डील ऑर नो डील?

I have an offer you can't refuse!

मी तुला रस्त्यातून उचलणार, घरी नेणार
एखाद्या कारागीराकडून मस्त शेप-बिप देणार
थोडासा माझ्यासारखा...
.
एका चांगल्या कॉर्नरमध्ये ठेवणार, मखरबिखर करून
चांदी-सोनंवालं, बगू झेपेल तसं
फुलं-बिलं, उदबत्त्या, रोज एक नारळ
रोज आंघोळ करून तुझी स्तुतीवाली गाणी बोलणार
.
.
तू काय करायचं...
आपलं लाईफ सेफ,
धंद्यात मस्त नफा, रायव्ह्ल्सचा गेम करायचा
काय रोगबिग, इडापिडा ते आपल्या घरात नाय आणायचं
पोरगा अभ्यास करत नाही, तेवढा पास करून टाक
आणि बाकी काय पडेल ती कामं
.
.
मं?... काय म्हंटो?
डील ऑर नो डील?

field_vote: 
3.714285
Your rating: None Average: 3.7 (7 votes)

प्रतिक्रिया

भारीच आहे कविता.
आवडली.

आणि बाकी काय पडेल ती कामं
.
.
मं?... काय म्हंटो?

या ओळी जबरदस्त. काय म्हंटो ?

बाकी नाऊ अ डेज या साईटवर मराठी पोएम्सची टायटल आणि फ्यू लाईन्स टू इंग्लिशमध्ये राईट करायची जी लेटेस्ट फॅशन आलेय त्याचे साला फॅन आहोत आपण! किती ईझी होतं ना अंडर्स्टँड करायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जी विकाऊ असते ती श्रद्धा होऊच शकत नाही. परंतु आजकाल हे फारसे विचारात घेतले जात नाही. शुन्य भांडवलाने सुरु करता/चालवता येणारा हा एक धंदा झाला आहे.हि कविता थेट मुळालाच जाऊन भिडते..देवाला दुकानदार बनवते किंबहुना देव या संकल्पनेचा बुरखा फाडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गमतीदार.

टेरी प्रॅचेटची "स्मॉल गॉड्स" ही कादंबरी आठवली. यात कथानक आहे, की जितक्या संख्येत भक्त आहेत, तितक्या प्रकाणात देवतेची चमत्कार करण्याची शक्ती असते, आणि अर्थातच जितक्या प्रमाणात देवता भक्ताकरिता चमत्कार करू शकते, त्या प्रमाणात भक्ताचा भक्ती करण्यात वैयक्तिक फायदा आहे. या देवाणघेवाणीचा सौदा देवता आणि भक्त करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खवचट कविता आवडली Smile

"सत्या" सिनेमातला डायलॉग आहे. सत्या नुकताच "भाई"च्या कृपाछत्रासाठी आलेला असतो. भाईचा एक असिस्टंट सत्याला दिलेल्या खोलीवर घेऊन जातो. छोटीशी, फर्निश्ड खोली. असिस्टंट म्हणतो " देख, भाईने तेरी जिंदगी बना डाली. क्या क्या दिया तेरेको. वो देख, भगवान भी है. भगवान को मानता है क्या ?"

गु़लजा़र म्हणतो :
चिपचिपे दूध से नहलाते हैं
आंगन में खड़ा कर के तुम्हें ।
शहद भी, तेल भी, हल्दी भी, ना जाने क्या क्या
घोल के सर पे लुढ़काते हैं गिलसियाँ भर के
औरतें गाती हैं जब तीव्र सुरों में मिल कर
पाँव पर पाँव लगाए खड़े रहते हो
इक पथराई सी मुस्कान लिए
बुत नहीं हो तो परेशानी तो होती होगी ।
जब धुआँ देता, लगातार पुजारी
घी जलाता है कई तरह के छौंके देकर
इक जरा छींक ही दो तुम,
तो यकीं आए कि सब देख रहे हो ।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

दोन्ही आवडलं. फारसं क्रूर, कठोर न होताही भावना व्यवस्थित पोहोचवल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

कविता आवडली

सौदेबाजी संयमित शब्दात व्यक्त केली आहे
पुलेशु

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

प्रतिसाद आवडला Smile मराठी पोएम्सची टायटल आणि फ्यू लाईन्स टू इंग्लिशमध्ये राईट करायची जी लेटेस्ट फॅशन आलेय त्याचे साला फॅन आहोत आपण!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली. भा.पो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता चान आहे. आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बगू झेपेल तसं
स्तुतीवाली गाणी बोलणार

या वाक्यांनी तयार होणाऱ्या व्यक्तिरेखेशी

रायव्ह्ल्सचा गेम करायचा
I have an offer you can't refuse!

डील ऑर नो डील?

या ओळी जुळत नाहीत. आता कवी असं म्हणू शकतो की हे अनेक वेगवेगळ्या लोकांनी म्हटलेलं आहे. पण मला ही घिसाडघाईने, चार मिनिटात लिहिलेली कविता वाटली.

सर्वसाधारण गद्य लेख लिहिताना लेखक सुमारे दोन तास तरी घालवतात. कवीने कविता लिहिताना तितकी मेहनत घ्यावी ही अपेक्षा रास्त वाटते. नुसत्याच भावना कशाबशा पोचवायच्या असतील तर पद्य का लिहावं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐवजी
काय बोलतो ? बोल .असं पालुपद वापरून वाचून बघीतलं .
एकदम फीट बसल्यासारखं वाटलं .

तू काय करायचं...
आपलं लाईफ सेफ,
धंदा याहूम
रोकडीची ठसी
सामनेवाल्याचा गेम
।काय बोलतो ? बोल ।

आपुन जातो हलकं व्हायला
इकडे आनी तिकडे पन
काय रोगबिग,
इडापिडा बाकी नष्टर
ते आपल्या घरात आणायचं नाय
सोनू अभ्यास करत नाही, तेवढा पास करून टाक
आणि बाकी काय पडेल ती कामं
।काय बोलतो ? बोल ।
(हा एक प्रयोग आहे. कविच्या मनात वेगळे काही असेल त्याचा मान ठेवून काय बोलतो ? बोल आणि इतर सुधारणा सुचवतो आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

_/\_
अफलातून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

याला म्हण्तात रामदास टच!
मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

झक्कास हो रामदासकाका... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओरिजिनल मधे एक कडक्क खारबाजपणा आहे. तो उगा घासून पिटून गुळ्गुळीत केलेला वाटला.

ज्या भाईस्टाईल 'हा' देवाशी डील करतोय, तिथे तो 'सोनु' वगैरे म्हणेल हे पट्लं नै.
ते 'काय म्हंटो? बोल?' हे पंच लाईन आहे. (He has given an offer even 'He' can't refuse. गॉडफादर स्टाईल.) उत्तर ततपप करीत 'ह..हो!' असं येणारच, हे अध्यहृत आहे इथे. त्यात जास्त मजा आला.

पालुपद लावून लाडीगोडी लावणे भावले नाही. थोडं भीक मागीतल्या सारखं वाटलं. रुबाबात आर्डर सोडल्यासारखं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सोनू हे देवाला थोडंच म्हटलंय.. ?? भाईलोक आपल्या पोराला सोनू म्हणत असतील हे शक्य वाटतं.

आणि काय बोलतो, बोल.., यातला टोनही डील ऑर नो डील पेक्षा अधिक भाईगिरीचाच वाटतो. डील ऑर नो डील मधे काहीसा ऑप्शन तरी आहे. "काय बोल्तो बोल" या टोनमधे तर तेवढाही भासत नाही.. बोलू देतोय हेच खूप, असा भाव आहे.. Smile असं मला तरी जाणवलं..

पण एक मुद्दा मुद्दाम नमूद करतो की मूळ कविता उत्तम आहे. रामदासकाकांना दिलेली दाद ही एका वेगळ्या कवितेसाठी असं समजावं..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे भाई लोक्स आमच्या भाई लोकांपेक्षा येगळे दिसतात. Wink
अ‍ॅग्री टू डिसॅग्री करून आवर्तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

डॉ. अडकित्ता, गविंना तुम्ही पाहिले आहे का? फोटो तरी? त्यांना पाहून भाई लोक, फक्त नम्र-रागच आळवत असतील हे ऐकल्यास आश्चर्य वाटायचे नाही!! Wink

(ह. घ्या हो गविशेठ, नायतर च्यायला सुपारी निघायची आमच्या नावाची.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

नाय्ब्वा! :-ss
कविता करणारा भाई फर्स्ट टाईम पाहिंग. वर्तून मराठी म्हंजे लै भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

देवाशी आपण काय डील करावं किंवा काय नाही याविषयी भाष्य करता येत नाही.. पण एक नक्की की देव दगडाचाच बरा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तं रे.. कविता आवडली. शिर्षकही चपखल. कवितेची 'लय' लय भारी साधलीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भा पो.
रामदास काकांनी दिलेले रुपडे तर अधिकच भावले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

राजस आणि थोडे तामस (रायव्हल चा गेम) भक्तीचे सुंदर उदाहरण आहे ही कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व प्रतिसादकांचे आभार. काही आक्षेपांबद्दल थोडक्यात-

कविता चार मिनिटांत लिहिली आहे का? - होय. जवळजवळ.
घिसाडघाईने लिहिली आहे का? - नाही. चार तास/दिवस 'मेहनत' घेऊनही फारसे काही बदलले गेले असते असे वाटत नाही. मुळात 'मेहनत घेतली जाण्याची' कारागिरी अपेक्षा निदान या कवितेसाठी नामंजूर. सहजच पेपर नॅपकिनवर केलेली खरड, हाच या कवितेचा फॉर्म आणि हाच तिचा जीव. ठाकूनठोकून शब्द बसवणे, 'या' ऐवजी 'ती' ओळ बरी दिसेल अशा विचाराने शेपबिप देणे हे spontaneity ला मारक ठरेल असे वाटते.

आडकित्ता यांनी वर लिहिलेच आहे, पण गॉडफादरमधल्या 'त्या' प्रसिद्ध वाक्याचा संदर्भ पहिल्या ओळीला आहेच. (कदाचित मला वाटले होते तेवढी ती लाईन 'आपल्याकडे' प्रसिद्ध नसेल) एकदा 'can't refuse' सांगून झाले की मग शेवटचे वाक्य ही केवळ फॉर्मॅलिटी राहते. सौद्यातल्या सगळ्या 'टर्म्स ऍण्ड कंडिशन्स' ठरवून झालेल्या आहेत. देवाला देव्हार्यात बसण्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा '।काय बोलतो ? बोल । ' टाईप आर्जवाचा प्रश्नच येत नाही Smile Smile

(च्यायला, हा र्या कसा ल्याह्यचा?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

र्‍या = RyA

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

कॅपिटल आर , वाय, ए, ए = र्‍या
अरेच्च्य्या दिसताना बरोबर दिसतो टाईप केल्यावर, मग बदलतो Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0