श्रावण मोडक - काही मोडक्यातोडक्या नोंदी

श्रावणची पहिली ओळख झाली ती आंतरजालावरूनच, आणि तीही दुरूनच, म्हणजे एखाद्या धाग्यात आलेल्या प्रतिसादापुरती; खरडी, व्यनिंतून वगैरे नाही. आंतरजालावरच्या वावरावरून एखाद्या व्यक्तीविषयी फारसे आडाखे बांधायला मला अावडत नाही. कारण एखाद्याचं लिखाण आवडलं म्हणून व्यक्तीशी जुळेल असं नाही; आणि लिखाण खास वाटलं नाही म्हणून व्यक्तीशी संवाद होणार नाही असंही नाही. तरीही आडाखे बांधले जातातच. त्यात आंतरजालावर पुष्कळ तथाकथित लेखकांची उगीचच आणि गरजेपेक्षा फार जास्त स्तुती केली जाते असाही माझा अनुभव होता. तशी पत्रकार, किंवा डाव्या विचारांची, चळवळीत असणारी, अगदी नर्मदा आंदोलनात सहभागी असणारी माणसंसुद्धा माझ्या ओळखीत होती. त्यामुळे त्याचंही मला काही नावीन्य नव्हतं. स्वत:हून जाऊन श्रावणशी ओळख करून घ्यावी असं त्यामुळे माझ्या स्वप्नातदेखील कधी आलं नव्हतं. आणि अंगी असलेला जन्मजात उद्धटपणा तर असा काही टोकाचा होता, की ज्यांचं उगीच स्तोम माजवलं जातं आणि भक्तांच्या गराड्यात जे स्वत:वरच खूष राहतात अशा असंख्य भोंदू व्यक्तींपैकी हे आणखी एक असणार, म्हणून त्यांच्यापासून लांबच राहिलेलं बरं अशी खूणगाठ मनात कधीपासूनच बांधून ठेवली गेली होती.

ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा प्रत्यक्ष भेट झाली, तेव्हा सुरुवातीला मी फक्त एकच केलं, आणि ते म्हणजे तोंडदेखलं हसून सभ्यतेच्या मर्यादेत गरजेपुरतं किंचित संभाषण. तिथे असणाऱ्या इतरांना तेव्हा ते कितपत लक्षात आलं असेल, आणि आता ते कितपत आठवत असेल ते मला माहीत नाही. आणि माझा हा अॅटिट्यूड नक्की कधी गळून पडला, पहिल्या भेटीत (ती बहुधा रात्रभर चालली होती), की दुसऱ्या की तिसऱ्या, ते मला आठवत नाही. हळूहळू माझ्या नकळत असं होऊ लागलं, की मराठी आंतरजालावरच्या कुणालातरी भेटायचा प्रसंग असो, की गरीबांच्या हॉस्टेलवर उगीचच (आणि अर्थात ओला!) अड्डा ठोकायचा प्रसंग असो; मोडक असतील ना, हे मी हळूच विचारून घेई आणि त्यावरून जायचं की नाही ते ठरवे. ते असतील, तर बाकी कुणी असोत-नसोत, त्यांच्याबरोबर गप्पा मारता येतील म्हणून मी खुशाल जात असे; आणि अनेकदा असं झालंदेखील - म्हणजे बाकी कट्टा ठीकठाक झाला, पण मोडकांबरोबर वेळ मस्त गेला.

जेव्हा हे घडलं, तेव्हा ते हळूहळू आणि आपसूक घडत गेलं. म्हणजे मुद्दाम त्याबद्दल काही विचार झाला नाही. पण नंतर जेव्हा विचार झाला, की हे नक्की कसं आणि का होतं आहे, तेव्हा लक्षात येऊ लागलं की हे घडणं अगदी स्वाभाविक होतं. असं का झालं असेल?

अॉस्कर वाइल्ड एका ठिकाणी म्हणून गेला आहे -

Action is limited and relative. Unlimited and absolute is the vision of him who sits at ease and watches, who walks in loneliness and dreams. But we who are born at the close of this wonderful age are at once too cultured and too critical, too intellectually subtle and too curious of exquisite pleasures, to accept any speculations about life in exchange for life itself.

तशा काहीशा धर्तीत ते होत गेलं. म्हणजे असं, की मोडक डावे किंवा चळवळीतले असल्यामुळे काहींचे त्यांच्याशी स्पष्ट मतभेद होते, तर काहींना त्याविषयी स्पष्ट, पण अगदी मध्यमवर्गीय (म्हणजे लांब राहून, आणि आपलं सगळं काही, म्हणजे संसार-लाइफस्टाइल वगैरे, सांभाळून झेपेल इतपतच) आकर्षण होतं. त्या दोन्ही दिशांशी माझा परिचय होता, पण मी त्या दोन्हींत मोडत नव्हतो. मी इतका लहानही नव्हतो की ते मला गुरुस्थानी वगैरे वाटावेत. अनेक डाव्यांशी माझे आधीही मतभेद होते आणि आताही आहेत. सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या अनेकांचे मातीचे पाय, खोटारडेपणा आणि वैचारिक गोंधळ मी जवळून पाहिले आहेत. (पण अर्थात उजव्यांबद्दलही मी हेच म्हणू शकतो. उजव्या लोकांमध्ये मी डावा म्हटलो जायचो, आणि डाव्या लोकांमध्ये उजवा. असो.) प्रत्यक्ष कृती आवश्यकच, असं मोडक मानत आणि मी पडलो पक्का कृतिहीन (पक्षी : विचारजंत!). पण मग मी त्यांना कृती करताना नव्हे, तर वरच्या उद्धृतातल्यासारखं, म्हणजे शांतपणे बसून फक्त पाहताना पाहिलं. अनेकदा असं झालं की समोर चाललेलं ते आणि मी दोघेही पाहत असू, आणि आमच्यात एक अक्षरही न बोललं जाता, केवळ एखाद्या कटाक्षानं संवाद होई. कधी कधी असं होई, की आम्ही दोघं इतरांबरोबरच, एका गटाचा भाग म्हणून बोलत असू, पण असं वाटे की मी बोलतोय ते त्यांनाच समजतंय आणि ते बोलताहेत ते मलाच. म्हणजे इतरांना त्यातले फक्त किरकोळ तपशीलच जाणवत आणि त्यावरच ते प्रतिक्रिया देत बसत, तर आम्हाला त्यातून त्या तपशीलांपलीकडचं काहीतरी म्हणायचं असे आणि ते सगळ्यांसमोर घडत असूनही फक्त आमच्यापुरतंच राही. आता मी काय, किंवा ते काय, आम्ही अजिबातच अाध्यात्मिक वगैरे नव्हतो, किंवा तसे एकमेकांच्या प्रेमात वगैरेदेखील नव्हतो. पण हे किती गंमतीशीर आणि आनंददायी आणि दुर्मिळ असतं, ते ज्यांना ह्याचा अनुभव आहे त्यांनाच कळू शकेल. (हे असलं धूसर बोलणं बुद्धिभेदी किती वेळा वापरतात ते मला चांगलंच माहीत आहे, पण मला तरी त्याचं याहून वेगळं वर्णन करता येणार नाही.) उदाहरणार्थ, महिन्याभरापूर्वी आम्ही शेवटचं भेटलो तेव्हाही असंच झालं. 'तुला काही कळत नाही; तू मूर्खासारखं बोलतोयस' असं एका प्रौढ माणसाच्या तोंडावर त्याला स्पष्ट म्हणण्याऐवजी मी त्याला फक्त काही प्रश्न विचारले. ते इतके दैनंदिन वाटावेत असे होते, आणि इतर इतक्या गप्पांच्या अधेमधे येऊन गेले, की तिऱ्हाइताला तर त्यांमागचा समान धागाच दिसला नसता. पण इतर शिळोप्याच्या गप्पांत योग्य तो प्रश्न माझ्याकडून आला आणि त्याला अपेक्षित उत्तर समोरच्याकडून आलं, की समोर बसलेले मोडक शांतपणे त्यांचं ते खास मिश्कील हसत होते आणि एका नजरेनं मला दाखवून देत होते, की तू स्वत:ला कितीही हुशार समजत असलास, तरी मला पक्कं कळतंय तुझं काय चाललंय ते. आणि गंमत म्हणजे कदाचित मोडकांची ओळख होण्यापूर्वी मी त्या माणसाला 'तुला काही कळत नाही; तू मूर्खासारखं बोलतोयस' असं उद्दामपणे तोंडावर सांगितलं असतं आणि स्वत:कडे कटूपणा ओढवून घेतला असता. म्हणजे कळत-नकळत माझ्यावर त्यांच्या शैलीचा प्रभाव पडला होता आणि बहुतेक हेसुद्धा लक्षात येऊन ते त्यांचं गोड हसू खुदकन हसत असणार.

सगळे मर्त्य असतात, तसे मोडकदेखील होते. जवळचं कुणीही गेलं तर दु:ख होतंच. कुणाचाच त्याला इलाज नसतो. मोडकांसारखं होणं तर मला बापजन्मात जमण्यातलं नाही. पण 'त्यांच्यासारखं' म्हणजे काय, हे कळून घेण्याचा प्रयत्न नक्की करता येईल. त्यांना माणसांत इतका रस होता, आणि ती त्यांना इतकी चांगली आकळायची, की प्रत्यक्ष पाहिलं नसतं तर मला ते अविश्वसनीयच वाटलं असतं. आणि इतकं कळत असूनदेखील माणसाचं माणूस असणं एवढंच त्याच्याशी संवाद आणि जवळीक साधण्यासाठी पुरेसं असतं हेदेखील त्यांना कळलं होतं. हे फार म्हणजे फार महत्त्वाचं असतं, आणि ते माझ्यात किती अभावानं आहे हे मला त्यांच्याकडे बघतबघत कळत गेलं. त्यांनी माणूसजातीच्या ठायी पाहिलं तितकं दु:ख आणि तितका अन्याय मी पाहिलेला नाही. तो पाहायची आणि पचवायची माझ्यात ताकदच नाही. ते पाहून कडवटपणा, चीड आणि नैराश्यच अंगी भिनणं खूप स्वाभाविक होतं. तरीही मोडक रसरशीत आणि हसतमुख असत. एवढ्यातेवढ्याशानं शिरा ताणण्याऐवजी किंवा कपाळावर आठ्या आणण्याऐवजी जमेल तितकी आयुष्याची रेवडीच ते उडवत असत. हे फार दुर्मिळ असतं. मानवी अस्तित्व हे मूलत: कार्यकारणहीन असतं आणि विशिष्ट पातळीहून जास्त संबद्धता त्याला देता येणं अशक्य असतं हे ज्यांना कळलेलं असतं त्यांचं असं असणं हे तर दुर्मिळाहून दुर्मिळ असतं. अशा ह्या माझ्या दुर्मिळ सुहृदाला माझी ही मोडकीतोडकी, माझ्या मगदुराच्या मर्यादेत केलेली, पण विनम्र श्रद्धांजली.

field_vote: 
4.8
Your rating: None Average: 4.8 (5 votes)

प्रतिक्रिया

_/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रद्धांजली आवडली.पटली देखील. आत्ता मी त्यांच्याशी मनातल्या मनात बोलतो आहे. श्रामो अहो तुम्हाला श्रद्धांजली वाहताना आमच्या अंनिस तल्या लोकांनी त्याला श्रद्धांजली न म्हणता आदरांजली म्हणल असत. श्रद्धा शब्दाच वावड आहे ना! त्यावर श्रामो मंद मिश्किल हसले असते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

पण मी तर लाल सलाम ठोकणार होतो. मग म्हटलं की ते अगदीच माओवादी होईल आणि मग इतक्या डावीकडे माझं वळणं मोडकांना रुचणार नाही. त्यापेक्षा किंचित उजवीकडे वळलेलं काय वाईट?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सुरेख!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांना माणसांत इतका रस होता, आणि ती त्यांना इतकी चांगली आकळायची, की प्रत्यक्ष पाहिलं नसतं तर मला ते अविश्वसनीयच वाटलं असतं. आणि इतकं कळत असूनदेखील माणसाचं माणूस असणं एवढंच त्याच्याशी संवाद आणि जवळीक साधण्यासाठी पुरेसं असतं हेदेखील त्यांना कळलं होतं. हे फार म्हणजे फार महत्त्वाचं असतं, आणि ते माझ्यात किती अभावानं आहे हे मला त्यांच्याकडे बघतबघत कळत गेलं. त्यांनी माणूसजातीच्या ठायी पाहिलं तितकं दु:ख आणि तितका अन्याय मी पाहिलेला नाही. तो पाहायची आणि पचवायची माझ्यात ताकदच नाही. ते पाहून कडवटपणा, चीड आणि नैराश्यच अंगी भिनणं खूप स्वाभाविक होतं. तरीही मोडक रसरशीत आणि हसतमुख असत. एवढ्यातेवढ्याशानं शिरा ताणण्याऐवजी किंवा कपाळावर आठ्या आणण्याऐवजी जमेल तितकी आयुष्याची रेवडीच ते उडवत असत. हे फार दुर्मिळ असतं. मानवी अस्तित्व हे मूलत: कार्यकारणहीन असतं आणि विशिष्ट पातळीहून जास्त संबद्धता त्याला देता येणं अशक्य असतं हे ज्यांना कळलेलं असतं त्यांचं असं असणं हे तर दुर्मिळाहून दुर्मिळ असतं.

अगदी नेमकं. खुद्द मोडकांनीही यावर सूचक, पसंतीदर्शक मान डोलावली असती असं वाटून गेलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि नंतर चॅटवर "हा जंतू आज का एवढा गोड बोलतोय?" अशी खवचट चौकशी केली असती.

ठरवलं तरीही श्रावणकडून काय काय शिकता येणार नाही हे अजूनही समजतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तर आम्हाला त्यातून त्या तपशीलांपलीकडचं काहीतरी म्हणायचं असे आणि ते सगळ्यांसमोर घडत असूनही फक्त आमच्यापुरतंच राही.

ह्याला भाग्य असावं लागतं. त्यांच्या जाण्याची खंत आहेच पण त्याहीपेक्षा हे असं कोणीतरी शब्दाविना संवाद साधणारं जाणं जरा जास्तच त्रासदायक वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रामोंचं व्यक्तिमत्व छान उलगडून दाखवले आहे तुम्ही. आणि तुमचा प्रामाणिकपणा तर भिडला. 'जीवन त्यांना कळले हो' या प्रकारच्या व्यक्तिंमधे श्रामो चपखल बसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्याला यायच्या आधीच श्रामो एक-दोनदा भेटले होते. इथे आल्यावर भेटींची फ्रिक्वेन्सी किंचित वाढली. घर आणि ऑफिस यांच्यातील जवळीक भेटींना पोषक ठरली.
त्यांचं व्यक्तीमत्त्व तुम्ही अगदीच नेमकं मांडलं आहे.. आभार!

श्रमोंना पुन्हा श्रद्धांजली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुमच्यातला अनोखा भावबंध तुम्ही फार नेमका उलगडून दाखवला आहे .त्यांचे लेखन
मला फारसे ज्ञात नाही आणि जालीय परिचय नुकताच झाल्याने एक अनोख्या व्यक्तीला
उशिरा आणि निसटते भेटलो असे वाटले .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

करून सुद्धा श्रद्धांजली चा लेख आवडला नाही. दिवंगत श्रावण मोडक यांना आणि लेखकाला, दोघांना ही मी ओळखत नाही. पण हा लेख वाचून जर हीच वस्तूस्थिती असेल तर ते एका अर्थाने बरेच असे वाटून गेले. राहून राहून पुर्ण लेखालाच एक 'स्नॉबरीचा' भपकारा येतो आहे. विशेषतः -

उदाहरणार्थ, महिन्याभरापूर्वी आम्ही शेवटचं भेटलो तेव्हाही असंच झालं. 'तुला काही कळत नाही; तू मूर्खासारखं बोलतोयस' असं एका प्रौढ माणसाच्या तोंडावर त्याला स्पष्ट म्हणण्याऐवजी मी त्याला फक्त काही प्रश्न विचारले. ते इतके दैनंदिन वाटावेत असे होते, आणि इतर इतक्या गप्पांच्या अधेमधे येऊन गेले, की तिऱ्हाइताला तर त्यांमागचा समान धागाच दिसला नसता. पण इतर शिळोप्याच्या गप्पांत योग्य तो प्रश्न माझ्याकडून आला आणि त्याला अपेक्षित उत्तर समोरच्याकडून आलं, की समोर बसलेले मोडक शांतपणे त्यांचं ते खास मिश्कील हसत होते आणि एका नजरेनं मला दाखवून देत होते, की तू स्वत:ला कितीही हुशार समजत असलास, तरी मला पक्कं कळतंय तुझं काय चाललंय ते. आणि गंमत म्हणजे कदाचित मोडकांची ओळख होण्यापूर्वी मी त्या माणसाला 'तुला काही कळत नाही; तू मूर्खासारखं बोलतोयस' असं उद्दामपणे तोंडावर सांगितलं असतं आणि स्वत:कडे कटूपणा ओढवून घेतला असता. म्हणजे कळत-नकळत माझ्यावर त्यांच्या शैलीचा प्रभाव पडला होता आणि बहुतेक हेसुद्धा लक्षात येऊन ते त्यांचं गोड हसू खुदकन हसत असणार.

हे वाचून, अस वाटतय की "ईट्स अ क्लिक". आपल्या पेक्षा कमी ज्ञान असणार्यांवर हळूच प्रश्ण सोडून, एकमेकात नेत्रपल्लवी करून, "याची कशी घेतली", असा भाव ज्यास्त जाणवतो आहे. यात, आणि भेजा फ्राय मध्ये दाखवलेल्या सो कॉल्ड मुर्खांन्ना जमवून मजा घेणार्यात काय फरक आहे? आणि हे अशा प्रकारे मांडले आहे की "ईट्स अ‍ॅन इम्प्रूवमेंट ओवर प्रिवियस बिहेवियर" (अ‍ॅन्ड मे बी ईट ईज फ्रॉम द पर्स्पेक्टिव ऑफ द ऑथर). आणि वर त्यातून सुचित केलेल श्री मोडक यांचे "टॅसिट अ‍ॅप्रूवल" ऐकून त्या व्यक्तिमत्वाबद्द्ल एकंदर पॉझीटिव भावना निर्माण होत नाही.

आता मी अस म्हणत नाही आहे की सर्वांनी सर्वच वेळेला "पोलिटिकली करेक्ट" वागाव. हे "याची आज मस्त घेतली" फीलिंग प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलेले असते. मी स्वतः यातून गेलेलो आहे. कधी कधी लोकांची घेतली (अशाच प्रकारे ईन-डायरेक्टली प्रश्न विचारून आणि माझ्या "मेंटर" कडे सुचित कटाक्ष टाकून), क्वचित मी स्वतः अशप्रकारे "मेंटर" बनून जिथे मी अशाप्रकारच्या वागण्याला अबोल प्रोत्साहन दिले, आणि फार ज्यास्त वेळेला "ज्याची घेतली गेली, पण खूप उशीरा लक्षात आलं", त्या भुमिकेतून सुद्धा. यातील कुठलीच भुमीका लॉन्ग टर्म मध्ये सुखावह नव्हती. कधी कधी अशा माझ्या अशा वागण्याचे आठवून सखेद आश्चर्य देखील वाटते. प्रत्येक जण वेगवेगळ्या परिस्थितीत वाढतो, मी कोण होतो कोणाला मुर्ख ठरवणारा? (ईदर ऑन फेस ऑर ईन-डायरेक्ट्ली). पण मला हे ही मान्य आहे की जर असा "ऑल्वेज पोलिटिकली करेक्ट" द्रूष्टिकोन ठेवला, तर कदाचित आयुष्यातील बरेच हास्य विनोदाचे क्षण निघून जातील. त्यामुळे मित्रा-मित्रात जमल्यावर अशी एखाद्याची खेचणे समजू शकतो. पण ते एखाद्याच्या व्यक्तीमत्वाचे पैलू म्हणून समोर आणणे कसेसेच वाटते. श्री मोडक यांचे ईतरही अनेक पैलू असतील ज्याने त्यांना आठवणे सुखावह ठरेल. पण माझ्या मते ते या लेखात पुरेसे व्यक्त होत नाहीत.

जाता जाता, कदाचित
१. माझी वैचारिक पातळी कमी पडल्यामुळे मलाच हा लेख कळला नाही असही असू शकेल. तसेही मला डावं, उजवं ई ई फारस काही कळत नाही. तसे असेल तर हा प्रतिसाद ज्यास्त गांभिर्याने न घेता सोडून द्यावा. तसेही "ऑऊट ऑफ काँटेक्स्ट" प्रसंगा वरून आपण फार ज्यास्त निर्णायाप्रती येऊ शकत नाही.
२. लेखाच्या सुरुवातीला लेखक म्हणतो की:
"की ज्यांचं उगीच स्तोम माजवलं जातं आणि भक्तांच्या गराड्यात जे स्वत:वरच खूष राहतात अशा असंख्य भोंदू व्यक्तींपैकी हे आणखी एक असणार, म्हणून त्यांच्यापासून लांबच राहिलेलं बरं अशी खूणगाठ मनात कधीपासूनच बांधून ठेवली गेली होती."
आणि नंतर हे:
"मोडक असतील ना, हे मी हळूच विचारून घेई आणि त्यावरून जायचं की नाही ते ठरवे. ते असतील, तर बाकी कुणी असोत-नसोत, त्यांच्याबरोबर गप्पा मारता येतील म्हणून मी खुशाल जात असे; आणि अनेकदा असं झालंदेखील - म्हणजे बाकी कट्टा ठीकठाक झाला, पण मोडकांबरोबर वेळ मस्त गेला."
आणि हे:
" अनेकदा असं झालं की समोर चाललेलं ते आणि मी दोघेही पाहत असू, आणि आमच्यात एक अक्षरही न बोललं जाता, केवळ एखाद्या कटाक्षानं संवाद होई. कधी कधी असं होई, की आम्ही दोघं इतरांबरोबरच, एका गटाचा भाग म्हणून बोलत असू, पण असं वाटे की मी बोलतोय ते त्यांनाच समजतंय आणि ते बोलताहेत ते मलाच. म्हणजे इतरांना त्यातले फक्त किरकोळ तपशीलच जाणवत आणि त्यावरच ते प्रतिक्रिया देत बसत, तर आम्हाला त्यातून त्या तपशीलांपलीकडचं काहीतरी म्हणायचं असे आणि ते सगळ्यांसमोर घडत असूनही फक्त आमच्यापुरतंच राही."
यातून कुणाला असही वाटू शकत की कदाचित मोडकांचा प्रभाव ईतका होता की त्याने लेखकाला आपले "बॅरियर्स" तोडून त्या भक्तांच्या गराड्यात समर्पण करायला भाग पाडले.

पुन्हा एकदा, वरील पुर्ण प्रतीसाद हा केवळ वरील लेख वाचून आणि केवळ तो वाचूनच मनात निर्माण झालेल्या भावनांबद्द्ल आहे. लेखक आपल्या जवळच्या गेलेल्या व्यक्ती बद्दल "ग्रीविंग" करत आहेत याची मला पुर्ण खात्री आहे. मला त्यांच्यावर किंवा मोडक यांच्यावर कुठ्ल्याही प्रकारे शिंतोडे उडवायचे नाहीत. असे वाटल्यास, किंवा कुणाच्या भावना दुखावल्यास ही प्रतिक्रिया उडवून लावावी.

पी एसः "ग्रीविंग" करणे याला मराठीत प्रती शब्द रचना काय असावी? पहिल्या प्रथम "शोक व्यक्त करणे" मनात डोकावून गेले. पण यातील पहीली गोष्ट शक्यतो एकांतात घडते, आणि दूसरी जाहीर रित्या करण्याची आहे अस मला वाटत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रावणबद्दल त्यांच्या एका पत्रकार मित्राने लिहीलेला लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

असा संदेश येतो आहे. लिंक बरोबर आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिंक दुरुस्त केली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यांच्याशी क्वचितच चॅट/खरड संवाद झाला होता एकदा-दोनदाच. त्यांच्याबद्दलचे पहिले मत तितकेसे चांगले नव्हते. नंतर ते काही प्रमाणात बदलले होते.

ज्यांना भेटायची इच्छा होती अशा जालओळखींपैकी एक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>>यात, आणि भेजा फ्राय मध्ये दाखवलेल्या सो कॉल्ड मुर्खांन्ना जमवून मजा घेणार्यात काय फरक आहे?<<

त्या प्रसंगाला हजर नसलेल्या तिऱ्हाईताला असा प्रश्न पडू शकतो. मी काही प्रश्न विचारले होते हे खरं आहे. कोणतेही प्रश्न विचारले की 'समोरच्याची घेतली' असं गोगोल यांना अभिप्रेत नसावं असं त्यांच्या प्रतिसादावरून वाटतं. त्यामुळे मी काही प्रातिनिधिक प्रश्न देतो. उदाहरणार्थ,
- तुम्हाला कोणती पुस्तकं/संगीत/सिनेमे आवडतात?
- नक्षलवादाविषयी तुमचं काय मत आहे?
- साने गुरुजींच्या 'शामची आई'मध्ये जे मूल्यशिक्षण आहे ते एकविसाव्या शतकात मुलांचं संगोपन करणारे एक पालक म्हणून तुम्हाला कितपत उपयुक्त वाटतं?

असे प्रश्न विचारणं म्हणजे समोरच्याचं मूल्यमापन करणं होऊ शकेल का? की 'भेजा फ्राय'सारखं त्याला उल्लू बनवणं होईल? की 'शांतता...'मधल्या बेणारेबाईंसारखं अपराधीच्या पिंजऱ्यात उभं करणं होईल? ह्याचं उत्तर मी वाचणाऱ्यावर सोडून देईन. एवढं मात्र नक्की सांगेन की ज्यांना चूक/बरोबर उत्तरं असतात असे हे प्रश्न नाहीत – माझ्या लेखी अन् मोडकांच्या लेखीही. (मोडकांच्या लिखाणातूनदेखील ह्याची प्रचिती यावी.) ह्यापुढे जाऊन मी हेदेखील सांगू शकेन, की ज्यांची कलाविषयक मतं माझ्या मतांशी जुळत नाहीत अशा माणसांशी माझा संवाद किंवा मैत्रीदेखील होऊ शकते. हेच धार्मिक, राजकीय किंवा मूल्यात्मक मतांविषयी म्हणता येईल. किंबहुना मी मोडकांविषयीसुद्धा असंच काहीसं म्हणतो आहे. त्यांचा माझा संवाद होऊ शकेल असं मला भेटीआधी वाटलं नव्हतं. पण म्हणजे भेटीनंतर मी मोडकांच्या 'भक्तांच्या गराड्यात समर्पित' झालो का? शक्यता अर्थात नाकारता येत नाही. ह्या प्रश्नाचं उत्तरदेखील मी वाचकांवर सोडून देईन. आंतरजालावरचे संवाद आणि खरडवह्या वगैरे जाहीर आहेत. त्यात डोकावून कुणीही आपल्यापुरतं ह्याचं उत्तर शोधू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्याचि अक्षरे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0