हरवलेल्या प्रवासातील भरकटलेली तरुणी

प्रेरणा आणि आभारः http://www.aisiakshare.com/poetry

********

मी डोळे किलकिले करून उघडले तेव्हा डोक्यावरचं विस्तृत निळं आकाश नजरेत भरलं. संध्याकाळ होत आली असावी. माझं डोकं भयंकर ठणकत होतं. थंडगार खार्‍या वार्‍याचा वास माझ्या नाकात भिनला तशी मी धडपडून उठले. डोकं भरभरत होतं, शरीर हेलकावे खाल्ल्यागत हलत होतं.

"अगं आई गं!" डोकं गच्च धरून मी आजूबाजूला नजर फिरवली. समोर नजरेत सर्व काही येत होतं आणि तरीही काहीच येत नव्हतं... म्हणजे काय होत होतं? मलाच माहित नाही. अथांग पसरलेला निळाशार समुद्र. मी कुठे उभी होते? जहाजाच्या डेकवर? अं! मी इथे कुठे पोहोचले असा प्रश्न पडला. काहीच आठवत नव्हतं. "सुन्न झालो, सुन्न झाले" अशी वाक्य आतापर्यंत फक्त वाचली होती. सुन्न होणे म्हणजे काय याचा प्रत्यय आज येत होता. मी पुन्हा सभोवार नजर फिरवली.

डेकच्या कठड्याला गच्च धरून पांढर्‍या गणवेशातला एकजण स्थिर उभा होता. मी डुगडुगत, डुचमळतच त्याच्यापाशी गेले. तो दूर क्षितिजाकडे नजर लावून उभा होता आणि कविता म्हणत होता.

शुष्क सुपक विदग्ध
तुझ्या आठवणींत
मी यक्ष शापदग्ध

"दुग्ध" या शब्दापुढे फारशी माहिती नसणारी मी बहुधा त्याच्या जगात नसावी.

"उंअह्!" मी खाकरले तसा तो प्रश्नांकित नजरेनेच मागे वळला. "तुम्ही जहाजाचे कप्तान का?" मी प्रश्न केला तसा तो माझ्याकडे कुतूहलाने पाहू लागला. मी बेशुद्ध पडले होते हे याला माहित होते का? मला या जहाजावर आणण्यात याचा हात असावा का? अनेक प्रश्न डोक्यात पिंगा घालत होते.

"तूस्स्सी.." त्याने तोंड उघडले.

तूस्सी? माणूस पंजाबी असावा. मी आपला नेहमीप्रमाणे मराठी बाणा दाखवला होता. "ओह! माफ किजिये.. लेकिन अगर आप.."

"अहो मराठीत speak करा की. I am Maharashtrian."

"मग ते तूस्स्सी असं का म्हणालात? मला वाटलं की तुम्ही पंजाबी.. " माझ्याकडे आधीचेच चिक्कार प्रश्न होते त्यात हा आणखी एक आगंतुक प्रश्न.

" नो नो नो नो नो" क्रूरपणे नकाराचं जबरदस्त फायरिंग माझ्या आधीच डुचमळलेल्या मनावर करत तो पुढे म्हणाला, "मला इंग्लीशमध्ये मराठी mix करायला आवडतं. तू see, ही माझी passion आहे. काही Folks मराठी बोलताना इंग्लीश mix करतात. मी इंग्लीश बोलताना मराठी mix करतो."

"म्हणजे तुम्ही मराठी आणि इंग्लीश दोन्हींची आयमाय करता? असं का बरं?"

"You won't get it. कारणं तुला दुर्बोध वाटतील. Let it जाऊ दे!" दुसर्‍या शब्दांत 'माइंड योर ओन बिझनेस' असा अर्थ घ्यायचा तो मी घेतलाच.

"बरं.. पण तुम्ही कोण? आपण कुठे चाललोय? आणि का,कधी ,केव्हा, कुठे, कशाला, कोणासाठी?" मी एका दमात सर्व प्रश्न केले. या माणसाने माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं आता द्यायलाच हवी होती. अंधारून येत होतं. मला उगीच अस्वस्थ वाटू लागलं होतं. मीही याच्याबरोबर इंग्रजी-मराठीची आयमाय करत बोलावं का? अरेरे! किती वाह्यात प्रश्न डोक्यात भरत होते. नवीन कल्पना किती चटकन आपल्या विदग्ध मनाचा ठाव घेऊ शकतात नाही! वा! वा! मी लगेच विदग्धचा वाक्यात प्रयोग केला होता. माझं मलाच कौतुक वाटलं.

"मी या हरवलेल्या जहाजाचा कप्तान." तो हळूच माझ्या कानापाशी येऊन पुटपुटला.

"हरवलेल्या?" मी तारस्वरात विचारलं. हरवलेल्या म्हणजे काय? मला वाटत होतं की मी हरवले आहे. इथे तर आख्खं जहाज हरवलं होतं. अरे बापरे! "अहो नक्की कोण हरवलं आहे?" मी पुन्हा विचारलं पण समोर कोणीच उभं नव्हतं. कप्तान जसा काही हवेत विरून गेला होता. अरे देवा रे! या अथांग समुद्रात एका जहाजात मी डेकवर उभी, इथे कशी आणि का आले ते मला आठवत नाही, कप्तान अंतर्धान पावतो. मी पुन्हा नजर फिरवली. यावेळेस जहाजाच्या दिशेने.

जहाजावर एक मोठ्ठं होर्डिंग लावलंय. जॉनचं. अर्धनग्नावस्थेत. गालावर हात फिरवत... "सॉफ्ट अँड सिल्की फील" असं म्हणतोय जॉन. मी हपापून बघत राहते. गालाकडे नै कै, त्याच्या खपाटीला गेलेल्या पोटाकडे आणि तिथून सरकलेल्या... भुकेचा डोंब उसळतो. ... हं! हं! पोटात... Meatloaf च्या आठवणीनं... बूम बूम बॅंग बँग! भर अथांग समुद्रात जॉनचं भलमोठं होर्डिंग कसली जाहीरात करत होतं? आणि कोणासाठी? की हा देखील मोकळं होण्याचा एक प्रयत्न असावा? शॅ! आणखी काही विचलीत करणारे प्रश्न...

--------

आता अंधारून आलंय. मी वेड्यासारखी कुडकुडत अद्यापही डेकवर उभी आहे. क्षितिजावर अंधार दाटला आहे. एखादं वटवाघूळ पंख फैलावून आसंमत व्यापून टाकत आहे असा भास होतो आहे. आपण कुठे चाललोय याचा पत्ताच नाही. अंधारातच लाल रंगाचा टोरुक पक्षी फडफडत उडत जातो. मी दचकते. या भर समुद्रात पक्षी? इथे काय करत असावा? च्यामारी! मी हरवल्ये, जहाज हरवलंय की पक्षी हरवलाय? टोरूक पक्षी असतो? मग त्याला क्रिचर का म्हणतात? सर्व पक्षी क्रिचर असतात पण सर्व क्रिचर पक्षी नसतात. अगं आई गं! आणखी किती Avatar बघायचे? कोणत्या fantasy land मध्ये वावरतो आहोत आपण? समोरून कोणीतरी चालत येत असतं. नक्की कोण ते अंधारात दिसत नाही तरीही मी डोळे फाडून बघते.

लांबसडक पांढरे केस मोकळे सोडलेली, सुरकुतलेल्या कांतीची, कमरेत वाकलेली ती किरिस्ताव म्हातारी माझ्या समोर पावला पावलांनी सरकत उभी ठाकते. पांढर्‍या झग्यातून तिची काळी पिशवी हलवते आणि आशाळभूतपणे माझ्याकडे बघून हसते. तिचे पुढचे दोन दात पडलेले आहेत. मी जागच्या जागी थरथर कापायला लागते. म्हातारीला बघून नाही... तिचा तो तोकडा झगा बघून... अय्याईईईई!

त्या तोकड्या झग्यातून दिसणार्‍या तिच्या त्या सुरकुतलेल्या, थरथरणार्‍या मांड्या पाहून माझी भीतीने गाळण उडाली आहे. "आपण जायचं ना कलकत्ता ब्रॉथेलला!" छद्मी हसत म्हातारी उद्गारते.

"म... म.... मला नाही जायचं ब्रॉथेलला. " मी हिम्मत करून म्हणते.

"कामाठीपुर्‍याच्या स्ट्रीटलाईटखाली लिपस्टीक लावून आपण उभे होतो तेव्हाच नाही का ठरलं की पुढला स्टॉप कलकत्ता ब्रॉथेल!" म्हातारीच्या डोळ्यांतून लुच्चेपणा टपकत असतो.

"ए..ए.ए.ए काहीतरीच काय? मी आणि तू एकत्र? एका स्ट्रीटलाइटखाली? Impossible." कामाठीपुर्‍यापेक्षा त्या म्हातारीसोबत एका स्ट्रीटलाइट खाली उभं राहण्याची कल्पना भयानक होती. " हे जहाज हरवलंय ना, मग कलकत्त्याला कसं निघालंय हे कसं माहित तुला?" मी धीर करून विचारते पण उत्तर द्यायला म्हातारी समोर नसते.

-----------

धूसर चेहर्‍याचा कोणीतरी आणखी एक जण डेकवर स्वतःच्याच तंद्रीत चालताना दिसतो.

"प्लीज, हेल्प मी!" मी जोरात ओरडून, हात हलवते. त्याला माझी जाणीव झाली असावी पण तो डोकं खाली करून म्हणतो, "I don't know anything."

काहीच कारण नसतानाही मी त्याच्या I don't know anything चा आशय समजून घेण्याचा प्रयत्न करते. डोंबल माझं! हा ही माझ्यासारखाच हरवलेला असावा...

"अहो, इथे या जहाजावर आणखी माणसं आहेत का?"

"चारजण आहेत... बट, I don't know anything."

"चारजण कोण आहेत? बाया की पुरूष?" ती म्हातारी ब्रॉथेलला निघालोय म्हणत होती... बापरे! बायाच असाव्या. मी "डोन्ट नो"वाली अक्कल चालवते.

"बाई की पुरूष काय फरक पडतो? प्रत्येक बाईत पुरूष आणि पुरूषात बाई असते पण त्यापुढे I don't know anything."

माझ्या डोक्याची १०० शकलं होऊन माझ्या पायाशी लोळण घ्यायचीच बाकी राहिली आहेत. मी हात जोडून काकुळतेने विनंती करते. "प्लीज, तुम्हीही अंतर्धान पावाल का?"

----------

मी त्या चारजणांच्या शोध घ्यायला जहाजात एण्ट्री घेते. एखाद्या जुन्या काळपट पडलेल्या गुहेत शिरल्यासारखं वाटतं. गुहेच्या दुसर्‍या टोकाशी ते चारजण उभे आहेत. माझ्या इफ, देन, एल्सच्या सर्व कंडिशन्स सोडवत मी त्यांना विचारते, "मी कुठे आहे? आपण कुठे चाललोय? मी इथे कशी आले?" बोलताना माझ्या कातडीला चिकटून निथळत असतो... घाम!

एकजण पुढे सरकतो. त्याचं टक्कल ओळखीचं वाटतं. "मला इथून बाहेर पडायचंय हो?

"Are you sure?" त्याने धीरगंभीर आवाजात confirmation विचारले जाते आणि मी गदागदा मान हलवते.

"I have an offer you can't refuse!"

"सांगा..."

"आमच्याकडे spare फ्लोटर्स आहेत."

"ती माझ्याकडेही आहे हो." मी माझ्या डोळ्यातल्या कोळ्यांच्या जाळ्यातून पायातल्या फ्लोटर्सकडे पाहत म्हणते.

"आम्ही स्विमिंग फ्लोटर्सबद्दल बोलतोय. आमच्याकडे spare फ्लोटर्स आहेत. तुम्ही ते घेऊन जहाजातून फुटू शकता. बोला.. डील ऑर नो डील?"

गुहेच्या दुसर्‍या टोकाशी show संपलेला असतो.

------

एक जबरदस्त शिवी हासडून मी पुन्हा लुब्रिकंटच्या बुळबुळीत surface वरून slide होत गुहेच्या बाहेर येते. डोक्याच्या बारीक, बारीक ठिकर्‍या उडतील असं वाटतं. अंतर्धान पावलेल्या प्रवाशांच्या भेसुर नजरांचे बलात्कार चुकवत मी पुन्हा डेकवर पोहोचते. जहाज हरवलेले असले तरी जहाजावरचे सर्व प्रवासी भरकटलेले असावेत. एक distress signal पाठवता आला असता तर जिवाच्या आकांताने "मे-डे, मे-डे, कॉलिंग घासूगुर्जी" असा संदेश पाठवला असता पण पुन्हा उठून त्या काळपट गुहेतून आत डोकावायचे त्राण शिल्लक नाही.

बाहेर अंधार आणि शांतता भरून राहिली आहे. नसलेल्या painful but not yet fatal जखमांचे व्रण चाटत, पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधत, टोरुकप्रमाणेच डोक्यावरून उडत जाणार्‍या बान्शीशी interconnectedness साधण्याचे स्वप्न पाहत मीही हरवलेल्या जहाजातून करते आहे. सोबत उललेल्या मनाने जहाजासारखं डुचमळू नये म्हणून मनःशांती करता "तोमास त्रांसतोमर" या नामजपाचा उच्चार सतत सुरु आहे.

(क्रमशः)

पुढला भाग पुढच्या कविता आल्यावर...

field_vote: 
4.166665
Your rating: None Average: 4.2 (6 votes)

प्रतिक्रिया

भरकटलेल्या तरुणीचं भानावर असल्यागत लिहलेलं आवडलं. तरी नवीन मुखवटा घालून यायची काय गरज होती ते काही कळ्ळं नाही ब्वॉ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

आईला!!!!! ROFL फुटले!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजाब्बाट काहीच नै बोल्नार परत! बाप्रे!! मेंबर्शीप ३ तास १८ मिन्टं? अन ह्ये अस्लं जहाल लिखाण??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मेंबर्शीप ३ तास १८ मिन्टं? अन ह्ये अस्लं जहाल लिखाण??

हो ना! किती हा वाह्यातपणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लांब झग्याखाली लोकं काय काय दडवतात कोण जाणे!

असो. लिखाण मजेशीर आहे. मूळ कविता कधी समजणार .... <समजणार काव्य कधी कुठवर साहू घाव शिरी>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लांब झग्याखाली लोकं काय काय दडवतात कोण जाणे!

काही का दडवेना, मला तर तुझा झगा गं, झगा गं वार्‍यावर उडतोय हे अप्रतिम गाणं आठवलं बघ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

मजेशीर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अफाट लिहिलय.
आता मुखवटा उतरवून लिहा पुन्हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

पहिल्यच लेखनात दिला की नाही लेको दनका!
मस्त!

'ऐअ' वर स्वागत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फुटले

ROFL =))=))=))=))=))
=))=))=))=))=))=))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

मी ओळखलं तुम्हाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगळा आयडी घेवून लिहिलं म्हणजे आम्ही ओळखणार नाही असं वाटलं की काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

प्रतिसादांसाठी धन्यवाद. प्रतिसाद देणारे सर्व भरकटलेले दिसतात.

मुखवटा उतरवा सांगणार्‍यांना विनंती की आज मुखवटा उतरवायला सांगताय, उद्या झगा उतरवायला सांगाल, तेव्हा असे करू नका. या सुसंस्कृत मराठी स्थळावर हे शोभत नाही.

काही बायांना आम्ही कोण हे कळले आहे तो त्यांचा जळफळाट असावा. लांब झगा आणि तरुण हे दोन्ही शब्द त्यांना बोचण्यासारखे वाटले असावे. Wink

----------

मंडळी, तुम्ही आयडीला प्रतिसाद का देता? तेच ते चान..चान! प्रतिसाद लेखाला द्या. तुम्ही मला ओळखलं असेल तर व्यनि करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लांब झग्यातल्या 'म' ताईंनी भरकटलेल्या तरूणीची कथा "लई झ्याक" लिवली हाय. अगदी एक नंबर
आता हे जहाज परत हरवू नका ..

ता.क. मुखवटा उतरवू नये ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

जोवर ही असली कसदार लिखाणं त्या आयडीतून येत आहेत तोवर त्या झग्याखाली, आयडीखाली काय दडलंय याच्याशी काय देणंघेणं आहे! वेळ आल्यावर आयडीमागची जिवंत व्यक्ती कळवीलच की, आता ठणठण(गो)पाळ करून काय उपयोग?

लांब झग्यातल्या मॉडर्न तरूणी, तू तुझ्या या बुरख्याआडून लिहीत राहा. जन काय, पळभर म्हणतील काय काय! तू जाता फाडील काव्य कोण? झकास चालू आहे! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जन काय, पळभर म्हणतील काय काय! तू जाता फाडील काव्य कोण?

मस्त. आपल्याला म्हणायचं ते आधीच कोणीतरी नेमक्या शब्दात म्हणून ठेवलेलं असलं की आयुष्य सोपं होऊन जातं. मूळ लेखाविषयी देखील हेच लागू आहे.

थोडं गंभीरपणे बोलायचं झालं, तर जहाजं हरवली आहेत की कुठल्यातरी भलत्याच अगम्य प्रवासाला चालली आहेत हे कळायला कधीकधी मार्ग नसतो. त्यात ती सरळ न जाता दिशांनाच आव्हान दिल्याप्रमाणे गोल फेऱ्या मारत, रिंगण घालत जायला लागली तर आणखीनच प्रश्न पडतात. असा काहीसा तऱ्हेवाईक मार्ग निवडायला काहीच हरकत नसते. कारण शेवटी बंदरावर पोचण्याइतकाच प्रवास महत्त्वाचा असतो.

भरकटणं म्हणजे काय या विषयावरती मूळ लेखात अत्यंत मार्मिक आणि अभ्यासपूर्वक टीका केलेली आहे. प्रचंड विनोदी लिहिला आहे ही तर मोठ्ठी जमेची बाजू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भयंकर इनोदी ! कवींना धावेळा विचार करून कविता टाकाव्या लागतीलसं दिसतंय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धम्माल लिहिलय. आता बाकीच्यांना सावध व्हायला हवं. कारण जुनी नावं प्रचलित असल्याने बरेच जण एकमेकांना ओळखतात. त्यामुळे आता अशी टिका करण्यासाठी सगळे जण नवीन नाव घेतील. नवीन येणारी कोणतीही कविता या अशांसाठी त्यांच्या लेखनाचा कच्चा माल ठरु शकते. त्यामुळे संस्थळाचे गंभीरपण कितपत टिकुन राहील हा साधा प्रश्न मला पडला. ( मी इथे नवी आहे.मी स्वतः इथे लिहिणार होते परंतु आता हिंमत होत नाही. नव्या येणार्‍या कोणालाही असे वाटणे साहजिक आहे.असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बेभान लोकांनी असल्या कच्च्या अन पक्क्या मालाचे भान कशाला ठेवावे म्हणतो मी? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मग काय करावे? चिरफाड होऊ द्यावी का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशी एक कथा आहे, वाचली/ऐकली आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ही घे रे निळ्या, आमच्या गुर्जींनी आधीच प्रतिसादात लिहून ठेवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लिहायचं तर बिनदिक्कत लिहा, लोक काय म्हणतील किंवा लिहतील ह्याची चिंता का करावी? चांगलं असेल तर नक्कीच कौतुक होईल. वरच्या लेखात मला टिका दिसली नाही. तुम्हाला नक्की काय खुपलं ते सांगा ना बाकी कीस कशाला पाडताय? आणि जरी वरच्या लेखात टिका असली तरी आपल्यावर होणारी टिका सकारात्मकपणे घेता येत नसेल तर न लिहिलेलेच बरे. तुम्ही नव्या असाल किंवा जुन्या, दुसर्‍यांचे लेखन तुमच्या लेखनाकरता मारक ठरू नये. बाकी तुम्ही समंजस असालच.

आणि वरच्या सदस्याने नवीन नाव घेतलं हा एक अंदाज आहे, हा एक खरोखर नवा आयडी असू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

अनामिकशी सहमत.

खरोखर चांगल्या लिखाणाचीही प्रशंसा करता येते तशीच थट्टाही करता येते आणि ती एकप्रकारे चांगल्या लेखनाला दिलेली पावतीच असते. थट्टा वेगळी आणि टीका वेगळी. लोकांनी आपल्या लिखाणावर काही लिहू नये अशी अपेक्षा असेल तर ते प्रसिद्धच करू नये. पण प्रसिद्ध केल्यावर लिखाणाची प्रशंसाच झाली पाहिजे आणि कोणी थट्टा करू नये ही अपेक्षा अवास्तव आहे.

या लेखात केलेली थट्टा कुणा जुन्या सदस्याने केलेली असेलच तर नवीन नाव घेण्यामागे, माझ्या मते, उद्देश हाच असावा की आपल्या मैत्री आणि/किंवा आधीच्या लिखाणाच्या पूर्वपुण्याईमुळे या लेखनाला प्रसिद्धी मिळू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लांब झग्यातल्या मॉडर्न तरुणीने झग्याआडून घेतलेले चिमटे गमतीदार आहेत. होर्डिंगच्या भागात जहाजाच्या डेकवरून लांब झग्यातला पाय घसरतो की काय असे वाटले पण छान तोल सावरला. होर्डिंगवाला भाग विशेष 'भावला'.
बाकी कोणी काय उतरवून काय चढवलंय यात आम्हाला रस नाही. लांब झगा असो वा बिकिनी, आम्हाला काय दिसेल ते शब्दसौंदर्य पाहाण्यात रस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

५-६ कवितांना एकत्रितपणे दिलेला हा प्रतिसाद फार भारी आहे. आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शतशः नमन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते