मुलाखत

मार खाण्याचे बहुत प्रसंग आयुष्यात आले. आणि बिनबोभाट यशस्वीपणे मार देऊन गेले. काही काळापर्यँत मी ज्याला शेवटचा अगदी शेवटचाच समजायचो तो मार टी. वाय. बी. ए. ला असताना खाल्लेला आठवतो . वस्तीतल्या लहान मुलांचं जी के वाढवायच्या आणि व्यक्तिमत्त्व घडवायच्या इराद्याने मी त्यांना काही शारिरिक हावभावांसमवेतच गोड दिसणारे प्रभावी संवाद कौशल्य शिकवीत असताना , ते त्यांच्या आयांना अजिबातच
पसंत न पडल्याने , त्यांनी आमच्या घरातील बाप नामक प्रमुख डाँन कडे तीव्र नापसंती दर्शवित, माझ्या व्यक्तिमत्त्व विकास पुरक सामान्यज्ञान वितरण साधनेला, तात्काळ प्रतिबंध करण्याची जबरी गळ घालत मोठाच दंगा केला. व त्या दिवशी एकूणच डाँन महोदयांनी माझ्या कान नाक, डोके, कपाळ, आकाळ या ठिकाणी उष्ण रक्त नांदत असल्याचा गहिरा जोमदार अनुभव आणून दिला. तेव्हा पासून मी ठरवले आपले ख्वाब आपण सर्व कायदेशीर प्रणाल्या पार पाडून एक दिवस पुरे करुच करु.
हा जबरदस्त रट्टे खाल्लेला प्रसंग शेवटचा ठरो अशा दृढ प्रार्थनेत काळ उलटला. उलटता काळ मेहेरबानासारखा मारापासून दुर ठेवीत गेला. पण काही दिवसांपूर्वी काळ नकारात्मक दिशेने जबरी उलटला. जुलै २०११ ची सकाळ. प्राध्यापक भरतीच्या फतव्याने सिध्द झालेल्या बातमीस भुलून मुंबईनगरीत अस्थिर असलेला महाविद्यालय कालीन यार , मुलाखत नामक प्रक्रियेस सामोरा जाण्याकरीता सिध्द होऊन माझ्याकडे पुणे मुक्कामी एक दिवस आधीच आला. मुलाखतीचा सदर विधी नगर जिल्ह्यातील एका तालुक्याच्या गावी पार पडणार होता. सदर महाविद्यालय कोर्ट कचेर्या आणि विद्यापीठ पातळीवर बदफैली वर्तनाबाबत जबर गाजलेलं. महाराष्ट्रातील बहुत नामचीन समाजसुधारक जे बहुतवेळा आपल्या सर्वाँच्या मनोरंजनार्थ विविध च्यँनेलवर आजच्या कालच्या सवालजवाबात ग्रेट भेटी सदृश प्रोग्रामात सामाजिक विषयांवर नरड्याच्या नसा यथोचित फुगण्याची काळजी घेत, समस्तास तिडिक येईपर्यँत पोटतिडकीने बोलताना बहुतबार आढळतात. ते महनिय व्यक्तिमत्त्व सदर महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीवर ' व्यवस्थित ' विराजमान आहे. प्राध्यापक होण्याच्या दांडग्या उत्साहात आलेला यार स्वतःच मोराल वाढविण्याच्या निर्विष मिषाने मला स्वतःसोबत जवळ जवळ खेचूनच घेऊन गेला. आम्ही पाचसात वर्षापासून नावामागे प्रा. लावत आहोत. पण या बिरुदासंगे येत असलेली सी.एच.बी.किँवा पार्टटाईम ही उपबिरुदे जबरी टोचत असत . या टोचर्या जाचातून माझी मुक्तता २००९ मधे झाली. हा अद्याप रखडलेला. आणि म्हणुन त्याच्या नजरेत मी नेणत्याचा जाणता झालेलो. जुलै च्या सुरम्य सकाळी चिखलचेँवदान तुडवीत एस टी थांब्याजवळ थांबून, आलेल्या व आम्हाला ईच्छित ठिकाणी घेऊन जाणार्या लालडब्यात आम्ही स्वतःस लोटून दिले. आणि भुरभूर पाऊस, कोवळं उन, ढगाळ वातावरण, पळती झाडे इ. विहंगम दृश्य पाहत लालडब्याची हाडांची माँलीश सेवा मनोभावे स्वीकारत महाविद्यालय काही मैलांवर राखुन आम्ही ईच्छित स्थळी पोहचलो.स्टँण्डवर आमच्या सोबत प्राध्यापक होण्याची जबराट इच्छा अंगी बाणवलेल्या स्पर्धक बंधु भगिनी देखील महाविद्यालयाकडे घेऊन जाणार्या गाड्यांची वाट पाहत उभे होते. सेटनेट च्या रेशोवर बोलत , कधी खरं, कधी खोटं हसत, एकमेकांना जोखत समविषय वाल्यास खोट्या व विषमविषय वाल्यास खर्या शुभेच्छा देऊन, आम्ही उत्साहवर्धक चहा व तंबाखूनामक चुर्णास दाढेखाली धरण्याच्या अतिव उबळीने हाटेलीच्या दिशेने जाण्याच्या विचारात असतानाच तांबूस गौर वर्णाचे काळाढुस्स सदृश वर्णाचे दणकट हाडापेराचे, आवाजाने दांडगे असलेले चार पाच तरुण पोटभर हसत आमच्याकडे आले. क्वालीजला चालले का ? कुटला विषय असं अतिव पाहुणचाराने विचारु लागले. आम्ही भारावून गेलो. आम्हाला अधिक भारावण्यास अधिक वेळ न देता, क्वालीजने न्ह्या आणाची सोय केलीय. गाडी हाये. म्हणुन पांढर्या ओम्नीत बसायचा आग्रह करु लागले. एक प्राध्यापक भगिनी आमच्याच सोबत यायची तीव्र ईच्छा दर्शवित असल्यामुळे मुंबईचा यार जबर उत्साही होत तरुण टोळीबरोबर सर्वांच्या वतीने संवाद नेतृत्व करु लागला. विषयाची विचारणा या प्रश्नाला अर्थशास्त्र हे उत्तर मिळाल्याने मदतोत्सूक टोळी हरकली. मी केवळ मोराल वाढविण्यासाठी गेलो असल्याने खरा विषय सांगण्याची सक्ती वा लपविण्याची युक्ती करण्याचे कोणतेही प्रबळ कारण नसल्याने , मित्राचा विषय तोच आपला अशा अर्थाने केवळ मान डोलवा डोलवी केली आणि गाडीत बसलो. भन्नाट वेगात गाडी पळू लागली. आणि मित्र गावची लोकसंख्या, शाळा, काँलेजं किती ई प्राध्यापकिय व्यवसायास साजेशी माहिती ड्रायव्हर कम टोळी प्रमुखास विचारु लागला. २० मिनिटात आजूबाजूला जवळ , जास्त घरे नसलेल्या मोठ्या घराजवळ गाडी थांबली इथे चहा नाश्ट्याची सोय केलीय म्हणुन आम्हाला उतरुन टोळीप्रमुख घरात घेऊन गेला. तिथे चार बंधु आधीच चहापान करुन बसले होते. कधी आलात तर पहाटेच असं त्यांनी सांगितलं. मुलाखती दोन वाजता आहेत निवांत वेळ आहे. खा प्या विश्रांती घ्या हा प्रेमळ आग्रह करीत तो निघून जाऊ लागला. मी त्यास धन्यवाद देत आम्ही आधी काँलेजवर जातो मग ईकडे येऊन विश्रांती घेतो असं म्हणून आम्हास गाडीने तिकडे सोडावे असा हट्ट धरला. क्षणार्धात मजबुत केसाळ हाताची दांडगी थप्पड गालावर आदळली. भरकन ओठं सुजला. मित्राने त्याच्या आईचा अतिशय प्रेमळ शब्दात उल्लेख केल्यामुळे बाक् बाक् दोन बुक्क्या त्याच्या पोटात बसल्या. त्याला वाचविण्या करीता मी मधे पडायच्या असफल प्रयत्नात असताना घप्पकन एक बुक्की पोटात बसली. एव्हाना टोळीप्रमुखास पडणारे मारधाडीचे कष्ट कमी करण्याच्या उदात्त हेतूने दुसरा सहकारी येऊन त्यास बाजूला करुन आमच्या चेहर्यावर जबराट हात चालवू लागला. केवळ पाच मिनिटात सर्व आटोपून. दोन गार्ड बसवून पलटलेला काळ निघून गेला. प्राध्यापक भगिनी थिजल्या. थाड थाड उडू लागल्या. बोलताच येईना त्यांना. तासाभराने वयस्कर बाबा आले. बिर्यानी विचारुन गेले. यार भलताच मवाळ झाला. बियरची मागणी केली. दांडगेश्वर प्रमुख परत आला. बियर घेऊनच ! तुमी भलतीच नाटकं करायले म्हणुन हितक्यावं यावं लागलं भौ .आमचा भाव ह्या वर्षात सेट नेट व्हनारच है. पाच लाख रोख दिल्यात क्वालीजला. आन् ते पुण्याचे लोक सेटनेट नसल तं घेणार न्हाईत मंग कशाला इंटरवीच हुवू द्यायची ? तुम्चा आम्चा काय वाद है का ? आजुनबी तुम्ची सम्दी सोय करतो इंटरवी सोडून. नाराज व्हवू नका पोलीसाची काळजी न्हाय. हितं आमचं लै चालतं. चुलता सभापती है लगी लगी म्यानेज करतो कायबी झालं तरी. तवा ईच्यार करा.
पाचशेच्या दोन दोन नोटा प्रत्येकाच्या हातात कोँबून तो बाहेरच्या सहकार्यांना कायबाय सुचना देऊन निघून गेला. सुजलेल्या ओठांनी थंड बियरचे घोट घेत आम्ही बसून राहिलो. दुखणारी दाढ जबरदस्त ठणकत होती. वेदना अनेक होत्या. आणि मित्र म्हणत होता , सत्या सहाव्या वेतन आयोगानं आय झौली !

field_vote: 
3.4
Your rating: None Average: 3.4 (5 votes)

प्रतिक्रिया

काय देशाची परिस्थिती झाली आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारीच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारीय.

जुन्या काळातल्या लिखाणात गावाकडचे लोकं सरसकट गरीब वगैरे दिसायचे, एखादा क्वचित कोणीतरी असेल तर तोच दांडगाई करायचा. इथे मात्र शहराकडून आलेल्यांना पार मामा दाखवलेलं. एकंदरच आवडली ही गोष्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काल्पनिक असेल तर....
कथनशैली, धाटणी रंजक वाटली; आवडली. मार्मिक भाष्य.
जर खरे असेल (जे असण्याचीच अधिक शक्यता वाटते) तर...
अवघड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खरंच अवघड आहे.

यावेळी लेख जरा शब्दबंबाळ वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

हा हा.. अश्या वेळी डार्विन आणि त्यापेक्षा त्याच्या थियरीचे हर्बर्ट स्पेन्सरने केलेले 'सर्वायव्हल ऑफ फिटेस्ट' हे वर्णन आठवल्याशिवाय रहात नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!