द हिन्दू : मांसाहारी पदार्थ नकोत !

तित्तर जर तुम्ही वाचत असाल ( रूढार्थ : twitter) , तर हे तुमच्यापासून दूर नाही.
म्हणजे लोकांसाठी ब्रह्मज्ञान , आपुले सोवळे अंग

टीप - चित्र डकवताना गंडलो.

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (3 votes)

प्रतिक्रिया

The Hindu asks non-veg employees to stop bringing meat into the canteen.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

लोकां पढवे सेक्युलॅरिझम, आपण करी ढोंगिझम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तथाकथित सेक्युलरिस्ट लोकांचा हा विषमभाव अनेकवेळा उघडा पडतच असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेक्युल्यारिझम आणि शाकाहार/मांसाहार यांचा अन्योन्यसंबंध समजला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेक्युलर लोक साधारणतः उदारमतवादी समजले जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसे बंधन नसावे.

माझ्या वैयक्तिक परिघात मी किती उदारमतवादी असावे नि किती नसावे, हे ठरविण्याचा पूर्ण अधिकार मला आहे.

समजा मी दारू पीत नसेन, तरी तुमच्या घरी दारू पिण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला असावे, त्यावर मी घाला घालू नये (किंवा त्यावर बंदी आणणारे कायदे मी आणू नयेत), एवढेच माझा उदारमतवाद म्हणतो. माझ्या घरी येऊन दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे लायसन माझा उदारमतवाद तुम्हाला देत नाही.

उलटपक्षी, समजा मी माझ्या घरी रोज दारू पीत असेन, तरीही, तुम्ही जर माझ्या घरात आलात, तर तुम्हाला मी दारू पाजायची की नाही, आणि पाजलीच, तर किती पाजायची, हेही ठरविण्याच्या माझ्या अधिकाराच्या आड माझा उदारमतवाद येत नाही. बाकी, तुमच्या घरी (किंवा, इन जनरल, माझ्या घराबाहेर) तुमच्या (किंवा माझ्याव्यतिरिक्त इतर कोणाच्याही) पैशाने तुम्ही वाट्टेल तेवढी दारू प्यावीत (किंवा वाटले तर पिऊ नयेत), माझ्या उदारमतवादाचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. (अशा पाठिंब्याची आवश्यकता असेल तर.)

प्रस्तुत प्रकरणी (माझी शाकाहारा-मांसाहारासंबंधीची व्यक्तिगत मते आणि आवडीनिवडी काहीही असल्या, तरी), 'हिंदू'च्या मालकीच्या जागेत प्रस्तुत नियम करण्याच्या बाबतीत माझ्या उदारमतवादाचा पाठिंबा 'हिंदू'च्या व्यवस्थापनाला आहे. (भलेही त्यांच्या ठिकाणी मी असतो, तर असले नियम बहुधा केले नसते, तरीही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मान्य. हिंदूच्या व्यवस्थापनाने हे आमचे नियम म्हणून नियम केला असेल तर त्याला आक्षेप घ्यायचा कोणालाही हक्क नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजा मी दारू पीत नसेन, तरी तुमच्या घरी दारू पिण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला असावे, त्यावर मी घाला घालू नये (किंवा त्यावर बंदी आणणारे कायदे मी आणू नयेत), एवढेच माझा उदारमतवाद म्हणतो. माझ्या घरी येऊन दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे लायसन माझा उदारमतवाद तुम्हाला देत नाही.

उदाहरण अंमळ भरकटलेले वाटले.
एखाद्या ठिकाणी दारू पिण्याला आणि न पिण्याला कायदेशीर मान्यतेची गरज आहे. ठराविक वयाचा निकषदेखील आहे.
मांसाहारासाठी असे काही निकष कायद्यात तरी नाहित. तेव्हा "दारू" आणि "मांसाहार" ही तुलना होऊ शकत नाही.

पुन्हा, मांसाहारी पदार्थ न एखाद्या जागी न विकणे, हा मुद्दा समजू शकतो.
पण तो खाण्यावर* बंदी आणणे - ह्याला कुठल्याच निकषांवर आधार नाही.

* - ह्यात भयाकारी वासाचे पदार्थ वगळलेले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे तर रिलायन्समध्येही लागू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"चायनीज लोकांनी घरुन आणलेले डबे" हा अनुभव घेतल्यावर उग्र वास येणारे अन्न आणण्यास परवानगी देऊ नये हे माझे मत झाले आहे. त्रास होतो हे नाकारण्यात अर्थ नाही, अल्पसंख्यांकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी बव्हंशांना त्रास का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाच प्रतिवाद अल्पसंख्यांकांच्या प्रार्थनेच्या आवाजाविरुद्ध करता येईल त्यामुळे जिभेचे चोचले असो किंवा काहीही, त्यांना हवे ते अन्न आणायचा अधिकार असलाच पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाच प्रतिवाद अल्पसंख्यांकांच्या प्रार्थनेच्या आवाजाविरुद्ध करता येईल

किती आवाज(बांग/आरती) झाल्यावर तुम्ही बंदी आणणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रश्न कळला नाही.
एकदा सेक्युलर आहोत म्हटल्यावर बंदी आणायलाच नको हेच माझे म्हणणे आहे त्यामुळे किती आवाज आणि किती वास याने काय फरक पडतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेक्युलर? आवाजाचा त्रास परिक्षार्थी, वृद्ध आणि आजार्‍यांना होउ शकतो, तरीहि बंदी आणणार नाही? बव्हंशी लोक वासाने 'अस्वस्थ' होत असल्यास त्यावर बंदी आणणे गैर कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या केसमध्ये तक्रार करायची सोय असतेच की. तेवढ्यासाठी सरसकट बंदी नाही आणू शकत ना.
आता असलेल्या मोकळीकीचा लोक गैरफायदा घेतात वगैरे गोष्टी येतात ती ज्याची त्याची संस्कृती. कंपनी किंवा सरकारने अधिकृतपणे कोणा एका बाजूला झुकते माप देणे अपेक्षित नाही एवढेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असा वटहुकुम जारी करणे जरा जास्तच वाटते ह्याबद्दल सहमत आहे, पण सोशल नॉर्म्समधे परिस्थितीचा त्रास (मानसिक नव्हे) होउ शकणार्‍यांना संरक्षण मिळते, परिस्थिती उद्भवल्यावर(पक्षी:त्रास झाल्यावर) तक्रार करा हे बहुसंख्यांच्या बाबतीत घडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अन्नाचा वास उग्र वाटणं वा न वाटणं हे फक्त सवयीवर अवलंबून असतं. कुणाकुणाकडे कढवल्या जाणार्‍या लोण्याचा वास (लोणी वाशेळे असल्यास) माझ्या डोक्यात जातो, तो त्यांना खमंग वाटत असू शकेल. तांदळाच्या ओल्या फेण्यांचा वास किंवा गव्हाच्या चिकाचा वास लोकांना अतिशय किळसवाणा वाटतो, तो मला अतिप्रिय आहे आणि त्यामुळे माझ्या तोंडाला पाणी सुटतं. सुकी ढोमी चुलीत भाजली, तर त्या वासानं शाकाहारी लोकांना जीव नकोसा होतो. पण फक्त त्या वासावर काही लोक चवीनं जेवतात.

त्यामुळे उग्र वासाचं अन्न आणायला 'परवानगी' नाकारणे हा शुद्ध अन्याय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

असं काहीही आणायचे स्वातंत्र्य असेल तर कपडे न घालण्याचं स्वातंत्र्य का हिरावून घेतलं जातं; ह्या अनुप ढेर्‍यांच्या शंकेचं पुन्हा कुणीतरी उत्तर द्या बुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काय रे सगळीकडे तेच विचारतोयस? तिथे उत्तर दिल्याचे स्मरते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भरतासाठी वांगे भाजतात तेव्हा येणारा वासही माशांच्या वासासारखाच डोक्यात जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शत्रुघ्नासाठी वांगे भाजताना (१) वास मारत नाही, की (२) (वास) माशांच्या वासासारखा नसतो, की (३) (पुन्हा, वास) डोक्यात जात नाही?

नेमके काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शत्रुघ्नासाठी काही भाजलेले वाल्मिकी रामायणात कोठे दिसले नाही (तुमचा प्रतिसाद पाहून आत्ताच पुन्हा संपूर्ण वाचून काढले Smile ). त्याच्यासाठी जे भाजतात किंवा न भाजतात त्याविषयी कल्पना नाही.

अवांतर: राम वनवासात असताना भरताने सन्यस्त वृत्तीने राहण्याचा निश्चय केला होता. शत्रुघ्नाने तसा निश्चय केला नसल्याने शत्रुघ्न रोष्टेड पूड ऐवजी फ्राईड किंबहुना डीप फ्राइड पदार्थ खात असेल. त्यामुळे वास येत नसण्याची शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सुकी ढोमी

हे काय असतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ढोमी नामक मत्स्यविशेष. मी तरी सुक्या मासळीतलाच ऐकला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

माश्याचा प्रकार आहे त्याला ढोमेली असे म्हणतात त्याच्या बरोबर दुसरा एक मासा येतो त्याला मांदेली म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणाकुणाकडे कढवल्या जाणार्‍या लोण्याचा वास (लोणी वाशेळे असल्यास) माझ्या डोक्यात जातो.

म्हणजे ते ऑल्मोस्ट रोज तुमच्यावर लादल्यास तुमची हरकत नसावी, कदाचीत तुम्हाला सवय होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ठीक,ह्याच न्यायाने तुमच्या अनुमत यादीत 'बॉडी ओडर' पण अंतर्भुत आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, बॉडी ओडर असू नये, असा संकेत आहे. आपण लोकांना हवंसं वाटलं पाहिजे, या इच्छेतून आलेला. तो काही नियम नव्हे. इथे नियमाबद्दल चाललं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आपण लोकांना हवंसं वाटलं पाहिजे, या इच्छेतून आलेला.

नाही, इतरांना आपल्या ओडरचा त्रास होउ नये ह्या विचारातुन आलेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरं, तसं असेल. संकेत आहे पण. नियम नाही. नियम करण्याला विरोध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मान्य!
अवान्तर -काही अपवादात्मक ठिकाणी हे केल्याले आहे . दुरिअन हे फणससदृश फळ काही ठिकाणी ( हॉटेल, सार्वजनिक वाहतूक) नेता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेघना http://mr.upakram.org/node/2770 येथील बोंबिल/ सामिष या विषयवरील उपचर्चा वाचावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सुक्या मासळीच्या वासाने कँटीनमधे बसलेल्या सर्व अ-मत्स्याहारी लोकांना जेवण बंद करण्याइतपत मळमळताना दिसते. तसं होत असू शकतं हे समजणं मला शक्य आहे. त्यामुळे मी स्वतः सर्वाहारी असलो तरी त्याचा त्रास इतरांना बर्‍यापैकी होऊ शकतो याची जाणीव असल्याने असे पदार्थ मी स्वतः डब्यात नेत नाही.

प्रत्येक ठिकाणी हक्क, कायदा आदि पातळीवर लढाईच करायची असते असे नव्हे. या गोष्टी समजून करण्याच्या आहेत. तसा कायदा करावा किंवा कसे याबद्दल मात्र साशंक आहे. विनंती किंवा सूचना लिहिण्याइतपत करायला हरकत नाही. यात मासे खाणार्‍यांची संख्या बहुसंख्य आहे की अल्पसंख्य हा मुद्दा नसून मांसाहारी आहारातले काही वास हे शाकाहारी लोकांना त्रासदायक ठरतात पण शाकाहारी पदार्थांतील बहुसंख्यांचे वास मांसाहारी लोकांना त्रासदायक ठरत नाहीत हा वास्तव मुद्दा आहे.

सर्वसाधारणपणे कोणी हपीसच्या कँटीनमधे बिनतंबाखूचा हुक्का ओढत असतील आणि धुराचा इतरांना त्रास होत असेल तर तसे सार्वजनिक जागी करु नये इतपत समजूत ठेवण्यासारखंच हे आहे. बिनतंबाखूचा हुक्का अशी कल्पना यासाठी केली की त्यात तंबाखूचे दुष्परिणाम हा अन्य फॅक्टर मिक्स होऊ नये.

-(शुद्ध मांसाहारी) गवि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येक ठिकाणी हक्क, कायदा आदि पातळीवर लढाईच करायची असते असे नव्हे.

तेच तर. साधे दोन विभाग करुन प्रश्न सुटू शकतो. कित्येक रेस्टॉरंट्समध्ये स्मोकिंग-नो स्मोकिंग विभाग असतात तसे इथे दोन वेगळे विभाग करता आले असते. थेट आणू नका वगैरे बंदीची भाषा आली की हक्काची भाषा येतेच.
शिवाय ज्यांना त्रास होतो त्यांनी आपली वेळ थोडी बदलून मार्ग काढावा.
मला त्रास होतो म्हणून इतरांनी काहीतरी करावं हा बालिशपणा झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कित्येक रेस्टॉरंट्समध्ये स्मोकिंग-नो स्मोकिंग विभाग असतात

काही हरामखोरांनी स्मोकींग झोन ठेवण्यावर पण बंदी आणवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तेच तर. साधे दोन विभाग करुन प्रश्न सुटू शकतो. कित्येक रेस्टॉरंट्समध्ये स्मोकिंग-नो स्मोकिंग विभाग असतात तसे इथे दोन वेगळे विभाग करता आले असते.

सर्व ठिकाणी, रादर बहुतांश ठिकाणी असे वेगवेगळे विभाग करणं जागेअभावी शक्य नाही. आमच्या हपीसात व्हेज नॉनव्हेज असे दोन वेगळे मायक्रोवेव्ह स्पष्ट स्टिकर लावून ठेवलेत तरीही नॉनव्हेज पदार्थ व्हेज साईडच्या ओव्हनमधे नेहमी गरम केले जातात.

थेट आणू नका वगैरे बंदीची भाषा आली की हक्काची भाषा येतेच. शिवाय ज्यांना त्रास होतो त्यांनी आपली वेळ थोडी बदलून मार्ग काढावा.

बंदीची भाषा, कायदा असे असू नये हे भाष्य वर केलंच आहे. बाकी वेळ बदलणे हा उपाय करण्यासाठी मुळात सर्वांना सर्वांची वेळ माहीत असली पाहिजे. मांसाहारी लोकांनी अमुक जागी (वेगळा विभाग) बसून किंवा कॉमन कँटीनमधे बसून पण दुपारी २ ते २:३० याच वेळात डबा खावा असा नियम केला तरी तेही शेवटी डिस्क्रिमिनेशनच.. त्यातही भेदभाव झालाच... त्यातही वेळेबाबत समजूत ठेवणे आणि स्वातंत्र्यसंकोच झालाच (वेळेच्या बंधनाने) इ इ.

मला त्रास होतो म्हणून इतरांनी काहीतरी करावं हा बालिशपणा झाला.

मी इतरांना त्रास होतो म्हणून मी काहीतरी टा़ळण्याविषयी बोलतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कित्येक रेस्टॉरंट्समध्ये स्मोकिंग-नो स्मोकिंग विभाग असतात तसे इथे दोन वेगळे विभाग करता आले असते.

द्याट इज़ सो नाइनटीन-नाइन्टीज़-इश, यू नो! अमेरिकेतील सध्याचा ट्रेंड पूर्णपणे नॉन-स्मोकिंग रेष्टारण्टांचा आहे. (बोले तो, १९९०च्या दशकात ज्या रेष्टारण्टांत स्मोकिंग-नॉनस्मोकिंग असे दोन वेगळे विभाग दिसले असते, त्यांपैकीसुद्धा बहुतांश रेष्टारण्टांत आजकाल ते तसे दिसत नाहीत. किंबहुना, बर्‍याच वर्षांत रेष्टारण्टात गेल्यावर 'टेबल फॉर टू/थ्री/जे काही असेल ते, नॉनस्मोकिंग' असे आवर्जून सांगितल्याचे वा सांगावे लागल्याचे आठवत नाही. याला कायद्याचे आंशिक पाठबळ जबाबदार असू शकेल.)

अर्थात, एखाद्या कामाच्या ठिकाणी खाण्याच्या जागेत मांसाहारास पूर्ण बंदी असावी अशा मताचा मी नाही (जरी ते मालकांच्या/व्यवस्थापनाच्या पूर्णपणे अधिकारात असले, तरी), परंतु तो स्वतंत्र मुद्दा झाला. (अधिक, ते माझे वैयक्तिक मत झाले; ते व्यवस्थापनावर बंधनकारक करण्याचा अधिकार मला नसावा.)

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रत्येक राज्याचे कायदे अर्थात वेगवेगळे आहेत; एकच देशव्यापी कायदा नाही. आमच्या जॉर्जियापुरते बोलायचे झाले, तर:

On July 1, 2005, the Smokefree Air Act went into effect, banning smoking statewide in all enclosed workplaces in Georgia, except as otherwise designated.[79] The Act exempts designated smoking areas in non-work areas of businesses that are separately ventilated, bars and restaurants where persons under 18 years of age are not employed or permitted to enter, separately enclosed smoking rooms in any bar or restaurant, private residences not used as healthcare or child daycare facilities, hotel/motel rooms designated as smoking rooms, retail tobacco stores, nursing homes, outdoor areas, designated areas in international airports, workplaces of a tobacco manufacturer or other tobacco business, privately owned meeting and assembly rooms during private functions where persons under 18 are not allowed, and areas of private places of employment (other than medical facilities) that are open to the general public by appointment only.[80] Local governments may regulate smoking more strictly than the state.[81] Buildings in which smoking is banned under the Act may have an outdoor smoking area that is located a reasonable distance from any entrance, exit, window, vent, or air intake system, but any ashtrays located there must be placed a reasonable distance away.[81] A violation of the Act is punishable by a fine of between $100 and $500.

(विकीवरून.)

थोडक्यात, सवलत देतानासुद्धा अशी दिली, की त्याकरिता रेष्टारंटवाल्याला विशेष कष्ट / खर्च उचलावे लागावेत१अ, अधिक बहुतांश ग्राहकांनाही ते कटकटीचे व्हावे (ज्याचा परिणाम अंतिमतः रेष्टारंटवाल्याच्या बॉटमलाइनीवर पडावा), तर मग बहुतांश रेष्टारंटवालेच "च्यायची मरो ती कटकट" म्हणून झक मारत आपापली रेष्टारंटे पूर्णपणे नॉन-स्मोकिंग करतात. (अर्थात, असे कायदे होण्याकरितासुद्धा मुळात बहुतांश नागरिकांची तशी सुप्त मागणी आणि/किंवा मूकपाठिंबा असावा लागतो, अन्यथा बोंबाबोंब होऊ शकतेच.)

१अ पूर्वी तत्त्वतः दोन वेगवेगळे विभाग असत, तेव्हासुद्धा त्या दोन वेगवेगळ्या खोल्या असतच, असे नाही; किंबहुना, बहुतांशी नसत, आणि असल्याच, तर बंदिस्त नसत. एकाच मोठ्या हॉलमध्ये एका काल्पनिक रेषेच्या या बाजूस स्मोकिंग आणि त्या बाजूस नॉन-स्मोकिंग, असला प्रकार म्हटल्यावर 'इकडून तिकडे गेले वारे'ला पूर्ण मुभा असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थेट आणू नका वगैरे बंदीची भाषा आली की हक्काची भाषा येतेच.

खाजगी मालकीच्या व्यवसायाच्या जागेत अशा प्रकारचे निर्बंध आणण्याचा हक्क मला वाटते मालकांच्या/व्यवस्थापनाच्या पूर्णपणे अधीन असावा. तसा तो आणणे हे उपयुक्त/डिझायरेबल आहे की नाही (कोणाला?), हा वेगळा मुद्दा.

तत्त्वतः, खाण्याच्या सुट्टीच्या वेळेत बाहेरील एखाद्या रेष्टारंटात (उपलब्ध असल्यास) जाऊन मांसाहार करून येण्यापासून कर्मचार्‍यांना कोणीही अडवू शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मालकी हक्काने पाहायला गेलं तर फक्त शेअरहोल्डर्स/ मालकांना हा हक्क पोचतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रॉक्सीने हा अधिकार (मालकांच्या/शेअरहोल्डरांच्या वतीने) व्यवस्थापनास पोहोचतो.

अर्थात, योग्य वाटले / गरज वाटली, तर मालक / शेअरहोल्डर तो अधिकार ट्रम्प करू शकतातच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय. पण हा हक्क बजावण्याचे कारण झुंडशाही असेल तर काळजीचे कारण आहेच.
मुंबईत काही वस्त्यांमध्ये विशिष्ट पंथीय लोकांनी त्या वस्तीतल्या उपाहारगृहांमध्ये मांसाहार असू नये म्हणून आंदोलने केली होती; त्याचा परिणाम म्हणून एखाद्या उपाहारगृहाने मांसाहार देणे बंद केले तरी तो त्या मालकाचा हक्कच असेल पण आंदोलनकर्त्यांना आंदोलन करण्याचा हक्क मात्र सर्व लोकांनी दिलेला आहे त्यात मांसाहारीही आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(असा) हक्क देणार्‍या मांसाहारींची बहुसंख्या असेल तर त्यांनी संघटित होऊन अधिक मोठी झुंड बनवून आंदोलन हाणून पाडण्यास कोणाचाच तात्त्विक विरोध असण्याचे काही कारण नसावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एग्झॅक्टली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येक ठिकाणी हक्क, कायदा आदि पातळीवर लढाईच करायची असते असे नव्हे.

का? हे ज्या व्यक्तीवर अन्याय होतो, जिला आपला हक्कभंग होतो असं वाटतं; तिनं ठरवायचं. कुणी कुठे लढाई करायची आणि कुठे नाही, हे आपण कसं ठरवणार?

त्याचा त्रास इतरांना बर्‍यापैकी होऊ शकतो याची जाणीव असल्याने असे पदार्थ मी स्वतः डब्यात नेत नाही..

असंच वाक्य जर रधोंनी म्हटलं असतं, तर? त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा इतरांना त्रास होतो, म्हणून त्यांनी स्वतःहून 'समाजस्वास्थ्य' बंद करावं, असं म्हणण्यासारखं आहे. शिवाय वासाचा त्रास होतो, तर तुम्ही दुसर्‍या वेळी जेवा. आरोग्याला अपाय होत असता, तर गोष्ट निराळी आहे. (मी डब्यात कधीही मांसाहार नेत नाही. मला शिळ्या आम्लेटाचा वास सहन होत नाही. पण म्हणून लोकांनी माझ्यासाठी डबे बदलावेत, अशी अपेक्षा कशी करणार?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>>जिला आपला हक्कभंग होतो असं वाटतं; तिनं ठरवायचं. कुणी कुठे लढाई करायची आणि कुठे नाही, हे आपण कसं ठरवणार?

बरोबर. पण त्या लढाईत सगळ्यांनी सामील व्हावेच अशी अपेक्षा करू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खिक! अर्थात! हे आपलं तुमचं काहीतरीच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

त्याचा त्रास इतरांना बर्‍यापैकी होऊ शकतो याची जाणीव असल्याने असे पदार्थ मी स्वतः डब्यात नेत नाही..

असंच वाक्य जर रधोंनी म्हटलं असतं, तर? त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा इतरांना त्रास होतो, म्हणून त्यांनी स्वतःहून 'समाजस्वास्थ्य' बंद करावं, असं म्हणण्यासारखं आहे.

बिनतोड मुद्दा आहे. मुळात मी इथे कोणी जबरदस्तीने मांसाहारी डबाबंदी करावी या मताचा नाहीच आहे. मुळात मत मांडलंय तेच इतरांना त्रास होतोय याची जाणीव असूनही आपल्या मार्जिनल आनंदासाठी दाबून तसेच पदार्थ नेण्याविषयी आहे.

रधोंच्या कार्याविषयी त्यांना स्वतःला जशी खात्री होती की हे कार्य अंतिमतः समाजासाठी आणि स्वतःसाठी उत्तम आहे.. तेव्हा त्यांनी ते चालू ठेवलं.

अर्थातच नॉनव्हेज अन्न कामाच्या ठिकाणी लंचमधे नेण्याने मिळणारे आहारशास्त्रीय फायदे अत्यंत इनडिस्पेन्सिबल असतील तर जरुर मांसाहार डब्यात आणावा.

इथे मुद्दा फक्त आपल्याला हे टाळणे शक्य आहे असे गृहीतक धरुन दिला आहे. माझी मांसाहाराची आवड रात्रीच्या जेवणात किंवा रविवारी पूर्ण करुन शिवाय मला इतरांना त्रासदायक न ठरणे शक्य आहे असे असेल तरच (आणि ते मजबाबत खरे असल्याने) मी दुपारी आपल्या हपीसात अनेकांना त्रास होत असल्यास मांसाहारी जेवण नेऊ नये असं मत मांडलं.

कायद्याने अशी सक्ती होऊ नये याबाबत सहमती मुळातूनच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा इतरांना त्रास होतो, म्हणून त्यांनी स्वतःहून 'समाजस्वास्थ्य' बंद करावं, असं म्हणण्यासारखं आहे.

सामाजिक औचित्य न पाळण्याचे दुरगामी सामाजिक सुपरिणाम आणि औचित्य पाळण्याचे दुरगामी सामाजिक दुष्परिणाम रधोंनी पटवून दिले होते, तुम्ही सांगणार काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या हापिसात केला असला आचरट नियम, तर नियम मोडीन आणि मग पाठोपाठ पत्रक काढून देईन पटवून. तोवर इतक्या चर्वितचर्वणावरच समाधान मानणं तुम्हांला भाग आहे बघा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

असं मात्र रधो म्हणाले नव्हते बघा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग? इथून पुढे त्यांनी काय केलं नि काय नाही ते विचारायला, त्याचं औचित्य-अनौचित्य ठरवायला, रधोंनाच भेटा बघू. (च्यामारी, एका उदाहरणात नाव काय वापरलं रधोंचं, मानगुटीवरच बसले राव! ;-))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सुकट वाकट बोंबिल इत्यादी च्या वासाने कुणाच्या तोंडात लाळ गळायला सुरवात होते तर त्याच वासाने कुणाची भुक मरते व मळमळायला लागत. एकाचा वासाचा काय हा महिमा.एकदा ऒफिस मधे बोंबलाच्या वासाने एका सहकार्‍याच्या तोंडातुन चक्क लाळ गळायला लागली तर मला त्या वासाने मळमळ झाली. इतर सामिष वासांचा त्रास होत नाही. पण काही वास उग्र असतात त्याबाबत काहींच डोक उठत. काहींच्या बाबत हा संवेदनशील मुद्दा असतो हे मात्र खरे. http://mr.upakram.org/node/2770 येथील उपचर्चा वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मुद्याचा जरूरीपेक्षा जास्त कीस काढल्याचे पाहून अर्थातच नवल वाटले नाही.

जेवणाचे प्रकार, कपडे, झालंच तर बॉडी ओडर या ३ गोष्टी तुलनीय कशा काय आहेत बरे? एकीचा हवाला देऊन दुसरी का समर्थनीय आहे इ. पृच्छा तर श्वानं युवानं मघवानमाह ची आठवण करून देतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुद्दा किस पाडण्याचा नसुन औचित्य पाळण्याचा आहे. खाणार्‍याप्रमाणेच ज्याच्या अंगाचा वास येतो त्याला त्याचा त्रास होत नाहीच, इतरांनाच होतो, तो येउ नये अशी व्यवस्था करणे म्हणजे 'फक्त' औचित्य पाळणे होय. त्यासाठी कायदे वगैरे करावे(करु नयेत) लागत नाहीत हेही खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विविध औचित्यांचा प्राधान्यक्रम कसा ठरवणार?

की भला उसका औचित्य मेरे औचित्य से ज्यादा औचित्यपूर्ण कैसा अशी चढाओढ सुरू आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Wink कंपनीच्या लेटरहेडवर सही करण्याची सत्ता असणारे प्राधान्यक्रम ठरवतात, कधी कधी सांबारही वास मारते पण त्यावर बंदी येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखादा नियम कैच्याकै असला तर चड्डीत राहून बंड करायचे स्वातंत्र्यही सही करणार्‍यांना असते-असावे. बाकी आमच्या जिव्हाळ्याच्या सांबाराला तुम्ही उगीच वादात ओढण्याचे कारण नव्हते. प्रस्तुत विषयाची चटणी उडवल्याशिवाय सांबार वर्ज्य आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आता मात्र असे वाटू लागलेय की नियमावली या विषयावर फारच सेन्सिटिव्हिटी काही बाबतीत सिलेक्टिव्हली होतेय.

- इथे आपण जे सर्वजण कॉमेंटतो आहोत त्यातले जे लोक हपीसच्या सिस्टीमवर आहेत त्यांतल्या जवळजवळ सर्वांनी लॉगिन करतानाच "इथल्या प्रत्येक हालचालीचा लॉग ठेवला जाईल, मॉनिटरिंग केले जाईल, प्रायव्हसीचा हक्क या सिस्टीमच्या वापराबाबत लागू नाही अशा आशयाचा "नियमा"चा पॉपअप स्वीकारुन लॉगिन केलेलं असणार. मी माझ्या ऐसीअक्षरे किवा अन्य खात्यांवर काय करतो यावर नुसता वॉच ठेवणेच नव्हे तर त्यावर एन्क्वायरी करणे हाही हक्क कंपनीला आहे. कारण मी त्यांचा नोकर आहे, मी त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर वापरतो आहे. कँटीन, क्युबिकल्स, ऑफिस स्पेस हे सर्व कंपनीचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे.

- मुळातून आपल्याला कंपनीने दिलेले काम दिलेल्या वेळेत पूर्ण करणे बंधनकारक असून पैसे मिळताहेत म्हणून आपण स्वातंत्र बर्‍याचश्या प्रमाणात त्यागून आपल्या असाईनमेंट्स, व्हेदर वुई वाँट टू डू इट ऑर नॉट.. पूर्ण करुन देतो. मला प्रचंड कंटाळा आलाय किंवा हे काम मला अजिबात आवडत नाही म्हणून ते न करण्याचे स्वातंत्र्य मला (किंवा कोणत्याच नोकराला) नाही.

- भले आपण आपलं अत्यंत आवडतं क्षेत्रच निवडलं आहे आणि स्वतःचाच व्यवसाय आहे, तरीही फायनान्सर, ग्राहक आणि अन्य घटकांच्या मर्जीनुसार आपल्याला वेळा, नियम सांभाळावेच लागतात. ज्यांच्याशी सिंबायोसिस करुन आपण राहतो त्यांच्यानुसार आपल्या स्वातंत्र्याला आणि आचारांना सदैव लिखित आणि अलिखित नियमांचं बंधन पडतंच.

- हे सर्व जाऊदे.. लग्न करुन जोडीदार सोबत आला तरीही आपल्या एखाद्या गोष्टीने त्याला त्रास होत असला तर ती गोष्ट टाळण्याचं बंधन येतंच.. तसं न केल्यास हे बंधन बिघडू शकतं.

व्यक्तिगत व्यवसाय आणि घरगुती आयुष्यातले नियम सध्या बाजूला ठेवले तरी कंपनीच्या प्रिमायसेस बाबत...?!

अंगाची दुर्गंधी, जेवणाला (कंपनीतील अन्य सहकार्‍यांच्या मते) उग्र वास, तोंडाला मीटिंगमधे कांद्याचा भकाभका वास, धूम्रपान, जोरात ओरडून बोलणे, मोबाईलवर गाणी लावणे, जागेवर झोपणे , वर्कस्टेशनवर अन्न खाणे/सांडणे... इत्यादि अनेक बाबतीत कंपनी असे गृहीत धरते की सर्वांना या गोष्टींचे भान आहे.

पण तसे नाही असे मोठ्या प्रमाणावर दिसल्यास कंपनी आपल्या आवारात कोणते बंधन पाळावे याबद्दल नियमावलीच्या स्वरुपात यापैकी कोणत्याही स्वातंत्र्याचा संकोच करु शकते आणि तसा केल्यास खास वेगळा स्वातंत्र्यसंकोच झाला असे मानून दु:खी होऊ नये कारण आगोदरच बर्‍याच बाबतीत तुम्ही कंपनीला नियमांनी बांधील आहात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रतिसाद वाचून मला प्रश्न पडला आहे, गविंचं म्हणणं तरी नक्की काय आहे?

कंपनीचे नियम लोकांना जोवर अन्यायकारक वाटत नाहीत (नियम पाळण्याबदल्यात मिळणारे पैसे, नियम पाळल्यामुळे होणार्‍या गैरसोईंपेक्षा जास्त आहेत असं लोकांना जोवर वाटतं), तोवर लोक बिनतक्रार नियम पाळतात. त्याबद्दल दस्तुरखुद्द लोक सोडून इतर कुणाचीही तक्रार असली, तरी त्याला कुणी कुत्रंही विचारत नाही. हे सगळ्यांना ठाऊक आहे, मान्य आहे.

इथे वेगळाच विषय चालला आहे. काही लोकांना त्रासदायक वास येतो (आरोग्याला अपाय संभवत नाही), म्हणून काही लोकांच्या खाण्याच्या सवयींवर बंधनं आणली जावीत की न जावीत, असा विषय आहे. या विषयाबद्दल मत असण्याचा आणि कंपनीतून लॉगिन करून ऐसीवर टंकन करण्याचा नक्की संबंध काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

या विषयाबद्दल मत असण्याचा आणि कंपनीतून लॉगिन करून ऐसीवर टंकन करण्याचा नक्की संबंध काय आहे?

म्हणजे असं की स्वातंत्र्य स्वातंत्र्य, नियम, व्यक्तिगत आचारांची मोकळीक आदि सर्वकाही आपण बर्‍याच पातळ्यांवर कंपनीकडे गहाण ठेवतच असतो, त्यात आणखी एकदोन नियम जरी आले (खाण्याविषयी) तरी त्याच्याखेरीज अनेक पातळ्यांवर आपण व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच मान्य करुनच राहात असतो. अशा वेळी या विशिष्ट नियमाने कोणतीही कंपनी विशेषकरुन जाचक बनते असे म्हणण्यात अर्थ नाही.

कंपनी कॅन मेक सच रुल्स लाईक मेनी अदर रुल्स ऑलरेडी अ‍ॅक्सेप्टेड बाय अस व्हेन वुई वर्क विथ देअर इन्फ्रा.

इंटरनेट वापराचं (ऐसीवर मत देण्याचं नव्हे) उदाहरण अशासाठी की ऑफिसचा कॉम्प्युटर, ब्रॉडबँड आदि कंपनीचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि तसेच ऑफिसचे कँटीनही..

त्यांचे नियम आपण इतरत्र स्वीकारतोच.. प्रॉक्सीने साईट्स बॅन केल्या असतील तर आपण ऑफिसातून त्या पाहू शकत नाही. आज ऐसी दिसतंय, उद्या दिसेल असं नव्हे.. मग मला रात्री घरुन कनेक्ट करुनच माझा इथला संचार करता येईल.

तिथे तर नुसता नियमच नसतो तर बळंच आपल्याला एका विशिष्ट साईटसंचारापासून रोखलेलं असतं. ते कसं चालतं ?

त्यामुळे कँटीनात वास पसरणारे पदार्थ आणू नयेत किंवा तत्सम नियमात काही वेगळे नाही.

घरी किंवा अन्यत्र काय करावे हे कंपनी सांगत नाहीये याची कृ नों घे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर कंपनीचे बहुसंख्य कर्मचारी कट्टर शाकाहारी असतील तर अशा स्वरुपाचे नियम कंपनी करु शकते हा स्वानुभव आहे. माझ्या पूर्वीच्या कंपनीत बाहेर गाड्यांवर मिळतात तसे अंड्याचे पदार्थ ताबडतोब समोर करुन देणाऱ्या स्वरुपाचा एक स्टॉल कंपनीच्या केटररने कँटीनच्या एका कोपऱ्यात सुरु केला होता. मात्र शाकाहारी लोकांनी प्रचंड आरडाओरडा सर्वत्र करुन तो स्टॉल तिथून हटवण्याची व्यवस्था केली.

अशी बंदी आणली जाऊ नये असे वाटते. चायनीज लोकांचे पदार्थ आपल्याला उग्र वासाचे वाटत असतील तसेच आपले 'सामान्य शाकाहारी' पदार्थ इतरांना उग्र वासाचे वाटत असतीलच. हे टाळण्यासाठी एक तर सर्वांनी (कांदा-मुळा व तत्सम उग्र वासाच्या भाज्या न घातलेले) सॅलड खाणे किंवा एकमेकांच्या खाद्यसवयीचा आदर राखणे (व जेवल्यावर हात स्वच्छ धुवून नंतर मिंट च्युईंगगम किंवा बडीशेप खाणे) असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. दुसरा पर्याय सुयोग्य वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द हिंदुच्या बैलाला ठ्ठो करून त्याचेच मांस त्याच्याच क्यांटिनात खावे हो!!!!!!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लै दिसांनी एक जुना टीआरपी पेश्शल शाकाहार-मांसाहार विषय आला. आल्याआल्या त्यात ad hominem ही आले, लगेच विषय स्युडो सेक्युलर वर ही गेला, मग अल्पसंख्यांसाठी बहुंसंख्यांना का त्रास?' अस म्हणत तो ही विषय लगेच आलाच, बरं मुळात कोण अल्पसंख्य नि कोण बहुसंख्य याचे अज्ञानमूलक म्हणा वा कायम गृहितकावरच जगण्याचा/ बेफाट बोलण्याचा सरावही लगेच सुरू झाला. आता फक्त धर्म नि राजकारण हे दोन विषय यात कसे घुसतायत याविषयी उत्सुकतेने वाट पाहत आहे.

मज्जा. चला पॉपकॉर्नचे दुकान लावायची वेळ झाली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

परफेक्ट.. अगदी खुट्ट झाले तरी गाडी लगेच (स्युडो) सेक्युलरिजमवर कशी येते याचे आश्चर्य वाटलेच होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरीही अजून नेहेमीचे यशस्वी कलाकार स्त्री विरुद्ध पुरुष (स्त्रीवादी वि. शॉव्हनिस्ट नाही), अनिवासी-निवासी हे रमताराम यांना आठवले नाहीतच. रमताराम यांचे पॉपकॉर्न चामट झाले असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वय झालं आणि आताशा मराठी संस्थळावरचे येणेजाणे कमी झाले. तेव्हा जरा विस्मृतीचा पडदा आहे इतकेच. आणि हो महत्वाचा म्हणजे 'जात' हा एक मुद्दा राहिला. तो येणारच बघ, नक्की. शिवाय मुंबईतील गुजरातींच्या शाकाहारी सोसायट्या नि तिथे मराठी माणसाला जागा न मिळणे हा एक मुद्दा नेहेमी येणारा, पण सध्याच्या स्थितीत हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता जरा कमी वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

माझी एक नमो नमः मैत्रिण दलाई लामांना 'मलाई लामा' म्हणायची (अज्ञानाने) हे ईथे उगिचच आठवले....(त्यावर आम्हीहि काहितरी म्हणायचो, पण ते ईथे अवांतर होईल म्हणुन जाउदेत..)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डु पोस्ट, आणि हि खालची पोस्ट पण आदितीच्या चामट पॉपकॉर्न च्या पोस्ट खाली हवी होती....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतरही झाले, तुम्ही केल्यामुळे बहुदा ट्रोलिंग म्हणणार नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही केल्यामुळे बहुदा ट्रोलिंग म्हणणार नाही. >> हे प्रिविलेज मला आहे हे माहित नव्हतं. च्यामारी ट्रोलिंग करण्यात अपुन येक्स्पर्ट. दे धुमशानच घालतो आता, थांबा जरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

हा हा हा.

हे हिंदूने केले म्हणून हा प्रतिसाद आला. हेच उजव्या लोकांनी केलं असतं तर विडंबनं पडली असती, हो की नै गुर्जी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगदी. पण इथे आपलेच दात आणि आपलेच ओठ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हेच उजव्या लोकांनी केलं असतं तर विडंबनं पडली असती, हो की नै गुर्जी?>> कोणी रे कोणी? आणि आता कुणी हात, तोंड, कळफलक धरलंय विडंबन पाडणार्‍याचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

वस्ताद ओ गुर्जी. पण असोच्च. बर्‍यापैकी सर्वांचे बायस कळालेत त्यामुळे अलं विस्तरेण Smile त्याने कै तादृश फरक पडतो असे नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो पडलं की विडंबन या लेखाचं. तुम्ही वाचलं नाही का ते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्र हो की. ते राहूनच गेलं पहायचं. गुर्जी रॉक्स! विधान मागे घेत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ट्यार्पी खेचायला हा पेडन्यूजसारखा प्रकार आहे.
विडंबनावर बॅटमॅनची १९ तारखेची प्रतिक्रिया आहे.
तरीही त्याला पैसे देऊन आज इथे असा प्रतिसाद द्यायला लावलाय.
मग त्यानी तिथे प्रतिक्रिया देऊन तो धागा पुन्हा वर आणलाय.
पण जनता दुधखुळी नाही.
ती तुम्हाला माफ करणार नाही.
आता चांगले दिवस येणारेत. (बैलांना आणि गाईंना)
'हिंदू' ला बैलांचा पाठिंबा!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

तुमचं वाचन कमी पडतंय हो. बॅटमॅन, अजो, घासकडवी असा नवा अक्ष तयार झालाय. वाचन वाढवा बैलोबा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ट्यार्पी खेचायला हा पेडन्यूजसारखा प्रकार आहे.

ओ बैलोबा, उगाच आम्हाला शिव्या देऊ नका. तुम्हाला जर आम्ही पैसे देतो असं वाटलं तर लोकायुक्तांकडे किंवा इलेक्शन कमिशनकडे तक्रार नेऊन द्या. पण मला दिसेलच मशीनवर कोणी तक्रार केली ते. मग त्या बैलाची वैरण तोडली जाईल आधीच सांगून ठेवतो.

बॅटमॅनने मुद्दाम विसराळूपणा करून बैलाचा राग माझ्यावर ओढवावा अशी व्यवस्था केलेली आहे ही. हे राजकारण आहे, नाही समजणार तुम्हाला.

आणि एक सांगा, अरुण जोशींनी असं काही केलं असतं तर बोलला असतात का? जोशीष्ट कुठले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथल्या चर्चेचा (मूळ) विषय पाहून मला एक बंगाली मित्र आठवला. जातीने .. त्याने सांगितलं म्हणून समजलं. मला बंगाली समाजाबद्दल फार माहिती नसल्यामुळे रॉय, पात्रा, बासू, सेनगुप्ता सगळे एकाच जातीचे, बंगाली - बटाटेखाऊ (किंवा सिग्रेट ओढणारे).

तर हा बंगाली मित्र म्हणायचा, "मी शाकाहारी आहे." माझ्या समोरच त्याने कोंबडी, माशांना सद्गती दिल्याचं पाहिलं होतं. त्यामुळे मला काही हे समजेना. पण या प्राण्याकडे नेहेमीच काहीतरी तिरकस तर्क असतो, म्हणून विचारलं, "ते कसं रे?" तर म्हणे, "मी इथे या कँटीनमधे खातो. होस्टेलमधे शिजवून खायचं तर होस्टेलात पुरेशी सोय नाही. आहे या पगारात बाहेर भाड्याचं घर घेऊन राहणं परवडणार नाही. त्यामुळे कँटीनमध्ये खाणं माझ्यावर लादलं जातं. तिथे आठवड्यातल्या १४ जेवणांपैकी फारतर एका वेळेस नॉनव्हेज मिळतं. मी महिन्यातून एखाद-दोन वेळा बाहेर जाऊन नॉन व्हेज खातो. म्हणजे महिन्याच्या ६० जेवणांपैकी साधारण ६ जेवणं नॉनव्हेज. याचा अर्थ मी ९०% शाकाहारी आहे. ९०% मोठं का १०%, याचं गणित तुला कठीण नाही."

आणि हे सगळं करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या, सरकारी, धर्मनिरपेक्ष ठिकाणी चालत असे.

(अतिअवांतर - हा मित्र आणि मी दोघेही विज्ञान शिकणारे म्हणून हा सगळा तर्क त्याने उलगडून सांगितला. एखादा कलात्मक चित्रपट असता तर दोन व्यक्तिंमधल्या संवादातली पहिली दोन वाक्यं दाखवली असती. आणि चित्रपटभर, अधूनमधून हे ९०%-१०% विदेचे प्रसंग दाखवून ते सिद्ध केलं असतं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण खाल्ल्यानंतर पब्लिक टॉयलेटमध्ये दुर्गंध निर्माण करणार्‍यांना कामावरून काढलं पाहिजे असे आमचे ठाम मत आहे.

-क्लॉसेटेड सेक्युलर

१. प्रश्न विचारण्याआधी अभ्यास करा.
२. २+३

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

राजस्थान /गुजराथ व अन्य उत्तर-पश्चिमे कडील अनेक राज्यातील बहुतांश कंपन्या मध्ये हा नियम कडकपणे लागू आहे. कंपनी कॅंटीन मध्ये तर कोणताही अ-शाकाहारी पदार्थ मिळणार नाहीच ,पण कंपनी /कॅंटीन /मेस परिसरात टिफीन /पार्सल मधुनही मांसाहारी पदार्थ आणता/ खाता येत नाही.

रिलायन्स /टाटा व बिर्ला समुहाच्या कंपन्यांच्या उच्चपदस्थ पार्ट्या /सभा स्थानी देखील हाच नियम लागू आहे (अगदी मुंबई /दिल्लीत सुद्धा) असे ऐकून आहे ...

जय शाकाहार !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre