गुळाचा गणपती.

सर्वप्रथम इथे (म्हण्जे या सायटीवर) कलादालन नसल्याने संस्थापक अन संयोजक मंडळाचा तीव्र निषेध (एकवेळ पाकिस्तानविरुद्ध भारत युनोमधे कमी तीव्र निषेध नोंदवत असेल, पण माझा जास्त तीव्र आहे)

सभासदांच्या उपजत कलागुणांना वावभर वाव कसा मिळावा म्हणतो मी.

तर निषेध नोंदवून धागा मौजमजेत डकवतो आहे. गुळापासून केलेली कलाकृती असल्याने पाकृ मधे टाकायचा विचार होता. पण म्हटलं गणपती आहेत, तर धार्मिक मधे टाकू. पण तो ही विभाग नाही Sad मग काय करू कसं करू ही धुसफुस करत शेवटी मौजमजेत टाकलाय.

तर. आमच्याकडे होणार्‍या प्रत्येक लग्नात (मुलीकडून) रुखवतावर गुळाचा गणपती करूण देण्याची जबाबदारी मजकडे असते. त्याप्रकारे एका भेलीतून कोरून बनवलेला गणपती पहा कसा दिसतोय :

IMG0179A IMG0178A

पांशा: हा गणपती त्या मुलाकडच्यांसाठी एक प्रचंड रॅगिंग असतो. कसे ते सांगा पाहू?

field_vote: 
3.25
Your rating: None Average: 3.3 (4 votes)

प्रतिक्रिया

तुमची सर्जरीचं कौशल्य इथे उपयोगी पडलेलं दिसतंय. Smile

गुळाचा गणपती बघितल्याबरोबर 'एक गळ्यात पडलाच आहे, हा दुसरा.' असं मुलीला म्हणत असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त आहे कलाकृती!!
<<सर्वप्रथम इथे (म्हण्जे या सायटीवर) कलादालन नसल्याने>>
+१ सहमत. कृपया संस्थापक मंडळाने यावर विचार करुन उपाययोजना करावी,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही हं डागदर! आवडली कला.

गुळाचा गणपती बनवताना चुकला तर गुळाचा खडा तोंडात घालून चघळायचीही सोय होत असावी. उत्तम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच दिसतो आहे गुळाचा गणपती.
(एकदम गोरागोरा आहे गूळ.)
वराचीच पूजा आणि वराचीच रेवडी उडवता काय. (गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्हाला नेहमीच आवडतात. हा कसा अपवाद असेल? पण नंतर त्या गणपतीचं काय करायचं या विचाराने सासरच्या मंडळींची झोप उडत असेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला मझ्या प्रश्नाचं उत्तर थोडं आलं. म्हनून्शान दीड मार्क.
प्रस्न ३ मार्कांचा हाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

गणपती गूळ म्हणून 'वापरून' टाकता येणार नाही आणि मुंग्या वगैरेंची डोकेदुखी होणार.

ता. क. गणपती मस्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तुम्हालाही दीड मार्क.
आता यावर मार्ग काय काढता येइल ते सांगा. मग उरलेला दीड मार्क देऊन टाकू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

गणपतीला एका तबकात ठेवावे.

रोज पाण्याने आंघोळ घालावी.
ते तबकातले पाणी तीर्थ म्हणून प्यावे (डायबेटिस नसणार्‍याने).

काही दिवसांनी गणपतीचा प्रश्न सुटलेला असेल. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तिकडचं रिसेप्शन अन रुखवत प्रदर्शन संपल्यावर सुमारे ६-८ दिवसांत तिकडून फोन येतोच.
घाबर्‍या घाबर्‍या. की अहो, तो गुळाचा गणपती.. त्याचं काय करू?
मग मनातल्यामनात खुदखुदू हसून सांगावे-
"पातेलीत पिण्याचे पाणी घेऊन त्यात गणपती बोळवा. ४-५ दिवसांत पाणी सुकून उरलेला गूळ गणपतीचा प्रसाद म्हणून नेहेमीच्या वापरास घेता येतो."

(खरेतर प्रतिष्ठापना केलेली नसल्याने त्या मूर्तीस नेहेमीचा गूळ समजून सरळ वापरताही येते, पण शेवटी भावनांचा प्रश्न असतो, अन गणपती बोळवायचा असतो, तो पात्रात बोळवला तरी चालते हे सगळ्यांना ठाऊक असते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

गूळाचा गणपती आवडला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

व्वा डाँक्टर
गणपती छान बनवला आहे

रुखवतात गुळाचा गणपती देउन जावयाला इशारा देताय की काय (ह घ्या)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

कसला गोड आहे Smile (दिसायला! चवीला नाही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चवीला पण गोडच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

गुळाच्या उरलेल्या भेलीचं काय केलंत?

सर्वप्रथम इथे (म्हण्जे या सायटीवर) कलादालन नसल्याने

स्वारी शक्तिमान. सोय केली पण उपलब्ध करून द्यायला विसरले. कलादालन आलेलं आहे आणि धागा तिथे हलवला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

<<कलादालन आलेलं आहे आणि धागा तिथे हलवला आहे.>>

कलादालन सदर काढल्यामुळे आता चांगली सोय होइल कलाकार मंडळींची!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गट्टम होते, कारण लग्नघरात हे कोरिव काम करीत असतांना आजूबाजूला कमीतकमी ७-८ पिल्लू लोक्स कायम असतात. अन कोरलेले तुकडे खाल्ले तर मामा रागावत नाही, हे समजलं, की शून्य मिन्टात ते गायब होतात Wink

टीपः
१. धागेपे पंगा ऐवजी नवीन दालन उघडल्याबद्दल धन्यवाद!
२. शक्तीमानला इम्पोर्टेड गेंड्याच्या कातडीचा नवा युनिफॉर्म टाकलाय शिवायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

"गोडुला गंपती गुलाचा" असा दिसतोय.. तुमचा हा गणू बघून आता मात्र मला इच्छा होतेय कि वाचावेच तुमचे "माझे डॉक्टर होणे" Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!