अलीकडे काय पाहिलंत? -७

याआधीचे भाग:

विनोद खन्नाचा फ्रेंच डुप्लिकेट जेरार्द दिपार्दिउ याची मुख्य भूमिका असलेला 'लुलु' नामक चित्रपट पाहिला. चित्रपटाचं नाव जरी जेरार्दच्या पात्राचं नाव असलं तरीही त्यात मुख्य पात्र त्याची मैत्रिण नेलीचं असावं असं वाटलं.

जाहिरातक्षेत्रात काम करणार्‍या नेलीने तिच्याच क्षेत्रातल्या माणसाशी लग्न केलं आहे; पण या बूर्ज्वा नवर्‍याबरोबर ती फार आनंदात नाही. तिची लैंगिक भूक त्याच्याकडून भागत नाही म्हणून ती लुलुकडे आकर्षित होते. कष्टकरी वर्गातला, बेरोजगार लुलुशी तिचं नातं शारीरिक पातळीवर सुरू होतं. हे काही फार दिवस टिकणार नाही असं आधी नवर्‍याला वाटत असतं. उलट, डोक्याने किंचित बालबुद्धी पण प्रामाणिक लुलुच्या ती प्रेमातही पडते. तिला जे हवं असतं ते त्याच्याकडून मिळतं, त्याबदल्यात त्याला पोसायला तिला अडचण वाटत नाही. ती त्याला बदलण्याचा प्रयत्न करत नाही, पण या नात्यात ती स्वतःच बदलते. दोन पुरुषांमधे (नवरा आणि प्रियकर) स्वतःची ओढाताण होते आहे हे लक्षात आल्यावर ती नवर्‍याच्याच ऑफिसात असणारी नोकरीही सोडते. दोघांनाही मूल हवं असतं, पण उत्पन्न नाही म्हणून ती गर्भपात करून घेते. त्यांच्यात भांडणही होतात.

चित्रपटाची गोष्ट फार महान नाही, पण त्यातला साधेपणा आणि सूचक सादरीकरण आवडलं. जेरार्द दिपादिउ (मला फार आकर्षक वाटला नाही तरीही) अभिनेता म्हणून आवडला.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अभिप्राय रोचक आहे. आता हेच पुढे नेऊन 'लंचबॉक्स विरुद्ध धोबीघाट' असा एक खुमासदार लेख आपण लिहावा अशी आपणांस विनंती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

तुमचा प्रतिसाद सरळ आहे की उपरोधिक आहे - अशा शंकेचा किडा चावला, म्हणून तुम्ही सुचवलेला लेख न लिहिता पुढचा उपप्रतिसाद. प्रतिसाद उपरोधिक नसेल, तर प्रश्नच मिटला. (हे माझं मत आहे आणि सिनेमाविषयक प्रतिसादांत आत्ताच्या आत्ता या भूमिकेवरून बरेचदा लिहिलं गेलं, म्हणून या उपप्रतिसादाच्या निमित्तानं हे इथं नोंदतेय.)

समीक्षकांनी चित्रपटाबद्दल सर्वसामान्य प्रेक्षकाहून निराळी भूमिका घेणं यात काहीच वावगं नाही. सर्वसामान्य प्रेक्षक एक विवक्षित चित्रपट बघत असतो, तर समीक्षकाला मात्र त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे आधीचे चित्रपट, त्या जॉनरमधले - त्या विशिष्ट भाषेतले आधीचे चित्रपट, त्या जॉनरमधले इतर देशांतले - इतर भाषांतले चित्रपट, त्या त्या प्रदेशातली सामाजिक परिस्थिती, तिथल्या इतर कलामाध्यमांतले पारंपरिक आणि तत्कालीन प्रवाह - हे सगळं दिसत असतं. (निदान तशी अपेक्षा तरी असते!) त्यामुळे त्याचं मत सामान्य प्रेक्षकाहून निराळं असणारच. त्या मतामुळे सामान्य प्रेक्षकाची जाणकारी उंचावतेच. (नि.त.अ.त.असते!)
पण समीक्षक पाहत असलेले चित्रपट (आणि इतर गोष्टी) आणि प्रेक्षक पाहतो ते (किंवा तो पाहू इच्छित असलेले) चित्रपट यांच्या आवाक्यात आणि उपलब्धतेत मोठाच फरक असतो. समीक्षकानं मत देताना हा फरक लक्षात घेणं महत्त्वाचं असतं. त्याचं मत कुठल्या 'सुरा'त नोंदवलं गेलं आहे, तेही महत्त्वाचं ठरतं. तो सूर चुकला वा या फरकाचं भान सुटलं, तर समीक्षक हस्तिदंती मनोर्‍यातला विद्वान ठरतो आणि त्याचं एरवी मोलाचं ठरू शकेल असं मत चक्क फुकट जातं.

या मताच्या पार्श्वभूमीवर मेनस्ट्रीममधे प्रदर्शित झालेला 'दी लंचबॉक्स' मला महत्त्वाचा वाटला, आवडला नि चिंजंशी आवर्जून मतभेद नोंदवणं आवश्यक वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मी जे काही लिहितो आहे ते गरीब बिचारे सानेगुरुजी छापाचे सरळ अर्थाचे गांधीटोपी घालून नाकासमोर बघत जाणारे आहे हे पटवून देण्यासाठी आता मला सीतेप्रमाणे एखादे दिव्यच करुन दाखवावे लागणार, असे दिसते. आपण प्रेक्षक आणि समीक्षक हे वर्गीकरण कशाच्या आधारावर केले आहे हे नीटसे समजले नाही, त्यामुळे मी स्वतः या दोन्हींपैकी कोणीच नाही असे मला वाटू लागले आहे. प्रेक्षक ते समीक्षक हा प्रवास कपाळांवरील आठ्या आणि चष्म्याचा नंबर या तहानलाडू- भूकलाडूंना बरोबर घेऊन जातो काय?
'लंचबॉक्स' मी पाहिलेला नाही, पण तो मी पाहणार आहे आणि तो मला आवडेल अशी माझी भावना आहे. त्यामुळे 'लंचबॉक्स न आवडणे' या सुनामीत 'मला आवडला बुवा! (किंवा बाई!)' असे धीटपणे म्हणणार्‍या एखाद्या तराफ्यावर बंडाचे एखादे लहानसे मळकट निशाण उभारण्यात माझा गौरवच आहे. 'लंचबॉक्स' आणि 'धोबीघाट' यांची तुलना (समीक्षात्मक?) करणारा लेख आपण लिहावा या माझ्या गयावयात्मक आवाहनाला एक कोपरखळ्याळ टंगीनचिकादि (पराजय नावाचा?) इतिहास आहे. पण तो सांगत बसणे म्हणजे 'अ बोअर इज अ पर्सन व्हेन आस्कड हाऊ ही इज, स्टार्टस टेलिंग इट' असे असल्यामुळे तो इथे सांगणे अप्रस्तुत ठरेल.
बाकी मतभेद नोंदवण्याबद्दल म्या काय लिहावे? कोई बतलावें की हम बतलायें क्या...लेखनसीमा अशी की माझे मत हे उपरोधिक ( की औपरोधिक?) वगैरे नसून सरळ, सामान्य वरणभाततूपमीठलिंबू असे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

मी जे काही लिहितो आहे ते गरीब बिचारे सानेगुरुजी छापाचे सरळ अर्थाचे गांधीटोपी घालून नाकासमोर बघत जाणारे आहे हे पटवून देण्यासाठी आता मला सीतेप्रमाणे एखादे दिव्यच करुन दाखवावे लागणार, असे दिसते

सत्यनारायण? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता बहुदा तेच करावे लागणार. कुणी सत्यदेव म्हणतात तर कुणी सत्यनारायण!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

'माणसं काळी वा पांढरी नसून राखाडी असणं, 'आणि ते सुखानं नांदू लागले'छाप उत्तराचा आग्रह नसणं, गोष्ट सांगताना अनावश्यक संवादांचा मोह टाळणं - हेही फार आवडलं'

चिठ्ठ्यांकरवी चा संवाद आवडला...तिच्या चिठ्ठीमधल्या प्रश्नाला नेमकं उत्तर न देता किंवा आपलं मत देता त्याच विषयावरचा आपला एखादा अनुभव सांगणं आवडलं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेरॉईन वर यु ट्युब वर असलेल्या अनेक डॉक्युमेंटरीज पाहिल्या. फार म्हणजे फार भयानक ड्रग आहे. माणुस याच्या असा काही विळख्यात अडकतो की ईच्छा असून सुद्धा सोडू शकत नाही (आणि विथड्रॉवल सिंड्रोम्स मानसिक तसेच शारिरिक असतात (काही दुसरे ड्रग्ज ज्यास्ती करून मानसिक असतात जसे की कोकेन, गांजा, सिगारेट). असेच दुसरे महाभयंकर ड्रग म्हणजे मेथ). मराठीत मी तुषार नातु यांनी त्यांच्या हेरॉईन व्यसनाधीन आयुष्यावर लिहिलेला ब्लॉग वाचला होता. तोही असाच अंगावर शहारे आणणारा होता.

वाईस ची "गाईड टू कराची" म्हणून एक यु ट्युब वर असलेली डॉक्युमेंटरी पाहीली. एका अत्यंत स्फोटक ठिकाणी चित्रीत केलेली फारच मजेशीर फिल्म आहे. आपण भारतात अराजकता आहे म्हणतो, पण यात जे काही दाखवल आहे ते पाहून असच म्हणावस वाटत की बर झाल ईकडे जन्माला आलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परवा स्टार मूव्हीजवर द हिल्स हॅव आईज हा चित्रपट पाहिला. http://www.imdb.com/title/tt0454841/ काही निरीक्षणे -
१. एक फिरायला गेलेले सुखवस्तू कुटुंब एका वाळवंटात (अरिझोना?) भरकटते. आमच्या भारतीय नजरेनुसार हे लोक गडगंज श्रीमंत असणार कारण त्यांच्याकडे लै भारी गाड्या होत्या, आणि त्यांनी सामान पण चिक्कार सोबत घेतलेले.
२. अपेक्षेप्रमाणे त्यांचा इतर जगाशी संपूर्ण संबंध तुटतो.
३. ते जिथे आलेले असतात तिथे अमेरिकन सरकारने अणुस्फोट केलेला असतो. त्याचे क्रेटर खूप मोठ्ठे असते. वाजपेयी पोखरणच्या क्रेटरच्या समोर थांबले कि क्रेटर दिसतच नाही, पण हे क्रेटर एवढे मोठे असते कि स्फोटाने एकाच वेळी अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरात सुनामी आले असावेत.
४. हा अणुस्फोट तिथल्या खाणकामगारांना न विचारता, त्यांच्या मर्जीविरुद्ध केला गेला. अगदी खाणीला लागूनच केला, इतका कि खाणीची काही बोळे चक्क त्या क्रेटर मधे उघडायला लागली.
५. स्फोटाला विरोध करणारे खाण कामगार आणि कुटुंबीय स्फोटाच्या वेळी खाणीत लपले. त्यांना तिथून न बाहेर न काढता दुष्ट अमेरिकन सरकारने स्फोट केला. बाकी जगाला कशाचाच पत्ता नाही. तशा काही पेपरांत बातम्या आलेल्या पण सरकारही विसरले आणि लोकही !!
६.शेवटी या लोकांत म्युटेशन्स झाली आणि त्यांना 'इतर अमेरिकन लोकांचा' राग आला. मग त्यांनी पापभिरु इतर अमेरिकन पर्यटकांना पकडून मारायला सुरुवात केली. त्यांच्यापैकी एक कुटुंब हिरोंचे.
७. ८-१० कुटुंबियांपैकी ५-६ टपकले असतानादेखिल दोन हिरोनी नेहमीप्रमाणे एकमेकाच्या कॉलरा धरुन पुढे काय करायचे याबद्दल ओरडून ओरडून भांडण केले.
८. प्रत्येकाला जिवानिशी मारणारे म्युटंट्स लहान बाळाला मात्र अपवाद करतात. कुत्रा आणि दांडुका घेऊन आपल्या बाळाला घेऊन हिरो भरदिवसा कितीतरी गन्स असलेल्या म्युटंट्सच्या गावात जातो. त्या दांडक्याच्या जोरावर तो आपल्या कामात यशस्वी होतो.
९. शत्रूपक्षात एकजण हिरोंसाठी प्राण देण्यास तयार असते.
१०. सिनेमा संपला, विषय बाजूला ठेवा ही प्रवृत्ती हे दिग्दर्शक लोक काही जपू देत नाहीत. तिघे जण वाचले म्हणून प्रेक्षक सुस्कारा सोडत नाही तोवर डोंगरावरुन डोळे पुन्हा त्यांना पाहतात. स्पेसीस आणि बर्‍याच लोकांनी ही थीम इथून चेपली असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारताचा ध्वज जादवपूर विद्यापीठात असावा का ? - यावर चर्चा चालू आहे.

अर्नब नेहमीप्रमाणे बोंबाबोंब करतोयच. जीडी बक्षी सुद्धा आरडाओरडा करतायत. पण त्या प्रा. लाहीरींचा युक्तिवाद हा - "आम्ही सौम्य शब्दात बोलतोय ... आरडाओरडा करीत नाही ... तेव्हा आमचे आर्ग्युमेंट कितीही बेबुनियाद असले तरी ते योग्य आहे" - अशा स्वरूपाचा व हास्यास्पद वाटतो. सगळा व्हिडिओ पाहिलात तर हा कॉमेडी सेक्शन मधे ठेवावा सा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेल्या महिन्यापासून सपाटा लावलाय पिक्चर बघायचा. अनेक दिवस खंड पडलेला. आता भरून काढतोय. गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस सुट्टी असताना कुंग फु पांडा- ३ , तमाशा , मॅड मॅक्स फ्युरी रोड, जय गंगाजल, नीरजा, स्पॉटलाईट बघून काढले.
जय गंगाजल सोडून बाकी सर्व आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने