माझेही स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग

स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग हे नेहमीच अंशकालीन तापदायक तर दीर्घकालीन सुखदायक असतात. हे आपल्याला एकदम कबूल ! काँलेजमधे असताना एका मैत्रिणीने मला आमच्या एका म्युचल मित्रा विषयी बहोत लाजत लाजतच विचारले , ए कसा आहे रे तो ? त्याने मला काल प्रपोज केलय. मी म्हटलं त्याला फक्त सेक्समधे इंट्रेस्ट आहे. तू विचार नको करुस. मैत्रिणीने तोँड कडवट केले. 15 दिवस बोलली नाही. नंतर एके दिवशी थँक्स म्हणुन चांगली मैत्रिण झाली. मी म्हटलं जय हो ! एका मित्राने एका मैत्रिणी विषयी न लाजता थेट विचारले. यार सत्या ती लय आवडती राव. काय करु ? मी त्याला म्हटलं तिला अटेटाईम चार जण आवडतात भो ! तुझी पाचव्याची भर कशाला ?
तुम्हे तो भावनाओँ की कदरही नहीं असे म्हणून गाली देत 15 दिवस तो ही दोस्त यादीतून बाहेर पडला ! नंतर म्हटला यार सत्या थँक्स ! इनव्हाल झाल्तो रे ! मी म्हटलं जय हो !
याच दोस्तास काही काळानंतर दुसरी मुलगी आवडू लागल्याने तत्कालीन मुली पटविण्याच्या प्रचलित असंख्य चालीँपैकी असलेली एक हुकमी चाल म्हणुन आम्ही आमचा वर्ग सोडून तिच्या वर्गात बसणे चालू केले व एकदिवस तिच्या वर्गात त्याचा तिच्याकडे नजरेतूनच प्यार फेकाफेकी करण्याचा व माझा त्यास माँरल सपोर्ट देण्याचा मंगल विधी चालू असतानाच जराही हळवे दिल नसलेल्या इंग्रजीच्या मँडमने मला खडे केले व विचारले , तुझा वर्ग कुठला ? मी तो जो बसलेला होतो तो नाही हे आगरकरी बाण्याने सांगितले. मग या वर्गात का बसलास या त्यांच्या , पुढे जोडून आलेल्या प्रश्नास उत्तर देण्याकरीता मित्रास मधे खेचणे भाग पडले. जराही न डगमगता स्पष्ट वाणीने मी त्यांना सांगितले , हा जो माझ्या शेजारी बसलेला मित्र आहे त्याला या वर्गातली दोन नंबर लाईन मधली पिवळा ड्रेस घातलेली ती मुलगी जाम आवडते. हा तिच्यावर खूप प्यार करतो. हा एकटा बसायला भितो म्हणुन मी सोबतीला बसलोय. आख्ख्या वर्गाच्या हशाकडे तमाम मुलीँच्या लाजण्याकडे टोटल दुर्लक्ष करीत डोळे वटारत आम्हा दोघास घेऊन नाँन हळव्या दिलाच्या मँडम प्राचार्य कक्षात शिरल्या. मित्राच्या हाताचे तळवे स्पष्ट ओले झाले. तो मँडमला म्हटला संडासला जाऊन येऊ का ? मँडम म्हटल्या चोप्प मुर्ख ! मी त्याचा धिक्कार केला व तीव्र निषेध व्यक्त करुन प्राचार्याँच्या प्रश्नास उत्तरे देण्यास सज्ज झालो. वर्गात झडलेल्या उपरोक्त संवादातील केवळ मँडम शब्दा ऎवजी सर शब्द घालून अँज इटीज वर्गातले संभाषणच तिथे बोललो. प्राचार्य केवळ सटपटले ! प्राचार्यकक्षात उपस्थित असलेल्या एका अत्यंत हिरवट मास्तरांनी आम्हास दोन दोन गुद्दे लगावले. मित्र नाराज झाला. तू वेडझवा आहेस म्हणाला ती पोरगी आता जिँदगीत कधी पटणार नाही म्हणुन सुस्कारे सोडू लागला. मी मात्र स्पष्टवक्तेपणाच्या सात्विक बळाने मोहरुन जाऊन त्याच्या सुस्कार्याकडे टोटल दुर्लक्ष करीत निवांत बसून राहिलो. आठ दिवसानंतर सदर पिवळ्या ड्रेसधारक मुलीने तिच्या मैत्रिणी करवी एक चिठी ज्यात इंग्रजी लिपीतली जाड साईजातली I LOVE YOU ही अक्षरे लाल ओठांच्या ठशासह होती ती माझ्याकडे पाठवली. आणि मी जाम खुष होऊन मित्रास म्हटले , घे भडव्या पटली तुला ती ! तो मला घट्ट मिठीत घेऊन नाचू बागडू लागला. एकाच वेळी चहा क्रिमरोल वडापाव मिसळ खायला घालून माझी त्रेधातिरपीट करु लागला. दुसर्या दिवशी चिठ्ठी आणून देणार्या मैत्रिणीस हा समक्ष भेटला आणि विचारले ती कुठे भेटायला तयार होईल ? ती मैत्रिण म्हटली तो जिथे सांगेल तिथे ती येईल. पण 12 वाजण्याच्या आतच हा ! त्याला सांग. मित्र म्हटला त्याचा काय संबंध ? मैत्रिण म्हटली मग काय तुझा संबंध आहे का ? येडपट ! मी टपरीवर चहा घेत याची वाट पाहत बसलेलो असताना हा लांबूनच दगा दगा दगा असे ओरडत आला . तु तुझीच सेटींग केलीस भोसडीच्या , ती तुला पटलीच कशी ? लै वाईट केलं यार तू. वगैरे वगैरे.. मी त्याला स्पष्टपणे मी असं काहीही केले नसल्याबद्दल निक्षूण सांगितले. व त्याच्या दुःखात सहभागी होत त्यानेच मला गुडन्युज दिल्याबद्दल आभार मानीत त्याच्यावर चहा चिवडा वडापाव क्रिमरोल मिसळीचा मारा करु लागलो. मित्र जराशाने सावरुन म्हटला, स्पष्टवक्तेपणाचा जय हो ! मी ही म्हटलं जय हो !
हळू हळू माझा कान्फिडन्स वाढत चालल्याने स्पष्टवक्तेपणा सारखी ही चांगली गोष्ट आपल्या घरात देखिल रुजवायचीच म्हणुन एका गाफील क्षणी मी चंगास बांधले व मोक्याची तलाश करु लागलो. जादा वाट बघावी न लागता एक दिवस तो मोका मला घावला ! घरातला स्पष्टवक्तेपणाचा पहिला प्रयोग मी आजीवर केला. आमची आजी म्हणजे अत्यंत खविस स्वभाव असलेली , फादरची आई ! भांडखोर आरादीन म्हणुन ती आजूबाजूच्या पाच पंचवीस गावात खूप गाजलेली ! ती गावाकडून पुण्यात आमच्या घरी आल्यानंतर दुसर्या दिवशी खूपच खूष होऊन गप्पा हाणीत असताना मी मधेच तिला म्हटलं हे बघ माय तु हितं आलेलं आणि दोन दिवसापेक्षा जादा राहिलेलं आमच्या मातोश्रीस ऊर्फ तुझ्या सूनबाईस बिल्कूलच आवडत नसल्याने तू लैच जादा खुषी जाहीर न करता लगोलग गावी परतण्याची तयारी करावीस हे अधिक बरे होणार नाही काय ? हे वाक्य संपल्याबरोबर मातोश्रीने खाडकन माझ्या मुस्काडात लगावली. मी म्हटले आई , सत्य बोलले की खर्या आईस राग येतो , हे आज तंतोतंत पटले. असे मी चारचौघात जाहीर करु काय ? भाड्या, तुझ्या तोँडात तीन वाटाची माती पडली ! या शापवाणीने मातोश्रीने माझ्याशी खूप कमी वेळ अबोला धरला . आणि मग पुढचे सलग सात तास आमच्या घराने (प्रमुख पात्रे आजी व आजीची सून) सबंध वस्तीचे विदाऊट तिकीट फुल्ल टाईमपास या धर्तीवर नाँनस्टाँप जंगी मनोरंजन केले ! नंतर मग मी आजीचा दीर्घकालीन लाडका झालो. आणि आईच्या नजरेस , काय का असेना लेकरु खरं बोलतंय म्हणुन कौतुकास पात्र ठरलो !
आफकोर्स ! आता पुढचा नंबर फादरचाच होता.. तो सुदिन महत्प्रयासानेच एकदिवस तय केला. आणि लगाव बत्तीच्या धोरणात थोडासा हलत डुलत घरात प्रवेश केला.
सुरुवातीला मी चोरुन अधेमधे दारु प्यायचो. कितीही लपवा छपवी करा सालं फादरला ते कळायचंच कळायच. आणि मग घरात शिव्याचा सप्ता चालू व्हायचा. सोमवारी दुपारी एकदा जरी पिलो तरी शनिवारी रात्रीपर्यँत सलग शिव्या खाव्या लागायच्या. एकदा आई समोर त्यांना खणखणीत वाणीत म्हटलं तुम्ही जाम चुकीचं वागता याची तुम्हाला जरातरी कल्पना आहे काय ? फादर जाम पिसाळले आणि भसाड्या वाणीत म्हटले काय चुकीचा वागतो रे भोसडीच्या ? मी म्हटलं , मी अधेमधे दारु पितो तर तुम्ही अधेमधेच शिव्या देत चला ना. रोज शिव्या कशाला देताय ? तुमच्या रोज शिव्या देण्याच्या हिशोबावर चालायचं म्हटलं तर मला रोजच प्यावी लागेल. आणि ते मला तुम्ही भयंकर चिडचिड करत , देत असलेल्या अत्यंत माफक किरकोळ रकमेत कसे परवडावे ? त्यातच हल्ली हल्ली , अधनं मधनं म्हणता म्हणता वारंवार तुमच्या खिशावर हल्ला करणे माझ्या सद् सद् विवेकबुध्दीस पटेणासे झाले आहे. त्यामुळे मला तुमच्या शिव्याच्या हिशेबा खातर देशीदारुच चालू करावी लागेल की काय ? हा प्रश्न प्रामुख्याने छळू लागला आहे. तेव्हा आपण एकतर देय रक्कम वाढवा किँवा शिव्यांचा डोस कमी करा ! कसे ? फादरनी तेव्हापासून हाणबिगर शिव्या बंद केल्या आणि मग मातोश्रीने मात्र त्या जंगी चालू केल्या ! मातोश्रीच्या शिव्यांचं आपल्याला कधीच वाईट वाटलं नाही.
तर अशा अंशकालीन तापदायक आणि दीर्घकालीन सुखदायक स्पष्टवक्तेपणाचे बहूत कष्टाने रुजलेले रोप आज निस्वार्थीपणाच्या पाण्याअभावी पार जळून चालले आहे. निस्वार्थी पाण्याचे झरे आता सगळीकडेच आटलेत ! काय करणार ? इलाज नाही..गतकाळातील वैभव आठवावे तसेच आता हे सगळे आठवतो !
जय हो..

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (6 votes)

प्रतिक्रिया

Smile एक नंबर!

जय हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हाहाहा! जय हो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नावरे आवरीता!

तुमचं ललित पहिल्यांदाच आवडलं, जय हो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जै हो! आवडल्या गेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जय हो. मजा आली. शिव्या-दारू-रतीब हे गणित काळ-काम-वेगासारखं वाटलं.
मेलं आमच्या स्पष्टवक्तेपणामुळे लोकं आम्हालाच नावं ठेवतात. एवढंच नाही तर म्हणे, अमका मनुष्य तुझा मित्र आहे म्हणून चारचौघात शिव्या खाव्या लागतात त्याला! आता आम्हाला कोण लाईन देणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नेमाडपंथी प्रभाव असलेले तरीही स्वतःची वेगळी अशी किक बसलेले लिखाण आवडले.
मी अधेमधे दारु पितो तर तुम्ही अधेमधेच शिव्या देत चला ना. रोज शिव्या कशाला देताय ? तुमच्या रोज शिव्या देण्याच्या हिशोबावर चालायचं म्हटलं तर मला रोजच प्यावी लागेल हे लॉजिक तर भन्नाटच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

बेश्ट!

बाकी
मी अधेमधे दारु पितो तर तुम्ही अधेमधेच शिव्या देत चला ना. रोज शिव्या कशाला देताय ? तुमच्या रोज शिव्या देण्याच्या हिशोबावर चालायचं म्हटलं तर मला रोजच प्यावी लागेल हे लॉजिक फक्त भन्नाटच नाही तर पालक-बालक मानसशास्त्रीय दृष्ट्या अतोनातच महत्वाचे आहे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजा प्रत्येकाने प्रत्येक बाबतीत स्पष्टवक्तेपणाने व खरे बोलायचे ठरवले तर काय होईल असा विचार करतो आहे. बाकी खरे बोलल्याचा एक फायदा असतो कि आपण काय बोललो होतो हे आठवाव लागत नाही. पुर्वी मला खोट बोलणार्‍या लोकांचा फार राग यायचा. लबाड साले! पण आता मजबूरीने खोटे बोलणार्‍या लोकांविषयी त्यांची अडचण समजून घ्यावी असे वाटते. अभवित पणे खरे जसे तोंडातून बाहेर पडते तसे खोटे देखील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

तुफान!
जय हो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सतीशसाहेब, त्या अटेटाईम शब्दातला स्पॅन केव्हढा? अर्ध्यातासापेक्षा कमी की जास्त? स्पष्ट विचारतोय, आपण जेव्हा ही माहिती काढलीत तेव्हा आपण नक्की काय पाहिलं असावं, या शंकेचं निराकरण केल्याशिवाय या ललिताचं रसग्रहण नीट होणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अटेटाईम आवडाय वेळ मोजायची गरज नाही हो. एखादीला भावनिक मानसिक पातळीवर अटेटाईम चार पाच लोक आवडू शकतात की ! प्रत्यक्ष शारीरिक मोमेँटच आवडा आवडीत गृहीत धरणं बरं न्हवं ! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अटेटाईम चार जण आवडतात

If you really wanted to convey only emotional level through what all you observed about a person, you should phrase your observations appropriately. Just read these four words together for 4-5 times and they end up saying altogether different world.

Language has huge limitations, be careful!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

स्पष्टच बोलतो, हे स्फुट आवडले.

असेच कधीतरी गतकाळातील वैभवाबाबत लिहा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखन जबरदस्त आवडले. तुमची भाषा लई पॉवरबाज आहे. तुमच्या अनेक न आवडलेल्या लेखांमधेसुद्धा तुमच्या भाषेवर मी बेहद्द खुष होतो. (स्पष्ट बोलणे ही आमचीही खासियत आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थेट आणि स्पष्टच.. 'न ब्रूयात सत्यमप्रियम' हे व्यवहारात नेमकं असलं तरिही, सुकडा साफ झाल्यासारखं मोकळं वाटतं खरं बोल्लं की हे सगळ्यात मोठ्ठ सुख स्पष्टवक्तेपणातला.. मस्त लिहिलेय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- प्रशांत उपासनी

उडत-उडत वाचले*, आवडले.

*नेमाडेसुद्धा मी उडत-उडतच वाचू शकतो**, आणि ते लिखाणही आवडते.

**"कोसला" उडत-उडत वाचले, "हिंदू" मात्र सलग वाचले. त्यामुळे वरील तळटीप ~५०%च बरोबर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मस्तं
(सतीश वाघमारेंचा फ्यान झालेलो आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा लेख वाचून पूर्वीच्या काळात अनेकदा पारायणे केलेल्या चिं.वि.जोशीलिखित 'माझे स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग' ह्या लेखाची आठवण झाली. त्यांची शैली वेगळी आणि धागाकर्त्याची वेगळी पण वेधकता तितकीच. धाग्याच्या शीर्षकातील 'माझेहि' ह्या शब्दात तो संदर्भ आहेच.

जोशींच्या लेखातील 'गोमातेची अंडी', 'तरुणीबाई गोर्‍यामोर्‍या होणे', ,'मुमुक्षु'चा अंक पेशंटास आणून देणे' अशा प्रसंगांची आठवण अजूनहि येत राहाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जय हो !!:)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0