मोकळा तर झालो!!

ते आले.. जिंकले.. हरले..
हरवून आले.. आवडले.. ठिकेय
काय छान राज्य केलं.. वा वा मस्त.. चान चान
काय वाट लावली देशाची.. वावा मस्त चान चान
करतोय चर्चा.. दळतोय दळणं.. ससंदर्भ.. असंदर्भ..
तर्कशुद्ध.. तर्कदुष्ट.. कुणाला पडलीये..
मोकळा तर झालो!!!

तो आला पिक्चर.. चालला
पडला.. आपटला.. आपटवला
एखादं गाणं.. एखादी हरकत.. वा वा मस्त.. चान चान
एखादा नट.. वाईट्ट काम.. घेतली हरकत.. वा वा मस्त.. चान चान
करतोय समीक्षा.. दळतोय दळणं.. प्रताधिकाराशिवाय.. अधिकार घेऊन..
कर्म तर वाढलं.. घटलं.. कुणाला पडलीये..
मोकळा तर झालो!!!

केला भात.. लाटल्या पोळ्या
चविष्ट.. जळक्या.. वातट.. हलक्या..
एखादा फोटो .. तोंडाला पाणी.. वा वा मस्त.. चान चान
फोटो नाही?.. कै च्या कै.. वेंगाडलं तोंड.. वा वा मस्त.. चान चान
दळतोय पीठ.. दळतोय दळणं.. चवीसकट.. बेचव..
अगदी दुष्ट.. एकदम पुष्ट.. कुणाला पडलीये..
मोकळा तर झालो!!!

आलो फिरून.. आणलं फिरवून..
सांगायला नको.. जळवायला नको?
एखादा फोटो.. तोंडाला पाणी.. वा वा मस्त.. चान चान
फोटो नाही?.. कै च्या कै.. वेंगाडलं तोंड.. वा वा मस्त.. चान चान
फिरतोय गावं.. फक्त वेगळी नावं.. फोटो तसेच.. वेगळी लेबलं
माहिती पूर्ण.. उपेक्षीत.. कुणाला पडलीये..
मोकळा तर झालो!!!

आलो.लिहिलं.
आवडलं.. नाही आवडलं.. ठिकेय..
मस्तच.. वा वा.. चान चान!
श्रेण्या.. कर्म.. मुल्य..
वावा .. चान चान..
लिहितोय काहितरी.. दळतोय दळणं.. ससंदर्भ.. असंदर्भ..
तर्कशुद्ध.. तर्कदुष्ट.. कुणाला पडलीये..
मोकळा तर झालो!!!

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

नेमकं काय झालं अन कशाबद्द्ल लिहिलंय बघायला आले.
कविता वगैरे कै समजत नै...असो. कविता लिहुन झालात ना मोकळे? झालं तर मग!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली रे मित्रा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा. अगदी खरं. म्हणूनच चान चान म्हणतो आणि मोकळा होतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वावा .. चान चान..
मोकळा तर झालो!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा वर आलाच आहे तर वाचक, प्रतिसादक, तारे व श्रेणी दाते सगळ्यांचे आभार मानतो Smile
धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"मोकळा झालो" हे शब्द पाहून एकदम काहीतरी तर्कदुष्ट पण ऐसी अक्षरेच्या कविता ट्रेंडशी साधर्म्य साधणारं काहीतरी डोक्यात आलं होतं. Wink

कविता आवडली. छान छान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते अन् तेच ते

ची संस्थळी व्हर्जन. हा सगळा अट्टाहास कशासाठी? असा प्रश्न आहे. उत्तर कोणाला माहिताहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यखांदी क्वारटर मारुन बी मोकळे व्हनारे हायेतच की! घुसमटन्यापेक्षा हे बाकी बर हाय! पन यखांद्याच्या मोकळ व्हन्याने दुसरा घुसमटतो त्येच काय कर्नार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

ते आले.. मांडले..वाढले..
"और कुच?".. आवडले.. ठिकेय
काय छान फ्राय केलं.. वा वा मस्त.. चान चान
काय वाट लावली करीची.. वावा मस्त चान चान
करतोय चर्वण.. मारतोय भुर्के.. सामिष.. निरामिष..
क्यालरी.. ट्रायग्लिसराईड.. कुणाला पडलीये..
मोकळा तर झालो!!!

तो आला स्टार्टर.. चापला
उचलला.. खाल्ला.. खिलवला
एखादं तंगडं.. एखादी ब्रेस्ट.. वा वा मस्त.. चान चान
एखादा सुरमय.. वाईट्ट भाजलाय.. घेतली हरकत.. वा वा मस्त.. चान चान
तोडतोय खेकडा.. ओढतोय गर.. बुळुक्कन.. जीभ खुपसून..
जमलंय.. जळलंय.. कुणाला पडलीये..
मोकळा तर झालो!!!

हाणला भात.. दाबल्या रोट्या
चविष्ट.. जळक्या.. वातट.. हलक्या..
एखादा लॉलिपॉप .. तोंडाला पाणी.. वा वा मस्त.. चान चान
डेझ्झर्ट नाही?.. कै च्या कै.. वेंगाडलं तोंड.. वा वा मस्त.. चान चान
काढतोय पट्टा.. सोडतोय बकलं.. कप्यासिटी.. वाढवतोय..
कोलेष्ट्राल वाढलं.. घटलं.. कुणाला पडलीये..
मोकळा तर झालो!!!

आलो गिळून.. आणलं गिळवून..
सांगायला नको.. जळवायला नको?
फेबुवर फोटो.. तोंडाला पाणी.. वा वा मस्त.. चान चान
आमाला नाही?.. कट्टी जा!!.. वेंगाडलं तोंड.. वा वा मस्त.. चान चान
वाव्वा rocking!.. मज्जायै!.. फक्त वेगळी नावं.. फोटो तसेच.. वेगळी लेबलं
अगदी दुष्ट.. एकदम पुष्ट.. कुणाला पडलीये..
मोकळा तर झालो!!!

*****************************************************
आलो.बसलो.
अवघडलं.. नाही जमलं.. ठिकेय..
इनो.. फायबर चॉईस.. इसबगोल.. वा वा मस्त.. चान चान
मारतोय झुरके.. काढतोय जोर.. ओढतोय कागद.. दाबतोय खटका
वा वा.. चान चान!
मोकळा तर झालो!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुज्ञ, चाणाक्ष इ. इ. वाचकांनी शीर्षकातला संदर्भ आणि पहिल्या शब्दाचा 'होण्यासाठी' ह्या अर्थाने लागू होणारा दुसरा अर्थ ओळखला असेलच :). कविता आवडली, ब्रिटिश ह्यांचा सुख म्हंजे नक्की काय आसतं? हा लेख आठवला ;).

शेवटी मेघना पेठे म्हणतात तसं 'होआवे लागे' हेच खरं म्हणा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचून मोकळा तर झालो!

प्रस्तूत कवितेत नायक हा आपल्या दररोजच्या कामाला वैतागलेला दिसत आहे. दररोजच्या पाट्या टाकून जीव शिणलेला आहे. घरी जावून सैपाक करायचाय, कपडे धुवायचेय असल्या कामांमुळे त्याचा जीव वैतागलेला दिसतो. बॅचलर लाईफ संपण्याच्या अन वैवाहिक जीवनाच्या उंबरठ्याकडे त्याची वाटचाल सुरू झालेली दिसत आहे.

पकाकाकांना पाहून आनंद झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही