एक कविता, आणि तिचं भाषांतर

मी काही तासांपूर्वीच सदस्य झालो आहे. सर्वांना नमस्कार. ऑगडेन नॅशची एक कविता, आणि त्यानंतर मी केलेलं तिचं भाषांतर:

The one-l lama,
He's a priest.
The two-l llama,
He's a beast.
And I will bet
A silk pajama
There isn't any
Three-l lllama.

एक ट अटल
झाला पंतप्रधान
दोन ट अट्टल
चोरापासून सावधान
पण देईन मी बक्षीस
सोनं एक क्विंटल
जर असेल कुठे जगात
तीन ट अट्ट्टल

❈ ❈

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (4 votes)

प्रतिक्रिया

मजेशीर मूळ कविता आणि भाषांतर. भाषांतर कसं असावं याचा एक उत्तम वस्तुपाठ.

ता क. नवीन सभासदाचं स्वागत.
ता ता क : तीन ट वरून आठवलं. "आमच्या काळी" , म्हणजे आम्ही पौगंडावस्थेत होतो तेव्हा - एका नटीबद्दल म्हणायचो : पूजा भट्ट, घट्ट, मठ्ठ.

एक अतिअवांतर प्रतिसाद : प्रस्तुत कवितेमधे जो शब्दांचा - शब्दांचा नव्हे तर अक्षरांचा - खेळ आहे त्यावरून आमचे इथले मित्र धनंजय यांची काही वर्षांपूर्वी वाचलेली कविता आठवते आहे. कोकणच्या माणसांना हा कोकणी सल्ला जरा अधिक आवडेल Wink

कोल्हापूरचा कोल्हे वाणी
पोलादपूरला सोलें आणीं
"सल्ला सच्चा , सोळा आणे :
सोलापूरला पोलाद नेणें"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

भाषांतर करताना दर वेळी शब्दशः अनुवाद शक्य नसतो आणि कित्येकदा योग्यही ठरत नाही. मूळ लिखाणाशी इमान राखणं, आणि तरीही दुसर्‍या भाषा/ संस्कृतीमध्ये चपखल बसणारे संदर्भ भावानुवादात आणणं कठीण असतं.
उत्तम अनुवाद.
(लामा लामा रेड पजामा आठव्लं)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम शब्दांची निवड! मजा आली. स्वागत आहे.

मात्र मुळात जशी घट्ट लय आहे, तशी कुठली मराठमोळी लय राखता आले असते, तर अधिक मजा आली असती :

एका टचा अटल
झाला पंतप्रधान
दोघ्या टंचा अट्टल
चोर! ... सावधान!
पण देईन बक्षीस
सोन्याचा क्विंटल
सापडला जर जगात
तिघ्या टंचा अट्ट्टल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ कविता आणि भाषांतर दोन्ही आवडल्या. असेच अजून येऊ द्या.
ऐसीवर स्वागत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(फा.फे.सारखा ट्ट्टॉक आवाज काढत) मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

(ट ला ट जोडून केलेली) कविता आवडली Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'स्वैर अनुवाद' आहे बर्का हा.
नै तर दलाई लामा मधे धर्मगुरू हाय
आय मिन अटल मधे पंतप्रधान.
त्ये जम्लं झक्कास हाय, पन हाउ अनुवाद न्हाई !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मत्त!!! आय मीन मस्त!!! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुंदर रचना अन बाकी प्रतिसाद. फार्फार आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही