परीचे पशुधन

परीचे पशुधन
*****************
परीच्या गोठ्यात गोगलगाय
तिच्या दुधाची चंदेरी साय
शिंगे मऊमऊ म्हणून काय
धोक्याचे तिच्या पोटातले पाय
***
परीच्या छतातलं चिमणीचं घरटं
लखलख काचेचं चकचक करतं
चिमणीचा चालतो आराम मस्त
गरजेच्या वेळी तेलच नसतं
***
परीच्या पागांत बंदुकीचा घोडा
बाबड्याला लागतो खुराक थोडा
लगाम न लागे, कधी न ओढा
उधळे तेव्हा, कधी न झोडा
***
परीच्या झाडावर पराचा कावळा
उगाच वाटतो परीला बावळा
असून आवळा कोकले कोहळा
मागून माजतो गोंधळ सावळा
*****************
पूर्वप्रकाशन : दुवा

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

सुंदर कविता. लहानग्यांना नक्की आवडण्याजोगी आहे.
ह्यावरून तुम्ही मागे एकवेळ सचित्र कविता लिहिलेली आठवली, तुमच्याकडे त्याचा दुवा आहे का? परत वाचायला/बघायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

लहान मुलांसाठी मूल होऊन लिहीलेली कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बालकवितेच्या रूपात मोठ्यांच्या शब्दांशी खेळ करणारी कविता गमतीदार वाटली. पहिली पावणेतीन कडवी मस्त आहेत. गोगलगायीची चंदेरी साय, मऊ शिंगं आणि पोटात पाय हे खूपच छान जुळलेलं आहे. पुढची कडवी क्रमाक्रमाने कमी परिणामकारक आहेत. मात्र सर्व द्वयर्थी (या शब्दाला नवीनच अर्थ प्राप्त झालेला आहे, हे एव्हाना सर्वांना समजलं असेलच) कल्पना मस्त - चिमणी, घोडा, आणि पराचा कावळा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली.

चिमणीच्या चालतो आराम मस्त

यातील चिमणीच्या म्हणजे काय? ही ओळ आणि पुढची ओळ फारशी कळली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गरजेच्या वेळी तेलच नसतं
या ओळीचा अर्थ काय? कसली गरज?
असून आवळा कोकले कोहळा
मागून माजतो गोंधळ सावळा

अच्छा आवळा देऊन कोहळा काढणे यालाच म्हणतात वाटते..... Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोठ्यांच्या वस्तु छोट्यांच्या शब्दांतून मस्त उतरल्या आहेत
'चिमणी', 'घोडा', पराचा कावळा सगळ्याच सांकेतिक कल्पना आवडल्या
गोगलगायीचं कडवं अगदीच छान जमुन आलंय मात्र अर्थ सरळ - एकच लागला. इतर कडावी मात्र अधिक क्लिष्ट झाली तरीहि नादमयता टिकली आहे हे विशेष

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शब्दांची जुळवण छान-छान आहे Smile यमक अगदी गोड जमले आहे.

पण काही गोष्ट सांगायची आहे काय? काही बालकवितांमध्ये एक गोष्ट कवितेमध्ये गुंफलेली असते, तसे काही आहे काय? गाणे/कविता लक्षात रहावी म्हणून बहूदा गोष्ट गुंफलेली असते, पण तसे असावेच असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परीचे पशुधन हे शिर्षक वाचून तोबताबड कविता उघडली Wink

मस्त वाटली एकदम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

मस्त वाटली एकदम.

हो, पण त्यात राजकुमारावर एकही कडवे नाही रे परा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

खरे आहे Sad

श्री. धनंजय यांनी तातडीने 'पराचे मद्यधन' अशी एक कविता करावी Wink अन्यथा आम्ही त्यांना दंड करू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

या कवितेत स्पष्ट 'पराचा कावळा' असा स्पष्ट उल्लेख आहे. तो कावळा, आवळा देऊन कोहळा मागतो असंदेखील म्हटलेलं आहे. पण त्याचा शेवटी सावळा गोंधळच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद राखून ठेवते.

मुलीला कविता वाचायला देईन असे म्हणते. तिला द्व्यर्थी(?) आणि सांकेतिक कल्पना कळणार नाहीत याची खात्री आहे पण त्या निमित्ताने त्या समजावून देता येतील असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वांचे आभार.

- - -

अनामिक यांनी ओळखल्याप्रमाणे ही आंशिक कृती आहे. (त्यांना आठवलेली कृती चित्रमय "विंचवाचे वर्‍हाड".) माझ्या मनातल्या कल्पनेत या शब्दांबरोबर कल्पक, शब्दार्थाचे अतिरेकी-गमतीदार चित्रण करणारी चित्रे हवीत. म्हणजे असे काही :
(१) गोठ्यात बांधलेली गोगलगाय, तिच्या पोटाशी (तिच्या मानाने लहान अशी) परी, आणि परीच्या पायाशी कलंडून दूध सांडलेले भांडे.
(२) घरट्यात काचेच्या चिमण्या - लहानमोठ्या म्हणजे चिमणी आणि पिले - कदाचित छोट्या चिमण्यांची गोल तोंडे पक्ष्यांची पिले तोंड वासून असतात तशी. वाटल्यास या चिमण्यांना पंख असतील. मोठ्या चिमणीची काच म्हणजे गाल फुगवून ओठांचा चंबू करून फुंकर मारण्याच्या आविर्भावात जवळ आलेली आगकाडीची ज्योत विझवणारी...
(३) कार्टूनछाप पिस्तूल - डोळे-कान असलेले - हेच हे घोड्याचे तोंड असलेला डुलता खेळघोडा (रॉकिंग हॉर्स) त्यावरर बसलेली परी, ती फटकारत असलेल्या चाबकाचे टोक घोड्याचे तोंड बनलेल्या चापाला/घोड्याला=ट्रिगरला लागलेले. घोडा "उधळल्यामुळे" त्याच्या पटर्‍यांच्या अगदी मागच्या टोकावर तोलून उभा राहिलेला
(४) काळ्या रंगाचे एकच पीस, पण त्याच्या दांडीचे टोक ही चोच... अशा कल्पक प्रकारे काढलेला कार्टून-छाप कावळा, त्याच्यासमोर आवळ्याच्या आणि कोहळ्याच्या टोपल्या - गावच्या बाजारात बसून जणू काही विक्रेता आहे. आर्श्वभूमीत फराट्यांनी अंधुक चितारलेली (गिर्‍हाइकांची) गर्दी.

- - -

@मिहिर : "चिमणीच्या" टंकनदोष बदलून "चिमणीचा" करणार आहे.

- - -

@मी : या कवितेला कथा नाही. काही बालकवितांत (उदाहरणार्थ इंगजीतल्या "ओल्ड मॅक डॉनल्ड" कवितेत) कथा नसून नुसता एक साचा असतो. नवीन नवीन प्राणी-पक्ष्याचे एक-एक अशी कितीही कडवी असू शकतात. बाळाला कंटाळा आला की वाटेल तिथे कविता तोडता येथे.

- - -

@३_१४, ऋषिकेश , राजेश घासकडवी, प्रियाली : लहान मुलांना (पोटात पाय, इत्यादि) वाक्प्रचारांचा अर्थ लागावा अशी अपेक्षा नाही. फक्त चिमणी ही वस्तू आणि चिमणी हा पक्षी यांची आदलाबदल करून खुदुखुदू वैचित्र्याचे कल्पनाचित्र मनात निर्माण व्हावे. वाक्प्रचार हे मुलांना कविता वाचून दाखवणार्‍या (आणि चित्रे दाखवणार्‍या) प्रौढाच्या रंजनाकरिता आहेत.

- - -
@परा : तुमचा कावळा परीच्या पशुधनापैकी एक आहे, हे अनेकांनी दर्शवलेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आणि सोबतच्या टिपणी साठी.बर्‍याच असं वाटतं (तुमच्या कविता वाचताना ) की तुमच्या मनोपटलावर कविता चित्र रुपात येत असावी आणि नंतर शब्द रुपात. हा अर्थात माझा कल्पना विलासही असू शकतो. पण असंही वाटतं की ती शब्द-रुपांतरीत होताना थोडीशी फिकट रंगात येते.
आगाऊपणाची आगाऊ माफी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदम सुंदर बालकविता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

कविता आवडली- रामदास यांच्या प्रतिक्रियेतून थोडेसे पुढे गेल्यास'शब्दचित्रात्मक'. किंचित 'मोर ऑन आयडियाज - लेस ऑन थिंग्स' झाल्यासारखे चित्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतरत्र देण्याचा प्रतिसाद ( क्र १७ )चूकून येथे दिला गेला आहे- संपादित केला आहेच, उडवता येईल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0