Flyby of Asteroid 2012 DA14

पृथ्वीपासून अगदी जवळून जाणार्‍या या अ‍ॅस्टेरॉईड बद्दल एव्हाना तुम्ही ऐकले असेलच. अ‍ॅस्टेरॉईडला पहाण्याची अशी संधी सहजी चालून येत नाही. ज्यांना हे पाहण्याची इच्छा आहे त्यांना मदत होईल अशी माहिती थोडक्यात देण्याकरता हा धागा सुरु करतो आहे (इतरांनीही माहितीची देवाणघेवाण करावी).

किमान दुर्बिण(Binoculars) लागेल, डोळ्यांनी दिसणे दुरापास्त आहे! टेलिस्कोप मधून दिसणे अवघड आहे, पण कौशल्य असेल तर अशक्य नाही!

सर्वात पहिले http://heavens-above.com/ इथे जा. कॉन्फिगरेशनमध्ये जाऊ तुमचे गाव (जवळचे शहर) निवडा. त्यानंतर पुन्हा पहिल्यापानावर जाऊन (आपोआप जाईळ) पहिल्या अ‍ॅस्टेरॉईडच्या लिंकवर क्लिक करा. तिथे गेल्यावर उजवीकडे तो वेळ आणि गावाचं नाव दाखवेल, ते बरोबर आहे याची खात्री करा. नसल्यास पुन्हा दुसरे गाव निवडून पहा.

गाव-वेळ बरोबर असेल, तर खाली दिलेल्या चौकटीत योग्य वेळ (सुर्य नसतानाची) घालून या अ‍ॅस्टेरॉईडचा मार्ग पहा. १५-१६ या दोन दिवशी (तुमच्या जागेनुसार) कोणत्या वेळी "ब्राईटनेस" (ईंडेक्स) आणि त्याचा मार्ग बघण्यास सर्वोत्तम आहे हे पहा.

ब्राईटनेस त्याच साईटवर खाली वेळेनुसार दिलेला आहे. जितका कमी "ब्राईटनेस" तितकं दिसण्यास सोपं. (गोंधळू नका, बरोबरच लिहले आहे. उदा. चंद्र = -१० च्या आसपास आहे, सुर्य -२६ इ.)

उदाहरणादाखल माझ्या गावाचा "स्कायचार्ट" इथे दिसेल (होपफुली लिंक बदलणार नाही) http://heavens-above.com/2012da14.aspx?lat=32.22167&lng=-110.9258&loc=Tu...

स्कायचार्टची प्रिंट ऑऊट घेऊन ठेवा, स्मार्टफोन असतील तर "डिस्टंट सन्स" वगैरे अ‍ॅप्स डाऊनलोड करून ठेवा. दुर्बिणी घ्या आणि बाहेर जा!

अ‍ॅस्टेरॉईड कसा शोधायचा हे इथे वाचून जा, मदत होईल. http://astroguyz.com/2013/02/09/astro-challenge-catching-the-flyby-of-as...

शुभेच्छा!

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

महत्त्वाची माहिती. सकाळमधील ही बातमी पुढिल महत्त्वाची माहिती देते

आज मध्यरात्री 2012 डी.ए. 14 पृथ्वीजवळ येत असला, तरी तो नुसत्या डोळ्यांनी दिसू शकणार नाही. मात्र बायनॉक्‍युलर किंवा छोट्या दुर्बिणीतून त्याला पाहता येईल. आज रात्री 11.30 वाजता पुण्यापासून 48,700 कि.मी. अंतरावर असेल व त्या वेळी तो नरतुरंग तारकासमूहात असेल. तेथून तो वासुकी मार्गे कन्येत जाईल. रात्री 1 वाजता तो कन्येत असून, आपल्यापासून 28,829 कि.मी. उंचीवर असेल. या वेळी त्याची तेजस्विता 7.1 असल्याने तो बायनॉक्‍युलरमधून दिसू शकेल. पुढील तासाभरात लघुग्रह अरुंधती केश (कोमा बेरेनिसेस), श्‍याम शबल (केन्स वेनाटिसी) मार्गे पहाटे 2.30 वाजता सप्तर्षीमध्ये जाईल. आता त्याचे तेज मंद होत जाईल, कारण तो सेकंदास 8 किलोमीटर वेगाने आपल्यापासून दूर जात आहे. दुर्बिणीतून त्याला सहज टिपणेदेखील अवघड ठरेल. कारण तो अवघ्या एका मिनिटात 0.8 अंश (पाऊण चंद्र) एवढे अंतर पार करणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अपेक्षित माहिती अपेक्षित व्यक्तीकडून....
छान माहिती व छान दुवे दिले आहेत नाईल्या. (निळोजीराव म्हणायचा मोह आवरतो Wink )

या धाग्यावर अजून आदितीचे आगमन कसे नाही झाले? तिच्याकडून वैज्ञानिक बाबी अधिक चांगल्या समजून घेता येतात.
लघुग्रहाची कक्षा पाहता नाईल्या आणि आदिती तुम्हा दोघांना फोटो घेता येतील की नाही माहिती नाही. पण भारतातून दुर्बिण वापरणार्‍यांना ही एक मोठी पर्वणी असणार आहे.

उपग्रहांची (म्हंजे आपले सॅटेलाईट्स) कक्षा छेदून पृथ्वीच्या एवढ्या जवळून जाणारा हा लघुग्रह म्हणजे एक दुमिळ योग आणि संधी आहे हे नक्की. वर ऋ ने माहिती दिल्याप्रमाणे लघुग्रहाचा एक देखणा प्रवास अवकाशप्रेमींना पाहता येईल. मध्यरात्री एक वाजायच्या अगदी काही मिनिटे अगोदर हा लघुग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळच्या म्हणजे २७,७०० किलोमीटर इतक्या अंतरावर आलेला असेल. उपग्रहांची कक्षा ३५,००० किलोमीटर्स पर्यंत असते. कोणत्याही उपग्रहाला नुकसान होणार नाही याची अपेक्षा आहे. उपग्रह हे पृथ्वीवरुन नियंत्रित करता येतात त्यामुळे संभाव्य धोक्याची त्या त्या देशातील उपग्रह केंद्रांनी आवश्यक ती खबरदारी घेतलेली असावी. पृथ्वीच्या गुरुत्त्वाकर्षणाचा परिणाम होऊन हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत खेचला जाणार नाही हे शास्त्रज्ञांनी अगोदरच तपासून पाहिले आहे. त्यामुळे अर्थातच आपल्या सजीवसृष्टीची कोणतीही हानी होणार नाही.

समजा हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला असता तर एक मोठे शहर नष्ट करण्याएवढी ताकद या लघुग्रहात होती एवढे समजले म्हणजे पुरे. एका संभावित संकटातून वाचल्याचा आनंद पृथ्वीवासीयांनी मनोमन करायला हरकत नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रिअल टाईम ऑनलाईन लिंक्स करता इथे पहा: http://earthsky.org/space/watch-february-15-asteroid-flyby-online-in-rea...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

रशियातील चेल्याबिन्स्क येथे अचानक झालेल्या उल्कावर्षावाने जवळपास ५०० लोक जखमी झाल्याची बातमी आहे.

हा एक व्हिडिओ
https://www.youtube.com/watch?v=xZFMbRFuyBA

हा दुसरा व्हिडिओ - यात स्फोट आणि आवाज यांच्या तीव्रतेमुळे हा वर्षाव केवढा जोराचा होता हे लक्षात यावे.
https://www.youtube.com/watch?v=QaKODxD2JOE

आज रात्री पृथ्वीजवळून जाणार्‍या लघुग्रहातून अशा उल्कावर्षावाची अर्थातच अपेक्षा नाहिये. पण काही सांगता येत नाही.
पृथ्वीच्या गुरुत्त्वाकर्षणाने उपग्रहाचे काही तुकडे पृथ्वीने आपल्याकडे खेचू नये एवढेच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अविश्वसनीय! असं काही होणार नाही याची पुरेशी खात्री (डी ए मुळे) शास्त्रज्ञांना आहे. (काही तासात कळेलच. Smile )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

खतरनाक प्रकरण असतं बाकी हे आकाशनिरीक्षण म्हणजे. एकदा राजगडावर भर रात्री चढाई केली होती तेव्हा मीटिऑर शॉवर्स दिसलेल्या त्याची आठवण झाली.

अवांतरः माणूस चंद्र/मंगळावर कधी जाणार रहायला? स्टार वॉर्स वगैरे प्रत्यक्षात आले तर कस्ली मजा येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फेसबुकावर हे दिसलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अ‍ॅस्टेरॉइडचा व्हिडियो:
http://apod.nasa.gov/apod/astropix.html
त्यात एक बारीकसा ठिपका, तार्यांच्या पार्श्वभूमीवर, उजवीकडच्या खालच्या कोपर्यातून डावीकडच्या वरच्या कोपर्याकडे जाताना दिसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुव्याबद्दल धन्यवाद ऋता. छान व्हिडिओ आहे. वेग अफाट होता या डी-१४ चा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुपारी १२ च्या सुमारास जेव्हा नासाच्या लाईव्ह ब्रॉडकास्ट मध्ये बेट्याला पाहिला तेव्हाच जाणवलं होतं की हा काही आपल्या तावडीत येईल असे वाटत नाही. आमच्याकडे संध्याकाळ होईतो तो बराच लांब आणि अंधुक झालेला होता (मॅग. १०+) शहरापासून दूर जाऊन बघुया असं म्हणून तासभर 'ड्राईव्ह' करून डोंगरावर गेलो. भयानक थंडीमुळे (शून्याखाली २ डीग्री!) आमची बोबडी वळाली तरी एक तास दोन तास थरथरत्या हाताने प्रयत्न गेला. पण हजारो ठिपक्यांमध्ये (आमचे थरथरणे वजा करूनही) हलणारा ठिपका काही दिसला नाही. पण टेलिस्कोप बाहेर काढलाच होता, तो तसाच परत कसा ठेवणार? पुन्हा घरी आलो, मित्राच्या घराच्या मागील बाजूस टेलिस्कोप लावला आणि झालेल्या चरफडीची भरपाई करण्याचा प्रयत्न केला.

यावेली ओरायन नेब्युला आयताच सापडला.

(एक्स्पोझर ७ सेकंद, आय एस ओ ६४००)

शिवाय हबल टेलिस्कोप डोक्यावरून जाताना अगदी स्पष्ट (योगायोगाने, हबल एक पृथ्वी प्रदक्षिणा ९५ मिनिटांत पुर्ण करतो!) दिसला आणि विकांताचे सार्थक झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

हे अवांतर आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाह! आवडले

अवांतरः टेलिस्कोप होता म्हणजे स्टँड असेलच, तरीही एक बारीक 'थरथर' जाणवते आहे, त्याला कसे टाळावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फोटो ७ सेकंद एक्स्पोझर ठेवून काढला आहे. टेलिस्कोप कॅप्युटराईज्ड माऊंटला जोडलेला होता आणि हा फोटो काढताना Betelgeuse ला ट्रॅक करत होतो. ट्रॅकिंग मात्र ढोबळ होते (ट्रॅकिंग सेट अप करायला जरा वेळ लागतो, शिवाय त्यातही एरर असण्याची शक्यता असतेच)

टेलिस्कोप (आणि कॅमेरा) स्थिर ठेवून जर फोटो काढला, तर चित्र ५ सेकंदात बरेच पुढे सरकते, म्हणून ट्रॅकिंग आवश्यकच आहे. चित्रातील थरथर ही ट्रॅकिंग एरर, फोकसिंग एरर आणि ट्रॅकिंगमुळे टेलिस्कोपमध्ये निर्माण होणारी spasmodic motion यांमुळे असावे असे वाटते. (टेलिस्कोपला कॅमेरा लावताना फोकस करणे तसे जिकीरीचे काम आहे, विशेषतः नॅब्युले इ. सारख्या अंधुक 'टारगेटां'साठी.) थोडक्यात, सुधारणेला भरपूर वाव आहे (म्हणून बरे आहे, नाहीतर लवकर कंटाळा यायचा). Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

नाईल्या फोटु काढले की न्हाई?
काढले असतील तर द्या की इथं Wink

अवांतरः ते "(एक्स्पोझर ७ सेकंद, आय एस ओ ६४००)" म्हंजी काय प्रकरण म्हनायचं हो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो लावला आहे ना. दिसत नाहीए का? मग इथे पहा: https://sphotos-a.xx.fbcdn.net/hphotos-ash3/860637_10151520731511514_194... (फेसबुक)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

दुव्यावरुन फोटो पाहिला

अप्रतिम आहे. माझ्या विचारणेचे सार्थक झाले Smile
एक्स्पोजर प्रकरणही कळाले

धन्यवाद नाईल्या Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0