टेडी बेअर--- अंतिम

घड्याळाचे टोले वाजले तसे मी फाईलीतून मान वर काढली. ५ वाजले होते. मीटींगची वेळ अझाली . दर वीकेंडला कामाचा आढावा घेणारी मीटींग घेण हा पपांनी घालून दिलेला शिरस्ता होता

कॉन्फरस हॉलमध्ये पोचले,तर कोणाची चाहूल नव्हती. मीच लवकर पोचले बहुदा. ह्म्म आता काय कराव. परत केबिन मध्ये जायचा कंटाळा आला. हॉल तसा प्रशस्त होता. भिंतीवरची पेण्टीग्ज पपाच्या खास आवडीची. पपा तसे चोखद्म्ळ ऑफिस असो वा घर प्रत्येक गोष्ट कलात्न्मक्तेने सजवलेली. पेनापासून ते खुर्चीपर्यत सार काही वेचून निवडलेले. त्यांची चेअरमनची खुर्ची तर खास होती. एकदम बर वाटायच तिथे बसल्यावर. बसताना काही प्रॉब्लेम होणार नाही, आरामदायी अषी ती खुर्ची . मस्तपैकी पसरुअन बसता येत असे. आताही बसून बघितल तर छान वाटल एकदम. साखरदांडे फर्मच्या चेअरमनची खुर्ची . आतून एक वेगलच फीलिंग आल. आईची आठवण झाली
तेवढ्यात पपा आणि समीर आत आले. बरोबर कुलकर्णी होतेच. मी चटकन उठले. समीर तिथे बसला . शेवटी तो त्याचाच हक्क होता. मीटींग सुरु झाली.

त्या दिवशी फार दिवसांनी घरी आम्ही तिघ एकत्र बसलो होतो. हल्ली हे क्षण दुर्मिळ झाले होते. शिळोप्याच्या गप्पा मस्त चालल्या होत्या. अशावेळी समीर माझी हमखास थट्टा करायचा॑. आताही तेच झाल. मी त्याला कृतक कोपाने रागावून घेतल. पपाही खुशीत होते. शेवटी सरुताईने घड्याळात बारा वाजल्याची आठवण करुन दिली तेव्हाच आम्ही झोपायला गेलो. त्या गडबडीत टेडीला मी समीरच्याच खोलीत विसरले
_____________________________________________________________________________________

दुसरा दिवस ऊजाडला तोच एक सुन्न बातमी घेऊन!! पपा पूर्ण कोसळले होते. समीरचा मृत्यू झाला होता. सरुताई सकाळी ऊठवायला गेली तेव्हा हाताला लागलेल थंडगार शरीर पाहून चरकली होती. धसकून तिन सगळ्यांना जाग केल. बेडवर निपचित पडलेल्या समीरला पाहून सुन्न व्हायला झाल. काहीच कळेना. सरुताईनेच धावाधाव करुन डॉक्टरांना बोलावल. पण त्याचा काही ऊपयोग नव्हता. सगळ संपल होत.
ऐन ऊमेदीतला समीर असा कोणालाच वाटल नव्हत. मी डोक गच्च धरुन बसले होते.पांढर्या चादरीवरच्या समीरच्या चेहर्याकडे पाहावत नव्हत. फार वेदना दायक मृत्यु झाला असावा. ते दुख तो त्रास चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. पोस्ट मॉर्टेम मध्ये कॉज ऑफ डेथ मॅसिव्ह अ‍ॅटॅक दाखवल होत. अनाकलनीय!!!!!! पपाना हे काही सहन झाल नाही. दोन दिवस ते कोणाशीच बोलत नव्हते. विषण्ण मनाने त्यांनी समीरच क्रियाकर्म ऊरकल. पण आतून ते पूर्णत ऊध्वस्त झाले होते. वय वर्षे साठ असलेले माझे पपा अचानक एशींचे वाटू लागले. समीरचा मृत्यू हा आमच्या घरावरचा फार मोठा आघात होता. त्यातून सावरण कठीण होत

समीरच्या जाण्याने घराला एक अवकळा आली.सगळीकडे उदासपण भरुन राहिल. आम्हाला जबरदस्त झटका बसला होता. विशेषत पपांना. मनातून ते पूर्णपणे खचले होते. त्याचा परिनाम त्यांच्या शरीरावर दिसू लागला. डॉक्टरांच्या अलिकडे फेर्या वारंवार वाढल्या होत्या. यावेळी ऑफिसात कोणाचच लझ नव्हत. नेहमीची काम पार पाडत होती ईतकच. कुलकर्णी विश्वासातलेच होते. त्यांनी निभावून नेल.

आजकाल पपांना झोप लवकर न येण हे नित्याचच झाल होत. ऊशिरापर्यत ते जाहे राहून विचार करत असत. अस सारख होण त्यांच्या प्रकृतीला चांगल नव्हत. आज बघितल तर ते अजूनही जागे होते. मला काही ते बर दिसल नाही. खोलीच दार ऊलटून पाहिल तर ते तसच एकटक पाहत होते.

"पपा" मी हळूवारपणे हाक मारली

लक्ष नाही दिल त्यांनी

"पपा, अजून कशाला जागे आहात, झोपा आता. डॉक्टरांनी सांगितलय ना तस" त्यांच्याजवळ जाऊन मी त्यांना थोपटत म्हटल

तंद्रीतून जाग होत त्यांनी माझ्याकडे पाहिल. डोळे भरुन आले त्यांचे.

"झोप??? ती आता काही येणार नाही. ती गेली समीरसोबत"

"एवढे निराश होऊ नका पपा. समीर कुठेही गेला नाहीये. तो आपल्या सगळ्याच्या मनात अजून आहे आणि कायमचा राहिल.टेन्शन नका घेऊ"

"हं टेन्शन?? आता कसल टेन्शन आलय?? आता तर हे जगण नको वाटत. काय करु जगून ?? टेन्शन असतात ती जगून राहणयासाठी, ईथे कोणासाठी जगू??"

"पपा, अस का बोलताय?? मी आहे ना. मी तुमची कोणीच नाही का??" माझा स्वर दुखावल्यासारख झाला.
"तू आहेस म्हणून तर मी जगलोय ना ईतके दिवस?? खरतर माझ आता कशातच लक्ष लागत नाही. हा एवढा पैसा , बिझिनेस ऊभा तरी कशासाठी हा प्रश्न पडलाय. कंटाळा आला या सर्वाचा. एकदा तुझ व्यवस्थित लग्न करुन दिल की सुटलो सगळ्यातून"

"पपा होईल हो लग्न, तुम्ही काळजी नका करु. झोपा आता"

"नाही ग!!! मला ही प्रॉपर्टी पैसा काही नको. शाप आहे या सगळ्याला!!! काही एक नको हे. ज्यासाठी स्वप्न पाहिल तो निघून गेला. उद्याच मुळे वकीलांना बोलावून घे. सगळ दान करुन टाकणार आहे मी. तुझा हिस्सा तुला दिला की सगळ काहि गंगार्पण!! तुला काही कमी पडणार नाही. सुखी राहा. " पपांचा स्वर ओलावला होता.

"आता खूप झाल बोलून. झोपा पाहू आता तुम्ही"

पपा काही न बोलता तसेच बसून राहिले. मी त्यांना थोपाटल. काही न बोलता मी बाहेर आले.

पपांना रात्री दुधातून गोळ्या द्यायच्या असतात. त्यांची गोळ्या घेण्याची वेळ झाली होती.

होय, वेळ आली होती . टेडी बेअरची!! पुन्हा एकदा!! यावेळीही ते आपल काम चोख बजावणार यात कोणतीही शंका नव्हती.ममीच्या, समीरच्या वेळी ते त्यांने आपल काम व्यवस्थित पार पडल होत. कुणालाही शंका न येऊ देता.
माझ्या मार्गातले दोन्ही अडथळे टेडीमुळेच तर विनासायास दुर झाले होते.

अडथळेच!!! साखरदांडेची फ़र्म मी अशी हातातून नाही जाऊ देणार. माझ स्वप्न आहे ते. अस सहजासहजी निसटू देणार नाही. ममीला समीरला यासाठीच जाव लागल. तुम्ही ममीच्या सल्ल्याने समीरला सगळ काही द्यायला निघालात आणि मला काय तर एक छोटासा तुकडा.!!! हा न्याय नव्हे. त्या दोघांच्या जाण्याला तुम्ही जबाबदार आहात. हो तुम्हीच . कारण मला काय वाटत याची तुम्हाला कधी फिकीर नव्हती.
चेअरमनच्या खुर्चीत एक वेगळ्या प्रकारची नशा आहे. ती खुर्ची, तो मान मला हवाय. पण तुम्हाला फक्त ममी आणि समीर हवे होते. त्यापुढे काही नाही . आता तुम्ही म्हणताय की सगळ काही देऊन टाकायच?? एवढ्या वर्षाच गुडविल, पैसा एका क्षणात द्यायच?? ते ही भावनेपोटी. !!! तुमच्या दुखापायी????
नाही पपा, मला यावेळी तुमच म्हणण मान्य नाही. जे तुम्ही उपभोगल ते मला नाकारण्याचा कोणताही हक्क तुम्हाला नाही. जे मला हवय ते मी मिळवणारच.

सॉरी पपा पण तुम्हाला आता जाव लागेल. समीरच ममीच जाण व्यर्थ नको ठरायला. माझ्या मार्गातला शेवटचा अडथळा तुम्ही आहात. मला वाटल होत की समीर गेल्यानंतर तुम्ही सगळ काही मला द्याल. पण तुम्ही तर वेगळाच मार्ग धरलात. आता हा शेवटचा काटा दूर करायला हवा. नाहीतर माझ स्वप्न कस पूर्ण होणार??? तुम्हाला माहितेय तुम्ही फार चांगले आहात. पण हा चांगुलपणा माझ्या काहीच कामाचा नाही. तुमची वेळ झालीय पपा समीर आणि ममीकडे जाण्याची.

सॉरी पपा. बट यू हॅव टू गो. बाय फॉर एव्हर!!!!!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

वा टेडीची गोष्ट आवडली. भारीच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटचा ट्विस्ट अचानक आला.. इतका अचानक की केवळ धक्का उरला -उपरती नाही.
आधीच्या गोष्टीत काही सैल दुवे या धक्याने जोडले गेले असते तर धक्का अधिक जिवंत वाटला असता असे वाटते.

अर्थात ही पश्चातबुद्धी, गोष्ट आवडली हे खरेच! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अर्र तेच्यायला. ट्विस्ट जबराच! मस्त कथा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कथा आवडली.
दुसर्‍या भागात काही वाक्यं टाळता आली असती; त्या भागानंतर पपा आणि समीरचं काही खरं नाही असं वाटलं होतं आणि तसंच झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वाचे आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

जाई,

टेडी बिअर ही कथा मनापासून आवडली.
अतिशय धाडसी मनाने तुम्ही ही कथा लिहिलेली असावी.

स्वत:च्या ध्येयप्राप्तीसाठी मार्गातले काटे कोणत्याही मार्गाने दूर करणे ही एक प्रवृत्ती आहे व त्याच्याशी स्त्री-पुरुष या अनुषंगाने कोणताही भेद नसला पाहिजे हा अतिशय धाडसी (खरेतर क्रांतिकारी) विचार तुमच्या या कथेतून मांडण्यात अतिशय यशस्वी झालेल्या आहात. आतापर्यंत बव्हंशी कथांमधून खलप्रवृत्ती या पुरुष खलनायकाच्या माध्यमातूनच प्रकट झालेल्या दिसतात. त्या पार्श्वभूमीवर या कथेतून दिपालीची एक सशक्त व थंड डोक्याची व्यक्तीरेखा वाचकाला एक वेगळ्याच ट्रान्समधे नेते. मुख्य म्हणजे कथानकाचा वेग अचंभित करतो आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद सागर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

शेवटची कथेची कलाटनी झकास.
पहिले भाग वाचल्यावरच "मी असतो तर असा शेवट केला असता" असं डोक्यात यायचं नि ही काहीह्सी तशेच गेलेली आहे . गोष्टीचा शेवट थरारक न होता टिपिकल सरळमार्गी, अतूट्-नाती वगैरे स्टाइल जाइल असंही मधूनच वाटलं होतं.
तशी न गेलेली पाहून बरं वाटलं. आवडली. एक अँटिक्लायमॅक्स सुचवासासा वाटतो. घरी पोचून लिहिन म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

एक अँटिक्लायमॅक्स सुचवासासा वाटतो. घरी पोचून लिहिन म्हणतो.

नक्की लिहा. मलाही ऊत्सुकता आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.