मलंगगड

मागच्या पावसाळ्यापासून कुठेही भटकंती झाली नव्हती, मागचे ४/५ रविवार तर अक्षरश झोपून आणि चित्रपट बघून काढले होते त्यामुळे पाच दिवसांपूर्वी उमेशने विचारले ‘ मलंगगडला येशील का ‘ तर ताबडतोब हो म्हणून टाकले, म्हटले टाकू शनिवारची पण सुट्टी पण नशिबाने जाण्याचा बेत रविवारचा ठरला...मग झालं तर फुकट काम...!!

रविवारी ठरवल्याप्रमाणे सकाळच्या ६ च्या सिंहगडने पुण्याहून निघून आम्ही कल्याणला ९ वाजता येऊन पोहचलो, कल्याण बस स्थानकामधून दर २० मिनिटाने मलंगगड जाण्यासाठी के. डी एम. टी. च्या बसेस असतात ज्या आपल्याला अर्ध्या तासात मलंगगडाच्या पायथ्याला आणून सोडतात. पायथ्याशी एका साध्या हॉटेलात थोडी पोटपूजा करून १० च्या सुमारास आम्ही गड चढायला पाहिलं पाउल टाकाल.

नवीन जाणार्यांसाठी हा गड जरा फसवा आहे, पायथ्यापासून पाहिल्यावर वर जाण्याचा रस्ता आणि वर काय असेल याची कल्पना येत नाही. गडाची रचना टेबलटोप सारखी आहे निम्मा गड चढून वर गेल्यावर जरा पठारासारखा सपाट भाग, मग तिरपी चढण, त्याच्यावर दगडाची लांब आडवी अरुंद आणि १००/१५० फुट उंच अशी भिंत आणि त्या भिंतीच्या वर परत डाव्या बाजूला थोडी सपाट जागा, उजव्या बाजूला एक सरळसोट सुळका त्याला खेटूनच उभी भिंत आणि भिंतीला मागच्या बाजूला परत एक त्याच उंचीचा सुळका आणि मागे खोल दरी. सर्वात वर चढण्यासाठी एकच वाट असून इतर सर्व बाजूंना खोल दरी असल्यामुळे गडाला आपोपाप नैसर्गिक संरक्षण प्राप्त होते.

मलंगगड हा मुख्यत बाबा हाजी मलंग यांच्या दर्गा साठी प्रसिद्ध आहे त्या मुळे तेथे कायमच भाविकांची गर्दी असते. हाजी बाबाचा दर्गा हा त्या वरच्या पठारावर वसलेला आहे त्यामुळे खालून बघित्याल्यावर फक्त वरची भिंत दिसते, पठार आणि त्यावरचा दर्गा दिसत नाही. पायथ्यापासून दर्ग्यापर्यंत जाण्यासाठी नागमोडी वळणाचा पायऱ्या-पायऱ्या रस्ता आहे, मुळचा हा रस्ता मातीचीच पायवाट होती पण नंतर दर्ग्यावर येणाऱ्या भाविकांनी सेवा म्हणून येथे पायऱ्या बनविल्या आहेत, पण त्या ज्या भाविकाला जितकी आणि जशी इच्छा असेल तश्या त्या बनविल्या असल्या कारणाने मधेच आपल्या शहाबादी फरशीच्या तर मधेच संगमरवरी, तर कुठे कडप्पा तर कुठे दगडी अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकाराच्या पायऱ्या दिसतात ज्यात कुठेही एकजिनसीपणा नाही आणि पायथ्यापासून दर्ग्यापर्यंत ह्या वाटेवर रांगेत छोटी मोठी हॉटेल्स आणि खाद्य पदार्थांच्या टपऱ्या पसरलेल्या आहेत, दर्ग्यापाशी तर बरीच चांगली उपाहारगृह आणि इतर सामान विक्रीची दुकाने आहेत.

दर्ग्यापाशी आमचा पहिला टप्पा संपला इथे पर्यंत येताना मी तर आजुबाजूच एकंदरीत वातावरण पाहून चांगलाच कंटाळलो होतो, म्हटलं हेच पाह्यचं होत तर घरीच बरा होतो, दर्ग्यापाशी जरा वेळ थांबून, पाणी वैगरे पिऊन आम्ही पुढच्या वाटचालीला सुरवात केली आणि लक्षात आलं इथूनच खरा ट्रेक चालू होतो.

मलंगगडाचे नैसर्गिकरीत्या आपोआप काही टप्पे पडले आहे तसाही हा काही खूप उंचावरचा किवा जंगलातला लांबलचक ट्रेक नाही आहे पण तो एक बऱ्या पैकी अवघड आणि साहसी लोकांचा ट्रेक आहे आणि कोण किती साहसी आहे हे
तो कुठल्या टप्प्या पर्यंत जातो ह्या वर अवलंबून आहे.

खालच्या फोटो मी गडावर जाण्याचा रस्त्यावर पायथ्यापासून जरा उंचीवरून घेतला आहे. आणि बाणाने जी झाडी दाखवली आहे तिथे आहे हाजी बाबाचा दर्गा आहे, खालून पाहताना बिलकुल अंदाज येत नाही कि वर एक छोट गाव वसले असेल.


गडावर जाण्यासाठी दर्ग्याचा जरा अलीकडे उजवीकडून दुकानांनाच्या गर्दीतूनच एक छोटी गल्ली सारखी वाट आहे, उमेशला अगोदरच कोणीतरी सांगितलं असल्यामुळे ती लगेच सापडली, इथून आमची दुसऱ्या टप्प्याला आणि खऱ्या अर्थाने गड चढायला सुरवात झाली इथून आपण गडाची जी कातळाची भिंत चालू होते तिथे येऊन पोहोचतो. मी जरा जोशात होतो म्हणून दणादणा उड्या मारत त्या भिंतीच्या पायथ्याला येऊन पोहचलो खाली पाहिलं तर उमेश आरामात येत होता, तो येई पर्यंत रस्ता शोधू म्हटलं तर लगेच उजव्या हाताला थोडं वर एक बुरुज आणि पूर्णपणे मोडून पडलेल्या आणि तरीही आपलं अस्तित्व राखून ठेवलेल्या पायऱ्या नजरेत आल्या. पण त्या पाहिल्यावर मी जरा गडबडलोच ( इथे तर गडबडलोच, पण पुढच्या एका टप्प्यावर तर गळपटलोच होतो ) कारण त्यांची अवस्था नीट चढण्यासाठी अतिशय वाईट आणि त्यांच्या उजव्या हाताला ५०० फुट खोल दरी, म्हटलं येऊ द्या उमेशला, आणि बघतो तर काय उमेशने वर येऊन तिथे एका डोंगराच्या कपरीसारख्या भागात चक्क ताणून दिली, त्याला पाहून मी पण मग गुपचूप त्याच्या जवळ जाऊन विचारलं वर जायचं का ? तो म्हणे .... तर मग. ... !! तोच आम्हला वरून जोरजोरात जय शिवाजी जय भवानी ‘ घोषणा कानावर आल्या.. पळत पायऱ्यापाशी जाऊन पाहतो तर वर बुरजावर ५/६ अस्सल मराठी टाळकी दिसली मग आम्ही पण त्यांच्या घोषणेत आमचा जय मिसळून दिला, महाराजांचं नाव घेतल्यावर अंगात बळ तर येणारच होत.......!! उमेश म्हणे चल ... मी म्हटलं चल... !! आणि लागलो पायऱ्या चढायला. ह्या पायऱ्या चढण आणि उतरण काळजीपूर्वक करावं लागतं कारण पायऱ्या जरी खूपच अवघड नसल्या तरी त्याच्या अंगाला लागुनच दरी आहे.


पायऱ्या चढून वर पोहचलो वर फार काही विस्तीर्ण जागा वैगरे नाही, उजव्या बाजूला समोरच सरळसोट प्रचंड भिंत उभी, आणि डावीकडे एक साधारण १०० मीटर लांब आणि ५० फुट रुंद असा उंच सखल भाग.
म्हटलं पहिले अवघड काम करून घेऊ, ह्या भिंतीच्या दोन्ही बाजूंला खोल दरी आणि डाव्या बाजूने भिंतीला अगदी खेटून जेमतेम दीड- दोन फुटाचा मागे जाण्यासाठी आडवा सरळ रस्ता, आणि इथे वर खूप माकडेपण आहे, एकट्या माणसाची थैली वैगरे पाहून तर सरळ अंगावरच झडप मारतात,त्यांना पहिले दगड मारून पिटाळून लावलं आणि त्या अरुंद रस्त्याने हळूहळू पुढे जाऊ लागलो, काही ठिकाणी रस्ता बर्यापैकी रुंद आहे तर काही ठिकाणी अतिशय अरुंद आणि धोकादायक आणि निसरडा आहे. खालचा फोटो त्या रस्त्यावरील एक धोकादायक जागेचा आहे.

रस्ता सरळ ‘कुराण बावडी‘ म्हणून उभ्या दगडाच्या भिंतींत गुहेसारख्या कोरलेल्या कुंडापाशी जाऊन संपतो, इथे रांगेने तीन कुंड खोदलेले असून त्यांचा आकार साधारण ५/६ फुट लांबी-रुंदी आणि साधारण ५ फुट खोल असा चौकोनी आहे. हे कुंड पाहून लक्षात येते कि जुन्या काळी हा रस्ता बराच मोठा आणि लांब असावा पण काळाच्या ओघात किवा शत्रूच्या माऱ्यात हा नष्ट झाला.


ह्या रस्त्याच्या मध्यभागहून वर भिंतीवर चढण्यासाठी एक तिरपी सरळ वाट आहे हि वाट सरळ चौकोनात कर्ण काढल्यासारखी भिंतीच्या डोक्यावर जाते, हा अतिशय खडतर धोकादायक मार्ग असून वर जायला फक्त दीड- दोन फुटाचा ओबडधोबड वाट आहे आहे आणि सर्वात मोठी अडचण म्हणेज या वाटेवरचा १५०/२०० फुट उंचीवर मधला २०/२५ फुटाचा रस्ताच तुटून गेला आहे, बहुत झीज होऊन किवां शत्रूच्या माऱ्यात तुटला असेल, आता त्या जागी एक आडवी दोन लोखंडी पोल आणि त्यावर आडव्या पट्या असलेली शिडी लावण्यात आली आहे पण पूर्वी तर दोरीशिवाय हा टप्पा पार करणे तर अशक्यच असेल. आता हि शिडी पार करण्यासाठी तेथे एक माणूस शिडीच्या पाच फुट वर एक दोर लावून ठेवतो, तो वरचा दोर धरून आणि खाली शिडीवर पावले टाकत अतिशय सावधपणे हे अंतर पार करावे लागते नाही म्हणायला तुमच्या कमरेला एक दोर बांधलेला असतो, इथे तोल गेला तर खाली सरळ ६००/ ७०० मीटर खोल दरीतच पडून निजधामाला पोहचू. हा माणूस तिथेच दर्यापाशी राहतो आणि बहुतेक तो रोजच वर येऊन तो दोर लावतो आणि जाताना परत काढतो जेणे करून तो तिथे नसतांना कोणी आगाऊपणे शिडी पार करू नये, शिडी पार करण्याचे तो २० रुपये माणशी घेतो, पण त्याच्या शिवाय ती शिडी पार करण जवळपास अशक्यच आहे. हि शिडी पार करून परत १०० फुटाची खडतर वाट चढून शेवटी भिंतीच्या डोक्यावर आणि गडाच्या सर्वोच शिखरावर येऊन पोहचतो. इथून दोर असेल आणि शास्रोक्त्र प्रशिक्षण असेल तरच दोन्ही बाजूच्या सुळक्यावर जाता येते.
खाली त्या तिरप्या वाटेचे आणि शिडीचे काही फोटो टाकले आहे.



दुर्दैवाने आम्हाला शिडीच्या खालच्या टोकापर्यंतच जाता आलं, कारण आम्ही पोहचलो तेव्हां तो माणूस खाली काही कामाला जायचं म्हणून दोर काढत होता, त्याच्या बऱ्याच विनवण्या केल्या, जास्त पैशाची लालूच दाखवली पण त्याने काही ऐकले नाही त्यामुळे तिथपासूनच परत फिरावे लागले. उमेश तर तरी पण तसच शिडीवरून झोपून रांगत जाऊ म्हणून सांगत होता, पण त्याला बोललो जाऊ दे परत येऊ त्याच्यासाठी कधीतरी, पण जर आता चूक झाली तर.... शेवटी जान है तो जहान है. !!

मग खाली उतरून परत त्या डावीकडच्या भागात आलो ह्या भागात साधारण १०/१५ फुट लांब, ५ फुट रुंद आणि ६/७ फुट खोल अशी दोन पाण्याचे कोरडेठक्क पडलेले कुंड, अजून पक्क्या अवस्थेत असलेले ३/४ बुरुज, शत्रू बुरुजावर चढू लागला तर त्यावर वरून गरम तेल ओतण्यासाठी बुरुजात केलेल्या चोर जागा बघायला मिळाल्या, तिथेच एक चोर दरवाजा पण आहे जो मागच्या बुरुजाच्या शेवटी दरीत निघतो हा चोर दरवाजा नावाप्रमाणेच चोर असून सहजपणे दिसत नाही, हि चोरवाट बघून मला राजगडावरच्या चोर दरवाजाची आठवण झाली पण मलंगगडचा चोर दरवाजा हा त्या मानाने जेमतेम एक माणूस जाऊ शकेल इतका अरुंद आहे. आम्ही पार खालपर्यंत जाऊन आलो पुढे मग खाली परत खोल दरी आहे इथून खाली उतरण्याची वाट अतिशय बिकट आहे जी दोराशिवाय उतरण अशक्य आहे, पण तरीही तिथे काही बहाद्दर जाऊन आपल्या प्रेमी युगुलाची नावे लिहून आले आहेत, साले चांगल्या गोष्टी खराब करायला तर एक नंबर .... !!

इथे वर मग उमेश बरीच व्हिडीओ शुटींग आणि फोटो काढत बसला, समोरच दरीच्या दुसऱ्या बाजूला अजून मलंगगड एवढ्याच उंचीची एक डोंगररांग आहे, त्यावर जायला दरीतूनच पायवाट आहे, तो पण एक चांगला ट्रेक होऊ शकेल पण त्या डोंगराच नाव मात्र कळू शकल नाही

वर २/३ तास थांबून आम्ही परत त्या तुटलेल्या पायऱ्यावरून उतरू लागलो, खाली बघून उतरतांना तर जाम फाटते राव .. !! उमेश माझी वरून शुटींग करून धीर देत होता.... उतरलो हळूहळू . खाली पहिल्यावर वाटलं खूप काही अवघड नाही पण पायऱ्या न पाहता दरीत पाहिल्यामुळे गडबड झाली पाहिजेतर परत चढून उतरू शकतो .. पण अगोदर उतरतांना थोडा घाबरलो होतो हे नक्की.. !!
मग पुढचा रस्ता सोपा आहे तिथून परत दर्ग्याला आलो हातपाय धुऊन थोडी पोट पूजा करून झपाझप पायऱ्या उतरलो, पायथ्याला आलो , बस मधून कल्याण स्टेशन, तिथून आठ वाजता रेल्वेने निघून ११ वाजता परत पुणे... !!

खाली अजून काही फोटो टाकले आहेत. मला अजूनही ऐसी अक्षरे वर फोटो चढवण्यास अडचण येत आहे, आशा आहे लवकरच ते हि समजेल .
१.
उमेश भिंतीची तिरपी वाट चढताना, फोटो वरून अंदाज येईल कि वाट किती बिकट आणि धोकादायक आहे कारण मागे लगेच खोल दरी आहे.

२. समोरच्या मोकळ्या जागेवरून दिसणारी भिंत

३. भिंतीच्या समोरच्या बाजूला असेलेला बुरुज

४. शत्रूच्या अंगावर गरम तेल टाकण्यासाठी बुरुजाला केले खड्ड्डे

५. मागच्या बुरुजाला असेलेली चोरवाट

६. सर्वात वरच्या बुरुजावरून दिसणारा दर्गा आणि खालची नागमोडी वाट

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

चित्रे नाही दिसली. पण अशी भटकंती केलेली पब्लिक दिसली की बरं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

+१ असेच म्हणते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलंगगडावर मी अनेक वर्षांपूर्वी गेले होते. तेव्हा काही असे शिडी वगैरे खतरनाक अनुभव आल्याचं आठवत नाही. कदाचित आम्ही त्या भागात गेलोच नसू ... किंवा आता वयानुसार काही आठवत नाहीये.

(फोटो इथे दिसत नाहीयेत, पण फ्लिकरवर जाऊन पाहिले. फ्लिकरवरचे फोटो इथे कसे डकवायचे हे मलाही समजलेलं नाही. आणि एक, फोटोंचा कॉण्ट्रास्ट किंचित वाढवलात तर फोटो आणखी सुंदर दिसतील.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

I started to read but got bore after first paragraph. There are so many fucking Blogs out there writing similar type of travelogues. Don't you think you should make it more interesting.

Why should i read yours post if there is nothing new ,fresh ,enriching for me. Its Just cliche.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

तुला नै आवडले तर ते जरा नीट शब्दांत सांगता येते. अन तू न वाचल्याने लेखकासकट कुणालाही *ट फरक पडत नाही. त्यामुळे असले अ‍ॅटिट्यूड योग्य जागी सारलेलेच उत्तम.

बाकी असला फालतूचा अ‍ॅटिट्यूड असणार्‍यांचा प्रॉब्लेम मला कळत नाही. प्रसिद्धीलोलुपता हे एक कारण त्यामागे नक्की असू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

In which language should i tell then? Whats is inappropriate in above comment. F word?should i comment like this?

"अय्या मस्त लिहल आहे आणखीन थोड रंजक करता आल असत बर का!!असूदे असूदे तुझा पहिलाच प्रयत्न होता.बाकि फोटो उत्तम आवडले"

किंवा

"अय्या वाव्व xyz गडावर जाऊन किती दिवस झाले नै ,अगदी त्याची आठवण आली बघ.

किंवा

"ब्ला ब्ला ब्ला"

And before telling me about publicity you should remember that i have faced very harsh comments on my very first writing.

But this doesn't mean i have started to discourage new folks.

I just gave my honest opinion about this particular post.

अवांतर - प्रसिद्धीलोलुपता मिळविण्यासाठी केलेली कमेंट आणि जे काही वाटल ते सांगणारा प्रतिसाद यातला फरक ओळखायला शिकणे महत्वपूर्ण आहे.

जे काही लिहतो ते direct लिहतो त्यात कुठलाही आडपडदा,पांढरपेशीपणा ठेवत नाही.त्यावर होणार्या परीक्षणाला जाण्याची तयारी असते म्हणून!

आपल्या मित्राच्या नाकातून शेंबूड बाहेर येत असेल आणि त्याला ते माहीत नाही आहे तर त्याला सरळ सांगणार कि शेंबूड पुस म्हणून नाहीतर आरसा दाखवणार. बाकी लोक चेष्टा ,दांभिकता करतील तो ज्याचा त्याचा प्रश्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

निरर्थक श्रेणी मिळाल्यामुळे आलेला मार्टिर काँप्लेक्स अस्थानी आहे हे ठसवण्यासाठी हा प्रतिसाद लिहितो आहे.

जे वाटतं ते सांगणं ठीक आहे, पण "इथे मुळात असं विशेष काय आहे म्हणून मी वाचू?" हा टिकोजीराव प्रतिसाद देण्याचं काहीच कारण नव्हतं. लेख अन प्रतिसाद यांत फरक आहे. प्रतिसादांत सौजन्याची अपेक्षा करणं म्हणजे चाटूगिरी किंवा दांभिकता नव्हे. दोन्हींतला फरक कळत नसेल तर नाइलाज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुलांनो, तुमचे दोघांचेही मुद्दे गुद्द्यांवर न आणता लिहाल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओ बै, माझे मुद्दे तरी मी वर ल्हिलो बगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Chill batman! I will try to be less direct and more diplomatic like judges in marathi saregampa.
Please watch if possible its live Now.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

Chill batman! I will try to be less direct and more diplomatic like judges in marathi saregampa.
Please watch if possible its live Now.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

जाली(य) महागुरु होणार तर तुम्ही! पण महागुरु, तुम्ही मराठी/देवनागरी मध्ये उधळाना तुमचे ज्ञानकण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

जालीय महागुरू विथ अ थॉर्नी टंग...;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

जालम्हाग्रू ळॉळ ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

अरे तो बिचारा हर्ष बावचळला असेल.
जालीय महागुरू ही जबरदस्त टर्म आहे. लोल.
च्यायला कालच पुण्य २ झाल होत आता परत १ होणार वाटत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

>>हर्ष<<
हर्श हो! नेमक्यावेळच्या शुद्धलेखनाचे पुण्य तरी पदरी पाडा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुद्धलेखन सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

मलंगगडावर बरेच आधी गेलो होतो (गेले ते दिन गेले वगैरे Wink )
फोटो दिसले नाहीत Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!