शार्कनेडो - प्यार करे आरी चलवाये...

लॉस एंजेलिस च्या जवळ समुद्रात वादळ होते व टोर्नेडोज तयार होतात. पाण्यातील मासे त्याबरोबर उचलले जातात व एलए वर शार्क्सचा पाऊस पडतो. शब्दशः खुदा जब देता है स्टाईल ने छप्पर फाडके मासे पडतात. मग आपले हीरो, त्याचे जवळचे लोक व इतर मिळून ते टोर्नेडोज व मासे यांना कसे हरवतात ही स्टोरी. आता हे मासे म्युटेटेड वगैरे नाहीत. माशांसारखे मासे, फक्त वादळामुळे आकाशात उडून परत खाली पडतात. या ब्याकग्राउंड वर हा चित्रपट पाहावा. म्हणजे प्रत्येक महान स्टोरीटेलिंग मधे सामान्य लोकांची असामान्य कामे असतात तसे सामान्य माशांनी केलेल्या असामान्य गोष्टी तुम्हाला कळतील.

झटपट उत्क्रांती -

पाण्याबाहेर काहीतरी इंटरेस्टिंग दिसते आहे असे अनेक पिढ्या पाहिल्यावर प्राचीन काळी पाण्यातून जलचर प्राणी बाहेर पडला व जमिनीवर चालू लागला त्याला बरीच वर्षे लागली असा आमचा समज होता. पण सध्याच्या इन्स्टंट युगात एवढा काळ थांबायला कोणाला वेळ आहे! येथे मासे पाण्यातून वर उचलले जाउन वादळाबरोबर गोलगोल फिरत असताना त्यांना पक्ष्यांप्रमाणे हवेतल्या हवेत झेप घेऊन भक्ष्य पकडताही येउ लागते. सुमारे हजार एक फुटांवर हवेत गोल गोल फिरत असलेल्या माशाला तेथून थेट खाली पत्र्याच्या वस्तूवर आपटल्यावर, अजिबात लागत नाही. बरं लागले नाही तर नाही, इतका वेळ चक्कर येइपर्यंत गोलगोल फिरतोय, धप्पकन एका टणक गोष्टीवर पडलोय, आजूबाजूला पाणी नाही, त्यामुळे श्वास घेणे अवघड - "मै कहाँ हूँ?" हा प्रश्नही पडत नाही. ती तोपर्यंत कधीही न पाहिलेली पत्र्याची वस्तू म्हणजे कार असून आत माणसे असणार व आपण ती खाऊ शकतो एवढे ज्ञान त्यांना लगेच येते. ते लिटरली आभाळातून पडले असल्याने काहीही करता येते त्यांना बहुधा.

डार्विन बिर्विन विसरा. इंटेलिजंट डिझाईन वाले उत्क्रांतीची थिअरी चुकीची आहे उगाच म्हणत नाहीत.

टोर्नेडोचा मात्र सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट मधे विश्वास असावा. कारण आख्ख्या पॅसिफिक महासागरातून तो फक्त शार्क मासे उचलतो. दुसरे कोणतेही मासे, जलचर, दारूच्या बाटल्या, शेवाळ काही नाही. फक्त शार्क्स. तेही छोटी पिल्ले बिल्ले एकही नाही. सगळे फुल साईज.

एक "बोर्डवॉक" टाईप किनारा. राईड्स ई. एक विजेचा पाळणाही. तेथेच हीरोचा बार. पाणी किनार्‍यावर येउन आदळू लागते (फक्त क्लोज अप्स मधे. लांबून घेतलेल्या शॉट्स मधे एकदम शांत किनारा). हीरोच्या बार मधे डायरेक्ट खिडकीतून एक शार्क मासा येउन पडतो. त्याला स्वतः श्वास घेण्यापेक्षा लोकांना खाण्यात जास्त इंटरेस्ट. त्यामुळे हीरॉइनला त्याला मारावे लागते. पण नंतर बार्स च्या खिडक्यांमधून मासे येणे ही नेहमीचीच गोष्ट असल्याप्रमाणे सगळे गप्पा मारतात.

मग पाण्याच्या तडाख्याने तो विजेचा पाळणा निखळतो व मोठ्या चाकाप्रमाणे धावू लागतो. येथे "मागे वरती पाहात पुढे धावायचे" कौशल्य असलेले लोक - जे डायनोसोर, गॉडझिला वगैरे चित्रपटात पळतात- ते वापरले आहेत. एका रुंद (व कोरड्या) रस्त्यावर मागून पाळणा येत असताना आजूबाजूला न जाता त्याच रेषेत सरळ पळायचे हे अनेकदा अयशस्वी झालेले तंत्र वापरल्याने त्या चित्रपटांत जे होते तेच येथे होते. भौगोलिकदृष्ट्या समुद्रसपाटीकडून जमिनीकडे उतार असल्याने बीचवरचा पाळणा निखळला तर तो साहजिकच तिकडे घरंगळत जातो हे ही येथे सिद्ध होते.

एक रस्ता. त्यावर थोडे पाणी असल्याने शार्क्स आरामात फिरत आहेत. तेथे एका स्कूल बस मधल्या मुलांना वाचवून नायक दोरखंडावर चढत चालला आहे वरती पुलाकडे. वरती पुलावर पाणी बिणी तर नाहीच, लक्ख उजेड आहे. तो अर्ध्या अंतरावर असताना खालून एक मासा उडी मारून तो दोर तोंडात पकडतो आणि 'चेस' करायचा प्रयत्न करतो. आता हवेत असलेल्या माशाला मारायचे म्हणजे खालील पर्याय शिष्टसंमत आहेतः
१. काहीही करायचे नाही. तो दोन मिनीटांत हवेत आपोआप मरेल किंवा कंटाळून दोर सोडून देइल.
(२. त्याचे गुणगान करायचे. मग तोही काही बोलायचा प्रयत्न करेल. तोंडातून दोर सुटून पडेल. पंचतंत्र फेम उपाय.)
३. चाकूने दोर कापून त्याला पाण्यात पाडायचा व आपण माणसे वाचवतोय की मासे याबद्दल सस्पेन्स निर्माण करायचा.
तुम्ही ओळखलेच असेल की तिसरा उपाय केला जातो. मासा हवेत उडू शकत नाही, श्वास घेऊ शकत नाही याप्रमाणे माशाला मारण्यासाठी त्याला पाण्यात पाडणे हा सर्वोत्तम उपाय नाही हे कथेला मान्य नाही.

मग हीरोच्या फॅमिलीला वाचवायचे ठरते. हीरो, हीरॉइन व एक दोन इतर लोक एलए च्या आतील बाजूस असलेल्या भागात जातात. तेथे त्याचे घर व आधी दुरावलेली बायको व मुलगी राहात असते. अमेरिकन मूव्हीत नवरा बायको दुरावलेले नसणे ही चैन शक्यच नाही. त्यामुळे त्या ताराचा - नायकाच्या एक्स-बायकोचा- दुसरा नवरा/बॉयफ्रेण्ड तेथे असतो. साहजिकच ते याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. येथे शार्क कोठून येणार, आणि आले तरी येथील इमर्जन्सी सर्विसेस "Are second to none" असे त्या बॉयफ्रेण्डने म्हंटल्याम्हंटल्या लगेच बाहेर पूल मधे शार्क्स दिसतात व एक काच फोडून घरातही येतो. कोठून आला तो? घर तर टेकडीच्या उतारावर असते? आणि कोण असे अंगण्/स्विमिंग पूल च्या तुलनेत सखल जागेत घर बांधतात?

आता तो बॉफ्रेच "त्यातल्या त्यात व्हिलन" असल्याने शार्क त्याला मारतो. तो ही वाईट बिईट नसतो. जरा खउट असतो एवढेच. पण त्याला शार्कने मारल्यावर दोन मिनीटात सगळे काहीच न घडल्याप्रमाणे गप्पा मारतात. अरे, इतके दिवस तुम्ही एकत्र राहात होता ना? जरा स्मार्टXXX डॉयलॉग मारण्याआधी एक दोन अश्रू तरी ढाळा त्याच्यासाठी? हे लोक तेथून बाहेर पडल्यावर एक मिनीटात त्या सगळ्या नेबरहूड मधे फक्त यांचेच घर कोसळते.

मग अचानक त्यांना आठवते की हीरोचा एक मुलगाही तिकडे कोठेतरी आहे. त्यालाही घ्यायला निघतात. वाटेत तो स्कूलबसवाला शॉट येउन जातो. मुलाच्या वर्कशॉपमधे जरा थोडाफार वारा सोडला तर सगळे कोरडे आहे. तो मुलगा व त्याचे सहकारी का कोणास ठाऊक पण लपून बसलेले असतात. त्यांची शोधाशोध चालू होते. तेही जरा कोठून आवाज आला तर हातात गन सरसावून. हॅलो! तू वादळ, मासे वाल्या कथानकात आहेस. हा स्पाय थ्रिलर नव्हे. त्यात तू नायकाच्या मुलाला शोधत आहेस. जेथे पाणी नाही तेथे आवाज आला तर गन सरसावून जायचे कारण नाही.

वेअरहाउस मधे बॉम्ब बनवायचे व ते टोर्नेडो च्या आत टाकून उलटे प्रेशर निर्माण करून टोर्नेडो फुसका करून टाकायचा असा प्लॅन. कारण ते बार ओनर ई. असले तरी जात्याच स्फोटकांतले तज्ञ असल्याने ज्याला पाच मिनीटांपूर्वी टोर्नॅडो आले आहेत हेच माहीत नव्हते तो त्यांची क्षमता किती आहे व त्याची पॉवर नलिफाय करायला काय क्षमतेचा बॉम्ब लागेल हे सर्व अचूकपणे ठरवू शकतो.

तेवढ्यात एका सिनीयर सेंटरच्या स्विमिंग पूल मधे मासे पडू लागतात. दोन मजल्यावरून डाईव्ह मारणारा माणूस किमान काही फूट पाण्यात आत जातो तरंगायच्या आधी. येथे थेट हजार फुटांवरून सिनीयर्सच्या स्विमिंग पूल मधे पडणारे मासे पाण्याला स्पर्श झाल्याझाल्या जन्मापासून तेथेच असल्यासारखे पोहू लागतात. आता त्यांना मारायचे आहे. अं... पूल ड्रेन करता येतो ना? पण तेवढ्या आणखी उत्क्रांती होऊन चालू किंवा स्वतःहून उडू लागले तर कोण रिस्क घेणार? म्हणून मग नायक तेथे पेट्रोल सारखे काहीतरी ओतून तो पूल/टॅन्क पेटवून देतो.

आता हेलिकॉप्टर मधे नायिका व हीरोचा मुलगा चक्रीवादळाजवळ जातात. तेथे गेल्यावर लगेच जे बॉम्ब टाकायचे आहेत ते सीटवरून मागे वळून हात लांब करून घ्यावे लागतील असे ठेवलेले असतात. एकेक करून वादळांमधे बॉम्ब टाकले जातात व वादळ निकामी केले जाते. मात्र तिसर्या वादळाच्या वेळेस टायमिंग चुकते व नंतरच्या गडबडीत नायिका हेलिकॉप्टरमधून बाहेर फेकली जाते. त्यावेळेस स्वतः चक्रीवादळात गोल गोल फिरणारा एक मासा त्याही परिस्थितीत झेपावून तिला गिळतो. तो मुलगा कसाबसा हेलिकॉप्टर लॅण्ड करतो. मग हीरो ठरवतो की हे एकदाचे फिनिश करून टाकायचे. नक्की किती टोर्नेडोज आहेत याचे ज्ञान त्याला असते. सर्वांच्या सोयीसाठी तेथेच एक हेअरपिन टर्न असलेला रस्ता असतो व टोर्नेडो ला हेअरपिन टर्न्स आवडत नसल्याने तो ही त्याच्या दिशेने येत असतो. मग हीरो एका गाडीत एक बॉम्ब ठेवून ती गाडी त्या टर्न च्या जवळून सुसाट त्या वादळात सोडून देतो व आधी बाहेर उडी मारतो. अशा तर्हेने ते वादळ विरून जाते.

मात्र इकडे अजून वरून शार्क्स पडतच असतात. टोर्नेडोज तर संपले होते ना? पण वेळ काळाबद्दल प्रश्न विचारायचे नाहीत. कारण तो हीरोही गाडीतून जाताना जेवढा वेळ लागला, त्याहीपेक्षा लौकर चालत परत येतो. वरून शार्क्स पडत असताना नेमके त्याच्या मुलीला त्याच वेळी तिच्या कॅरेक्टर मधले flaws, anxieties, vulnerabilities ई दाखवायची हौस येते, त्यामुळे ती वरती लक्ष द्यायचे सोडून इतरत्र बघत बसते व एका वरतून पडणार्या शार्क च्या रेंज मधे येते. आता टोर्नेडो संपले आहेत, उरलेले शार्क्स वरून पडत आहेत. सर्वसामान्य माणसे अशा वेळेस एखाद्या भक्कम इमारतीत जाऊन पाच मिनीटे थांबतील. पण हीरोला तसे करून कसे चालेल? त्यामुळे तो तिला बाजूला करून एक "आरी" (चेन सॉ) घेऊन आ वासून येणार्‍या शार्कपुढे उभा राहतो, व त्याच्या पोटात शिरतो.

येथे बाजूला असलेली त्याची बायको "आश्चर्याचा धक्का बसला" हे एक्स्प्रेशन देते. तिने आख्ख्या चित्रपटात तोच एक शॉट फक्त दिलेला आहे. हिंदी चित्रपटात जसे हीरोला एक फाइट मारायला सांगून तो शॉट अनेक वेळा रिपीट करतात, तसे तिच्याकडून या चित्रपटाकरता तो फक्त एक शॉट करून घेतला असावा व तोच नेहमी रिपीट केला असेल. सगळे दु:खाने शार्ककडे बघत असताना आतून एकदम आरीचा आवाज येतो व हीरो त्याचे पोट फोडून बाहेर येतो. आता चित्रपट संपला असे वाटत असतानाच, हीरो पुन्हा शार्कच्या पोटात हात घालून आणखी एक व्यक्ती बाहेर काढतो. ती म्हणजे दुसरीतिसरी कोणी नसून १०-१५ मिनीटे आधी गिळली गेलेली नायिका असते, हा तोच शार्क असतो (दिग्दर्शक मनमोहन देसाई कडे शिकवणीला असावा). म्हणजे वादळ विरल्यानंतरही इतका वेळ तो शार्क विझलेल्या भुईचक्रासारखा १०-१५ मिनीटे हवेतच फिरत असावा.

चेन सॉ हातात असलेला माणूस जर प्रेमात पडलेला असेल तर तो महाडेंजर, हे त्या बिचार्‍या शार्कला कसे माहीत असणार? "प्यार करे आरी चलवाये, ऐसे आशिक से डरियो.." हे गाणे त्याने ऐकले नसावे.

येथे याचा ट्रेलर आहे. नेटवर कदाचित पूर्ण चित्रपटही मिळेल. अमेरिकेतील लोकांसाठी नेटफ्लिक्स वर आहे. टीव्हीसमोर जरा लांब बसा. तसे हे मासे टीव्हीतून बाहेर यायची शक्यता कमी आहे, पण उत्क्रांतीचे काही सांगता येत नाही.
http://www.youtube.com/watch?v=iwsqFR5bh6Q

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (6 votes)

प्रतिक्रिया

ROFL अरे गृहस्था, ठार करशील का आता हसवून???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL आता हा शिणोमा पहायलाच हवा!
फारएन्ड यांनी ऐसी अक्षरेवर, अशा अनमोल चित्रपटांच्या रसग्रहणाचा एक साप्ताहिक कॉलम सुरू करावा अशी जोरदार मागणी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जोरदार अनुमोदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारएण्डने अशी चक्रम कॉमेंटरी लिहिण्यासाठीच काही चित्रपटांचा जन्म होत असावा असं वाटतं. टोरनेडोमधून शार्कवर्षाव काय, आणि चेनसॉ घेऊन शार्कच्या पोटात जाणं काय... गुंडा सिनेमा ज्याप्रमाणे स्वतःच्या अस्तित्वातूनच हिंदी सिनेमाच्या टुकारपणावर एक डाडाइस्टिक मल्लिनाथी ठरला तसा हा सिनेमा तमाम टेररी फ्यूजन मूव्हीजवर टीका आहे बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__/\___

निव्वळ थोर!!

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अस्ले पिचर बघ्तना कय्म झोपच येते म्ला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

आयायायाया... खरंच असा चित्रपट आहे? हिंदी सिनुमे बरेच सुधारले म्हणायचे.

बाकी जगाला वाचवणार्‍या नायकाची पत्नी त्याच्यापासून विभक्त आणि मुलामुलीसह तिसर्‍या (बेफिकीर खवट इ इ) बॉयफ्रेंडसोबतच असणे हा फॉर्म्युला अनिवार्य आहे का संकटपटांमधे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लैच खंग्री पिच्चर आहे असं दिस्तंय. बाकी अजूनेक पिच्चर पाहिला होता, नाव विसरलो. त्यात काही लोक एका रणगाड्यात बसलेले असतात, आणि तो विमानातून खाली पडत असतो-पॅराशूटही काम करत नै. मग ते रणगाड्याच्या तोफेचा अँगल अ‍ॅडजस्ट करून फायर करतात, जेणेकरून त्यांची ट्रॅजेक्टरी बदलते आणि ते एकदम दाणकन खाली आदळण्यापासून स्वतःला वाचवतात. शार्कचे वर्णन पाहून त्याचीच आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पृथ्वीच्या दिशेने पिंडाचा एक तुकडा (तोफगोळा) अधिक वेगाने गेला, तर उरलेला तुकडा (वाहन व प्रवासी) कमी वेगाने पृथ्वीकडे जाईल.

नेहमीची यशस्वी रॉकेटे याच तत्त्वावर उडतात/क्वचित उतरतात : स्फोट किंवा ज्वलनाने काही वायू मोठ्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने फेकतात. जेणेकरून मोमेंटमच्या बारीक हिशोबाने वायू-सोडलेले उर्वरित यान वरच्या दिशेने जाते वा त्याचा खाली पडण्याचा वेग अलगद होतो. .

सध्याच्या रणगाड्यांमध्ये हे करण्याइतपत गोळे नसतील, किंवा ते पुरेशा वेगाने फेकण्याचे उपकरण नसेल, ही बाब खरीच. पण हे सैद्धांतिक दृष्ट्या ठीक वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थातच. सैद्धांतिक दृष्ट्या ठीकच आहे, पण.... Biggrin Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

यावरून डोळ्यांसमोर एक जबरी शीन आला. रजनीकांत विमानातून पडतो आहे. पॅरेशूट उघडत नाही. तो डगमगत नाही. जमिनीकडे पार्श्वभाग करून तो मोठ्ठ्याने वायू-प्रक्षेपण करतो. त्यायोगे एक मश्रूम क्लाऊड तयार होतो. त्यावरून घसरत तो हलकेच जमिनीवर पाय टेकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ही थीम कदाचित रजनीच्या पिच्चरमध्ये असूही शकते पुढे कधीतरी Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे लोक एलेमध्ये राहतात म्हणून यांच्या आरीच्या बॅटऱ्या नेहेमी चार्ज्ड असतात का? बरं झालं बै आम्ही समुद्र आणि आखातापासून फार लांब राहतो ते. कोण ते आरी वगैरे घरात आणून ठेवणार आणि चार्ज करत बसणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धमाल! शार्कनॅडो पाहिलेला नाही. (कारण तोवर आम्ही रुममेट्स या दुष्टचक्रातून सुटलो होतो.) पण शार्कनॅडो ज्या यंत्राची निर्मिती आहे त्याच्या आधीच्या कलाकृतींचा भरपूर जाच सहन केला आहे. अमेरिकेतील 'सायफाय' चॅनेलवर दहा-पंधरा हजारात (डालरां, डालरां) बनवलेले हे 'सिनेमे' प्रसारित होतात. रसिकांनी खालील सिनेमांचा रसास्वाद घ्यावा.

१. मेगा पायथॉन वर्सेस गेटरॉईड

मी पामर काय यादी करणार, तुम्हीच शोधा. इतर महान कलाकृतींप्रमाणे हे सुद्धा शोधाल तितके सापडेल. इथे काही उदाहरणं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

फार भारी! चित्रपट पाहिलेला नसूनही प्रसंग कसे असतील ते डोळ्यासमोर उभे राहून हसू येते. हे वाचून माझ्या मनात एक अचाट विनोदी चित्रपट निर्माण झाला आहे; प्रत्यक्ष चित्रपट पाहून कोणता जास्त विनोदी वाटतोय ते पाहायलाही मजा येईल.

पिर्‍हाना ३डीडी हाही असाच एक धमाल चित्रपट पाहिल्याचे आठवते. तो मात्र खरोखरच अशा चित्रपटांचे विडंबन होता (असे वाटतेय. किंवा गुर्जी म्हणतात तसेच असेल).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त!हे अजून काही -
mega shart Vs. Giant Octopus
SharkTopus (देवा!)
ह्याच प्रकारचा एक चित्रपट - इथे बघता येइल. नशीब, हे सगळं बघायला हिचकॉक नाहीये आता !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकच नंबर आहे परिक्षण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0