गांधीहत्या - सावरकर दोषी?

गांधीजींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज 'हिंदू'मध्ये 'How Savarkar escaped the gallows' हा लेख आला आहे. गांधीहत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपातून सावरकर निर्दोष सुटले; तरीही सावरकरांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंगरक्षक आपटे आणि त्यांचे सचिव दामले यांनी कपूर समितीसमोर दिलेल्या साक्षींनुसार सावरकरांचा गांधीहत्येतला सहभाग सिद्ध झाला होता असं ह्या लेखात म्हटलं आहे. वल्लभभाई पटेल यांना आधीपासून सावरकरांच्या सहभागाविषयी खात्री होती असंही लेखात म्हटलं आहे, आणि भाजप सरकारनं संसदेत सावरकरांचं छायाचित्र लावलं असाही लेखात उल्लेख आहे.

field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (2 votes)

प्रतिक्रिया

अत्यंत नाजूक विषय!

वल्लभभाई पटेल यांना आधीपासून सावरकरांच्या सहभागाविषयी खात्री होती असंही लेखात म्हटलं आहे

Smile नुकतेच शिवरात्र वाचले आहे त्यातील गोपाळ गोडसेंच्या पुस्तकाचे कुरूंदकरांनी केलेले समिक्षण आठवून गेले. गोडसे आणि प्रस्तूत लेखकाच्या मतांत काय विलक्षण साम्य आहे Wink

असो मुळ विषयावर: भारतीय न्यायसंस्थेने दिलेला निकाल समोर, असलेले पुरावे, तर्क आणि साक्षी यांच्यावर आधारीत असल्याने त्याच्या सत्यतेविषयी शंका वाटत नाही. सरकारला शंका (किंवा लेखात म्हटलंय तसं खात्री) असती तर त्यांनी तेव्हाच रिव्ह्यू पिटिशन दाखल केले असते.

समांतर: आज गांधीजींच्या हत्येला ६५ वर्षे झाली. त्या महात्त्म्याला मनःपूर्वक वंदन करतो आणि आदरांजली वाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ह्या संदर्भात वाचण्यासाठी दोन गोष्टी सुचवू इच्छितो.
मधुकर तोरडमल ह्यांनी जेलमधून जन्मठेप भोगून परतलेल्या सहाअरोपी व माफीचे साक्षीदार नारायण आपटॅ ह्यांची घेतलेली मुलाखत एका दिवाळी अंकात छापून आली होती. ती अवश्य वाचावी.
दुसरे म्हणजे माफीच्या साक्षीदाराचे खटल्यातील एकूण statement.
तिसरे म्हणजे नेटावर सहजी उतरवून घेता येइल असे "समग्र सावरकर" कुठेतरी आहे. त्यात सवरकरांचे ह्या खटल्यातील बचावाचे भाषणही उपलब्ध आहे. तो वकिली बचावाचा उत्कृष्ट नमुना आहे.
.
ह्या शिवाय सावरकरांचे इतरही भडक/प्रखर्/आक्रमक निबंध नि इतर लेखन वाचले की खरोखर तेच मास्टरमाइंड आहेत की काय असे वाटत राहते(मला तरी). अर्थात कोर्ट कुणाला "वाटण्या"वर नाही तर (उपलब्ध्/शिल्लक)"पुराव्यां"वर निर्णय देते.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मधुकर तोरडमल ह्यांनी जेलमधून जन्मठेप भोगून परतलेल्या सहाअरोपी व माफीचे साक्षीदार नारायण आपटॅ ह्यांची घेतलेली मुलाखत एका दिवाळी अंकात छापून आली होती. ती अवश्य वाचावी.

कुठे वाचायला मिळेल? जालावर उपलब्ध आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दुर्दैवाने जालावर उपलब्ध नाही.
पण सावरकरांनी केलेल्या बचावात त्यांनी त्याचे कित्येक मुद्दे quote करुन चिरफाड करुन ठेवलेली आहे.
त्यावरून त्याच्या मुद्द्यांचा तरी अंदाज येउ शकतो.
शिवाय सरकारी कामकाजातील कागदात जे काही आहे, त्यातीलच बहुतांश भाग त्याने पुन्हा त्या मुलाखतीत पुनर्कथन केलेला दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

गांधीहत्येचा विचार कसा निर्माण झाला, त्यात कोणकोण किती प्रमाणात गुंतलेले होते, पोलिस आणि शासनातील अन्य जबाबदार व्यक्ति ह्यांना काय माहीत होते आणि त्या माहितीचा त्यांनी कसा उपयोग केला अथवा केला नाही, घटनेनंतर तपास कसा झाला इत्यादि सर्व गोष्टींचे अतिशय ओघवते वर्णन माळगावकरांच्या "The Men Who Killed Gandhi" नावाच्या पुस्तकात उपलब्ध आहे.

हे पुस्तक मी ग्रंथालयातून आणून वाचलेले आहे. सावरकारांबाबतचे माझे त्यातील स्मरण असे आहे की सावरकरांवरचा आरोप हा ओढून-ताणून आणलेल्या circumstantial पुराव्यावर आधारलेला होता. उदा. त्या दिवसातील बिंबा नावाची एक मराठी नटी आरोपींपैकी कोणासतरी (नाव आता आठवत नाही) पुणे-मुंबई प्रवासात आगगाडीत भेटली. ती शिवाजी पार्क भागात राहात होती. आरोपींनी तिला टॅक्सीमध्ये त्या भागापर्यंत लिफ्ट दिली. ह्यावरून तर्क - आरोपी तिला सोडून सावरकरांकडे गेले.

सर्वसामान्य वाचकास माहीत नसलेल्या अन्य अनेक व्यक्ति, ज्यांचा ह्या घटनेशी दूरान्वयाने काही संबंध होता, त्यांचीहि नावे आणि पार्श्वभूमि पुस्तकातून कळते.

विशेष म्हणजे गांधींच्या जिवास धोका आहे असा स्पष्ट संकेत पोलिसांना मिळाला होता पण सध्यासारखा लगेच संपर्क साधण्याच्या यंत्रणेचा अभाव, दिल्ली आणि मुंबई पोलिसांमधील सहकार्याचा अभाव, मोरारजींना एका व्यक्तीने (नाव आठवत नाही) प्रत्यक्ष भेटून दिलेल्या माहितीचा पुरेसा उपयोग केला गेला नाही अशा अनेक कारणांमुळे योग्य वेळी योग्य पावले उचलली गेली नाहीत असा निष्कर्ष पुस्तक वाचून काढता येतो. गोडसे-आपटे लोकांचीहि संघटना अशी काही नव्हतीच आणि प्रत्यक्ष घटनेपूर्वी त्यांच्याकडूनहि अनेक गोंधळ झाले होते आणि हत्या होण्यापूर्वीच कट फसण्याच्या अनेक संधि येऊन गेल्या होत्या असे दिसते. थोडक्यात म्हणजे ही घटना इतकी शोकपर्यवसानी नसती तर Clueless Police and bumbling criminals धर्तीचा Pink Panther सारखा सिनेमा तिच्यावर निघू शकला असता असे वाटते.

योगायोगाने माळगावकर १९४८ मध्ये दिल्लीतच बिर्ला हाउस पासून काही घरे पलीकडे राहात होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडीशी असहमती...
सावरकरांकडे अंगुलीनिर्देश करणार्‍या दोन्-तीन घटना म्हणजे:-
१. माफीच्या साक्षीदाराने ह्या धर्तीवरचे सांगणे "गांधीवर हल्ल करण्यापूर्वी आअम्ही सावरकरांस भेटावयांस गेलो. तिथे मी खालीच थांबलो. नथुराम व गोपाळ वर गेले. थोड्यावेळाने ते खाली आले तेव्हा निरोप देताना सावरकर त्यांना दुरूनच हात हलवत विजयी भव असे बोलते झाले." ह्यानंतर काही दिवसातच (की काही तासातच) गांधीहत्या घडली.
.
२.खटल्याच्या वेळी नथुरामने आपले म्हणणे मांडले. त्यानंतर " स्वतःची बाजू मांडताना तर साक्षात तुझ्या जिभेवर सरस्वती विराजमान होती" असे सावरकरांनी नथुरामला नंतर (बहुतेक जेलमध्ये असताना) म्हणणे.
.
अजून दोन-चार पॉइंटर्स आहेत. पण तेही धड आठवत नाहित.
तो माफीच साक्षीदार होता ना, तो जेलमधून सुटल्यावरही "विजयी भव" वाल्या ष्टोरीबद्दल ठाम होता.
कोर्टाला ह्या भेटीचा पुरावा मिळाला नाही. अणि ह्या गृहस्थाची साक्ष कोर्टास पुरेशी वाटली नाही असा काहीतरी तांत्रिक झगडा होता. सारेच काही दशकभरापूर्वी वाचलेले असल्याने आठवत नाहिये नीटसे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अरविंद कोल्हटकर यानी "मोरारजींना एका व्यक्तीने (नाव आठवत नाही) प्रत्यक्ष भेटून दिलेल्या माहितीचा पुरेसा उपयोग केला गेला नाही" असे लिहले आहे ती व्यक्ती म्हणजे जगदीश चंद्र जैन, व पुस्तकाचे नांव I could not save Bapu.

पुस्तक आंतरजालावर उपलब्ध आहे http://dli.ernet.in/handle/2015/499860

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधारणपणे किती दिवसांपूर्वीची घटना आहे ही....?..? (बातमी नव्हे, मूळ घटना) .. त्यापैकी किती जण आज पोलीस कोठडीत आहेत? किती हयात आहेत?

माझ्या माहितीप्रमाणे क्रिमिनल केसेसमधे सर्व पार्टींच्या मृत्यूंनंतर केस पूर्ण बंद होते. त्यानंतर काहीही सिद्ध झालं तरी ते सर्व "नॉन अ‍ॅप्लिकेबल" ठरतं.

फक्त सिव्हिल केसेस वारसांतर्फे चालू राहतात. तेव्हा समजा सावरकर किंवा आणखी कोणी दोषी असले, आणि आता नि:संशय सिद्ध झाले आणि त्यामुळे कितीही भावनिक फरक पडत असला तरी कोणताही प्रत्यक्ष फरक आता पडणे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यावहारिक पातळीवर थेट तुम्हाला आम्हाला कशाचा कधीच फरक पडत नाही.
पण सदर केस ही "आयकॉनिक केस" आहे.
.
सध्या भारताच्या राष्ट्रिय राजकारणातील मुख्य दोन प्रवाह ह्या केसच्या दोन बाजूने फिरताहेत. त्यापैकी एक जण उघड खून झाला ते अत्यंत वाईट, गलिच्छ असं स्पष्ट म्हणतो. दुसरा वरवर तसं म्हटला तरी वातवरण अप्रत्यक्षपणे असे तापवाय्चा यत्न करतो की जेणेकरुन हत्या करणारा श्रेष्ठ तरी ठरावा, किंवा हत्या करणार्‍आची मानसिकता अगतिकता मानली जावी(छुपे समर्थन). पुन्हा वर "आमचे समर्थन नाहिच " असे तेच उच्चारवाने सांगणार.
.
ह्याहून महत्वाचं म्हणजे ह्या सवंग , थिल्लर्,प्रचारकी,भडक्क बनायला फुल्ल स्कोप आहे. म्हणून मी त्यातल्या त्यात अधिकृत माहितीच्या उपलब्धतेकडे इशारा करण्याचा प्रयत्न केला.
.
दुसरे महायुध्ह होउनही तित्कीच तपे लोटली. त्यातल्या छोटातल्या छोट्या घटनेवर आजही अभ्यास होतो. फ्रान्समध्ये नेपोलियनला गचकून दोन शतके उलटाहेत; पण आजही फ्रान्समध्ये त्याचयावर कोठडित देहांत विषप्रयोग झाला किंवा कसे ह्यास बरेच महत्व आहे. काही घटना आयकॉनिक नि घडून गेल्यानंतर दूरगामी परिणाम करणार्‍या ठरतात. राहवले नाही; प्रतिसाद दिला.(एरव्ही वाद घालायचाही कंटाला येतो. म्हणून मी चर्चाच टाळ्तो.).
.
थोडक्यात इतकेच की मलाही जालीय चर्चांचा स्पेशली अशा एव्हरग्रीन विषयांचा अतिथकवा आता येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

थोडक्यात इतकेच की मलाही जालीय चर्चांचा स्पेशली अशा एव्हरग्रीन विषयांचा अतिथकवा आता येतो.

अगदी अगदी. आंजावरील वय वाढल्याची निशाणी, दुसरे काय Wink

"कृतांतकटकामलध्वजजरा दिसो लागली" Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

@ मन..

एकदम मान्य.. मार्मिक श्रेणी दिली आहे... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडक्यात इतकेच की मलाही जालीय चर्चांचा स्पेशली अशा एव्हरग्रीन विषयांचा अतिथकवा आता येतो.

खरंय असा कंटाळा बहुदा सगळ्यांनाच येऊ लागला आहे त्यातूनच गविंनी वरील प्रतिक्रिया दिली असावी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ठीक आहे, समजा तुम्ही ती हिंदु मधली बातमी खरी आहे. बर मग??? काय म्हणायचे आहे तुम्हाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(मी सावरकर विचाराचा पाठिराखा नाही तरीहि मन ह्यांच्याप्रमाणेच गांधीहत्येची केस iconic आहे असे मलाहि वाटते. आपणांस पटो वा न पटो, सावरकर विचार आजहि भारतीय राजकारणातील महत्त्वाची धारा आहे आणि सावरकर गांधीहत्येच्या कटात सहभागी होते किंवा नाही हा अवश्य चर्चा करण्यायोग्य मुद्दा आहे.)

गांधीहत्येच्या कटात सावरकरहि सहभागी होते असे प्रतिपादन करतांना पुढील बाबी मांडल्या जातात -
१)नथुराम गोडसे, नारायण आपटे आणि कटात सामील असलेल्या अन्य व्यक्तींचा सावरकरांशी निकटचा परिचय होता आणि ते सर्व सावरकरांचे कट्टर अनुयायी आणि भक्त होते.
२)२७ जानेवारी १९४८ ह्या दिवशी दिल्लीस जाण्याआधी गोडसे-आपटे सावरकारांना भेटून आले होते.
३)सावरकरांनी त्यांना निरोप देतांना 'यशस्वी होऊन या' असे उद्गार काढले अशी साक्ष माफीचा साक्षीदार बडगे ह्याने दिली आहे.

ह्या खेरीज कपूर कमिशनने पुढील नोंद सावरकरांच्या सहभागाच्या संदर्भात केली आहे असाहि मुद्दा माडण्यात येतो. उदाहरणार्थ पहा http://www.outlookindia.com/article.aspx?225000 येथील पुढील उतारा -

The Justice J.L. Kapur Commission findings: Twenty years after the assassination, the Justice Jivan Lal Kapur commission of inquiry found that Badge's evidence was being corroborated by Savarkar's bodyguard Appa Ramchandra Kasar and Gajanan Vishnu Damle. Justice Kapur's conclusion: "All these facts taken together were destructive of any theory other than the conspiracy to murder by Savarkar and his group."

ह्यावर सर्वांवर माझे मत मांडण्यासाठी प्रथम क्र. १ ते ३ कडे वळतो. कपूर कमिशनने काय म्हटले आहे तिकडे त्यानंतर जाईन.

क्र. १ ह्यामध्ये वादग्रस्त काहीच नाही आणि आपटे-गोडसे आणि अन्य हे सावरकरभक्त होते हे सर्वमान्य आहे.

क्र. २ च्या भेटीत सावरकर आणि गोडसे-आपटे ह्यांच्यात काय बोलणे झाले हे कोठेच बाहेर आलेले नाही. गांधींची हत्या करण्याचा आपला विचार आहे असे गोडसे-आपटे ह्यांनी सावरकरांना सांगितले असे जरी मानले तरी त्या इराद्याला सावरकरांनी पाठिंबाच दिला असला पाहिजे असा तर्क त्यातून निघू शकत नाही. For all that we know 'असा अविचारी प्रकार करू नका, त्याचे दूरगामी परिणाम वाईट होतील' असा पोक्त सल्लहि सावरकरांनी दिलेला असणे अशक्य नाही आणि माहीत असलेल्या बाबींशी हेहि तितकेच सुसंगत आहे. त्याहि पुढे जाऊन, गोडसे-आपटे ह्यांच्या बोलण्यातून 'गांधीहत्या होऊ शकेल' असा अंदाज सावरकरांना आला असला पाहिजे हे जरी क्षणभर गृहीत धरले तरी तोहि गुन्हा होऊ शकत नाही. कपूर कमिशननेच काढलेल्या निर्णयाप्रमाणे ग,वि. केतकरांपासून ते बाळूकाका कानिटकर, र.के.खाडिलकर, प्रो.जैन, स्वतः मोरारजी, मुख्यमंत्री खेर अशा अनेकांना गांधींच्यावर प्राणघातक हल्ला होऊ शकेल अशी कमीअधिक खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यांपैकी कोणावरच एव्हढयाच कारणासाठी खटला भरण्यात आलेला नाही. इतकेच काय, मदनलालने २० जानेवारीला बाँबस्फोट घडवल्यानंतर जो जबाब दिला होता त्याअनुसारे करकरे आणि 'हिंदु राष्ट्र' ह्या पुण्यातील वृत्तपत्राचा संपादक - ज्याचे नाव मदनलालला माहीत नव्हते - असे कमीतकमी दोघे गांधीहत्येच्या कटात गुंतलेले आहेत अशी निश्चित माहिती दिल्ली आणि मुंबईच्या पोलिसांना पुरे १० दिवस आधी मिळाली होती पण तिचा काहीहि उपयोग केला गेला नाही. (अशा हलगर्जीपणाचे एक उदाहरण पहा - पुण्याचे अधिकारी राणा ह्यांना दिल्ली पोलिसांनी ही माहिती २१ जानेवारीला समक्ष हातात दिली होती. टाकोटाक विमान पकडून पुण्यामूंबईत येऊन छापे घालून कट उद्ध्वस्त करण्याऐवजी 'मला विमानप्रवास आवडत नाही' अशा कारणासाठी हे सद्गृहस्थ सावकाश ३ दिवसांनंतर मुंबईत पोहोचले. तेहि सरळ आगगाडी पकडून नाही तर कानपूर मार्गे.) अशी हलगर्जी करणार्‍या पोलिसांवर (उदा. मुंबईचे जिमी नगरवाला) कपूर ह्यांनी नापसंती व्यक्त केली आहे पण ह्यापलीकडे अशा अधिकार्‍यांना कसलेच प्रायश्चित्त मिळाल्याचे दिसत नाही.

क्र. ३ मधील बडगे ह्या माफीच्या साक्षीदाराचा जबाब हा अन्य कशाचाच आधार घेऊ शकत नाही. अप्पा कासार (सावरकरांचा अंगरक्षक) आणि गजानन विष्णु दामले (वैयक्तिक सचिव) ह्यांनीहि माफीच्या साक्षीदाराच्या ह्या विधानाला दुजोरा दिलेला नाही. माफीच्या साक्षीदाराच्या आधाररहित (uncorroborated) विधानावर पूर्णतः विसंबणे अयोग्य आहे असे अनेक निर्णय पूर्वीच्या ब्रिटिश न्यायालयांनी आणि भारतीय सर्वोच्च न्यायालयानेहि दिले आहेत. वानगीदाखल महाराष्ट्रातील गाजलेल्या मानवत खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचे विवरण पहा. (Dagdu & Others Etc vs State Of Maharashtra, http://www.indiankanoon.org/doc/148506/) म्हणूनच केवळ बडगेच्या 'यशस्वी होऊन या' ह्या कथेच्या आधारे न्या.आत्मा चरण ह्यांच्या निकालपत्रामध्ये सावरकरांना दोषी धरणे अमान्य केलेले आहे आणि ते योग्यच आहे. ह्यावर सरकारने पूर्व पंजाब उच्च न्यायालयात अपील केले नाही हेहि लक्षात ठेवावयास हवे.

आता कपूर कमिशनकडे एक नजर टाकू. आपल्या रिपोर्टच्या Vol II, p. 303, paragraph 25.106 येथे कमिशन असे म्हणते -

<25.106 All these facts taken together were destructive of any theory other than the conspiracy to murder by Savarkar and his group and, in the opinion of the Commission, Mr. Nagaravala tripped because perhaps he was badly served by informants and contacts on whom he had every right to rely or there was some erroneous conclusion. Of course, he does say that this was merely an information which had yet to be verified; but did it deserve to be so seriously considered under these circumstances?>

सकृद्दर्शनी पाहता वाचकास असे भासते की सावरकर कटात सहभागी होते असा निष्कर्ष कमिशनने काढला आहे. पण कमिशनचे हे शब्द कशातून निर्माण झाले हे मागे जाऊन पाहिल्यास हा सकृद्दर्शनी भासमान होणारा निष्कर्ष ढासळतो.

सर्वप्रथम कमिशनच्या Terms of Reference, विशेषतः Term of Reference Angel आणि त्यावरील कमिशनचा निष्कर्ष पाहू. त्यासाठी खालील उतारे रिपोर्टच्या Vol II, पृ.३२७ आणि ३२८ येथे वाचता येतात.




सावरकरांचा कटातील सहभाग वा त्यांना त्याची असलेली माहिती ही बाब कमिशनपुढे विचारासाठी ठेवण्यातच आलेली नव्हती, सहाजिकच कमिशनच्या वरील उतार्‍यांमध्ये त्याबाबत काहीहि टिप्पणी नाही. अन्य डझनभर व्यंक्तींची नावे कमीअधिक प्रमाणात हे रहस्य माहीत असलेल्यांच्या यादीत कमिशनने दिली आहेत पण त्यात दुरूनहि सावरकर दिसत नाहीत.

हे जर असे आहे तर वर उद्धृत केलेल्या २५.१०६ ह्या परिच्छेदाचा अर्थच काय आणि कमिशनने तसे का म्हटले आहे असा प्रश्न चाणाक्ष वाचकांपुढे साहजिकच उत्पन्न होतो. त्याला उत्तर आहे आणि ते असे:

हा परिच्छेद मुंबईचे अधिकारी जिमी नगरवाला ह्यांच्या साक्षीच्या छाननीचा भाग आहे. तपास पुरेशा वेगाने का झाला नाही अशा प्रश्नाला नगरवालांचे उत्तर असे होते की त्यांच्यापुढे दोन शक्यता होत्या - एक म्हणजे सावरकर आणि पुण्यातील त्यांचे समर्थक गांधी हत्येचा कट करत आहेत किंवा दुसरी शक्यता म्हणजे असंतुष्ट आणि भडक माथ्याचे काही पंजाबी गांधींचे अपहरण करण्याचा कट करीत आहेत आणि स्वतः नगरवाला दुसर्‍या शक्यतेच्या मागे लागल्यामुळे पहिलीकडे त्यांचे पुरेसे ध्यान गेले नाही. कमिशनला नगरवालांचे हे म्हणणे पटलेले नाही. उपलब्ध परिस्थितीमध्ये त्यांना केवळ पहिली शक्यताच दिसायला हवी होती आणि तिच्यावरच त्यांनी आपले ध्यान केंद्रित करायला हवे होते असा कमिशनचा निष्कर्ष परिच्छेद २५.१०६ मधे लिहिलेला आहे. जिमी नगरवालांच्या नजरेत काय होते हेच काय ते तेथे नोंदविले आहे. ते कमिशनचे स्वतःचे मत नाही.

एवं च, सावरकरांवर गांधीहत्येच्या कटामध्ये सामील असण्याचा काहीहि पुरावा नाही हे पहिल्या न्यायालयाचे मत योग्यच आहे असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरविंद कोल्हटकर यांच्या मताशी बराचसा सहमत आहे.

"यशस्वी होऊन या" असे सावरकर म्हणाले असण्याची शक्यता नाही कारण यशस्वी व्हा हे ठीक आहे यशस्वी होऊन परत येणे अशक्य गोष्ट होती.

आम्ही गांधी हत्या करायला जात आहोत असे गोडसेने सावरकरांना सांगितले की नाही याची खात्री नाही. सांगितले होते असे सिद्ध झाले असेल तर सरकारला माहिती न देण्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो (सहभागी असण्याचा नाही असे वाटते).

सावरकर सहभागी होते याचा पुरावा नाही हे ठीकच आहे. [डझ नॉट मीन- सहभागी नव्हते याचा पुरावा आहे].

सावरकरांचा इतिहास लक्षात घेता संशयित म्हणून आरोप ठेवणे मात्र अयोग्य नव्हते असे वाटते.

२० वर्षे उलटून गेल्यावर काही निष्कर्ष काढणे अयोग्य वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सावरकरांचा इतिहास लक्षात घेता संशयित म्हणून आरोप ठेवणे मात्र अयोग्य नव्हते असे वाटते

सावरकर ब्रिटिश सरकारला दिलेल्या वचननाम्यानुसार कित्येक वर्षे राजकारणापासून दूर होते, तेव्हा किती जुना इतिहास ग्राह्य धरावा हे कसे समजावे. बाकी सावरकरांचा इतिहास बघुनही नक्की कोणत्या कारणाने -इतिहासातील तपशीलामुळे- त्यांना संशयित समजावे हे कळले नाही.

अतिअवांतरः हा प्रतिसाद लिहिताना डोक्यात आलेले स्वैर काही: वचननाम्यानुसार सक्रिय राजकारणापासून दूर राहणारे सावरकर आणि करारनाम्यानुसार ५५ कोटी पाकिस्तानला दिलेच पाहिजेत असे मत प्रदर्शित करणारे गांधी त्या काळात होऊन गेले. आपल्या शत्रु*लाही दिलेले शब्द पाळण्यासाठी कटिबद्ध असणारे नेते नंतर जन्मालाच आले नसावेत नै? हि नेत्यांची मुल्यानवती की समाजाचीच?
*: काश्मिर युद्धात पाकिस्तान अधिकृत शत्रु झाला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला वाटते प्लँचेट करुन सावरकरांच्या आत्म्यालाच विचारावे खर काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सावरकर विज्ञानवादी असल्याने त्यांचा आत्मा प्लँचेटवर येणार नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्लन्चेट वैज्ञानिक असेल तर येईल ना....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इंग्रजी नावाचे ते सर्व वैज्ञानिक असे तर तुम्हाला सुचवायचे नाही ना? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पश्चात्बुद्धीने प्रतिसाद काढून टाकला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिटी ऑफ जॉय. ओ जेरुसलेम आदी विख्यात पुस्तकांचे लेखक Larry Collins आणि Dominique Lapierre यांनी लिहीलेल्या फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट या पुस्तकातील सावरकर व गोडसे संदर्भातील मजकुराने मोठा विवाद उत्पन्न झालेला होता. गोपाळ गोडसे यांनी या पुस्तकावर बॅन आणावा अशी मागणी केलेली होती पुढे काय झाले माहीती नाही.
सावरकर व नथुराम गोडसे हे समलैंगिक होते असा उल्लेख या पुस्तकात होता.
या विवादाचे पुढे काय झाले माहीत नाही.
सावरकरांनी ब्रिटीशांना माफीनामा जो लिहुन दिला होता त्या संदर्भात भक्त त्याला strategy आणि विरोधक cowardice असे म्हणतात. या अर्जातील शब्द योजना विलक्षण आहे. त्यातला हा शेवटचा भाग विशेषतः

Now no man having the good of India and Humanity at heart will blindly step on the thorny paths which in the excited and hopeless situation of India in 1906-1907 beguiled us from the path of peace and progress. Therefore if the government in their manifold beneficence and mercy release me, I for one cannot but be the staunchest advocate of constitutional progress and loyalty to the English government which is the foremost condition of that progress. As long as we are in jails there cannot be real happiness and joy in hundreds and thousands of homes of His Majesty's loyal subjects in India, for blood is thicker than water; but if we be released the people will instinctively raise a shout of joy and gratitude to the government, who knows how to forgive and correct, more than how to chastise and avenge. Moreover my conversion to the constitutional line would bring back all those misled young men in India and abroad who were once looking up to me as their guide. I am ready to serve the Government in any capacity they like, for as my conversion is conscientious so I hope my future conduct would be. By keeping me in jail nothing can be got in comparison to what would be otherwise. The Mighty alone can afford to be merciful and therefore where else can the prodigal son return but to the parental doors of the Government?
Hoping your Honour will kindly take into notion these points.”

या तुलनेत भगतसिंगचा अर्ज बघण्यासारखा आहे त्यातील हा शेवटचा भाग

Our humble sacrifices shall be only a link in the chain that has very accurately been beautified by the unparalleled sacrifice of [Jatin] Das and most tragic but noblest sacrifice of Comrade Bhagawati Charan and the glorious death of our dear warrior [Chandrashekhar] Azad.
As to the question of our fates, please allow us to say that when you have decided to put us to death, you will certainly do it.
You have got the power in your hands and the power is the greatest justification in this world.
We know that the maxim “Might is right” serves as your guiding motto. The whole of our trial was just a proof of that.
We wanted to point out that according to the verdict of your court we had waged war and were therefore war prisoners. And we claim to be treated as such, i.e., we claim to be shot dead instead of to be hanged.
It rests with you to prove that you really meant what your court has said.
We request and hope that you will very kindly order the military department to send its detachment to perform our execution.
अर्थात ही तुलना अनेक वेगवेगळ्या कोणांतुन बघता येईल केवळ फाशी वर जाऊन हेतु साध्य होतो का ? की नाही?
शत्रुला नामोहरम करण्याच्या विविध मार्गांची तुलना इ. इ. साध्य , साधने , नैतिकता राष्ट्रवाद अनेक पैलु आहेत या विषयाला.
संबंधित लिंक्स
१-http://thewire.in/25657/bhagat-singh-and-savarkar-a-tale-of-two-petitions
२-https://en.wikipedia.org/wiki/Mercy_Petitions_of_Vinayak_Damodar_Savarkar
३-http://www.assam123.com/hindi/savarkar-and-godse-were-both-gay
४-http://indianexpress.com/article/opinion/editorials/forty-years-ago-book...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0