दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२० एप्रिल
जन्मदिवस : चित्रकार ओदिलाँ रेदाँ (१८४०), चित्रकार जोन मिरो (१८९३), संत साहित्याचे अभ्यासक प्राचार्य सोनोपंत दांडेकर (१८९६), उडिया लेखक गोपीनाथ मोहंती (१९१४), 'याहू'चा सहनिर्माता डेव्हीड फिलो (१९६६)
मृत्युदिवस : 'ड्रॅक्युला'चा लेखक ब्रॅम स्टोकर (१९१२), बासरीवादक पं. पन्नालाल घोष (१९६०), 'दुर्दैवी रंगू' ह्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक व भारतीय साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक भारताचार्य चिंतामणराव विनायक वैद्य (१९६८), कवी शकील बदायुनी (१९७०), 'रुचिरा'कार कमलाबाई ओगले (१९९९)
---
४/२० - आंतरराष्ट्रीय गांजा संस्कृती दिवस.
१२३३ : 'इन्क्विझिशन'ची सुरुवात.
१६५७ : न्यूयॉर्कमधल्या ज्यू लोकांना धर्मस्वातंत्र्य देण्यात आले.
१७७० : कॅप्टन कुकच्या जहाजांना सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचा किनारा दिसला.
१८६२ : लुई पास्चर आणि क्लोद बर्नार यांनी अचानक जीवोत्पत्तीचा सिद्धांत खोडणारा प्रयोग पूर्ण केला.
१८६५ : समुद्र वा तलावातल्या पाण्याची पारदर्शकता मोजू शकणाऱ्या सेची चकतीचा पहिला प्रयोग पियेत्रो सेचीने दाखवला.
१९०२ : मेरी आणि पिएर क्यूरी यांनी रेडियम क्लोराईड पिचब्लेंडमधून वेगळे केले.
१९३९ : मध्य प्रांतातील मराठी विभागाचे एकीकरण करून विदर्भ नावाचा नवीन प्रांत बनविण्याची शिफारस करणारा ठराव प्रांतिक कायदेमंडळात संमत झाला.
१९७२ : इंजिनातल्या बिघाडावर मात करून अंतराळयान अपोलो १६ चंद्रावर उतरले.
१९९२ : जी.एम.आर.टी.ची पहिली अँटेना पुणे जिल्ह्यातल्या खोडदमध्ये उभारली गेली. ही आशियातली सगळ्यात मोठी रेडिओ दुर्बिण आहे.
१९९९ : कोलंबाईन रक्तपात - अमेरिकेतल्या कोलंबाईन शाळेत दोघांनी केलेल्या बेछूट गोळीबारात त्यांच्यासह १५ मृत. शस्त्र बाळगण्याचे अमेरिकन स्वातंत्र्य त्या निमित्ताने चर्चेत.
२००१ : चीनमध्ये मानसिक आजारांच्या यादीतून समलैंगिकतेला वगळले.
२००२ : वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा फलंदाज सचिन तेंडुलकर याने २९वे शतक काढून ऑस्ट्रेलियन फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
२०१२ : ५००० किमीपर्यंत माऱ्याची क्षमता असणाऱ्या 'अग्नि-५' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
२०१३ : फुकुशिमा दाईची अणूऊर्जा प्रकल्पातला शेवटचा रिअॅक्टर बंद.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
चुकून एकाच विषयाचे दोन कौल प्रकाशीत झालेत, उरलेला कसा उडवावा?
अॅडमिन, जरा इकडे लक्ष द्याल का? हा सुरू ठेवायचा आहे, तर याच नावाचा दुसरा चुकून तयार झालाय तो डिलीट मारायचा आहे. कृपया लक्ष घालावे.
होय
होय, न उडवता हातात ठेवल्यास हाताला जखम होण्याची शक्यता आहे.
--फटका हाताने उडविणार हे गृहीत धरून.
आक्शेप.
१. क्र. १० चा प्रतिसाद हा प्रश्नास उद्देशून नाही. प्रश्न फटाके 'फोडण्या' बद्दल नाही. 'उडविण्या'बद्दल आहे.
२. एकापेक्षा जास्त प्रतिसाद देण्याची सोय हवी ~भोकाड पसरतो~
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
हिन्दून्नी दिवाळीमधे फटाके
प्लिज प्लिज प्लिज.. शब्द जरा निट लिहा हो. शब्दांचे नको ते भास होतात.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
हा चिल्लर आला का इकडे पण. ;)
हा चिल्लर आला का इकडे पण.
अॅडमिन, जरा इकडे लक्ष द्याल
अॅडमिन, जरा इकडे लक्ष द्याल का? जात-धर्मावर आधारित भाडकवु लेखन कशाला इथे?
फडतूस कौल आणि केच्याकै
फडतूस कौल आणि केच्याकै पर्याय. ह्या कौलांना श्रेणी द्याची सोय हवी.
चावलेत का?
तुम्हाला जामोप्या चावलेत का?
की तुम्ही जामोप्याच आहात लिंबूचा आयडी घेऊन,गुरूदक्षिणा म्हणून
खी खी खी! +१
लिंबूटिंबूनी ट्यार्पीचा धंदा सुरु केला की काय अशी एक शंका आली.
दुसरीही एक शंका आली (धर्म, समधर्म, गड्या आपला गाव बरा वगैरे) पण आम्ही जात्याच खोडसाळ असल्याने कर्म बोंबलायचं म्हणून व्यक्त करत नाही.
-Nile
नै हो, मी लिम्बुटिम्बुच,
नै हो, मी लिम्बुटिम्बुच, मायबोलीवरचा.
दिवाळीत फक्त हिंदूच फटाके
दिवाळीत फक्त हिंदूच फटाके उडवतात हे नव्यानेच कळते आहे.
>>>> दिवाळीत फक्त हिंदूच
>>>> दिवाळीत फक्त हिंदूच फटाके उडवतात हे नव्यानेच कळते आहे. <<<<<
मी असे कुठे लिहीलेय वा सुचवलय?
कृपया(च) प्रश्न पुन्हा एकदा नीटपणे वाचा, "हिन्दून्नी दिवाळीत फटाके उडविणे आवश्यक आहे का?" यात फक्त हिन्दूच उडवितात असा अर्थ कसा काय काढता बुवा? बाकी धर्मिय पण उडवत अस्तील, पण मला काय त्याचे?
मी हिन्दून्पुरते विचारतो, बाकिच्यान्नी काय करावे न करावे हे विचारण्या/सान्गण्यावर माझा कसलाही "अधिकार" नैये. कळ्ळ?
तरी नशिब तुम्च, मी "हिन्दुन्च्या दिवाळीत हिन्दुन्नी" असा अधिक परिपूर्ण कायदेशीर शब्द प्रयोग केलेला नाहीये, तरी तो तिथे अध्यार्हुत आहेच! आता बोला
सगळे भारतीयच
कोण हिंदू आणि कोण अहिंदू? सगळे भारतीय आहेत. या जाती-धर्माच्या लोढण्यातून बाहेर उठा मंडळी.
-- अ.ना.डिसूझा उर्फ अब्दुल नारायण डिसूझा
"अल्पसन्ख्यान्क"
म्हणुनचे आधीचे व होऊ घातलेले विशेष कायदे व रिझर्वेशन्स रद्द करा, मी लगेच उठतो
फटाके उडवून झाले आजच
फटाके उडवून झाले आजच
.
फटाके उडवा अगर न उडवा हा
फटाके उडवा अगर न उडवा हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न. पण कुण्या लिंबूटिंबूने ते उडवू नये असे आमचे मत, भाजून फोड येऊ शकतात.
------------------------
घणघणतो घंटानाद