ऐसी अक्षरे लेखन कार्यशाळा - व्यक्तिचित्रण - १ व्यक्तीचं दिसणं/जाणवणं

सुरूवात करण्याची आदर्श जागा मला माहीत नाही. पण कुठच्याही प्रकारचं गद्य ललित लिखाण करायचं झालं तरी त्यात व्यक्तिचित्रण हे येतंच. म्हणून तिथून सुरूवात करूया. व्यक्तिचित्रणातही अनेक भाग असतात. तिने भोगलेले प्रसंग, तिच्यावर येणारी संकटं, तिचे प्रश्न, तिच्यावर झालेले संस्कार, तिची नातीगोती - हे त्या व्यक्तीचं बाह्य वातावरण. तिचं रूप, तिचे गुण, स्वभाव, बोलण्याची पद्धत, धडाडी, तिचा आनंद, दुःख या सगळ्या गोष्टी तिचं आंतरिक वातावरण दाखवतात. या आंतरिक आणि बाह्य वातावरणांनी घडलेला आकार म्हणजे तिचं व्यक्तिमत्व. हे आंतरिक आणि बाह्य घटक स्वतंत्र नसतात. ते एकमेकांत गुंतलेले असतात. कधी त्यांचे रस्ते समांतर असतात, तर कधी एकमेकांविरोधी जातात. त्यांच्या रस्सीखेचीतून व्यक्ती खेचली जाते आणि तुटेपर्यंत ताणली जाते. कधी हे ताणतणाव तडजोडीने तात्पुरते शांत केलेले असतात. प्रत्येक व्यक्तिचित्रणात या सर्व बाह्य आणि आंतरिक गोष्टींचं वर्णन आवश्यक आहेच असं नाही. पण यापैकी सर्वच टाळणं शक्य नाही.

तेव्हा चांगलं व्यक्तिचित्रण कसं करावं यासाठी आपण प्रत्येकाने एक एक व्यक्तिचित्रण करून बघू. चित्र काढताना आधी समोर दिसणाऱ्या वस्तूचं स्थिरचित्र काढायला शिकतो तसं काल्पनिक व्यक्ती तयार करण्याअगोदर आपण आपल्या डोळ्यासमोर दिसणारी एखादी व्यक्ती घ्यावी असं मी सुचवेन. या भागात आपण ती दिसते कशी इतकंच वर्णन करणार आहोत. ती व्यक्ती दिसल्यावर आपल्याला काय दिसतं? चेहऱ्याचा आकार, केसाचा रंग, शरीरयष्टी, उभं राहण्याची पद्धत यांसारख्या गोष्टींचं वर्णन तर त्यात येतंच. पण तेवढं पुरेसं नसतं. कारण व्यक्ती या स्थिरचित्रातल्या एखाद्या कपाप्रमाणे अचल नसतात. स्थिरचित्र काढताना तुम्हाला अवकाशाच्या तीन मिती दिसतात. तुमच्या डोळ्यांवर त्यांचं द्विमितीय चित्र तयार होतं. ते तुम्ही मनात त्रिमितीय इंटरप्रेट करता. आणि तसंच समोरच्या कॅनव्हासवर उमटवून प्रेक्षकाच्या मनातही त्रिमितीय संकल्पना तयार होईल असा प्रयत्न करता. मात्र व्यक्तीच्या चित्रणासाठी एक कालाची मितीही वापरावी लागते. म्हणजे तो माणूस पुतळ्यासारखा स्थिर उभा आहे अशी कल्पना करूनच केवळ चित्रण करता येईलही. पण वॉंटेड फोटोत दिसणाऱ्या चित्रापेक्षा फार वेगळं काही त्यात दिसणार नाही. त्यांच्या आकाराच्या वर्णनाबरोबर त्यांच्या हालचालीचं वर्णनही करता येतं. 'तो हसला की त्याच्या उजवीकडचे पडलेले दात दिसून त्याच्या केविलवाणेपणात भरच पडायची' अशा वर्णनाने त्या माणसाचं दीनवाणं रूप डोळ्यापुढे यायला मदत होते. 'ती चालताना डावा पाय एखाद्या नकोशा ओझ्याप्रमाणे खेचत चालायची' असं म्हटल्यावर त्या स्त्रीच्या नुसत्या रूपाविषयी, किंवा शरीराविषयीच नाही तर तिच्या व्यक्तिमत्वाविषयी बोलता येतं.

त्या व्यक्तीचं डोळ्याला दिसणारं चित्र उभं करायचं म्हणजे हालचालींतून आपण काळाची मिती वापरतो. तसंच त्या व्यक्तीच्या भूतकाळ आणि वर्तमानकाळाबद्दल बोलूनही काळाची मिती वापरता येते. उदाहरणार्थ विजय तेंडुलकरांनी एका माणसाचं वर्णन करताना 'त्यांच्या अंगावर कोडाचे डाग असल्यामुळे एखाद्या झाडाच्या सावलीत असल्याप्रमाणे ते दिसत होते' असं लिहिलं (शब्दांची खात्री नाही). हीच कथा काळात पुढे सरकते तेव्हा त्याचं वर्णन करताना ते म्हणतात 'एव्हाना त्यांचं कोड अंगभर पसरल्यामुळे ते लख्ख उन्हात उभे असल्याप्रमाणे वाटत.' ती व्यक्ती कशी दिसायची आणि आता कशी दिसते यातून त्या व्यक्तीच्या प्रवासाबद्दलही काही टिप्पण्या करता येतात. उदाहरणार्थ 'तरुणपणी त्याचे घनदाट असलेले केस वाढत्या वयाबरोबर त्याच्या आशा आकांक्षांप्रमाणे गळून गेलेले होते.' अवकाश व काळ यांमधून दिसणाऱ्या गोष्टींचं वर्णन करून आपल्याला त्या व्यक्तिमत्वाविषयी काही लिहिता येतं.

आत्तापर्यंत जे व्यक्तीचं वर्णन म्हटलेलं आहे ते केवळ डोळ्यांना दिसणारं आहे. आणि सर्वसामान्यपणे व्यक्तीचं वर्णन करताना नवीन लेखक केवळ डोळ्याने वर्णन करतो. त्यातही आकार प्रथम सांगतो. पोत, रंग सांगतोच असं नाही. पण दृक्दर्शनापलिकडेही व्यक्ती आपल्याला जाणवते. या त्रिमिती आणि काल यांपलिकडेही वेगळेपण जाणवतं. एक जाणवणारं अंग म्हणजे वास. गॉन विथ द विंडमधल्या नायिकेला तिची आई म्हणजे तो सळसळणारा पिवळा ड्रेस आणि मॅग्नोलियाचा आश्वस्त वास म्हणूनच अधिक आठवत असते. ती गेल्यानंतरही तिच्या बेडरूममध्ये तिला तो वास येतो (किंवा आल्याचा भास होतो) या वासांची आणि आवाजाची दुनिया नवीन लेखकाच्या लेखनात पुरेशी येत नाही. एखाद्या बाईचं वर्णन 'ती नेहमी जाईचा गजरा माळत असल्याचं आठवतं. म्हणजे अजून चेहरा डोळ्यासमोर येत नाही पण कित्येक वेळा पलिकडच्या खोलीतून तो वासच जाणवायचा.' असं करता येतं. यातून चेहरा धूसर झाला तरीही इतर व्यक्तिमत्व अधोरेखित व्हायला मदत होते.

रंग, पोत, आकार, वास, आवाज, स्पर्श या आपल्या पंचेद्रियांना होणाऱ्या जाणीवा. यापलिकडे व्यक्ती आपल्याला भिडते ती या सर्वांतून निर्माण होणाऱ्या भावनांतून. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी लिहितो तेव्हा आपण एक निवेदक म्हणून काही ना काही छोटीशी भूमिका त्या व्यक्तीच्या आयुष्यात निभवतो. सर्वसाधारणपणे व्यक्तिचित्रणात निवेदकाची भूमिका ही नगण्य असते. थर्मोमीटर जेव्हा एखाद्या पदार्थाची उष्णता मोजतो तेव्हा तो किंचित उष्णता शोषून घेतो, आणि त्यानुसार तापमान दाखवतो. या शोषलेल्या उष्णतेमुळे त्या पदार्थाचं तापमान बदलत नाही. त्याअर्थाने निव्वळ व्यक्तिचित्रण हा एकतर्फी प्रवास असतो. पण याचा अर्थ निवेदक पूर्णपणे निष्क्रिय असतो असं नाही. अनेक वेळा ज्या व्यक्तीचं वर्णन करायचं तिला कॉंट्रास्ट म्हणून निवेदकाची भूमिका असते. (उदा. 'नंदा प्रधान'चा निवेदक हा नंदा प्रधानपेक्षा खूपच वेगळा दाखवला आहे.) तेव्हा पंचेंद्रियातून होणाऱ्या अनुभूतींतून निवेदकाच्या मनात जे उमटतं त्याचं चित्रणही आवश्यक असतं.

व्यक्तीच्या आंतरिक वातावरणाचा बाह्य जगावर होणारा दृश्य किंवा सकृतदर्शनी होणारा परिणाम म्हणजे त्या व्यक्तीचं दिसणं/जाणवणं. बहुतेक चित्रणांत हा भाग आधी येतो. एखाद्या प्रश्नासारखा. तो असा दिसतो, असा वागताना आढळतो.... तो असा का झाला? कुठच्या आतल्या आणि बाह्य शक्तींनी तो घडून असा दिसेल/जाणवेलसा झाला? या सगळ्याचं चित्रण करून काही प्रमाणात उत्तरं देणं, काही प्रश्न अर्धेच सोडणं हा व्यक्तिचित्रणाचा उद्देश असतो. ती उत्तरं देण्याआधीची पहिली पायरी म्हणजे 'तो दिसायला/जाणवायला कसा आहे?' याचं वर्णन. हे आपण आधी करून बघू.

तर कार्यशाळा म्हणून एक करूया. सर्वांनी कुठचीतरी एक व्यक्ती डोळ्यासमोर आणा. आणि सुमारे दोनशे शब्दांत ती तुमच्या डोळ्यांना, कानाला, नाकाला, स्पर्शाला कशी जाणवते ते लिहून काढा. ती उंच आहे का बुटकी, तरुण आहे का वृद्ध, हसरी आहे का रडकी.. या शक्य तितक्या प्रश्नांना तुमच्या इंद्रियांतून जाणवणाऱ्या तिच्या पैलूंचं वर्णन करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तिच्या वागण्याबोलण्यातून, लकबींतून तुमच्यावर किंवा इतरांवर काय परिणाम होतो हे मांडण्याचा प्रयत्न करा. सर्वच उत्तरं मिळाली पाहिजेत असं नाही. पण नुसतं 'तिची उंची ५ फूट ० इंच होती' असं म्हणू नका. 'तशी ती लहानगीच. नवऱ्याच्या शेजारी उभी राहिली की ती आणखीनच लहान दिसायची. तो धिप्पाड, सहा फुटाहून उंच. अंगानं आडवातिडवा. ही जेमतेम त्याच्या छातीपर्यंत यायची....' किंवा 'त्यांचा आवाज दमदार होता' म्हणण्याऐवजी 'जिना चढायच्या आधी, चौकात खेळणाऱ्या पोरांवर ते वस्सकन ओरडत. तो आवाज ऐकून आमच्या पोटात धडकी भरायची, आणि आम्ही हातातलं टाकून पुस्तकं उघडून बसायचो.' वगैरे तुम्हाला जाणवणारे पैलू मांडा. कोणाच्या लेखनाच्या नमुन्याला चांगलं वाईट म्हणताना नुसतीच श्रेणी देण्यापेक्षा 'या व्यक्तीचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं का? कुठले शब्दप्रयोग, वाक्यं विशेष आवडली? कुठे तुम्हाला वेगळं परिणामकारक वाक्य सुचतं?' असा विचार करावा. लेखकांनी आपल्याला आलेले प्रतिसाद सकारात्मक रीतीने घ्यावेत.)

डिस्क्लेमर
- मी जी उदाहरणं दिलेली आहेत ती सगळी काही चांगल्या लेखनाचा नमुना म्हणून नव्हेत तर केवळ वेगवेगळे पैलू तपासून बघता येतात, मांडता येतात हे दाखवणारी उदाहरणं आहेत. जरी वर्णन करताना तीन मिती + काल, इतर इंद्रियांना जाणवणाऱ्या मिती, आणि त्यातून होणारे भावनिक परिणाम या सगळ्यांचा विचार करा असं म्हटलं असलं तरी उत्कृष्ट वर्णनासाठी काही वेळा काही मिती प्रयत्नपूर्वक गाळलेल्या असतात. अनेक वेळा काळी-पांढरी छायाचित्रं रंगीत छायाचित्रांपेक्षा परिणामकारक ठरतात - त्यात रंग या पैलू हेतुपुरस्सर अभाव केलेला असतो तरी - किंवा त्यामुळेच. मुद्दा असा आहे की काय परिणामकारक ठरतं, काय वाचकाचा ठाव घेऊ शकतं हे कळण्यासाठी लेखकाला त्याच्या हाती असलेल्या पूर्ण पॅलेटचा अनुभव असायला हवा. अमुक एक केलं की उत्कृष्ट लेखन करता येईल अशा 'फाड फाड लेखन' टाइप या सूचना नाहीत. वेगवेगळी अंगं विकसित करण्यासाठी व्यायामप्रकार आहेत असं समजा. ही मर्यादा लक्षात घेऊनच आपण हा सराव करू.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (6 votes)

प्रतिक्रिया

अतिशय उत्तम उपक्रम आहे त्याबद्दल उत्सुकता आणि शुभेच्छा.

एक प्रश्नः व्यक्ती किंवा स्थळाचं वर्णन थेट किंवा आडून करणं हा एक व्हॅलिड अप्रोच आहेच. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे हेही खरं की अगदी "पाच फूट ० इंच" असं वर्णन न करता ते अन्य संदर्भातून वर्णिता येतं. व्यक्तीप्रमाणेच ठिकाणाचंही वर्णन (उदा. चाळ.. किती मजली, लाकडी जिने की सिमेंटचे, रंग कोणता, संडास किती आणि गॅलरीच्या कोणत्या बाजूला अशी वर्णनं) जाताजाता सूचित करता येतं.

पण हे सर्व पटकथा / व्हिज्युअल मीडियमसाठी अत्यंत योग्य किंबहुना आवश्यक असतं.

तुम्ही लेखन असं म्हटलं आहे ते जर पुस्तक वा तत्सम अक्षरलेखन सदृश माध्यमासाठी म्हणजेच वाचकासाठी (वाचनासाठी) असेल तर माझा अप्रोच नेहमी वाचकाच्या मनाच्या रंगभूमीला जास्तीतजास्त वापरुन घेण्याचा असतो.

माझं लिखाण अजिबात काही खास आहे असं नव्हे पण मी मनापासून ते करत असल्याने मला हा अप्रोच लिहावासा वाटला.

मी सहसा व्यक्ती किंवा ठिकाणाचं वर्णन टाळतो. टकले, उंच, देवीचे व्रण असलेल्या गालाचे, नाकावर चामखीळ, सुजल्यागत डोळ्याचे असं पात्रांचं वर्णन करुन ती वाचकापुढे पेश करण्याऐवजी मी फक्त त्या त्या पात्राची कथा सांगायचा प्रयत्न अशासाठी करतो की त्या त्या व्यक्तीच्या ओव्हरओल पॅकेजमधे अफलातून रियल लाईफ संदर्भ लाखोंच्या संख्येने असतात आणि आपण वर्णन केलं नाही तर वाचक स्वतःच्या खास आतल्या ठेवीतून एक वर्णन काढून त्या पात्राला चिकटवल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. वाचकाची ही क्षमता अफलातून आहे. वाचकाचा स्वतःचा रंगमंच अगदी रंगवलेल्या चेहर्‍यांसकट तयार असतो. प्रत्येकाचा वेगळा. मग शाळा पुस्तकातल्या शाळेत प्रत्येकाला आपली शाळा मिळते.. आप्पामधे आपला हेडमास्तर नसला तरी एक मारकुटा कडक स्वभावाचा खराखुरा अनुभवलेला मास्तर मिळतो.. मग त्या खर्‍याखुर्‍या मास्तरचं टक्कल, उंची, मिश्या, गहिरे हिरवे डोळे असं आपोआप येतंच त्याच्या त्याच्या मनात त्याच्यापुरतं.. (शाळा हे बोकिलांचं पुस्तक हे पूर्णपणे या अप्रोचचं उदाहरण नसेलही, पण त्यातली शाळा आणि आप्पा हे पात्र इतकीच उदाहरणं घेतली.) यामुळेच पुस्तकावरुन कोणी सिनेमा केला आणि आपण तो आधी पुस्तक वाचून नंतर थेटरात पडद्यावर पाहिला की भ्रमनिरास होतो.

वाचकाला इन्क्लूड न करणारं लेखन कितीही उच्च असलं तरी त्यात जीव नसतो हा माझा विचार आहे.

या मार्गाने वाचकाला माझ्या प्रत्येक पात्राशी स्वतःचं एक पात्र जोडून ती कथा अक्षरशः जगता येते.. आणि असं वाचणं अत्यंत जास्त एंजॉयेबल असतं असं मला वाटत आलेलं आहे. यात वाचकाच्या अंतर्गत ताकदीचा पूर्ण उपयोग करुन घेतला जातो आणि आपोआपच वाचक त्या कथेत इनव्हॉल्व होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा एक विचित्र मुलगी हा लेख वाचलात का?त्यामध्ये मी व्यक्तिचित्रणावर भर देण्यापेक्षा घडणार्या प्रसंगावर भर दिलेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

.......आपण वर्णन केलं नाही तर तरी वाचक स्वतःच्या खास आतल्या ठेवीतून एक वर्णन काढून त्या पात्राला चिकटवल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. वाचकाची ही क्षमता अफलातून आहे. वाचकाचा स्वतःचा रंगमंच अगदी रंगवलेल्या चेहर्‍यांसकट तयार असतो. ................. यामुळेच पुस्तकावरुन कोणी सिनेमा केला आणि आपण तो आधी पुस्तक वाचून नंतर थेटरात पडद्यावर पाहिला की भ्रमनिरास होतो..........

(तुला 'तरी' म्हणायचं होतं का?. मला तरी Smile ते जास्त योग्य वाटतं. )
अगदी बरोब्बर. या लेखातला शेवटून दुसरा परिच्छेद याचं उत्तम उदाहरण आहे.

राजेश,
आता थोडा दुतोंडीपणा करतो! गविचा मुद्दा रास्त आहे पण व्यक्तिचं वर्णन जेव्हा करायचं असतं / करावं लागतं तेव्हासाठीची तू दिलेली उदाहरणं ( ..... 'तशी ती लहानगीच. नवऱ्याच्या शेजारी उभी राहिली की ती आणखीनच लहान दिसायची......) पण अगदी पटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

(तुला 'तरी' म्हणायचं होतं का?. मला तरी ते जास्त योग्य वाटतं. )

मला "तर"च म्हणायचं होतं. वर्णन केलं नाही तर वाचक आपल्या खास ठेवणीतलं एखादं पात्र काढून त्याला आपल्या पात्राशी एकरुप करतं. कधीकधी दोन किंवा अनेक व्यक्तींचं मिश्रण असलेली नवीन पात्रंही वाचक उभी करतात.

"तरी" असं म्हटलं की मग वर्णन केलं काय किंवा नाही केलं काय, वाचक शेवटी आपल्याला हवं तेच करतात असा अर्थ ध्वनित होतो. तसं नाहीये. वर्णन "केलं" तर लोक आपल्या पोतडीतले रंग बाहेर काढतच नाहीत. ते रेडीमेड बघतात. सिनेमा बघितल्यासारखं. त्यातही मनोरंजन आहेच, पण इन्व्हॉल्वमेंट नाही. मेंदूला खुराक नाही.. स्वतःला कथेत प्रवेश मिळणं नाही. फक्त चमच्याने भरवलेलं खाणं. अशा वेळी मग कथासूत्रात दम, वेग इत्यादि नसेल तर लोक फारच लवकर कंटाळतात किंवा अलिप्त होतात.

म्हणूनच बरीच आवडती पुस्तकं आजन्म मनाच्या गाभार्‍यात राहतात पण सिनेमे कितीही उत्कृष्ट असले तरी बघतानाच्या वेळेपुरती आणि त्यानंतर भारावलेले काही तास इतकी त्याची खरी मजा टिकते.. त्यातला एखादाच अद्वितीय सिनेमा पुस्तकासारखा जन्मभर मनात वसतीला येतो. म्हणून सिनेमा आदि व्हिज्युअल मीडियाचं काम जास्त कठीण आणि सर्वांगीण आहे. त्याने लोकांना दीर्घकाळ पकडून ठेवले तर ते यश अफलातूनच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि आपण वर्णन केलं नाही तर वाचक स्वतःच्या खास आतल्या ठेवीतून एक वर्णन काढून त्या पात्राला चिकटवल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. वाचकाची ही क्षमता अफलातून आहे.

याबद्दल वादच नाही. किंबहुना, काय झाकायचं आणि काय दाखवायचं हा लेखकाचा जाणीवपूर्वक निर्णय असला पाहिजे. कारण शेवटी शब्दसंख्या मर्यादित असते, तेव्हा कुठच्यातरी पातळीवर हे निर्णय घेतले जाणं आवश्यक आहे, आणि जातातच. मात्र शंभर गोष्टी सांगता येतात त्यातल्या ठरवून पन्नासच सांगणं, आणि इतर ऐशी गोष्टींबद्दल विचारच न केल्यामुळे फक्त वीसच सांगणं यात मी फरक करतो आहे. अशी वीसची उदाहरणं दिसली की 'कथा फुलवता आली असती' अशी माझी प्रतिक्रिया होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुझनला मी गेल्या वर्षी भेटले. कलाकृतींचे दुकान थाटलेली सुझन वयाने ६७ आहे हे मला खूप नंतर कळले. ते कळेपर्यंत मला ती ५० शीचीच वाटत राहीली. कलाकृतींचे (आर्ट) दुकान चालवणारी अन डोळ्यात खूपशी धूर्त (श्र्यूड) झाक असलेली सुझन, स्वतः एखाद्या सुंदर कलाकृतीसारखीच दिसते. देहयष्टी किंचीत सुटलेली, खरं तर समृद्धीचेच लक्षण वाटणारी. एखादी व्यक्ती दिसली की माझे पहीले लक्ष त्या व्यक्तीच्या नाकाच्या आकाराकडे, ठेवणीकडे जाते. तद्वत सुझनच्या डोळ्यां/केसांआधीही मला तिचे नाक लक्षणीय प्रमाणबद्ध वाटले.त्रिकोणी अन नीटस, सुबक!
मी जेव्हा जेव्हा पेंटींग पहात असे तेव्हा तिने मला मदत केली. जसे मला चिकाडी पक्षाची पेंटींग आवडतात हे कळल्यावर माझ्या बजेट्मध्ये बसणारी चिकाडीची अनेक लहान लहान पेंटींग्स दुकानात फिरुन तिने दाखवली. इतर विक्रेत्यांसारखा तिने पिच्छा मात्र कधीच पुरवला नाही. एक शिष्ठ किंवा आब राखलेले तिचे व्यक्तीमत्व खूपसे बिझनेस्-लाइक वाटते. म्हणजे गळेपडू नसलेले, पुरेसे अंतर राखलेले. प्रोफेशनल.
गेले वर्षभर मला सुझन फक्त बिझनेस्-वूमन म्हणून माहीत होती. १९ मार्च ला मी एक सुंदर पेंटींग निवडले अन तिला किंमत विचारली. ती म्हणाली "दॅट्स माय पेंटींग" अन मला तेव्हाकळले की ती स्वतः आर्टीस्ट आहे. दुकानात फिरुन माझ्या विनंतीवरुन तिने तिची पेंटींग्स दाखवली. एकापेक्षा एक व्हायब्रंट, अत्यंत सुंदर पण परत तेच पेंटींग्ज ही स्वतःचा आब राखून असलेली. वहावत न गेलेली.
कदाचित या क्षणी मला आयुष्यात "वहावत न जाणे/ सेल्फ्-कंट्रोल" या गोष्टी सुपर सुपर महत्त्वाच्या वाटत आहेत म्हणून ती पेंटींग्ज मला तशीच जाणवताहेत. असेलही.
तिचे पेंटींग विकत घेतानाही मी घासाघीस केलीच अन तिने होकार तर दिला पण हेदेखील सुनावले की तिचा वेळ बहुमूल्य आहे अन त्या पेंटेंग्ज्मध्ये इन्व्हेस्टेड आहे. परत लक्ककन हेच जाणवले उद्योजक + कलाकार यांचे बेमालूम मिश्रण!!! १९ मार्च - हा तिचा वाढदिवसही होता हेदेखील तिने सहज सांगीतले. अन ती ६७ वर्षाची आहे हेदेखील. तिच्या नेहमीच्या प्रोफेशनल व्यक्तीमत्वाला हेच दोन काय ते अपवाद.
खाली त्या पेंटींगचा फोटो दिलेला आहेच. मला ते खूप आवडलं आहे. खरं तर या पोस्ट नंतर मी तिच्याकडेच परत जाणार आहे, यावेळी घासाघीस न करता पण लहानसं काहीतरी घ्यायला Smile
मला तिच्या व्यक्तीमत्वाची भुरळ पडली आहे. खरं आहे.हे ते पेंटींग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही वर्गातल्या पहिल्या रांगेतल्या बाकावर वाटतं?! तुमचा गृहपाठ आवडला.

अवांतरः दुसर्‍या धाग्यावर 'ऐसीवर नवीन काय करता येईल' खल चालू आहे. त्याचं हे फलित असेल तर gosh, it worked Jim!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

हाहाहा. इन्टेरॅक्टीव्ह सर्वच गोष्टी आवडतात त्यामुळे हा धागा खूप आवडला पण कोणी वाद घालायला लागले की भीती वाटते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यक्तिवर्णन आवडले. काही सुचवण्या आहेत, त्या अशा (तुमचीच वाक्ये मागेपुढे केली आहेत. पूर्ण नवीन शब्दरचना असेल तर अधोरेखित केलेली आहे.)

सुझनला मी गेल्या वर्षी भेटले. इथल्या जत्रेत विक्रीला पेंटिग्झ मांडली होती तिने. सुझन वयाने ६७ आहे हे मला खूप नंतर कळले. ते कळूनही मला ती आधीसारखी ५० शीचीच वाटत राहीली. एखादी व्यक्ती दिसली की माझे पहीले लक्ष त्या व्यक्तीच्या नाकाच्या आकाराकडे, ठेवणीकडे जाते. तद्वत सुझनचे नाक मला लक्षणीय प्रमाणबद्ध वाटले. त्रिकोणी अन नीटस, सुबक नाकाचा, चाणाक्ष डोळ्यांचा सुझनचा चेहरा एखाद्या सुंदर चित्रासारखाच दिसत होता. देहयष्टी किंचीत सुटलेली, खरं तर समृद्धीचेच लक्षण वाटणारी.

"इथल्या जत्रेत" किंवा असे काहीतरी म्हटले तर व्यक्तीभोवती वातावरण/वलयही तयार होते.
"कळूनही/आधीसारखी" असे म्हटल्यामुळे तिचे चिरतारुण्य अधिक ठसते (नाहीतर काय खरे वय कळल्यानंतर ती पोक्त वाटायला लागली? अशी शंका पेरायला नको.)
मला डोळ्यांच्याआधी पहिले नाक दिसते, असे म्हटले आहे, म्हणून नाकाचे वर्णन डोळ्यांच्या वर्णनाआधी हलवले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा गृहपाठ आवडला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी लिहायला घेतलेल्या एका गोष्टीचा तुकडा. रूढार्थानं व्यक्तिचित्रण नाही हे. पण आहेही. मुदलात हा तुकडा स्वतंत्र नाही. पण शब्दमर्यादेत बसला आणि त्याचं माझ्याच्यानं पुढे काही होतही नव्हतं, म्हणून इथे देतेय.
***

तुझ्या घरातल्या लोकांचा कायम संताप येई मला. खरं तर तो तुझाच यायला हवा हे कळत नसे असं नाही. पण आपल्या माणसाचा हा असा थेट राग करता येत नाही हे स्वत:शी न उच्चारताच स्वीकारून मी त्यांच्यावर बंदुकीचं टोक रोखून मोकळी होत असे. सवयीनं अजूनही होते.
जिच्या मऊ पोटाला हात लावून, तोंडावरून तिच्या सुती पदराचा काठ फिरवत दुपारी लोळत पडायला तुला आवडे, ती तुझी आई. संसार सांभाळून पोस्टाचं काम करणारी, संस्कार भारतीच्या शिबिरात माफक - भगवं समाजकार्य करणारी, वडलांच्या समोर ब्रही उच्चारू न शकणारी. मला अनाकलनीय असलेला एक कंडिशण्ड, चाकोरीबद्ध, काहीसा दयनीय पण, कावेबाज बाईपणा होता तिच्यात.
मला ठाऊक आहे, कावेबाज या शब्दावर आजही तुझ्या डोळ्यात थंड परका राग उमटेल - तिथूनच तर आपल्यात फटी पडत गेल्या...
क्रूरपणे कोपर्यात चेपली गेलेली माणसं परिस्थितीशी जुळवून घेताना अधिकाधिक दबक्या - मवाळ चेहर्याची होत जातात. पण त्यांना कधीच न गाजवता आलेली सत्ता वाटा शोधत राहतेच. ती बाहेर पडताना अनेकदा संभावित क्रौर्याचा चेहरा घेऊन येते आणि 'बायकाच बायकांना छळतात...'छाप सुलभीकृत प्रतिक्रियांना जन्म देऊन जाते. आपण एका रविवारी एकत्र पहुडून वाचलेलं 'रणांगण' आठवतं तुला? त्यातल्या हॅर्टाच्या आईची आठवण येई मला अनेकदा तुझ्या आईकडे पाहून. शरीरा-मनानं विशविशीत झालेली, आपल्याच पोरीच्या उत्कटतेचं उधाण पेलण्याची ताकद न उरलेली, म्हातारं कातडं डोळ्यांवर ओढून शुष्क-अलिप्त होत गेलेली ती असहाय्य बाई आणि तिच्या मांडीत पुन्हा पुन्हा आवेगानं शिरत थोडी ऊब शोधू पाहणारी हताश हॅर्टा.
आपल्याला पुस्तकातली पात्रंही आपापल्या जागेवरून निरनिराळी दिसतात. इथं तर हाडामांसाच्या नात्यागोत्याच्या माणसांचा प्रश्न. कितीही स्पष्टपणे बोललं वा कितीही आडवाटांनी आपलं आपल्यापाशी राखून ठेवलं, तरीही एका रेषेवर कसे येऊ शकणार होतो आपण?
पण आपण निर्लज्जपणे होता होईतो भाबडे राहू पाहत असतो.
वेल, त्याचीही किंमत भरावी लागते.
लागलीच.

***

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

"मी" आणि "तू" यांची "तू"च्या आईबद्दल वेगवेगळी व्यक्तिनिष्ठ प्रतिमा आहे, असा तुकडा कल्पक आहे. यातील चित्रदर्शी व्यक्तिवर्णनात्मक वाक्ये :

जिच्या मऊ पोटाला हात लावून, तोंडावरून तिच्या सुती पदराचा काठ फिरवत ... तुझी आई. संसार सांभाळून पोस्टाचं काम करणारी, संस्कार भारतीच्या शिबिरात माफक - भगवं समाजकार्य करणारी, वडलांच्या समोर ब्रही उच्चारू न शकणारी ...

त्या मानाने

मला अनाकलनीय असलेला एक कंडिशण्ड, चाकोरीबद्ध, काहीसा दयनीय पण, कावेबाज बाईपणा होता तिच्यात

हे वर्णनापेक्षा वर्गीकरणाच्याकडे झुकते. तसेच :

क्रूरपणे कोपर्यात चेपली गेलेली माणसं परिस्थितीशी जुळवून घेताना अधिकाधिक दबक्या - मवाळ चेहर्याची होत जातात...

वगैरे दोन-तीन वाक्ये "तू"च्या एकुलत्या एक आईपेक्षा बायकांमधील एका उपोद्धृत (अ‍ॅब्स्ट्रॅक्ट) वर्गाची कर्मकहाणी सांगतात, आणि त्यात "तू"च्या आईला बसवतात.

ते ठीकच आहे म्हणा. "मी"च्या मनात "तू"च्या आईचे एक वर्गीकरण झालेले आहे, आणि ते "तू" ओळखतो त्या आईपेक्षा वेगळे आहे, हा मुद्दाच आहे तुकड्याचा.

मला वाटते, व्यक्तिचित्रणात (१) "अनोखी-त्यासम-तीच" असे वर्णन आणि (२) "अमुक वर्गीकरणासाठी उदाहरणभूत (टिपिकल)" असे दोन्ही प्रकार येणे साहजिक आहे. परंतु पहिल्या प्रकारचे वर्णन व्यक्तीला मूर्त करते, चित्रदर्शी होते; दुसर्‍या प्रकारचे वर्णन व्यक्तीला वर्गाच्या गर्दीत सामावून टाकते, आणि चित्र धूसर करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म्म....

(म्हणजे - अरे बाप रे! असं झालंय का?! हम्म्म्म्म...........)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वाचतोय आणी शिकायचा प्रयत्न ही करतोय .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भेट व्यक्तीचित्रणाला हात घातलेला बघुन धाडसाचं एकीकडे कौतुकही वाटलं आनि काहिशी धास्तीही. पण लेख वाचला आणि बरं वाटलं, छानच उतरलाय लेख.
===

इथे नवे व्यक्तीचित्रणपर लिहिणे गरजेचे आहे काय?
नाहितर मी डॉक्टर कापरेकरांचं व्यक्तीचित्रण इथे ऐसीवरच लिहिलं होतं. ते या लेखानंतर आलेल्या नव्या जाणींवांसह कसं वाटतंय? कुठे सुधारणा हव्याहेत हे समजून घ्यायला अधिक आवडेल.

थोडक्यात डॉ.कापरेकरांचं चित्रण समिक्षेसाठी नव्याने खुलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

व्यक्तिचित्रणाचा फायदा असा की एका व्यक्तीवर लक्ष केंद्रित करता येतं. त्यासाठी कथेचे चढउतार, नात्यांची वर्णनं वगैरे गोष्टी कमीत कमी करता येतात.

इथे नवे व्यक्तीचित्रणपर लिहिणे गरजेचे आहे काय?

नवीन लिहिलंच पाहिजे असं नाही, पण या भागापुरता दिसण्या जाणवण्याचा वर्णनात्मक भाग इथेच डकवला तर बरं होईल. तयार व्यक्तिचित्रणातून हा भाग वेगळा काढणं कदाचित कृत्रिम वाटेल. पण तेवढ्याच तुकड्याचा इथे विचार करावा अशी इच्छा आहे. हवं असल्यास या लेखातून काही विचार झाला तर त्या अनुषंगाने पुनर्लेखन केलं तर जास्त आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यक्तीचित्रणात त्या व्यक्तीचं फिजिकल आरेखन करणारी वाक्य मी फारशी घेत नाही. किंबहुना माझे नैसर्गिकरित्याच व्यक्तीकडे ती कशी दिसते, बोलते, रंग, वजन वगैरे अंगाने बघणेच होत नाही. ती व्यक्ती काय बोलते, तिच्या आवडी, जाणीवा, स्वभाव याकडे जास्त लक्ष जाते. मात्र ते व्यक्तीचित्रणात देताना, थेट देण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रसंगातून नुसते सुचवलेले असते. ही व्यक्ती रागीट, दानशूर, प्रेमळ, कपटी वगैरे लेबलीकरण करणे मी टाळतो. ते वाचकावर सोडले असते. आणि बाह्य रूप, लकबींचा उल्लेख करणे ठिक मात्र त्या तपशीलात देणे किंवा त्याल इतके वेटेज देणे मला अनेकदा (काही अपवाद आहेतच) अनावश्यक वाटतात.

आता हे किती योग्य आहे? का व्यक्तीचित्रण म्हटले की स्वभावविशेषासोबत हे 'कायिक' वर्णन तितकेच गरजेचे आहे. हे विचारतोय कारण मी ते लिहायच प्रयत्न केला. मुळ लेखात लिहिलेल्या वर्णनाहुन आवर्जून द्यावे असे अधिक काही आठवले नाही.

मुळ लेखातला फिजिकल वर्णनात्मक भागः

मी अगदी लहान असल्यापासून त्यांच्याकडे जात असेनच. त्यामुळे त्यांना प्रथम कधी पाहिलं वगैरे प्रश्न या इसमाच्या बाबतीत गैरलागू आहेत. जितके माझे आई, वडील, आजी किंवा इतर कुटुंबीय माझ्या आयुष्यात जन्मापासून 'होते' तितकेच आमचे हे डॉक्टरही जन्मापासून 'होते'.

मी लहान असतानाचे डॉक्टर मला आठवताहेत ते साठीला आलेले. उंच, शिडशिडीत, एकेकाळी गोरे असतील असा भास देणारा रापलेला रंग, तजेलदार बोलके डोळे आणि अव्याहत चालू असलेले तोंड. दहिसरच्या एका जुन्या इमारतीच्या तळमजल्यावरच्या ब्लॉकमधे त्यांनी आपला दवाखाना टाकला होता. अख्ख्या गावात एक विचित्र डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती. तसे ते होतेही विचित्र - विक्षिप्त! "पेशंट्स हे औषधांपेक्षा बोलण्याने बरे होतात" असा त्यांचा समज असावा बहुदा. कारण त्यांच्या दवाखान्यात लोक इलाजापेक्षा बोलायलाच जास्त येत. त्यांच्याकडे गेलो आहे आणि त्यांच्या केबिनमधून फक्त औषधांचे प्रिस्क्रिप्शन घेऊन ५ मिनिटात बाहेर आलो आहे असे कधी झालेच नाही.

==============

अजुनही मला या कार्यशाळेचं स्वरूप फारसं लक्षात आलेलं नाहीये बहुदा (माय बॅड)
प्रत्येकाने काही परिच्छेद दिले आहेत. मात्र वर एक धनंजयने केलेली अगदी माफक चिकित्सा/टिपणी वगळता फारशी चर्चा झालेली नाही. इथे प्रत्येक जण शिकाऊ असताना ती तशी होणे मला फारसे अपेक्षितही नाही. असावेळी या कार्यशाळेतुन काही तरी शिकता येईल यासाठी एकाने (बहुदा राजेश तुम्हीच! Smile ) एका मर्यादेपर्यंत शिक्षकाची - रादर गुर्जींची Wink - भुमिका सोडता कामा नये असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वर्णनाची वाक्ये "ते साठीला... चालू असलेले तोंड" छान वठले आहे.

"तसे ते होतेही विचित्र - विक्षिप्त!" हे वाक्य छाटले तर त्याच्या आदले मागले वाक्य अधिक प्रवाही होते, प्रभावी होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जरा अवघड प्रकार आहे असं वाटलं .. कारण मी जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल लिहीन ते माझ्या दृष्टीकोनातून, अनुभवातून लिहीन. त्यामुळे ते परिपूर्ण असेल असे नाही. आणि तटस्थं राहून तिर्‍हाईताच्या नजरेतून लिहिणं कठीण.
मी प्रयत्न केला आहे. (शब्दमर्यादा ओलांडून)
***
संगीता

"आवो ताई ही संगी बघाना ..."

अचानक माझ्या दिशेने ३-४ मुलं, मुली धावत आली. बालभवन च्या पायरीवर आम्ही काहीजण बोलत बसलो होतो.
माझ्या कपाळावर आठ्या आल्या, आणि त्रासिक आवाजात मी म्हणलं
"जा तिला मी बोलावलय म्हणून सांग "
जास्तं चिडू नकोस .. आमच्यातल्या एका अनुभवी कार्यकर्त्याने मला सल्ला दिला. या मुलांना तुझ्या रागावण्याचीच काय, पण तू दिलेल्या
शिक्षेची सुद्धा भिती , लाज वगैरे वाटणार नाही.
इतक्यात संगीला, म्हणजे संगीताला घेऊन ती तक्रार करणारी मुलं आली.
आम्ही राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत पुण्यातील एका झोपडपट्टीतील महानगरपालिकेच्या बालभवनात तेथील वस्तीतील मुलांसाठी संध्याकाळचे वर्ग
घ्यायचो.
ही संगीता जरा कुप्रसिद्धच होती अतिशय दांडगट (मुलगी असून), आणि तोंडात अतिशिवराळ भाषा. आम्हा पांढरपेशा समाजातील कॉलेजच्या
विद्यार्थ्यांसाठी ते शब्दं ऐकणंदेखील धक्कादायक वाटायचं. आणि ती नेमकी माझ्या गटात आली होती. ती स्वत: तिथल्या उपक्रमात सामील
व्हायची नाहीच, पण जी मुले शिकण्याचा काही करण्याचा प्रयत्नं करत त्यांना त्रास द्यायची. तिला आवरणे म्हणजे माझ्यासाठी डोकेदुखीच होती.
इतके दिवस झाले ती तेथे यायला लागून पण तिला काही शिकविण्याचे माझे सगळे प्रयत्नं निष्फळ ठरले होते.
संगी माझ्यासमोर उभी होती. तिला नक्कीच माहिती होतं की तिला का बोलावलेले आहे. पण भितीचा लवलेश चेहर्‍यावर नव्हता. काहीशी
थोराड बांध्याची, काळ्याकुळकुळीत रंगाची ही मुलगी 12 वर्षांची आहे असे अजिबात वाटत नव्हते.पण तिच्या आईने तसे सांगितले होते,
म्हणूनच तिला त्या वर्गात प्रवेश मिळाला होता.
मळके कपडे, चेहरा, विस्कटलेले केस आणि चेहर्‍यावर बेपर्वा भाव. .
तिला समोर पाहून मीच जरा बिचकले. अजून "ताईगिरी" करणं मला तितकंसं जमत नव्हतं.
मी आजूबाजूला नजर टाकली. आता खेळाचा वेळ संपून सारी मुले ७-८ च्या गटात विभागून बसली होती.प्रत्येक गटाला काही सोपे असे उपक्रम
दिलेले होते. मला एकदम काहीतरी सुचले. मी म्हणलं,
"हे बघ संगीता, आपल्या गटात तूच सगळ्यात हुषार मुलगी वाटते आहेस मला. आजपासून तू मला मदत करायची. आपल्या गटातील मुलं नीट
काम करतायत की नाही यावर लक्ष ठेवायचं आणि त्यांना येत नसेल त्यात मदत करायची, काय? "
मी तिच्याकडे अपेक्षेने बघत होती.
"मला न्हाय अस्लं जमनार .. " असे म्ह्णून ती निघून जाण्याची शक्यता जास्तं होती.
पण .. नाही. चाचपडत, अंदाजाने मी टाकलेला डाव यशस्वी झाला होता.
इतक्या दिवसात पहिल्यांदाच तिच्या चेहर्‍यावर काहीसे वेगळे भाव उमटले होते. थोडंफार हसून, डोळ्यावर आलेले केस मागे करत ती मला
म्हणाली,
"पर .. जमंल का मला ह्ये असं.. " ती अडखळत म्हणाली.
"अगं नक्कीच जमणार, आणि मी आहेच ना इथे.. " मी तिला आश्वासन दिलं.
आणि नंतर एक वेगळीच संगीता दिसू लागली. आधी मोठ्या अनिच्छेने येणारी.. त्रास देणारी, सतत भांडणे करणारी संगीता आता बदलली होती. आता ती नीटनेटकी, स्वच्छ होऊन यायची. भांडणे बरीच कमी झाली होती. तिथल्या उपक्रमांमधे सहाभागी व्हायला लागली होती.
एका दिवस तिची आई मला म्हणाली..
"ताई तुमी आमच्या संगीला, ती लई शानी हाये असं म्हनला का? मला बोल्ली ती. आन आता साळत जायचं म्हनत्येय"

माझ्यासाठी हे एक प्रशस्तिपत्रकच होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

व्यक्तिचित्रणात्मक भाग :

...होती अतिशय दांडगट (मुलगी असून), आणि तोंडात अतिशिवराळ भाषा. ... भितीचा लवलेश चेहर्‍यावर नव्हता. काहीशी थोराड बांध्याची, काळ्याकुळकुळीत रंगाची ही मुलगी 12 वर्षांची आहे असे अजिबात वाटत नव्हते.पण तिच्या आईने तसे सांगितले होते, ... मळके कपडे, चेहरा, विस्कटलेले केस आणि चेहर्‍यावर बेपर्वा भाव.

चांगले चित्र येत आहे डोळ्यांसमोर. "मुलगी असून"च्या भोवतीचे कंस () घातले आहेत, म्हणून वर्णनाचा वेग थोडासा अडखळतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद !

एखादी व्य्क्ती 'मुलगी/स्त्री' आहे असे म्हणल्यावर काही गुण तिच्यात असावेत अथवा नसावेत अशी अपेक्षा केली जाते. कंस घातल्याने तो गुण विशेष अधोरेखित होईल (जो मुलगी असल्याने तिच्यात असणे अपेक्षित नाही) असे मला वाटले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

मुलगीत अपेक्षित नाही असा गुण तुम्हाला सांगायचा आहे, हे बरोबरच आहे.

> ही संगीता जरा कुप्रसिद्धच होती अतिशय दांडगट (मुलगी असून), आणि तोंडात अतिशिवराळ भाषा.
यासारखेच
> ही संगीता जरा कुप्रसिद्धच होती : मुलगी असून अतिशय दांडगट, आणि तोंडात अतिशिवराळ भाषा.
या रचनेत सुद्धा "मुलगी असल्या मुळे अशी अपेक्षा नव्हती" असे ध्वनित होते. परंतु पहिल्या, मूळा रचनेत "दांडगट" शब्दानंतर थोडासा विराम घ्यावा लागतो, आणि "असून" शब्दानंतरही विराम घ्यावा लागतो. त्याच्यामुळे विचारांचा प्रवाह खंडित होतो, असे माझे म्हणणे होते.

अर्थात त्या ठिकाणी विचारांचा प्रवाह खंडित व्हावा, वाचकाने क्षणार्धभर अंतर्मुख व्हावे, असे लेखकाचे प्रयोजनही असू शकते. तसे प्रयोजन असल्यास कंस वापरलेली रचना योग्यच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"जुनी ओळख", गृहपाठ म्हणून.

त्यातील व्यक्तिचित्रणात्मक भाग :

बारच्या एका कोनाड्याकडे
अर्धवट दिव्याच्या झोताबाहेर
खांदे पाडून, अवघडून
गळ्यापर्यंत खेचून कोटाचा झिपर
दोन्ही हातात धरलेली बियर
चाखतचाखत, नसलेल्या चष्म्यातून
गढूळ नजरेने इकडेतिकडे
मधूनच बघत, पण बहुतेक करून
ग्लास धरणारी बोटे निरखत
चापलेचेपले केस नीट करून उगाच
कोणीतरी आपल्याशी बोलेल
आपली ओळख काढेल
अशा आशेने
एकटाच
तो मला बसलेला दिसला.

असा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

sundar!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(आधी प्रकाशित झालं आहे पण कार्यशाळेच्या प्रवेशासाठी पुरेलसे आहे का ?
वासकसज्जाच्या रुपांतरासाठी लिहीलेला हा उतारा आहे.)
बेबीला नाव आहे गाव आहे पण त्याला काही महत्व नाही.बाजारात बचकी म्हणूनच ओळ्खतात. ती आहे म्हणजे आईबाप असणारच. (कदाचीत) कदाचीत-ती बापाचीच मुलगी असेलही. दुक्काळाच्या गावात योनीशुचीतेचा मंत्र ऐकायला बेंबीवर कान उगवत नाही.सुक्काळाच्या गावात लैंगीक शोषणाला शौक म्हणतात. बचकी म्हणते "शौक और भूख दोनो बिमारी है."
एक चपटी पोटात गेली की बेबीही बरळते."दिलको छू ले ऐसे दाग नही"आणि असं म्हणत थोडीशी अपीश होत ठणठणीत आवाज करत पादते.
बचकी शोलापूरहून आली आहे.
धंदा करते. पैसे कमावते.
मेंढीचा धंदा करते म्हणून दहापेक्षा जादा गिर्‍हाईक घेत नाही.
ती आम्रपाली नाही -कान्होपात्रा नाही-शिवलिलामृताचा अकरावा अध्याय तिच्या वैश्यीक खानावळीत कुणी वाचला नाही. बेबीची आई पण रांडच आहे. बारा खणाची रांड म्हणून माळशिरसच्या आसपास फेमस आहे. दुष्काळाच्या गावात कारण सांगायला नी ऐकायला कुणी येत नाही म्हातार्‍या बाया आणि पोरं -म्हणजे बसायला न लागलेल्या पोरीसुध्दा भिक मागायला गावाबाहेर पडतात.
बचकीचा बाप मेला तेव्हा आधार कार्ड नव्हतं पण बचकीच्या आईच्या हातात एक आधार कार्ड होतं .ते तिनी वापरलं.चोख वापरलं .बचकी बाजारात सोडून ती तालुक्याला धंदा करायला जायची. बचकी एकदा दोनदा रडली तर म्हणाली (बचकीच्या आईचा आवाज)
"बाप मेला तुझा आता मी काय घरात बसून फोद्रीला वारा घालू ?"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंकल, जिस स्कूल में हम पढ़ रहे हय, आप उस के हेडमास्टर रह चुके हो.

त्यामुळे आपले उतारे देऊन आम्हांस न लाजवणे. शाल, श्रीफळ आणि पुगु घेऊन ष्टेजावर बसणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पूस्प्गुच या शब्दाचे 'पुगु' असे अंमळ गर्ली कम बालिश कम इनोसंट क्यूट कम अमुक बिन तमुक रूप पाहून डॉळॅ पाणावले ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कधीकधी सगळा शब्द लिहायचा टंकाळा येतो. त्यातून बर्‍याचदा लिहितो/बोलतो ती प्रमाणभाषा ठराविक वळणं घेत, साचा भरत रहाते. मग शॉफॉ लिहिला तरी लोकान्ला कळतेच.

आमचे थोर न्येते प्लम वुडहौस पण असंच लिहितात कधीकधी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अर्थातच शमत हाये. पण पुगु हॅज सच अ क्यूट अँड ओह-सो-नाईस रिङ्ग टु इट यू सी Wink त्यामुळे त्याने माझी उत्सुकता पिकवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आमच्या महाराष्ट्र मंडळात एकदा एका हौशी, नवोढा सूत्रसंचालिकेने याचा पुष्पपुच्छ असा उच्चार करून माफक हशा पिकवला होता त्याची आठवण झाली Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रामदासांच्या या तुकड्यात "चरित्रकथेतून-वर्णन" हे अंग बलवत्तर आहे. मूर्त व्यक्तीचे चित्र/ध्वनि/रसे/गंध/स्पर्शवर्णन थोडके आहे :

एक चपटी पोटात गेली की बेबीही बरळते."दिलको छू ले ऐसे दाग नही"आणि असं म्हणत थोडीशी अपीश होत ठणठणीत आवाज करत पादते.

परंतु तिचे आईवडील, गाव, व्यवसाय यांच्याबद्दलची वाक्ये तिचे चरित्र सांगतात. ती डोळ्यासमोर उभी राहिली नाही, तरी "बचकी आपल्याला कळली आहे" असे वाचताना वाटत राहाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विश्वविद्यालय मेट्रो स्टेशनमधून बाहेर उतरल कि सगळे सायकल रिक्षावाले एकदम झडप घालायचे. मला कायम लेट झालेला असायचा. त्यामुळे मी पटकन मिळेल त्या सायकल रिक्षामध्ये बसून कॉलेज पर्यंत जायचो. पाच रुपयात ते पाहिजे तिथे सोडायचे.
एके दिवशी संध्याकाळी स्टीफन्सला मक्बेथ नाटक होत. आलरेडी ६ वाजले होते. नाटक सुरु झाल होत. मी स्टेशन मधून पळत पळत बाहेर आलो. आज सायकल रिक्षा थोड्या कमी होत्या. त्यामुळे त्यांचा भाव वधारला होता. कोणीही गिर्हाईक मिळव यासाठी आरडओरडा करत नव्हत. मी स्वताहून एका रिक्षावाल्याकडे गेलो.

''भाई स्टीफन्स जाना है''

हा मनुष्य सायकल रिक्षाच्या बसायच्या ठिकाणी डोक ठेवून आणि handle वर पाय ताणून झोपला होता.
मी विचारल्यावर झोपेतून उठला. अंगावर पांघरलेल लाल फडक गळ्याभोवती अडकवल. उन्हाळ्याचे दिवस होते.अंगावरच्या मळकटलेल्या पांढर्या शर्टची सगळी बटण सोडली होती.
मी रिक्षात बसल्यावर हा आरामात हळूहळू paddle मारायला लागला
‘’भाई जरा जल्दी चलो’’
‘’क्यो’’
‘’कॉलेज को लेट हो राहा है’’
‘’क्या है आज ’’
‘’नाटक है एक आप जरा जल्दीसे चलो मै पहलेही लेट हुं’’
‘’हम्म’’
अस म्हणत त्याने उभा राहून झपाझप सायकल चालवायला सुरु केली.एकदम लयबद्ध प्रकारे काड्या झालेल्या हात पायांच्या मदतीने तो सायकल चालवत होता.
तीन ते चार मिनिटात स्टीफन्स समोर आणून उभे केल.
पैसे देता देता मी त्याला नाव विचारलं.
‘’मुन्ना’’
नंतर मी त्याचा रेगुलर कस्टमर झालो.
तो बिहारमधल्या पूर्णिया जिल्ह्यातून आला होता. तिकडे थोडीफार शेती होती. वय एकवीस-बावीस असाव. शर्टची सगळी बटन सोडून सायकल पळवणारा एकटाच होता त्या स्टेशनावर. बहुतांश रिक्षावाले म्हातारे होते. मुन्ना कोणी आडव आल तर जोरात शिट्टी वाजवायचा. एखादी पोरगी आजूबाजूला दिसली कि याला जाम उत्साह यायचा.
एके दिवशी मी कॅमेरा घेऊन गेलो.
कॅमेरा ऑन केला त्याला पाठमोरा सायकल रिक्षा चालवताना रेकोर्ड करत होतो.
“मुन्ना क्या हम कॅमेरापे रेकोर्ड करेंगे तेरा इंटरव्ह्यू चलेगा का क्या तेरेको?”
‘’क्यो’’
प्रत्येक गोष्टीला हा प्रश्न विचारायची याची सवय.
“ऐसेही”
“किधर दिखायेगा क्या?”
“वो हम फिल्म बना रहे है सोच रहे थे हिरो का रोल तुझे देते है”
“शाहरुख ने चलाया था ना सायकल मै हुं ना मै”

मुन्नाच हिंदी चित्रपट खासकरून शाहरूखवर भयंकर प्रेम. रिक्षाच्या मागे शाहरुखचा एक फोटो होता. हेअरस्टाईल थोडीफार शाहरुख सारखीच होती.

“दिल्ली कब आये तुम?”
“दिल्ली आके पाच साल हो गया”
’’और ये सायकल कबसे चला रहे हो’’
‘’यहापे आनेसे पहले बाप चलाता था सायकल. बाप तीस सालसे सायकल चलाके जिंदगी निकाला...बुढा हो गया ..तो हमको इधर बुलाया’’
“अब कहा है तुम्हारे पिताजी”
“देहांत हो गया तीन साल पहले”
“फिर अब घरमे कोण है”
“तीन छोटे भाई है एक बहन है माँ है”
“वो क्या करते है”
“वो पटना मै काम करती है”
“भाई छोटे छोटे है सबसे छोटी बहन है २ साल की है वो ऐसेही छोटे मोठे काम करते है
जितना मिलता ही उतना पैसा मै इधरसे भेजता हूँ”
’’रोज कितना मिलता है?”
“२००-३०० तक कमाई होती है ..उसमेसे किराया देना पड़ता है सायकल के मालिक को''
ही त्याची दुसरी पिढी होती सायकल रिक्षा चालवणारी नंतर बराच वेळ तो मालक कस लुटतात. एकदम श्रीमंत घरातले दिसणारे लोक पाच रुपयासाठी कशी एकेक तास हुज्जत घालतात हे त्याच्या खास बिहारी हिंदीमध्ये वर्णन करत होता.
दिल्ली विश्विद्यालायाचा झगमगीत परिसरात स्टीफन्स, मिरांडा हाउस सारख्या नामवंत कॉलेजच्या बाजूला याच्या दोन पिढ्या सायकल चालवत खपल्या.
दिल्लीच्या प्रत्येक सायकल रिक्षावाल्याची अशीच कहाणी होती. घरदार बिहार, झारखंड, युपीमध्ये अंगावर लहान भाऊ, मुलांची, आईबापाची जबाबदारी. सायकल चालवण हे कष्टाचे काम असल्यामुळे म्हातारे झाल कि हे काम बंद कराव लागे. मग त्याची तरुण मुल पुन्हा या चक्रात अडकत. एकूण वेगळ्याच प्रकारच शोषण आहे हे. आपल्याला सोशोलोजीच्या पुस्तकात सापडणार नाही. कितीही थेरिज वाचल्या तरी आपण काही करू शकणार नाही या विचाराने खिन्न व्हायला व्हायचं पण मुन्ना कायम मूड मध्ये असायचा. त्याला ना कशाच दुख होत ना कशाचा आनंद. रोज विश्वविद्यालयासमोर उभारायचा. लोकांना स्टीफन्सला सोडायचा. मालकाला भाड देऊन रात्री बाहेर राहायला परवडत नाही म्हणून तो रिक्षात handle वर पाय ताणून झोपायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

व्यक्तीचे बरेच तपशील मधूनमधून पेरल्यामुळे हळूहळू मुन्ना चांगला डोळ्यासमोर उभा राहातो :

झोपेतून उठला. अंगावर पांघरलेल लाल फडक गळ्याभोवती अडकवल. उन्हाळ्याचे दिवस होते.अंगावरच्या मळकटलेल्या पांढर्या शर्टची सगळी बटण सोडली होती. ... आरामात हळूहळू paddle मारायला ... उभा राहून झपाझप सायकल चालवायला सुरु ... वय एकवीस-बावीस असाव. शर्टची सगळी बटन सोडून सायकल पळवणारा एकटाच होता त्या स्टेशनावर. ... मुन्ना कोणी आडव आल तर जोरात शिट्टी वाजवायचा. एखादी पोरगी आजूबाजूला दिसली कि याला जाम उत्साह यायचा. ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यक्तीच्या दिसण्यावरून अनेक संदर्भांत आलेली वर्णनं मनात जागृत होत आहेत. जमेल तशी देतो.

चित्रपट : "फार्गो"
प्रसंग : "मार्ज्" नावाची पोलीस ऑफिसर (जिला या सिनेमाची नायिका म्हणता येईल.) ती खूनाचा शोध घेते आहे. खुनी लोक ज्या वेश्यांकडे गेले होते त्या वेश्यांची मुलाखत चालू आहे. प्रसंगातला विनोद प्रश्न केल्या जात असलेल्या व्यक्तीच्या "दिसण्या/जाणवण्या"बद्दल आहे. कसा तो वाचूनच समजेल.

MARGE
Okay, I want you to tell me what
these fellas looked like.

HOOKER ONE
Well, the little guy, he was
kinda funny-looking.

MARGE
In what way?

HOOKER ONE
I dunno. Just funny-looking.

MARGE
Can you be any more specific?

HOOKER ONE
I couldn't really say. He wasn't
circumcised.

MARGE
Was he funny-looking apart from
that?

HOOKER ONE
Yah.

MARGE
So you were having sex with the
little fella, then?

HOOKER ONE
Uh-huh.

MARGE
Is there anything else you can
tell me about him?

HOOKER ONE
No. Like I say, he was funny-looking.
More'n most people even.

MARGE
And what about the other fella?

HOOKER TWO
He was a little older. Looked like
the Marlboro man.

MARGE
Yah?

HOOKER TWO
Yah. Maybe I'm sayin' that cause
he smoked Marlboros.

MARGE
Uh-huh.

HOOKER TWO
A subconscious-type thing.

MARGE
Yah, that can happen.

HOOKER TWO
Yah.

HOOKER ONE
They said they were goin' to the
Twin Cities?

MARGE
Oh, yah?

HOOKER TWO
Yah.

HOOKER ONE
Yah. Is that useful to ya?

MARGE
Oh, you bet, yah.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

वाहत्या चर्चेत मलाही कुणी माझ्या पूर्वप्रकाशित कथेत दुरुस्त्या सुचवल्या तर बरं होइल.
पूर्ण कथा इथ आहे :- http://www.aisiakshare.com/node/1488
.
माझ्या तेव्हाच्या खोलीतील दार/दरवाजा आणि आरशाची काच ही ह्या कथेतील प्रमुख पात्रे आहेत.
मी स्वतः कथेचा निवेदक आहे.
लिखाणातील काही भागावर रेषा चालवल्यात; त्यातला इंग्लिश शब्दांचा वापर अस्थानी वाटल्यानं मूळची ओळ strike-through
करुन नवीन त्याच अर्थाचं मराठीत लिहिलय.

.
.
****************माझे लेखन सुरु******************

प्रतिमासृष्टी : एक गोष्ट

काल घरी गेलो.
दाराने रोजच्यासारखे स्वागत केलेच नाही.
काय झालंय तेच कळेना. म्हटलं जाऊन त्या आरशाच्या काचेला विचारावं झालंय तरी काय?
तर तीही जागची गायब.
काहीच कळेना. अजब शांतता. माझे रूम मेट्स ते दार, ती आरशाची काच धड कोणीच दिसेना.
जे दिसताहेत ते बोलेनात. वैतागून खिडकीवर ओरडलो:-
" अरे, झालंय तरी काय इथे?काल पर्यंत तर हे दार आणि आरसा प्रेम गीत म्हणायचे. "

खिडकीने एक स्माइल दिली. (गूढ, गमतीशीर स्माइल. खिडकी खूश आहे का उदास तेही कळेना. )
खिडकीच्या चेहर्‍यावर गूढ स्मित उमटलं. (गूढ, गमतीशीर स्मित. खिडकी खुश आहे की उदास तेही कळेना)
मला आठवलं.....
मी इथे नवीन राहायला आलो होतो. घराला नुसतं एक दार होतं. आत रिकामी जागा होती. त्यालाच घर म्हणायचं.
म्हटलं ठीक आहे. दुसर्‍या दिवशी जाऊन घर लावायला घेतले. जाऊन नवीन मोठ्ठा आरसा आणला.
दारातून नेताना, दाराने जरा आवाज काढला, करकरलं ते. म्हटलं वा! दाराला हि काच पसंत आहे म्हणायची.
आणि असणारच. किंचित सावळी, पण फ्रेश दिसणारी, सदा तजेलदार असणारी अशी ती होती.
तिच्यात स्वतःला पाहून ते दार चकितच झाले!
आपल्या रुबाबाची, मजबुतीची आणि वेगळेपणाची हे सगळे अशी तारीफ का करतात हे त्याला समजले!
दार खूश झाले!आपल्या अस्तित्वाची जाणीव त्याला तिच्यामुळे झाली.
" एरवी इतरांनी आत बाहेर करण्यापुरता आपला काय तो वापर" असे समजणार्‍या दाराला तिच्यामुळे कळलं
" अरेच्च्या! आपण नुसते ह्यांनी हालवल्यावर हालण्यापुरते नाही आहोत!आपणही हलु शकतो, बाहेरुन
धूळ येत असेल तर अडवू शकतो.बाहेरच्या वाईट नजरा रोखून धरायचे सामर्थ्य ह्या घराचे स्वामी म्हणवितात
त्यांच्यातही नाही, पण आपल्यात आहे!"
दार रोज त्या आरशातील काचेत स्वतःचे रुपडे न्याहाळत असे, आपली, आयडेंटिटी पाहून त्याची छाती गर्वाने तट्ट् फुगून येई.
स्वतःचीच स्वतःला ओळख पटल्यासारखी वाटली, की त्याची छाती गर्वाने तट्ट फुगून येइ.

**************माझे लेखन समाप्त********************

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

दार आणि आरशाची काच ही पात्रे काहीशी चिन्हभूत झालेली वाटतात. (स्वतःहून असे लेखन योग्यच.) परंतु "व्यक्तिवर्णन"चा गृहपाठ म्हणून प्रातिनिधिक वाटत नाही.
त्यातून "कुठलेही दार"पेक्षा वेगळे "हे दार" असे भासवणारा एक शब्द छान जमला आहे "करकरलं ते" - हे अगदी ऐकू येते.

त्या मानाने "खिडकीच्या चेहर्‍यावर गूढ स्मित उमटले" हे चित्र डोळ्यांसमोर येत नाही. म्हणजे मोनालीसाच्या चेहर्‍यावर गूढ स्मित आहे, हे चित्र डोळ्यासमोर येऊ शकते, आणि ६ काचा असलेली खिडकी डोळ्यासमोर येऊ शकते, परंतु स्मित उमटलेली खिडकी मात्र सैद्धांतिक रीत्याच समजते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या अजून एका धाग्यात कुणी दुरुस्त्या सुचवल्या तर बरं होइल.
पूर्ण कथा इथे आहे :-
http://www.aisiakshare.com/node/1129
.
.
****************माझा लेखनतुकडा सुरु******************
स्वातंत्र्यदिन(एक लघुकथा)

चौथी पाचवीत असलेला मनोबा स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाचा झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपून मस्त मजेत,
झेंडावंदनाची गाणी गुणगुणत रस्त्यानं चालला होता. उत्साहानं भरलेला गोलगोबरा चेहरा, डाव्या हातानं फ्रेश इस्त्री केलेली चड्डी सावरत
आणि उजव्या हातानं आपलं सदोदित गळणारं नाक पुसत स्वारी मजेत चालली होती.
आपल्या इवल्याशा जगात खुश होती.
वातावरण नेहमीचं मान्सूनी ऑगस्टचं... चिंब श्रावण महिना आणि पावसाची चिन्हं.
वातावरणात संचारलेला पन्नासाव्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. जागोजागी दिसणारे लहान-मोठे, डौलानं फडकणारे तिरंगी ध्वज.

अशाच वेळी जाताना मनोबाला दिसलं कुणीसं रस्त्याच्या कडेला असलेल्या डेरेदार वृक्षाखाली बसलेलं....
एक शांतचित्त , प्रसन्नमुख, दाढीधारी शुभ्र व्यक्तिमत्त्व. मनोबा सहजच तिकडं ओढला गेला.

त्यानं मनोबाला गंभीर, पण प्रसन्न आवाजात विचारलं "कुठं चाललात मनोबा? कुठून येताय? "
"झेंडावंदनाहून येतोय. " लिमलेटची गोळी शेंबुडलेल्या हातानंच तोंडात टाकत मनोबा पुढं म्हणाला:-
"आज भारताचा पन्नासावा स्वातंत्र्यदिन. "

**************माझा लेखनतुकडा समाप्त********************

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हे चित्रदर्शी वर्णन

झेंडावंदनाची गाणी गुणगुणत चालला ... उत्साहानं भरलेला गोलगोबरा चेहरा, डाव्या हातानं फ्रेश इस्त्री केलेली चड्डी सावरत
आणि उजव्या हातानं आपलं सदोदित गळणारं नाक पुसत ... लिमलेटची गोळी शेंबुडलेल्या हातानंच तोंडात टाकत ...

आणि त्याहून जरा त्रोटक आणि कमी मूर्त

शांतचित्त , प्रसन्नमुख, दाढीधारी शुभ्र

वरील तुकडा व्यक्तिवर्णनाचे उदाहरण म्हणून चांगला निवडला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही प्रतिसादाबद्दल एकत्रित आभार.

शांतचित्त , प्रसन्नमुख, दाढीधारी शुभ्र

हे थोडं लांबवलं तर असं होउ शकेल (त्रोअटक्/लहान न वाटता विस्तारित वाटेल) :-
शांतचित्त , प्रसन्नमुख, शुभ्र दाढीधारी , गडद काळ्या डोळ्यांची पार पलिकडचं पाहू शकेल असं वाटणारी नजर, भव्य कपाळ, स्वस्थ असा एक भाव संपूर्ण अंगभर पसरलेला जाणवावा अशी मुद्रा.

वरील प्रतिसादाबद्दल :-
खिडकीचं नेमकं स्मितहास्य दाखवायचं कसं ह्याचा अजून विचार करतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तुमची ती लघुकथा राजकीय उपहास करणारी होती. निरागस शेंबडा मुलगा डोळ्यासमोर यावा, पण योगी मात्र "योगी"वर्गातला असावा, विवक्षित चित्र देऊ नये, हे तुम्ही हेतुपुरस्सर ठरवू शकता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या अजून एका धाग्यात कुणी दुरुस्त्या सुचवल्या तर बरं होइल.
पूर्ण कथा इथे आहे :-
http://www.aisiakshare.com/node/1131

एक पोपट , त्याच्या मागे लागलेला ससाणा ही प्रमुख पात्रे.
पोपट जंगलात राहतो. जंगलाला लागूनच शेत आहे. व इतर बरीच वनराई जंगलाबाहेरही आहे.
पोपटाचे ह्यासर्वाच्या जीवावर आजवर मस्त चालले आहे. असे कथासूत्र.

****************माझा लेखनतुकडा सुरु******************

सुटका (एक लघुकथा)

तो उठला, पंख झटकले, आपलं घरटं आणि त्या सभोवतालची ती दाट जंगलातली तुटकी-पडकी विहीर बघत बघत, थोडासा आळस देत तो बाहेर पडला.
सकाळी सकाळी सुंदर सोनेरी कोवळ्या उन्हाची तिरीप अंगावर घेत प्रसन्नतेने तो उडू लागला.
स्वतःच्या लाल चुटुक ओठ, हिरवे गार पंख, दिमाखदार तोरा आणि एकूणच समग्र सृष्टीत नावाजलं जाणारं रुपडं घेऊन,
आपल्याच आनंदात स्वच्छंदात गाणी गुणगुणत तो जंगलातून आला बाहेर आणि समोरच्या शेतावर झेपावू लागला.
त्याला मोठीच मौज वाटत होती. इतक्या उंचावरून माणसही मुंगीइतकी छोटिशी दिसत होती.
अरेच्च्या, पण हे मागून,....
कुणीतरी येतंय. मला वाटलं त्या धवल-पक्ष्याच्या येण्यानं हालणारी ती हवा असेल. पण... वास तर शिकारी पक्ष्याचा आहे. "
त्यानं वळून पाह्यलं. हा तर खासा ससाणा! ह्याच्याच पिच्छ्यावर असणारा. तो वेगाने इकडेच येत होता.
**************माझा लेखनतुकडा समाप्त********************

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

गेले तीनचार दिवस जरा फिरतीवर आहे, आणि पुढचे दोन दिवसही इंटरनेट मिळेलच असं नाही. पण त्यानंतर पुन्हा यात सहभागी होईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद धनंजय!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

"आदित्य कसला हँडसम दिसायला लागलाय! आवडला ब्वॉ आपल्याला :-P."

"हं %-)?? थांब बघते लगेच." पॉज...
"च्यायला :-O! ओळखलच नाही मी त्याला आधी. फ्रेँड्समधे अमर आहे याची खात्री करुन घ्यावी लागली. एकदम क ड क दिसतोय प्रोफाइल पिकमधे."

आणि दोघी फिदीफिदी हसायला लागलो.

थोड्यावेळाने फोटो परत झुम करुन पाहिला. डोक्यावर मुद्दाम बर्फाचे कण टाकुन काढलेली सेल्फी. बारीक कापलेले केस, चेहर्याला एकदम चिकटुन असलेले कान आणि कानांपर्यँत पोहोचलेलं हसू. त्यामुळे मुळ आयताकृती चेहरा फोटोत मात्र अंडाकृती वाटत होता. जाड तरीही शेपली भुवया. आणि डोळे उं droopy?? की साधना वगैरेनी काजळ लावल्यावर दिसतात तसे?? जे काही आहे ते करारी, तीक्ष्ण आहे... खरंतर गोर्यापान चेहर्यामुळे काळेभोर केस, भुवया, डोळे एकदम उठुन दिसतायत. सरळ, तिखट नाकाचा शेँडा थोडा लाल झालाय. ओठ फार खास नाहीत, पातळ आहेत. पण स्टबल एकदम सेक्सी दिसतेय.

मी(वय १०) आणि अमर (वय ८) पत्ते खेळत होतो. बाजूलाच पाच वर्षाँचा आदि प्लास्टीकच्या खेळण्यांत एकटाच काहीबाही करत बसलेला. थोड्या वेळाने कंटाळला असावा. छोटा हत्ती घेऊन माझ्यापाशी आला. आणि तो हत्ती माझ्या हातावर चालतोय अशी अॅक्शन करुन झुईईई आवाज करायला लागला. मी त्याच्याकडे डोळे वटारुन पाहिलं तर हसला. तरी मी हसत नाही बघुन "आई आई" करत स्वयंपाकघरात निघुन गेला.
बस एवढी एकच आठवण आहे त्याची.
त्यानंतर बहुतेक आम्ही कधी भेटलोही नाही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडले. अधिक फुलव, पूर्ण व्यक्तीचित्र वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बसमध्ये रोज एक बाई चढते. आल्या आल्या सर्वांना (कारण नसताना) अभिवादन करते. नंतर ड्रायव्हर पाशीच उभी राहून पूर्ण प्रवासभर चकाट्या पीटते. ड्राय्व्हरला अक्कल पाहीजे गप्पा मारताना एवढ्या बर्फातून गाडी पूलावरुन घसरली तर Sad
ड्रायव्हर नसेल तर एखादं गिर्हाईक पकडून ही बाई कान किटेपर्यंत गप्पा चालू ठेवते. टू लाऊड्!!मध्येच बसम्धेच कंगवा काढून लांब (खांद्याहून जरा मोठे) केस विंचरते अन गुंतवळ बसमध्ये खाली टाकते. अनॉयींग नमुना आहे. अति अति आनंदी अन बालीश दिसते. म्हणावसं वाटतं "पुट ऑन ब्रेक्स्!!डोंट स्पिन सो फास्ट"
रोज अजून एक बाई चढते. शी इज व्हेरी वेल पुट टुगेदर. शांत असते.डोळ्यातही एक प्रकारची जरब अन शांती आहे. लहान कापलेले केस इतके व्यवस्थित की एकही इकडचा तिकडे नसतो. मेकअप फारसा नसतो अन तरीही नेमस्त/व्यवस्थित(डिसेंट) दिसते. नाक अ‍ॅरीस्टोक्रॅटीक आहे. ऊन येतं तेव्हा न चुकता सन-ग्लासेस चढवते. मुख्य कोणाला त्रास देत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा कधी टाकावा ? धागा कसा लिहावा ?
धागा गुरुवारी टाकू नये. शुक्रवारी रिस्पॉन्स मिळाला तर मिळतो. पण जर शुक्रवारी पिक अप झाला नाही धागा तर मग थेट सोमवारी पब्लिक पाहणार असतं. पण तोवर धागा खाली खाली गेलेला असतो. सोमवारी पुन्हा अजून नवे, ताजे धागे येतात. पब्लिकचं लक्ष तिकडे जातं. तुमचा धागा मागे पडत जातो. तोच धागा तुम्ही सोमवारी टाकला असतात तर कदाचित अधिक लोकांनी उघडून पाहिला असता किंवा अधिक प्रतिसाद आले असते.
.
.
मी धागे लिहितो. सुचेल ते, सुचेल तसं लिहितो. डोक्यात आहे ते ऑल्मोस्ट जशाला तसं लिहायचा प्रयत्न असतो. मुद्दाम वेगळं असं काही सुधारणा वगैरी करत नाही. अर्थात एका गोष्टीकडे लक्ष असतं. वाक्य लहान , सुटी सुटी ठेवतो. शब्द आपल्या विचार करण्यातले असतात. बोलण्यातले असतात, तसेच ठेवतो. लिखित भाषा टाळतो. ह्यामुळे वाचणार्‍याच्या विचारविश्वात चटकन् पोचता येतं. वाक्यात खूप सारे "ऊन हून", व, आणि , किंतु , परंतु असे प्रत्यय टाळतो. फारच आवश्यक असले तरच टाकतो.
म्हणजे "लै थकून वाट पाहिल्यावर मिळालेली टॅक्सी सायन पर्यंत सोडून गेली." हे वाक्य मी सहसा असं लिहतो --
"लै थकलो.लै वाट पाहिली. पण मग टॅक्सी मिळाली. सायनपर्यंत त्यानच गेलो." एकूणात शब्द्संख्या ह्या दुसर्‍या प्रकारात वाढतही असेल. पण सरासरी वाक्याची लांबी कमी होते. आणि वाचलं की चटकन समजतं. शिवाय अटॅन्शन स्पॅन मजबूत, लांब पल्ल्याचा असण्याची गरज आपसूक नाहिशी होते. तुमचं लिखाण अक्षरशः एखाद्या गाडीसारखं बनतं. वाचकाचं मन त्यावर मागच्या सीटवर बसलेलं असतं. तो तुमच्यासोबत फिरु लागतो. ड्रायव्हिंग सीटवर तुम्ही असता. गाडी फिरवून आण्णं तुमचं काम असतं. सफरीमध्ये आसपासचा भाग खूप काही रोमांचक असलाच पाहिजे असं नाही. पण किमान आवश्यक बाब म्हणजे तुम्ही वाचकाला शब्द-सैर घडवून आणली पाहिजेत. त्याला छोटिशी का असेना फेरी मारुन आल्याचा आनंद मिळायला हवा. अर्थात ह्यालाही अपवाद असतात. आहे तिथेच आहे त्याच ठिकाणाचं वर्णन करत आख्खा लेख टाकता येणं शक्य आहे. पण त्यासाठी लिखाणाची लै पॉवर हवी. जींच्या त्या फेमस कथेत नै का घडत फारसं नाहिच काही. एक प्राध्यापक त्याच्या एका विद्यार्थ्याच्या आख्ख्या कुटुंबाचं कसं शोषण करतो ते दाखवलय. "मिशाळ स्वप्न" वगैरे वाक्यरचना आहेत. भीषण, भेसूर सूर आहे कथेचा. नुसतच एखादं स्थिरचित्र काढावं, एखाद्या क्षणाचा फोटो काढावा अणि त्यातून खूप काही सांगून जावं अशी ती शैली.
पण तो प्रकार विरळा.
तर माझे प्रश्न --
इहिता ?
लिहिण्यापूर्वी जे उद्दीष्ट असतं ते साध्य होतं का?
तुमचं म्हण्णं बरोबर समोर पोचतय असं तुम्हाला वाटतं का ?
लिहिताना इतर काही बाबींची विशेष काळजी घेता का ?
.
.
इथल्या लिहिण्याबद्दल --
मला रा.घा. भारी वाटतात. त्यांना जे म्हणायचय ते नेमकं समोरच्यापर्यंत पोचतं बहुसंख्य वेळा. शिवाय समोरचा जे म्हणतोय, तेही त्यांना समजत असतं, आणि त्यावर ते नेमकं उत्तर देतात. मुख्य म्हणजे चेष्टा, थट्टा मस्करी करत असले, तरी मुख्य विषयापासून ते फारसे ढळत नाहित. सूर कुजकट, कुबट छद्मी होत नाही. समोरचा बोचकारलाही जात नाही.त्यामुळे बोलणं पुढे सुरु राहतं. मुद्दे स्पष्ट होत जातात. हे फार मोठ्या प्रमाणात थत्त्यांनाही लागू होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

राघांची विनोदबुद्धी मला आवडते. एका दगडात किती पक्षी गंभीर चेहरा ठेऊन मारतील ते सांगता येत नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0