच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला माझा लेख मला कोणतीही पूर्वसूचना न देता लोकमत मधे प्रसिद्ध करण्यात आला आहे. तेव्हा ऐसीवर लेखन करणार्यांना मी सावध करू इच्छिते की त्यांचे लेखन इथून परस्पर दुसरीकडे प्रसिद्ध होऊ शकते.
मी व्यक्तिगत स्वरूपाचा संपर्क याबद्द्ल ऐसीअक्षरेशी केला असता कळवण्यात आले की लोकमतशी संबंधित व्यक्तीने या लेखाबद्द्ल त्यांना विचारले होते, व त्यांनी माझा ईमेल पत्ता पूर्वपरवानगीसाठी त्यांना दिला होता. माझ्याशी लोकमतच्या कोणीही कोणत्याही मार्गे संपर्क केला नाही आणि परस्पर हा लेख छापण्यात आला आहे. लेखात, मुख्य भाग तोच ठेवला असला तरीही बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत.
हे सर्व मला तरी अजिबात बरोबर वाटलेलं नाही.

मला कोणत्याच माध्यमातून लेखनाचा फारसा अनुभव नाही. इथल्या इतर लेखकांचे याबद्द्लचे मत जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.

ऐसीअक्षरेच्या संपादकांना विनंती आहे की अशी विचारणा झाल्यास त्यांनी लेखकाला पूर्वकल्पना द्यावी.

पुरवणी:
लोकमतच्या संबंधित संपादकांनी आक्षेपाची नोंद घेतली असून झाल्या प्रकाराबद्द्ल कारणे देऊन, दिलगीरी व्यक्त केली आहे. "लेखकांना गृहित धरलं जाऊ नये" हा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवणे आणि इथल्या सदस्यांना सतर्क करण्याचा हेतू या धाग्यामागे होता.
माझ्या भूमिकेला दुजोरा दिल्याबद्द्ल सर्वांचे आभार.

ऐसीने लेखन प्रकाशित करून ते अनेक वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्द्ल त्यांचे आभार. ऐसीवरून पुढे जाऊन लेखन जास्त लोकांपर्यंत पोहोचले याचा आनंद आहेच.
या घटनेतून घेतली तर, ऐसीवर लेखन प्रकाशित करण्यासाठी स्फूर्तीच घ्यावी.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

त्या छापलेल्या लेखाचं क्रेडीट तुम्हाला दिलंय हे जरी योग्य असलं तरी तुमच्या पूर्वपरवानगी शिवाय हा लेख वृत्तपत्रात छापणे चूकच!
हा लेखनचौर्याचाच प्रकार म्हणता यायला हवा.
तुम्ही लोकमतशी संपर्क केलाय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

परवानगी घ्यायला पाहिजे हे खरेच - पण संस्थळाचे नाव दिले आहे, शिवाय आपला नामोल्लेख आहेच. मला वाटतं आपलं चांगलं लेखन लोकांपर्यंत जात असेल तर इटस ओके :)..अर्थात हे माझं मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"लोकमत" तर्फे दिवाळी अंकातला ऋता यांचा प्रस्तुत लेख छापावा याबद्दल विचारणा करणारे पत्र तेथील संपादकांकडून आलेले होते. त्यावर, हा लेख छापण्याकरता "ऐसी अक्षरे"कडून कसलीही हरकत नसल्याचे त्यांना कळविण्यात आलेले होते. मात्र याचबरोबर, खालील तीन गोष्टी सांगण्यात आल्या :

- "ऐसी अक्षरे"चा संदर्भ "लोकमत" वर द्यावा अशी विनंती.
- मूळ लेखाच्या लेखिकेचा इमेल आयडी
- लेखिकेची परवानगी घ्यावी अशी सूचना.

झाल्या प्रकाराबद्दल "ऐसी अक्षरे" दिलगीर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ऐसी अक्षरे'चा संदर्भ 'लोकमत'ने दिला आहे. त्यावर 'ऐसी'चे समाधान झाले का? लेखकाची परवानगी घेण्याची सूचना 'ऐसी' व्यवस्थापनाने 'लोकमत'ला केली होती. ती पाळली गेली नाही. हा अगदी गुन्हा नसला तरी चूक आहे. ती त्यांच्या पदरात टाकली पाहिजे. येथे कोणताही दबाव मानता कामा नये. कारण यात अनीष्टता दडलेली आहे. लेखकाऐवजी प्रकाशकाला विचारायचं आणि प्रसिद्ध करून मोकळं व्हायचं. अशी गोष्ट मुख्य प्रवाहातील माध्यमांनी करता कामा नयेत, ही जाणीव त्यांना करून दिली पाहिजे. दिलगिरी व्यक्त केल्याने विषय संपला असे मानता कामा नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखिकेने लिहिलेली उपरोक्त पुरवणी वाचली. याहून अधिक कुणी काही करणे इथे अभिप्रेत आहे त्याबद्दल कल्पना नाही. विषय अजूनही संपवायचा नसल्यास पुढे काय काय करता येईल याबद्दलच्या पुढील सूचनांच्या प्रतीक्षेत आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

पुरवणी अपेक्षीत होती. "'लोकमत'च्या संबंधित संपादकांनी" दिलगिरी व्यक्त केली आहे, असे त्यातून दिसते. तेव्हा, धागा काढून टाकला तरी चालेल. 'झाकली मूठ राहणे...' उत्तम. इथे विषय संपवतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ऐसी' संस्थापनाच्या हेतूंविषयी अजिबात शंका नाही. पण कुठल्याही सभासदाचा ईमेल पत्ता, सदर सभासदाच्या परवानगीविषयी इतरांना देऊ नये असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण मग संबंधित लेखकाची परवानगी घेण्यासाठी काहीतरी संपर्क तर पाहिजे. दुरुपयोग होईल या भयगंडाने ग्रासले तर संवाद होणे कठीण होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कुठल्याही सभासदाचा ईमेल पत्ता, सदर सभासदाच्या परवानगीविषयी इतरांना देऊ नये असे वाटते.

वैयक्तिक ओळखीच्यांशी किंवा मित्रमंडळींशी ज्या पद्धतीने वागतो त्या पद्धतीने न वागता, ऐसीचे सदस्य म्हणून एका विशिष्ट फॉर्मॅलिटीने वागलं पाहिजे हे आमच्या लक्षात आलेलं आहे. व्यवस्थापनाकडे जेव्हा अशी परवानगीची मागणी होते तेव्हा 'हा लेखिकेचा इमेल पत्ता, तिच्याशी संपर्क करून परवानगी मिळवा' असं सांगणं योग्य नाही हे पटलं. त्याऐवजी लेखकाला/लेखिकेला ऐसीच्या व्यवस्थापनाने त्या विशिष्ट व्यक्तीशी संपर्क साधायला सांगणे अगर इमेल पत्ता द्यायला परवानगी मागणे हे करणं सर्वात उत्तम. यापुढे आम्ही ही पद्धत वापरायचं ठरवलेलं आहे.

अर्थात ज्यांना असा लेख हवा आहे, त्यांनी जर ऐसीवर खातं उघडलं तर इमेल पत्ता माहीत नसताना संपर्क साधण्याची सोय आहे. (त्यासाठी अर्थात असा संपर्क साधू देण्याची परवानगी मुळात त्या सदस्याने दिलेली असायला हवी हे आहेच) सदस्यत्व असेल तर व्यनिही करता येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्यक्ष लेखिकेपर्यंत लोकमतवाल्यांनी संपर्क साधला पाहिजे होता याबद्दल दुमत नसावे. पण त्यांनी संस्थळाची लिंक अन मूळ लेखिकेचे नाव दिलेले असल्याने निषेधाची धार बोथट झाल्यागत वाटतेय. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'लोकमत'ने ऋता यांचा लेख त्यांच्या संमतीविना छापला, शिवाय लेख छापला आहे हे कळवलेही नाही हे अयोग्यच आहे. तसा प्रतिसाद 'लोकमत'वर नोंदवला आहे - तो प्रकाशित होईल की नाही हे माहिती नाही.

संकेतस्थळावरील एखाद्या लेखाचा दुवा पूर्वपरवानगीविना देणे आणि पूर्ण लेख पूर्वपरवानगीविना देणे - यात नेमका काय फरक असतो - असा एक प्रश्न मनात आला. कारण इतर संस्थळावरच्या लेखांचे, प्रतिसादांचे दुवे इथं बरीच मंडळी देत असतात. त्यावर कुणी कधी आक्षेप घेतला असेल तर मला माहिती नाही. त्यासंबंधी इतरांची काय भूमिका आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

आणखी एक जाणवलं (पुन्हा एकदा!!) ते असं की - आपल्या आणि इतरांच्या हक्कांबाबत आपण कितीही संवेदनशील असलो (इथं 'ऐसी अक्षरे' लेखकांच्या आणि सभासदांच्या हक्कांबाबत संवेदनशील आहे हे गृहित आहे) तरी जेव्हा आपण एका प्रक्रियेत सामील होउन इतर कुणाबरोबर भागीदारी करत असतो तेव्हा अनवधानाने का होईना या हक्कांवर (ज्यांना आपण मूल्य मानतो त्या हक्कांवर) गदा येण्याच्या, त्यांची पायमल्ली होण्याच्या प्रक्रियेत आपण सहभागी होण्याची शक्यता असते. असे काही होईल याची आपण कल्पनाही केलेली नसते. तेव्हा भागीदारीत सामील होताना अधिक जागरुक राहण्याची गरज असते. शिवाय हक्कांची पुनर्प्रस्थापना करण्याची कृतीही हाती घ्यावी लागते अशा वेळी.

सातत्याने, जाणीवपूर्वक केल्या जाणा-या अशा गोष्टी (हक्कांची पायमल्ली) आणि नकळत घडून गेलेल्या अशा गोष्टी - हे चित्र समाजातही वेळोवेळी दिसत असणार (दिसतेच!). त्यावेळी आपण किती समंजस भूमिका घेतो आणि किती टोकाची भूमिका घेतो हेही पाहणे रोचक ठरावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'लोकमत'ने ऋता यांचा लेख त्यांच्या संमतीविना छापला, शिवाय लेख छापला आहे हे कळवलेही नाही हे अयोग्यच आहे

+१ असेच म्हणतो.

संकेतस्थळावरील एखाद्या लेखाचा दुवा पूर्वपरवानगीविना देणे आणि पूर्ण लेख पूर्वपरवानगीविना देणे - यात नेमका काय फरक असतो - असा एक प्रश्न मनात आला

माझ्या मते एखादे पुस्तक लेखकाची परवानगी न घेता पुन्हा छापणे आणि मुळ प्रकाशकाने प्रकाशित केलेले पुस्तक कुठे वाचता येईल त्या ठिकाणचा पत्ता देण्यात जो फरक आहे तोच या दोन गोष्टीत आहे. अर्थात दुवा देण्यात गैर वाटत नाही, किंबहुना अनेकदा संदर्भ देण्यासाठी ते आवश्यक वाटते.

=====

बाकी, लोकमत सारख्या अधिक व्यापक माध्यमात लेख आल्याबद्द्ल ऋता यांचे अभिनंदन! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

संकेतस्थळावरील एखाद्या लेखाचा दुवा पूर्वपरवानगीविना देणे आणि पूर्ण लेख पूर्वपरवानगीविना देणे - यात नेमका काय फरक असतो - असा एक प्रश्न मनात आला.

अत्यंत महत्त्वाचा फरक म्हणजे पैसे कोणाला मिळतात हा असतो. मूळ स्रोताकडे जाण्याऐवजी वाचकांना क्ष साइटच्या पानावर तो लेख दिसला तर त्याभोवती जाहिराती दिसतात. त्या जाहिरातींचा पैसा क्षच्या मालकांना मिळतो. तसंच 'क्ष साइटवर चांगलं लेखन येतं' असा वाचकांचा ग्रह झाला की ते त्या साइटवर अधिक गर्दी करतात. म्हणजे फ्यूचर रेव्हेन्यूही वाढतो. थोडक्यात, दुवा देणं हे रेस्टॉरंटचा पत्ता सांगून तिथली अमुक डिश खाऊन बघा अशी रेकमेंडेशन असते. तर तो पूर्ण लेख उद्धृत करणं म्हणजे ती डिश तिथून (कदाचित फुकटात) आणून आपल्या रेस्टॉरंटमध्ये सर्व्ह करणं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपले लेखन जर जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, त्यांनी ते वाचावे असे वाटत असेल तर झाला प्रकार हा इष्टापत्तीच म्हटले पाहिजे. अर्थात प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

धाग्यात संपादन करून लावलेल्या पुरवणीत बहुतेकांना अपेक्षित प्रतिसाद मिळावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जास्त वाचकांपर्यंत हा लेख पोहोचला हे महत्वाचे आहे तरी:

ऐसी अक्षरे ची ध्येय धोरणे फ़ायनली कुठे ठेवली आहेत? मला दिसत नाहीत. त्यामधे कॉपीराईट, परवानगीबद्दल त्यांनी काही लिहिले आहे काय?

आपल्याला इथे चांगला वाचक/ चांगले लेखन मिळते. इंटरनेटवर प्रसिध्द झालेल्या बाबींकडे सिरिअसली न पाहण्याची वृत्ती या प्रकारातुन दिसते. असे आहे काय?

जाता जाता, लोकमत सारख्या वृत्तपत्रातुन प्रकाशित होणारे साहित्य इत्यादी इंटरनेटवरल्या माध्यमांवर सर्रास ठेवले जाते. अशावेळी, ते ठेवणारे वा ते संस्थळ परवानगीचा विचार करतात काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरे ची ध्येय धोरणे फ़ायनली कुठे ठेवली आहेत? मला दिसत नाहीत. त्यामधे कॉपीराईट, परवानगीबद्दल त्यांनी काही लिहिले आहे काय?

'संस्थळाची माहिती' असा टॅब वर दिसेल. त्यावर टिचकी मारलीत तर 'संस्थळविषयक' म्हणून पान उघडेल. त्यावर 'संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे' असा धागा दिसेल. ह्या धाग्याचा दुवा प्रत्येक पानावर अगदी खालीसुध्दा दिसेल.

कॉपीराईट, परवानगी वगैरेबद्दल माहिती - हीसुध्दा पानावर अगदी खाली 'Terms of use and privacy policy' म्हणून दुवा दिसेल त्यावर दिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल या लेखातील लोकमतच्या त्या लिंकवर जाऊन माझ्या आडकित्ता व रजिस्टर्ड ईमेल आयडिने चोरी केल्याबद्दलचा निषेध नोंदवला.
माझी प्रतिक्रिया 'संपादनासाठी' राखून ठेवली आहे असा मेसेज आला.
आजही माझी प्रतिक्रिया तिथे प्रकाशित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-