शेटजी

संजय हा शेटजीचा वफादार नोकर होता, त्याने शेटजीजवळ सुमारे दहा वर्ष सेवा देत होता.शेटजीचा त्याच्यावर विश्वास होता पण त्याचा विश्वास शेटजीवर नव्हता. पण तो शेटजीशी व्यवाहारानी वाग़त, शेटजीचा व्यवसाय चांदीचा होता.तेथे संजय हीशोब पाहत आसे,एक एक पैशाचा हीशोब शेटला देत आसे.
काही दिवसानी संजयला आपला ही धंदा आसावा आसे वाटत होते.पण पैशाच्या कमी पणामुळे तो काही करत नव्हता.
एकदा सुट्टीच्या दिवशी संजय आपल्या पत्नी सोबत जेवत होता,
पत्नीने विचारले,' खुप शांत आहात, काही झाले का?'
'हो , मी तसा बरा आहे पण मला वाटतं आपण कीती दिवस शेट जवळ काम करायचे',संजय म्हणाला,
'तुम्हाला काय म्हणायचे आहे?'पत्नीने शांतपणे विचारले,
'फक्त मला ही वाटते आपण शेट व्हावे', संजय आत्मविश्वासाने म्हणाला,
'पण शेट व्हायला तुमच्या जवळ आहे तरी काय?',पत्नीने विचारले,
'काय नाही काही नसो मी शेट होणारच,'संजय म्हणाला,
दुसर्या दिवशी संजय शेटकडे काही पैशाची माग़णी केली , ते शेटजीने दिले, घरी जाताना मिठाई, नवे कपडे इ त्याने शेटजीच्या घरात जे आसते तसे घेतले,
घरी पत्नीने आश्चर्ययाने म्हणाली,' हे काय इतके पैसे आले कोठुन?'
'कोठुन म्हणजे एका शेट दुसर्या शेटला पैसे दिलेत,'संजय म्हणाला,
'तुम्ही आणि शेट ह्या वस्तु पाहुन तर वाटते शेटजी',पत्नीने हासुन उत्तर दिले,
पुढे काही महिने आसेच चैनी करुन दिवस काढत होता, शेटजी कडुन वरचेवर पैसे घेत होता,घरी आल्यावर पत्नी त्याला शेटजी म्हणुन संजयचा रुबाब वाढवत होती.
इकडे संजयच्या वाग़ण्यात बरात बदल शेटजीला दिसत होता,
एक दिवस शेटजी संजय कामावर आसताना त्याच्या घरी ग़ेला , त्याची पत्नीने खिडकीतुनच त्या शेटला पाहीले, आणि नेहमी नवीन नेसणारी साडी काढुण पुर्वीची जुनी साडी नेसली,शेट घरी येताच त्याने संजय विषयी चौकशी केली, मग़ त्याच्या पत्नीने सर्व हाकीकत सांग़ितली,
शेटला सर्व कळाले आणि त्याने मी इकडे आल्याचे न सांग़ण्यास सांग़ितले.
दुसर्या दिवशी जेव्हा संजय कामावर ग़ेला तेव्हा त्याला शेट म्हणाला,'जरा हिशोब घेऊन या',
आचानक मालकाने हीशोब माग़ितल्याने त्याला नवल वाटले,हिशोब घेउन तेथे ग़ेल्यावर एक तास संजयशी बसुन हीशोब तपासनी केली,आणि आनंदाची मुद्रा करत शेट म्हणाले ,'तु तर शेट पेक्षा हुषार आहेस खरा शेट तर तुच आहेस',
संजयचा चेहरा लाजला ग़ेला , अाणि त्याने मान खाली घातली,
घरी ग़ेल्यावर पत्नी म्हणाली,' शेट नाराज दिसतात आज?'
'शेट आणि मी नाही , मला नाही व्हांयच शेट,मी आपला संजयच बरा,' संजय नाराज आवाजात म्हणाला,
पत्नी म्हणाली,' काय झालं आसं का?'
आग़ं शेटने आज माग़ील सर्व हीशोब तपासले आणि माझ्या खुप चुका झालेल्या दिसल्या आणि शेटनं, माझा पग़ार कट केला,'संजय म्हणाला,
'कामावरुन काढले नाही ना?'पत्नीने विचारले,
'बरे झाले तसे घडले नाही ते' नाहीतर मी तर आज रस्त्यावर आलो आसतो बरं आज नशिबाने वाचलो आहे आता शेट वैग़ेरे म्हणायचे बंद कर',संजय म्हणाला,
'पण माझ्या साठी तुम्हीच माझे शेट आहात,'पत्नीने हासुन म्हटले,

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे नक्की काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

रतीब Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"पंचतंत्र" किंवा "जातक कथा" असा लेखनप्रकार हवा.

अवांतर - बायको मात्र ड्यांबिस वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0