जन्म मृत्यूचे समीकरण............

डॉ. निशा: hello Dr. akash?
डॉ. आकाश: Yes nisha.
डॉ. निशा: Dr. please come here, there are some complications in operation. It seems difficult to save..........
डॉ. आकाश: no....no nisha, मी आलो लगेच! don't panic... OK!

वर्ष १९९० नोव्हेंबर महिना. आजही आठवतो तो दिवस ज्या दिवशी माझा मृत्यू झाला आणि मी या दुसऱ्या जगात येऊन पोहचलो. इतरांप्रमाणेच मी सुद्धा एक सरळ मार्गी आयुष्य जगणारा. फरक फक्त एवढाच की इतर अन्यायाविरुद्ध तक्रार करायचे आणि मी त्यांना न्याय मिळावा म्हणून लढायचो. लक्षातच आलं नाही की इतरांचं आयुष्य सावरता सावरता माझ्या बिछान्याची सावरा सावर वयाची चाळीशी ओलांडूनही मलाच करावी लागायची.
ती माझी शेवटची case , आनंद आहे मला की मी ती case जिंकली जरी त्याच case मुळे मी आज या दुसऱ्या जगात असेल. एका अनाथ आश्रमातील १०-११ वर्षाची मुलगी, जिच्यावर एका वासना पिडीत नराधमानी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. पण सुदैवाने लगेचच त्याच्या तावडीतून सुटून त्या मुलीने आश्रमाकडे धाव घेतली होती आणि नंतर तिच्या आश्रमातील मंडळींनी माझ्याकडे. जरी अतिप्रसंग घडलेला नव्हता तरी मला त्या नराधमाला अशी कठोरातील कठोर शिक्षा करायची होती की जेणेकरून परत त्यानी असं करणं तर दूरच मनात तसा विचार सुद्धा आणायला नको आणि त्याच्या सारख्या विकृत लोकांचा गैरसमज दूर व्हावा की आश्रमातील मुलींना कोणी वाली नसतो. कोर्टाच्या फेऱ्या सुरु झाल्यात......पुरावे, साक्षीदार, आरोप, प्रत्यारोप............

मी जेव्हा जेव्हा त्या मुलीला बघायचो मला असं वाटायचं की जर माझंही लग्न योग्य त्या वयात झालं असतं तर आज मलाही अशीच छान सुंदर मुलगी असती. आणि म्हणूनच मी त्या case साठी रात्रंदिवस काम करू लागलो. मला काहीही करून त्या व्यक्तीला शक्य तितक्या जास्त काळासाठी गजाआड पाठवायचं होत.
दिवसावर दिवस निघून गेलेत आणि शेवटी निर्णय आमच्या बाजूनी लागला. मला अपेक्षित असलेली शिक्षाच त्याला ठोठावण्यात आली. त्यावेळेस त्या मुलीच्या चेहऱ्यावर असलेले समाधानाचे, आनंदाचे आणि आपण जिंकलोय या जाणिवेचे भाव निरागस आणि सहजरीत्या दिसत होते. त्या मुलीचा निरोप घेताना तिच्या डोक्यावर हात ठेऊन "सुखी राहा...........खूप मोठी हो" एवढं बोलून मी पण चालायला लागलो, तोच माझा हात धरून तिन्ही मला अडवलं आणि फक्त दोनच शब्द बोलली "Thanks काका". तिला मी पहिल्यांदाच हसताना बघितलं. तिच्या गालावर पडलेल्या गोड खळी कडे बघून मला हा आतापर्यंतचा माझा सर्वात मोठा विजय वाटू लागला.

pending काम आणि files ची आवरा आवर करता करता रात्रीचे १० वाजलेत आणि मी घराकडे निघालो. घरचा १०-१२ मिनिटांचा रस्ता मला प्रत्येक पावलावर अभिनंदन करत होता. case जिंकल्याचा आनंद त्याहूनही मुलीला न्याय मिळवून दिल्याचा आनंद, रात्रीच सुंदर चांदण, हळुवार वाहणारा गार वारा मन अगदी प्रसन्नतेच्या शिखरावर जाऊन पोहचलं होतं. मनात विचारांचं नाचणं सुरु होतं "जर मीच त्या मुलीला दत्तक घेतलं तर? जर मीच तिच्या काका ऐवजी वडील बनलो तर?........ तिचं मी नवीन नाव काय ठेवणार, गोड खळी पडणारी.....Dimple??". विचारांवर विचार सुरु होते तोच एका थंडगार स्पर्शाने समुद्रात लाट उठावी तशी एक वेदनेची लहर माझ्या सर्वांगात उठली. काही कळायच्या आतच माझं पोट फाटून एक सुरा बाहेर आला होता. "आमच्या माणसाला गजाआड टाकतोस" बस एवढं ऐकू यायचा अवकाश आणि सपकन त्यांनी तो सुरा माझ्या पोटात भोसकला. अर्धमेल्या शरीराचा ताबा सोडून मी खाली कोसळलो. लक्षात आले होत की आता प्राण फक्त थोडेच शिल्लक आहेत, पण तो व्यक्ती प्राण शिल्लक ठेवायच्या हेतूने आलेला नव्हता. त्यानी परत सुरा उचलला आणि शेवटचा वार करणार तोच आमच्या चेहऱ्यावर एक प्रकाश पडला. समोरून एक तरुण आमच्या जवळ आलेला होता त्याच्या गाडीच्या प्रकाशाने सगळच उजळ झालं होत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मला बघून त्याने गाडी तिथेच थांबवली. "निघून जा इथून नाहीतर फुकटचा मरशील" असं म्हणत तो सुरा घेऊन त्या तरुणाकडे चालू लागला. काहीसा घाबरलेला तो तरुण गाडी दुसरीकडे न नेता त्याच गुंडाच्या दिशेने वेगाने जाऊ लागला. त्याला या प्रतिहल्ल्यातून सावरता येईस्तोवर तरुणाने त्यास धडक दिली आणि तो सुऱ्याचा वार हवेत करत खाली कोसळला. अचानक फसलेल्या त्याच्या बेतामुळे तो गुंड मिळेल त्या दिशेनी पळू लागला. गाडी तशीच टाकून तो तरुण माझ्या जवळ आला, माझं डोकं मांडीवर घेताना, त्याची मला वाचवायची धडपड त्याच्या नजरेत दिसत होती आणि त्याच्या डोळ्याखाली झालेला घाव सांगत होता की त्या गुंडाचा वार हवेत नाही तर त्याच्या डोळ्याखाली बसला होता. हळू हळू माझे डोळे मिटायला लागले आणि माझ्या श्वासांची उलट मोजणी सुरु झाली.
विझायच्या आधी प्रत्येक दिवा शेवटी एकदा फडफडतो, तशीच माझी ज्योत विझायच्या आधी, अखेरच्या श्वासासाठी माझे डोळे उघडलेत. माझे डोळे उघडले तेव्हा मी एका बिछान्यात होतो कदाचित हॉस्पिटलच्या, आणि समोर होते दोन चेहरे. डोळ्याखाली पट्टी केलेला त्या तरुणाचा चेहरा, ज्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता तो की तो मला वाचवू शकलाय की नाही? आणि जर नाही तर त्या प्रश्नात दडलेली मनापासून वाटणारी खंत त्याच्या चेहऱ्यावर होती. दुसरा चेहरा अर्थातच त्या मुलीचा जिला तिच्या आश्रमातील लोकांनी तिथे आणले होते. त्या हसऱ्या चेहऱ्यावरची गोड खळी नाहीशी झाली होती, होती ती फक्त आसवं. तिच्या त्या रडक्या आवाजात तिचा एकच शब्द कानी पडला ...."काका.......". वडील होण्याचा स्वप्नात मी तिचा काकाच राहिलो होतो. परत तिच्या गालावरची गोड खळी बघायची होती पण ते आता शक्य नव्हते आणि जे शक्य होते ते झाले, मी माझा अखेरचा श्वास घेत त्या दोघांचाही निरोप घेतला या जगात येण्यासाठी .

मोक्ष ....... मोक्ष प्राप्तीचा मार्ग खरंच वाटतो त्यापेक्षा हजार पटीने अवघड आहे आणि म्हणूनच या जन्म मरणाच्या खेळातून निवृत्त होणेही तेवढेच कठीण. नको असताना करावी लागणारी गोष्ट म्हणजे जीवनाची सुरवात हे मृत्यूनंतरच कळतं तेही इथे आल्यावर. आयुष्याची साधी सरळ समीकरणे सोडवता सोडवता हैराण होणारे आपण, इथल्या सूत्रधाराला काय समजणार? आयुष्यातील संबंधांची समीकरणे, गणित, त्यांची जुळवा जुळव इथला सूत्रधार कशी करत असणार हे आपला दृष्टीक्षेप, कल्पनाशक्ती यांच्या पार पलीकडचं आहे. सगळच पूर्वनिर्धारित आणि तेवढंच आपल्या प्रयत्नावरही निर्धारित. असो, भरपूर काळ ओलांडलाय माझ्या जन्म मरणाच्या खेळाचा एक डाव संपून. कदाचित मला हे सगळं आठवण्याची ही शेवटची घटका असेल किंवा नसेलही. कारण मला माहिती नाही की कधी आज्ञा होईल आणि कधी सुरुवात होईल खेळाच्या नवीन डावाला...........

डॉ. आकाश: Mr. Rajesh, you can come in now.
राजेश: (आत येत) डॉ. मी तर कधी पासून वाट बघतोय, आणि ......???
डॉ. आकाश: हो..हो सावकाश जरा.........निशा?
डॉ. निशा: हे घ्या तुमच बाळ, congrats! मुलगी झालीय तुम्हाला.
राजेश: wow किती सुंदर.................................. अगं! बघितलंस का किती sweet आहे ही.
मिसेस राजेश: (हसत) हु.............!!!
राजेश: तुझ्यावरच गेलीय बघ. I am sure हसल्यावर हिच्या ही गालावर तुझ्या सारखीच गोड खळी पडणार.
मिसेस राजेश: (हळू स्वरात) हो का? मग dimple म्हणूनच आवाज देऊ आपण तिला.
राजेश: चालेल........ काय ग डीम्पे तुला चालेल ना?

delivery मध्ये complications होतेच पण डॉ. आकाशच्या अनुभवामुळे सगळं व्यवस्थित झालं. त्यामुळे अभिमानाने,समाधानाने आणि अवघड परिस्थितीतून एका अर्भकाचा जीव वाचवल्याच्या आनंदाने डॉ. आकाशचे मन भरून आले एवढे की दोन अश्रू ओघळत खाली आले कधीकाळी झालेल्या डोळ्याखालील जखमेच्या डागावर.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कथा खरच चांगली आहे..पण जे शीर्षक दिलय त्यामुळे,नक्की काय मांडायच आहे या कथेतुन? असा प्रश्न मात्र पडतो.. :~

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''